आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 30, 2019

चाकवत पाले भाजी !


काल तारिख २९ जानेवारी २०१९ इंटरनेट चे पैसे भरायला गेले ली.
येतांना थोड चालत आले.
सायकल वाले भाजी घेऊन दिसले.
चाकवत पेंडी जूडी १० रुपये ला घेतली.

देठ सगट निवडली,धुतली विळी ने चाकवत भाजी चिरली.
भांड मध्ये भाजी पाणी घालून शिजविली.
दही त हरबरा पिठ ,लाल तिखट मिठ. हळद घातली.
सर्व भाजीत घातले उकळू दिले.
मस्त चाकवत पाला भाजी दही घालून भाजी केली !

ब्लॉग वाल्या आजीबाई !

img_1362[1]
चाकवत भाजी पाला !
img_1366[1]
दही !
img_1367[1]
तयार चाकवत भाजी !

महात्मा गांधी !


३० जानेवारी २०१७
महात्मा गांधी

गांधी बाप्पा
आत्ता ११ वाजतां
मि व प्रणव देवा पुढे
घरी दोन २ मिनिट उभे राहिलो
पूर्वी शाहू मिल चा भोंगा ऐकू येत असे
आत्ता शाहू मिल बंद आहे

नमस्कार !

मी लहान असतांना हैद्राबाद येथे होतो
तेथे मोठ्ठा मैदान मध्ये
महात्मा गांधी यांची सभा होती
खूप उंच बसलेले दिसले
तसे मी लहान होते पण दिसले नक्की चं
महात्मा गांधी
नमस्कार

मी माझी आई ( सौ वहिनी) गंगा ( सौ काकू )
सौ आत्याबाई व ईतर तेथील बायका
चालत चालत मैदान मध्ये गेलोलो आठवत

खूप लांब मैदान होत फत्ते मैदान !
माझी सख्खी बहिण कमल ताई यांनी
मैदान चं नाव सांगितले आहे .

मी त्या मैदान चं नाव विचारून लिहीन नंतर
माझ्या भावांना माहित असणार

येतांना माझ्या गंगा काकू ने निशा ला चुलत बहिण
हिला कडेवर घेतले
तसेच माझ्या आईने पण मला कडेवर घेतले

खूप चालून झाल्या नंतर गंगा म्हणाल्या
निशा कुठे निशा कुठे

तर आत्या बाई म्हणतात आ हो तुमच्या कडेवर चं
निशा आहे नां
कसं असतं बघा आपलं चं आपल्याला जड होत नाही

नंतर आठवत होत तेंव्हा कुणी तरी गोष्ट म्हणा
किंवा सहज अनुभव सांगितला असणार

आज महात्मा गांधी

यांची आठवण

नमस्कार

images
22814380_897856103724494_1643374786473649684_n

%d bloggers like this: