अनारसे घरी केले ले ! ब्लॉग वाल्या आजीबाई
ॐ
जेष्ठ अधिक महिना
अधिक महिना त अनारसे वाण दिले
आत्या सासूबाई / प्रकाश राव !
ॐ
जेष्ठ अधिक महिना
अधिक महिना त अनारसे वाण दिले
आत्या सासूबाई / प्रकाश राव !
ॐ
काल तारिख २९ जानेवारी २०१९ इंटरनेट चे पैसे भरायला गेले ली.
येतांना थोड चालत आले.
सायकल वाले भाजी घेऊन दिसले.
चाकवत पेंडी जूडी १० रुपये ला घेतली.
देठ सगट निवडली,धुतली विळी ने चाकवत भाजी चिरली.
भांड मध्ये भाजी पाणी घालून शिजविली.
दही त हरबरा पिठ ,लाल तिखट मिठ. हळद घातली.
सर्व भाजीत घातले उकळू दिले.
मस्त चाकवत पाला भाजी दही घालून भाजी केली !
ब्लॉग वाल्या आजीबाई !
चाकवत भाजी पाला !
दही !
तयार चाकवत भाजी !
ॐ
३० जानेवारी २०१७
महात्मा गांधी
गांधी बाप्पा
आत्ता ११ वाजतां
मि व प्रणव देवा पुढे
घरी दोन २ मिनिट उभे राहिलो
पूर्वी शाहू मिल चा भोंगा ऐकू येत असे
आत्ता शाहू मिल बंद आहे
नमस्कार !
मी लहान असतांना हैद्राबाद येथे होतो
तेथे मोठ्ठा मैदान मध्ये
महात्मा गांधी यांची सभा होती
खूप उंच बसलेले दिसले
तसे मी लहान होते पण दिसले नक्की चं
महात्मा गांधी
नमस्कार
मी माझी आई ( सौ वहिनी) गंगा ( सौ काकू )
सौ आत्याबाई व ईतर तेथील बायका
चालत चालत मैदान मध्ये गेलोलो आठवत
खूप लांब मैदान होत फत्ते मैदान !
माझी सख्खी बहिण कमल ताई यांनी
मैदान चं नाव सांगितले आहे .
मी त्या मैदान चं नाव विचारून लिहीन नंतर
माझ्या भावांना माहित असणार
येतांना माझ्या गंगा काकू ने निशा ला चुलत बहिण
हिला कडेवर घेतले
तसेच माझ्या आईने पण मला कडेवर घेतले
खूप चालून झाल्या नंतर गंगा म्हणाल्या
निशा कुठे निशा कुठे
तर आत्या बाई म्हणतात आ हो तुमच्या कडेवर चं
निशा आहे नां
कसं असतं बघा आपलं चं आपल्याला जड होत नाही
नंतर आठवत होत तेंव्हा कुणी तरी गोष्ट म्हणा
किंवा सहज अनुभव सांगितला असणार
आज महात्मा गांधी
यांची आठवण
नमस्कार
ॐ
हस्ताक्षर ! पोष्ट ने आलेली पत्र ! मी सतार परीक्षा पास झाल्या च पोष्ट च पत्र !
साल १९८९ ! एप्रिल ! सौ.वसुधा श्रीकांत चिवटे !
पूर्वी पट पट झट पट बातमी समजावी साठी तार करत असत !
आतां आतांशा संगणक फोन सुरु झालं आहे. त्यामुळे झटपट माहिती मिळते. पण जपून असं काहीं ठेवण्यासाराखं राहतं जवळ असं काहीं नसतं. पूर्वी पोष्टमन घरी पत्र आणून देत असतं. ठरावीक वेळ झाली कीं घरच्या माणसा सारखी . पोष्टमनची वाट पाहतं असतं मीच काय घरोघरी असं वाट पाहणं असें.
अजूनही माझ्याकडे जूनीं जपून ठेवलेली पत्र आहेतं. पोष्ट मन ने दिलेली ! माझे मलाचं छानं व आच्छर्य वाटतं, अशी पत्रं माझ्याजवळ आहेतं ह्याचं.
ॐ
आपली मूल मोठ्ठी झाली शिक्षण झाल नोकरी ला लागली.
कि आई बाप यांना एक प्रकारे हलक वाटत असतं आणि
ते आई वडील यांचे जून घर पण सांभाळतात ते जास्त चांगल असत .
आणि मुली संसार करून आपापल्या घरी नांदत असतिल
तर आई बाप यांची काळजी दूर होते .
मुल यांनी निट राहून आपली प्रगती करावी जास्त चांगल असतं.!
ॐ
तारिख २६ जानेवारी २०१९ ला .
प्रणव चिवटे यांनी जिलबी विकत आणली.
काल थोडी खाल्ली .
आज सकाळी तारिख २७ जानेवारी २०१९ ला मी छायाचित्र घेतले !
जय जिलबी ! जय भारत !
ॐ
फ्रान्स विमान येथे सरकारि बस ने फिरतांना घेतलेला फोटो !
Vasudha Chivate मी ब्लॉग वाल्या आजीबाई !
शाळेत असतांना फ्रान्स महायुद्ध लिहिलेलं चांगले मार्क मिळाले.
आणि मी फ्रांन्स चे विमानतळ पाहिले योगायोग!
योगायोग पेक्षा आपण जे काम अभ्यास करतो ते सारख
मनात राहत आणि काही दिवस वर्ष याने अभ्यास केल्याच चित्र पूर्ण होत !
प्रार्थना समाज शाळा विलेपार्ले !मुंबई !
शाळा आणि बाई शिकवत होत्या ईतिहास नमस्कार !
ॐ
Govind Barmera चार चौघात जे कौतुक होते त्याची किंमत अमोल.
मराठी चार आकडे चं कौतुक वसुधा चिवटे / ब्लॉग वाल्या आजीबाई !
तारिख २३ जानेवारी २०१९ ला हस्ताक्षर साठी काढलेली रांगोळी
चार हस्ताक्षर साठी आलेली प्रतिक्रिया ! वसुधा चिवटे यांना !
ॐ
Former Prime Minister Manmohan Singh meet South African President Cyril Ramaphosa. He was the chief guest at the Republic Day parade today.
ॐ
तारिख २६ जानेवारी २०१९ .
प्रजासत्ताक दिन ! जळगाव वार्ता !
पत्रकार जळगाव येथील किशोर कुलकर्णी !
आणि सैनिक ! अधिकारी ! ईतर अधिकारी !
जय भारत !
पत्रकार किशोर कुलकर्णी !
पत्रकार किशोर कुलकर्णी आणि ईतर अधिकारी
ॐ
तारिख २६ जानेवारी २०१९
१५ ऑगष्ट ची आठवण !
ॐ
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन !
आम्ही मुली ! चिं शाळा मुली चिं शाळा होती !
शाळा मध्ये जमत
शिक्षक
कोणत्या मैदान मध्ये
प्रभात फेरी करत
चालत नेत
खूप वेळ बसत
नंतर सर्व मुली व
जमलेले विद्दार्थी
यांना
एक एक बिस्कीट देत
तेंव्हा घरी
बिस्कीट नव्हती
खूप उशीर होत असे
परत चालत चालत
घरी जात येत
भूक खूप लागलेली असे
पण
आपण शाळा त सामील आहे
यांचा आनंद असे
जय भारत
वंदे मातरम् !
ॐ
कोल्हापुर येथे १५ ऑगष्ट दिवस ! आणि प्रजासत्ताक दिवस !
कोल्हापूर येथे मांडव घालून तूप आणि तेल ची जिलबी करतात,
त्या प्रमाणे विक्री करतात मी नेहमी मांडव मध्ये लेले ली
जिलबी विकत आणत असते फोटो जुने आहेत.
पण आज हि मांडव मधील जिलबी विकत आणिन ,
वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !
ॐ
तारिख २६ जानेवारी २०१९.
प्रजासत्ताक दिन भारत !
वसुधालय ब्लॉग आणि वसुधा चिवटे फेस बुक !
सण याची माहिती ! तिर्थ क्षेत्र ! विश्र्व दिन !
सर्व माहिती वाचन करतात आणि
Like आणि प्रतिक्रिया आणि भेटी देतात !
वाचन संस्कृती मुळे सर्वजण एकत्र आले ले आहेत !
कोणी कुणाला पहिले ले नाही तरी
असं सर्व समाज माणूस एक एक करत एकत्र येतात .
जग याचे चांगले काम चालू राहते धन्यवाद !
शुभेच्छा !
प्रजासत्ताक दिन च्या शुभेच्छा ! जय भारत !
ॐ
तारिख २६ जानेवारी २०१९.
पूर्व राष्ट्रपति प्रणब मुखर्जी
भारतरत्न किताब !
अभिनंदन !
ॐ
मध्यंतरी प्रणव चिवटे यांनी भोक पडण्याचे मशिन भाड याने आणलेले.
तेथे वाकलेला खिळा लावला.आणि ब्लॉग वाल्या आजीबाई निं
विणलेल शिंकाळ लावले ल आहे ! मस्त सुंदर घर चं काम याचा हॉल !
ॐ
तारिख २३ जानेवारी २०१९ जागतिक . विश्व हस्ताक्षर दिन रहता है !
तब ! हिंदी में पत्रकार जलगाव किशोर कुलकर्णी का
लेख हिंदी में प्रसिध्द हो गया है |
लेख कि लिंक मै वसुधा चिवटे / ब्लॉग वाल्या आजीबाई !
लिंक देती है जरूर सब लिंक पढणा ! शुभकामनाये |
वसुधा चिवटे / ब्लॉग वाल्या आजीबाई !
ॐ
काल तारिख २३ जानेवारी २०१९ ला .
हस्ताक्षर दिन झाला !
तर मी मराठी चार आकडा याचे
. अक्षर सारखे रांगोळी काढली !
एक हस्ताक्षर आणि रांगोळी
दोन हि चे एक रुपांतर केले . हस्ताक्षर चा दिवस
उच्छाह ने साजरा केला.शुभेच्छा ! अभिनंदन !
ॐ
तारिख २३ जानेवारी २०१९ .हस्ताक्षर दिन !
हस्ताक्षर जपणूक वसुधा चिवटे / ब्लॉगवाल्या आजीबाई च्यां
घरी अक्षर जपणूक ठेवलेली आहे ! शुभेच्छा ! अभिनंदन !
तारिख 1. 1 . 1980 . / १.१. १९८० अक्षर जपणूक ! नमस्कार !
रांगोळी हस्ताक्षर / वसुधा चिवटे / ब्लॉग वाल्या आजीबाई ! अभिनंदन
शुभेच्छा
तुळस पान याच हस्ताक्षर
ॐ
एका पोष्ट ला केले ली प्रतिक्रिया
Vasudha Chivate मी
R. Y. Deshpande. माझे मोठ्ठे भाऊ यांनी घरी बीज गणित शिकविले होते.
S.S.C. ला गणित विषय घेतलेला.बोर्ड साठी चाचणी परीक्षा शाळा ने घेतलेली
गणित विषय चे पेपर सर यांनी दिले मी पास झाले.
.पण थोड्या वेळाने खुणवून मला पेपर मागितला.
मी भित भित गणित याचा पेपर दिला.
सर यांनी गणित चा माझा पेपर परत तपासला.
आणि दोन मार्क वाढवून दिले आत्ता कित्ती ते सांगता येणार नाही
पण छान पास झाले आणि बोर्ड परीक्षा ला
पण गणित व सर्व विषय मध्ये पास झाले
एका झटक्यात सर्व विषय मध्ये पास आहे.
जास्त छान आहे गणित विषय घेऊन.
सर यांच आडनाव माहित नाही . नमस्कार !
R. Y. Deshpande . मोठ्ठे भाऊ ! / वसुधा चिवटे !
तिळ गूळ
ॐ
तारिख २१ जानेवारी २०१९
शाकाबंरी पौर्णिमा / पौंष पौर्णिमा
शाकाबंरी चि समाप्ती !
पूर्वी मी घेतलेला आमच्या ग्यालारीतून फोटो
ॐ
पत्रकार किशोर कुलकर्णी
तारिख २० जानेवारी २०१९
जागतिक संत्र महोच्छव
२१ जानेवारी २०१९ पर्यंत आहे.…
तर
जळगाव चे पत्रकार किशोर कुलकर्णी
नागपूर येथे आहेत शुभेच्छा ! अभिनंदन
15 ऑक्टोबर 1956 ला
डॉ आंबेडकर यांनी बौद्ध धर्म
स्वीकारला होता
दीक्षा भूमी
ॐ पत्रकार किशोर कुलकर्णी
तारिख २० जानेवारी २०१९
जागतिक संत्र महोच्छव
२१ जानेवारी २०१९ पर्यंत आहे.…
तर
जळगाव चे पत्रकार किशोर कुलकर्णी
नागपूर येथे आहेत शुभेच्छा ! अभिनंदन
दीक्षा भूमी !
नागपूर चि दीक्षा भूमी येथे पत्रकार किशोर कुलकर्णी !
ॐ
ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर !
पंखा पुसला !
पलंग स्वयंपाक घरात आणला सतरंजी ची जाड घडी घातली
ओल्या टॉवेल ने धुवून दोन तिन वेळा पुसून पंखा काढला !
नंतर पलंग हॉल मध्ये नेला. जाड सतरंजी घातली दोन वेळा
ओल्या टॉवेल ने पंखा पुसला
छान वाटतं स्वत: काम केल्याच !
स्वयंपाक घर मधील पंखा !
हॉल मधील पंखा !
ॐ
सौ. सुनबाई पुष्कर ! शुभेच्छा !
ब्लॉग वाल्या आजीबाई निं सजवलेलं घर !
तिळ गूळ !शुभेच्छा !
ॐ
दुर्गा सोसायटी चे वर्गणी रंग काम पूर्ण झाले .
तर घरी केले ले आकाश कंदील सगळी कडे लावले .
तर अण्णा चिं श्रीकांत चिवटे यांची खोली तिल ग्यालरी !
तेथे पण आकाश कंदील नविन करून लावला .
मुख्य सर्व आकाश कंदील !
!ब्लॉग वाल्या आजीबाई निं केले आहेत !
आण्णा चिं खोली तिल ग्यालरी !
ॐ
दुर्गा सोसायटी ने वर्गणी काढली .इमारत जिना रंगविला .
मी वसुधा चिवटे / ब्लॉग वाल्या आजीबाई नि.
आकाश दिवा करून घर सजविल .
आज सकाळी च छोटा आकाश कंदील केला
आणि लावला पण ! वास्तू पूजा !
स्वयं पाक घर !
हॉल मधिल रंगीत आकाश कंदील !
ॐ
ब्लॉग वाल्या आजीबाई !
आज तिळ गूळ वडी केली.
तिळ भाजून घेतले
.गूळ किसून घेतला.…
गूळ पाणी पाक केला.सादुक तूप घातले.
तिळ भाजलेले घातले.घट्ट एकत्र केले.
संगम रवरी पोळपाट ला तूप लावले.त्यात
पाक चे तिळ घातले.पसरविले.
वडी केल्या.चांदी च्या ताट मध्ये नैवेद्द केला !
तिळ गूळ वडी !
चांदी चे ताट नैवेद्द !
ॐ
नोव्हेंबर २०१८ मध्ये ओल आल आणलेलं.
पुष्कर चिवटे येथे आले ले असतांना आलं आणलेलं !
मातीचे भांड मध्ये ठेवलेले.छान वाळले.सुंठ झाली.
छोटा दगडी खल बत्ता त आल वाळलेलं सुंठ झालेलं
कुटले.मिक्सर मधून काढले.थोडावेळ
उन्ह मध्ये ठेवले. १८ जानेवारी २०१९ ला !
कुटता कुटता सुंठ चा वास आला.
साठी छान आल आहे.सुंठ छान आहे.
चहा त किंवा भाजीत वापरले कि संपून जाईल !
आल चे सुंठ केली.
ॐ
सध्या पौंष महिना चालू आहे . देवी चा महिना ! देवी चा महिमा !
पूर्वी च्या काळ मध्ये पाऊस कमी पडला.दुष्काळ पडला.
ऋषी मुनी आणि त्या काळातील लोक यांनी
देवी प्रार्थना केली.पाऊस पडू दे पिक येऊ दे.
तर पाऊस पडला पिक आली. भाज्या ताज्या मिळाल्या.
ह्या दिवस मध्ये पण धान्य पेरतात.सर्व निट व्यवहार चालू झाले.
देवी मुळे घडल असं भावना मन आहे नवस मुळे !साठी
सर्व भाजी ला पण शाकाबंरी भाजी म्हणतात
देवी ला शाकाबंरी देवी म्हणतात पौंष महिना भाजी देवी शाकाबंरी आहे !
कोल्हापूर येथील त्रिंबोली देवी आहे .टेंबला बाई देवी . उंच डोगर येथे आहे गावा बाहेर आहे. नमस्कार !
सौ सखू आजीबाई
ॐ
सध्या पौंष महिना चालू आहे देवी चा महिना म्हणतात !
सर्व देवी नां शाकाबंरी देवी म्हणतात.
लातूर तेथील देवी आहे .
नमस्कार !
हिरवे ताजे वाटाणे / मटार गहू चा सांजा तिखट !
ॐ
पौंष महिना त सुगड ,बोळक, माती चि भांडी मध्ये
खिचडी मुग डाळ तांदूळ याला
. तेलंगण मध्ये पोंगळ म्हणतात ! तसं मी शिजविले ले
पूर्वी चा फोटो आहे !
पोंगळ / मुग तांदूळ खिचडी !
लिज्जत पापड
ॐ
वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर !
स्वयंपाक घर मध्ये छान माणसं लावून ठेवतात.
सहज जाता येता नजर जाते आणि मन याला बरं वाटतं !
सहज बोलण तेही फोन मध्ये पत्रकार किशोर कुलकर्णी !
डोळ्या पुढे दिसतात . बरं वाटतं शुभेच्छा !
पत्रकार किशोर कुलकर्णी सौ. आरती कुलकर्णी / आकाश वाणी ! मुलाखत ! ब्लॉग वाल्या आजीबाई !
ॐ
आत्या सासूबाई / प्रकाश अंचन !
अधिक वाण दिलेले ! सोळ नेसून शालू नेसून अधिक वाण दिल !
आत्या सासूबाई चें प्रकाश अंचन ! जावाई !
कित्ती छान वाटत सहज बघायला ! शुभेच्छा !
ॐ
श्री क्षेत्र गाणगापूर !
दत्त दर्शन ! नमस्कार !
ॐ श्री क्षेत्र गाणगापुर !
डॉ सौ मेधा देशपांडे !
रांगोळी बघतांना ! दत्त चि कविता वाचतांना !
डॉ सौ मेधा देशपांडे / किर्तनकार !
रांगोळी डॉ. सौ.मेधा देशपांडे.
ॐ
श्री तिर्थ क्षेत्र गाणगापूर !
डॉ शरद देशपांडे दर्शन साठी उभे आहेत !
नमस्कार !
गाणगापूर देऊळ येथील पालखी ! नमस्कार !
डॉ शरद देशपांडे गाणगापूर येथील फोटो ! नमस्कार !
ॐ
श्री क्षेत्र गाणगापुर येथील भिमा – अमरजा नदी दोन चा संगम आहे.
एक च मोठ्ठी नदी आहे.
तेथे डो सौ मेधा देशपाण्डे नदी चि पूजा करतांना !
भिमा – अमरजा नदी चा संगम गाणगापूर येथील फोटो !
डॉ सौ मेधा देशपांडे गाणगापूर येथील फोटो !
ॐ
ब्लॉग वाल्या आजीबाई / वसुधा चिवटे !
तारिख १६ जानेवारी २०१९
करी दिन ! हे फोटो मागे घातलेले आहेत.
धिरडी दुध गूळ !
सुगड /बोळक दुध पूजा !
ॐ
माहेर चा बटवा / बटवे !
काय आहे णां !
माझे सख्खे सौ भावजय भाऊ
यांनी मला ७६ वय मध्ये
पण आदर याने कौतुक याने मला
बटवा आणि भेट पण दिली आहे
ॐ
माहेर चे बटवे ! बटवा ! भेट !
R. Y. देशपांडे. केदार देशपांडे .वसुधा चिवटे.
सौ सुनिती देशपांडे माझ्या मोठ्ठ्या भावजय यांनी
माझे भाऊ R.Y. देशपांडे यांच्या बरोबर बटवा आणि भेट दिली.
आणि सुन्दर नक्षीदार डबी पण !
ॐ
डॉ शरद देशपांडे डॉ सौ मेधा देशपांडे .वसुधा चिवटे.
डॉ शरद देशपांडे डॉ सौ मेधा देशपांडे
यांनी घरी बटवा शिवून भेट घालून
मला बटवा दिला आहे.
ॐ
संक्रांत सण चं मारुती ला खाऊ सांजा दिला !
मटार हिरवे ताजे वाटाणे सोलून धुवून घेतले.
अंदाजे गहू चा रवा घेतला.दोन हिरवी मिरच्या घेतल्या.
पातेल्यात तेल मोहरी चि फोडणी केली हिरवी मिरची तुकडे
मटार ताजे हिरवे वाटणे घातले वाफ आणली.
गहू चा रवा घातला परतून सर्व घेतले
पाणी घातले
मिठ,हळद ,थोड लाल तिखट लिंबू रस घातले शिजवू दिले
परत थोडे पाणी घातले.छान शिजले वाफ आली.
मस्त गहू चा हिरवे ताजे वाटणे चा सांजा केला.
ॐ
तारिख १५ जानेवारी २०१९ संक्रांत सण च्या शुभेच्छा !
तिळ गूळ घ्या गोड बोला !
ओम तिळ गूळ कुटलेले लाडू !
तिळ गूळ पोळी !
ॐ
तारिख यंदा १५ जानेवारी ला संक्रांत सण आला आहे.
संक्रांत सण काळी साडी चि आठवण !
आमचं लग्न झाल तेंव्हा संक्रांत सण याला
माझ्या सासरी सर्वांनी विशेष त:
सासरे बाबा यांनी मला काळी साडी घेतली.
सासूबाई नि हलवा दागिने केले.
थाटात संक्रांत सण केला. विशेष माझे पहिले सण
व्यवस्थित पार पडले मी पहिली सून खूप कौतुक करायचे
आणि व्यवहार पण !
कधी शेजार, नात , वाडा येथे कधी अडचण आली नाही.
नाही तर कोणी तरी जात आणि सण निट होत नाहीत ठरवलं साठी
आटोपून घेतात. अस खूप ऐकल आहे साठी लिहित आहे.
माझा काळी साडी हलवा चा दागिना चा फोटो मुंबई त
स्टुडीओ दत्ता तेथे काढलेला आहे !
काळी साडी ची आणि एक आठवण !
कोल्हापूर येथे खूप वर्ष राहत आहोत
डॉ करंडे घर चे च !चहा जेवण कोजागिरी पौर्णिमा
साठी जमत!
तर अस ते सर्व घर चे राजस्थान ला गेले ले.
तर हे श्रीकांत चिवटे म्हणाले तिकडून
कॉटन बांधणी साडी आणा !
त्यावेळेला कोल्हापूर येथे अशा
साड्या मिळत नव्हत्या.तर डॉ करंडे यांनी
काळी बांधणी साडी आणली खूप छान दिली.
मी ती काळी साडी भरपूर वापरली !
डॉ करडे सर्वजण आहेत शुभेच्छा !
तेंव्हा तरुण च होते मी ! तब्येत पण
मस्त छान दिसायची मी !
आत्ता २०१९ साल ला मी ह्यांच्या
श्रीकांत चिवटे पेंसन मधून मला
काल काळी साडी आणली.
खूप छान साडी आहे.
साडी देणारे सर्व छान आहेत शुभेच्छा !
ॐ
तारिख १४ जानेवारी २०१९ ला भोगी आहे.
तर कोल्हापूर येथे राजाराम पुरी येथे खूप भाजी विक्रेते आहेत.
पण मी सखुबाई आजी कडे पावटे ! ताजे वाल सोलून दाणे काढतात.
मटार ! हिरवे वाटाणे ताजे सोलून वाटाणे काढतात ते आणले.
वाल १५ रुपये पावशेर! आणि मटार हिरवे वाटाणे १० रुपये पावशेर!
सौ सखू आजीबाई चं कित्ती छान काम आहे नां टेंपो ने येतात.
दिवस भर रात्री ८ वाजे पर्यत बसतात.डबा आणतात कोणाच्या तरी
बंगला त पाणी पितात व छान धंदा करतात.शिकेले ले पेक्षा हिशोब
चोख करतात.
भोगी ची भाजी सौ.सखू आजीबाई !
पिवळी लाल लुगड नऊ वारी काष्टा चं लुगड !
हिरव्या बांगड्या!कुंकू टिकली नाही!