आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 11, 2018

दांडिया / गर्बा


तारिख ११ ऑक्टोबर २०१८.
आश्र्विन नवरात्र

दांडिया / गर्बा

23843662_1957651714492516_1265494419088995305_n
39976844_309347376311923_6275028716460441600_n

रांगोळी महालक्ष्मी देऊळ


मागील वर्षी महालक्ष्मि
महालक्ष्मी देऊळ येथील रांगोळी

21765090_881017475408357_62574989174080156_n

दुर्गा स्तोत्र


श्री दुर्गा स्तोत्र
श्री युधिष्ठिर विरचितं
।। श्रीगणेशाय नम: । श्रीदुर्गायै नम: ।।
नगरात प्रवेशले पंडुनंदन । तो देखिले दुर्गास्थान ।
धर्मराज करी स्तवन | जगदंबेचे तेधवा ।। १ ।।
जय जय दुर्गे भुवनेश्वरी । यशोदागर्भसंभवकुमारी ।।
इंदिरारमण सहोदरी । नारायणी चंडिकेंबिके ।। २ ।।
जय जय जगदंबे विश्वकुटुंबिनी । मूलस्फुर्ति प्रणवरुपिणी ।। ३ ।।
जय जय धराधरकुमारी । सौभाग्यगंगे त्रिपुरसुंदरी ।
हेरंबजननी अंतरी । प्रवेशी तू आमचे ।। ४ ।।
भक्तहृदयारविंदभ्रमरी | तुझे कृपाबळे निर्धारी |स्तोत्र
अतिमूढ निगमार्थ विवरी | काव्यरचना करी अद् भुत ।। ५ ।।
तुझिया कृपावलोकने करून । गर्भावासीस येतील नयन ।
पांगुळा करील गमन । दूर पंथे जाऊनी ।। ६ ।।
जन्मादारभ्य जो मुका । होय वाचस्पतिसमान बोलका ।।
तू स्वानंद-सरोवर-मराळिका । होसी भाविका सुप्रन्न ।। ७ ।।
ब्रह्मानंदे आदिजननी ।तव कृपेची नौका करुनी ।
दुस्तर भवसिंधू उल्लंघुनी ।निवृत्तितटा जाईजे ।। ८ ।।
जय जय आदिकुमारिके ।। जय जय मूळपीठनायके ।
सकल सौभाग्यदायिके । जगदंबिके मूलप्रकृति ।। ९ ।।
जय जय भार्गवप्रिये भवानी । भयनाशाके भक्तवरदायिनी ।
सुभद्रकारिके हिमनगनंदिनी त्रिपुरसुंदरी महामाये ।। १० ||

श्री दुर्गा स्तोत्र
श्री युधिष्ठिर विरचितं
जय जय आनंदकासार मराळिके । पद् मनयने दुरितवनपावके |
त्रिविधतापभवमोचके । सर्व व्यापके मृडानी ।। ११ ।।
शिवमानसकनकलतिके । जय चातुर्यचंपककलिके ।
शुंभनिशुंभदैत्यान्ति के ।निजजनपालके अपर्णे ।। १२ ।।
तव मुखकमलशोभा देखोनी । इंदुबिंब गेले विरोनी ।
ब्रह्मादिदेवा बाळे तान्ही । स्वानंदसदनी निजविसी ।।१३ ।।
जीव शिव दोन्ही बाळके । अंबे त्वां निर्मिली कौतुके ।
स्वरूप तुझे जीव नोळखे । म्हणोनी पडिला आवर्ती ।। १४ ।।
शिव तुझे स्मरणी सावचित । म्हणोनि तो नित्यमुक्त ।
स्वानंदपद हाता येत । तुझे कृपेने जननीये ।। १५ ।।
मेळवूनि पंचमहाभूतांचा मेळ त्वां रचिला ब्रह्मांडगोळ ।
इच्छा परतता तत्काळ क्षणे । निर्मूळ करिसी तू ।। १६ ।।
अनंत बालादित्य श्रेणी ।। तव प्रभेमाजी गेल्या लपोनी ।
सकलसौभाग्यशुभकल्याणी । रामारमणवरप्रदे ।। १७ ।।
जय शबररिपुरवल्लभे । त्रैलोक्यनगरारंभस्तंभे ।
आदिमाये आत्मप्रभे । सकलारंभे । मूलप्रकृति ।। १८ ।।
जय करुणामृतसरिते । भक्तपालके गुणभरिते ।
अनंतब्रह्मांडफलांकिते । आदिमाये अन्नपूर्णे ।। १९ ।।
तू सच्चिदानंदप्रणवरुपिणी । सकलचराचरव्यापिनी ।
सर्गस्थित्यंतकारिणी । भवमोचनी ब्रह्मानंदे ।। २० ।।
ऐकूनि धर्माचे स्तवन ।दुर्गा जाहली प्रसन्न ।।
म्हणे तुमचे शत्रू संहारीन ।राज्यी स्थापीन धर्माते ।। २१ ।।
तुम्ही वास करा येथे । प्रगटो नेदी जनात । शत्रू क्षय पावती समस्त ।
सुख अद् भूत तुम्हां होय ।। २२ ।।
त्वां जे स्तोत्र केले पूर्ण । ते जे त्रिकाल करिती पठण ।
त्यांचे सर्व काम पुरवीन । सदा रक्षीन अंतर्बाह्य ।। २३ ।।
इति श्री युधिष्ठिर विरचितं दुर्गा स्तोत्रम् समाप्तम् ||

21768021_881109755399129_5870407247102287151_n

%d bloggers like this: