आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 3, 2019

शाहू छत्रपति रेल्वे तिकीट / ब्लॉग वाल्या आजीबाई !


कोल्हापूर वार्ता / शाहू छत्रपति रेल्वे तिकीट / ब्लॉग वाल्या आजीबाई

तारिख १४ फेब्रुवारी २०१९ जळगावचे पत्रकार, लेखक किशोर कुलकर्णी यांचा जन्मदिवस साजरा होणार कोल्हापूरला!! १५ फेब्रुवारी २०१९ ला जळगाव चे पत्रकार, लेखक आणि सुंदर हस्ताक्षरचे धडपडे कार्यकर् किशोर कुलकर्णी (ज्यांनी मला ब्लॉगवाल्या आजीबाई वसुधा चिवटे ही नवी ओळख करून दिली) माझ्या आग्रहामुळे आमच्या घरी कोल्हापूरला येत आहेत. जन्मदिनाच्या औचित्याने ते उत्सव करीत नाही, कधी वाढदिवस साजरा करीत नाही पण मी १५ फेब्रुवारी ला किशोर कुलकर्णी यांचा जन्मदिवस मी म्हणजे ब्लॉग वाल्याआजीबाईकडे करणार आहेत. खर तर आमची भेट पण नाही कधी पाहिलं पण नाही!त्यांनी मला ब्लॉगच्या माध्यमातून शोधून काढले आणि माझ्यावर मोठा लेख लिहिला तरुण भारतामध्ये त्यांनी मला ब्लॉगवाल्या आजीबाई हे नाव दिल ! वसुधालय ब्लॉग, संगणक मधील लिखाण आणि फेस बुकचे लिखाण, वाचन एवढीच ओळख! माझा वसुधालय हा ब्लॉग जगभर वाचला जातो. हा ब्लॉग ऑस्ट्रेलिया ,लंडन अमेरिका इतके नव्हे तर अगदी खेडेगावात जेजुरी, अमळनेर, पारोळा, भडगाव, इचलकरंजी येथे पण वाचन करतात. प्रकाशक विभाकर कुरमभट्टी आणि लेखक कुळकर्णी यांनी ‘ब्लॉगवाल्या आजीबाई’ पुस्तक लिहिले. तरुण भारताचे त्यावेळचे संपादक दिलीप तिवारी यांनी त्यांच्या प्रस्तावनेत कौतुक केले. नंतर कोल्हापूर आकाशवाणीवर मुलाखत ही प्रसारित झाली. माझे लेखन खूप होत आहे. कुळकर्णी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी ‘स्वीट डिश’ संगणक मध्ये पुस्तक केले आहे…किशोर कुलकर्णी यांना ते अर्पण करणार आहे… २०१९ चा १५ फेब्रूवारीचा वाढ दिवस मी वेगळ्या पद्धतीने साजरा करणार आहे. त्यांनी जळगाव ते छत्रपती शाहूराजे रेल्वेच तिकीट काढल आहे किशोर जी ब्लॉग वाल्या आजीबाई च्या घरी आपले स्वागत !

50932696_2255336154788835_7156615597717979136_n

1544606_241018256074952_2014903634_n
तिळ गूळ पोळी !

%d bloggers like this: