आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 4, 2019

कागद पताका ! तोरण !


आम्ही १९८४ साल ला दुर्गा सोसायटी स्वत: च्या फ्याट मध्ये राहायला आलो.
तर रंग पण दिलेला नव्हता.पण हॉल माध्ये कागद पताका लावल्या.

पुष्कर कॉलेज च शिक्षण घेत होता प्रणव शाळा शिकत होता.
पण नवीन स्वत: चं कष्ट ची वास्तू श्रीकांत चिवटे यांनी तयार केके ली !

उच्छाह होता सर्वांना आणि कागद पताका पाहून पाहुणे पण खुश होत !

त्याची आठवण आली आणि मी सहज बसल्या बसल्या कागद पताका
तोरण केल.स्वंयपाक घरात लावलं !

आता पत्रकार आणि हस्ताक्षर प्रमुख किशोर कुलकर्णी जळगाव येथून
ब्लॉग वाल्या आजीबाई च्यां घरी त्यांच्या वाढ दिवस साठी येणार आहेत

उच्छाहा त आजीबाई आहेत !

IMG_1375[1]
51168144_467600350442315_2041607223775330304_n

बीट ची कोशिंबीर !


बीट उकडून घेतले. साल काढली. विळी चे चिरून बारीक काप केले.
शेंगदाणे भाजलेले कूट घातला.लाल तिखट, मिठ.
हळद तेल मोहरी ची फोडणी दिली.दही घातले.
बीट चे उकडलेले पाणी घातले. मस्त बीट कोशिंबीर चा फोटो
मी काढला ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_1378[1]
IMG_1377[1]

सातार चे अंभ्यकर !


१९६६ साल ला गोंदवले येथे जाण्यास निघालो आम्ही दोघ !
त्यावेळेला पुणे गोंदवले बस नव्हती तर !
सातारा त सकाळी ६ वाजता बस असे.
तर अंभ्यकर यांच्या कडे उतरलो

त्यावेळा दोन आजी अंभ्यकर मुल राहत.
आम्हाला वाडा मध्ये उंच येथे खोली दिली झोपायला !
सकाळी आजी ने हाक मारली आम्ही उठलो आणि आवरून
गोंदवले येथे निघालो चहा पिऊन

ती आठवण कायम राहून आम्ही
पुष्कर सौ सुनबाई चे लग्न झाले तर
मुद्दाम सातारा त आजी ना भेटायला गेलो सर्व जण
वहिनी म्हणत ! मला !
तर आजी नां तिळ गूळ दिला

सौ सुना नां धारवाडी खण दिले तिघी जण होत्या !

इतक डोक्यात माणस भरतात आणि
आपण त्यांना भेटावे काही द्यावे वाटत असत.

आपल मन हि हलक होत त्यांच्या आठवणी नं
तिळ गूळ साठी आठवण आली !

img_1291[1]
IMG_8108[1]

बीट ! फळ भाजी


सहज पुष्कर बरोबर बोलतांना बीट खाव ताकद राहते.
पण शुगर असते थोड खाव !

अस बोलण झाल मला आमच्या भाजी वाले कडे बीट मिळाल आज !
तारिख ३ फेब्रूवार २०१९ ला !

सकाळी उकडून दही घालून कोशिंबीर करते शेंगदाणा कुट घालून.

IMG_1369[1]
untitled

%d bloggers like this: