आकाशवाणी कोल्हापूर माझी मुलाखत दखल / पत्रकार किशोर कुलकर्णी यांनी घेतली!
ॐ
तारिख १० नोव्हेंबर २०१८ ला
आकाशवाणी कोल्हापुर केंद्र येथे
ब्लॉग वाल्या आजीबाई ची मुलाखत झाली.
तर त्याची दखल पत्रकार किशोर कुलकर्णी जळगाव यांनी
त्यांच्या फेस बुक मध्ये मुलाखत आढावा / दखल दिली आहे.
त्या बद्दल त्यांचे अभिनंदन! शुभेच्छा! धन्यवाद !
मी आढावा / दखल वसुधालय ब्लॉग मध्ये वाचण्यास देत आहे.
तरी आपण जरूर वाचून प्रतिक्रिया द्यावी ईच्छा.
वसुधालय ब्लॉग वाल्या आजीबाई
Kulkarni Kishor
12 November at 08:09 ·
https://vasudhalaya.wordpress.com/…/%E0%A4%86%E0%A4%95%E0%…/
माझ्या 76 वर्षांच्या फेसबुक मैत्रीण ज्यांची ओळख मी लेख आणि पुस्तकाच्या माध्यमातून ‘ब्लॉगवाल्या आजीबाई’ अशी करून दिली त्या वसुधा चिवटे यांची परवा कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावर खूप छान मुलाखत झाली. त्यांनी आपल्या मुलाखतीत माझा आवर्जून उल्लेख केला. या वयातही त्यांचा उत्साह त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या आम्हापेक्षा दांडगा आहे. कौतुक हे आहे की रात्री 10 ला मुलाखत संपली आणि लगेच रात्रीच्या रात्री त्यांनी रेकॉर्ड केलेली मुलाखत आपल्या ब्लॉग आणि फेसबुकवर अपलोड ही केली…
या माझ्या ब्लॉगवाल्या आजीबाईंचा खरोखरीच आदर्श घेण्यासारखा आहे…
आवडलं तर नक्की कॉमेंट करा अधिकच आवडली तर शेअर जरूर करा…