आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 25, 2019

सतीश जैन / जळगाव वार्ता


तारिख २५ फेब्रुवारी २०१९

सतीश जैन / जळगाव वार्ता

नमस्कार
सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने पद्मश्री डाॅ भवरलालजी जैन यांच्या तिस-या श्रध्दावंदन स्मृतिदिनानिमित्त मोठी लग्नाची तिथी असलेल्या रविवार दि.२४ फेब्रुवारी२०१९ रोजी जळगावी कांताई सभागृहात अष्टपैलू पद्मश्री डाॅ भवरलाल जैन एक दिवशीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. सुरवातीला शहिद जवानांसह दिवंगत साहित्यिकांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
श्रध्देय भाऊंवर जे खरोखर मनापासून प्रेम करीत होते त्या दर्दी रसिकांच्या उपस्थितीत हे संमेलन यशस्वी झालेले आहे. गर्दी नाही तर दर्दी चोखंदळ रसिक या संमेलनास उपस्थित होते. संमेलनाच्या निमित्ताने खरोखर कळले की श्रध्देय भाऊंवर फक्त लाभार्थी साठी किती लोकं प्रेम करीत होते.
संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रख्यात लेखक प्रा डाॅ किशोर सानप यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन झाले. खानदेशातील संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रख्यात लेखक प्रा सि.एस.पाटील यांनी संमेलनाचे उद्घाटन केले तर खानदेशातील नामवंत समीक्षक चंद्रकांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचा समारोप झाला. प्रमुख पाहुणे म्हणून आनंद गुप्ते उपस्थित होते. जैन इरिगेशनचे संचालक अजितभाऊ जैन यांच्या मुळे हे संमेलन मला आयोजित करता आले.
संमेलनात प्रा.डाॅ. शरदचंद्र छापेकर (जळगाव) विषय – व्यक्तिमत्व भाऊंचे, रत्नाकर खंडू कोळी(खामखेडा, शिरपूर) विषय -भाऊंचं काळ्या मातीशी नातं तसेच डाॅ सुधीर भोंगळे यांचे याच विषयावर रेकाॅर्ड भाषण ऐकवण्यात आले, प्रा.डाॅ.प्रभाकर जोशी (अमळनेर) विषय – भाऊंचे सामाजिक भान , इतिहासतज्ज्ञ नामवंत लेखक डाॅ.श्रीनिवास साठे (कल्याण)विषय – इतिहास भाऊंचा घराण्याचा,गिरीश कुळकर्णी (अध्यक्ष आशा फाऊंडेशन जळगाव)विषय-शिक्षणमहर्षी भाऊ, आश्र्विन झाला विषय – गांधी तिर्थ एक विचार या मान्यवरांनी भाऊंचे पैलु उलगडले.निमंत्रितांचे कविसंमेलन
प्रा.बी.एन.चौधरी(धरणगाव) यांच्या अध्यक्षतेखाली झाले .यात अशोक नीलकंठ सोनवणे ,सौ.माया दिलीप धुप्पड , डाॅ.संजीवकुमार सोनवणे प्रा.महेंद्र पाटील , प्रा.डाॅ.शकुंतला चव्हाण , राजेंद्र रायसिंग (डि वाय एस पी फैजपूर ),अनिल शिंदे अमृत तेलंग हे कवी सहभागी झाले. या वेळी राज्यस्तरीय निसर्ग या विषयावरील काव्य लेखन स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.
काव्यलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक कोल्हापूर येथील सुधीर माजवलकर यांच्या श्रावण, द्वितीय क्रमांक पेण येथील वनीता भोसले यांच्या निसर्ग, तृतीय क्रमांक बडनेरा येथील अब्दुल रहेमान यांच्या निसर्गरम्य पाऊस या कवितांना अनुक्रमे रूपये १५०० रूपये, १००० रूपये , ७०० रूपये व गौरवपञ अशी बक्षिसे दिली जातील, तर उत्तेजनार्थ मीना सैंदाणे
(जळगाव), गोविंद पाटील (जळगाव), सचिन मोर्य(जळगाव), कमलाकर पवार(औरंगाबाद),
सौ.छाया सराफ(जळगाव) यांना गौरवपञ व अनाथांची आई पुस्तक बक्षीस म्हणून दिली गेली. सूञसंचालन पौर्णिमा हुंडीवाले यांनी केले तर आभार प्रवीण लोहार यांनी मानले.
सेवादास आदरणीय दलुभाऊ जैन , जैन इरिगेशन सि ली चे अध्यक्ष अशोक भाऊ जैन, संचालक अजित भाऊ जैन , सर्व प्रिंट मिडीया , इलेक्ट्रॉनिक मिडीया, सूर्योदयचे पदाधिकारी, संमेलनात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार न मानता सदैव ॠणात राहू इच्छितो.

ओम
अभिनंदन छान बातमी आहे मी वाट च पाहत होते याचा मी आपले नाव देऊन जळगाव बातमी ब्लॉग करते धन्यवाद सांगितल्या बद्दल!

वसुधा चिवटे

img_1338[1]

रांगोळी


पूर्वी चे काम पाहण्यास पण छान वाटत !

बोटा ची रांगोळी
खुप वेळा रंगोली रांगोळी दाखविली आहे.

thumbnail_15697680_710310509145722_3137676994068096396_n
img_20130605_175148

%d bloggers like this: