आपले स्वागत आहे!

Sun 4/14/2019 3:56 PM
  • You
संत सखाराम महाराज वाडीत कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून धार्मिक जागर
मराठी माणूस लेखणी, छावणी, लावणी नांगरणी यातच रमतो, पण तो हरिकीर्तन, हरिपाठ, वारी या आध्यात्मिक गोष्टी देखील करत असतो. त्यासाठी त्याचे श्रद्धास्थान हे पंढरीचा पांडूरंग आहे. अडीचशे वर्षांपूर्वी संत सखाराम महाराज नावाचे संत अमळनेर नगरीत होऊन गेले. त्यांनी तर बोरी नदीच्या काठी प्रति पंढरपूर निर्माण केलं. पंढरीच्या पांडूरंगाचे दर्शन खान्देशातल्या भाविकांना व्हावे यासाठी वारकरी उभे करण्याचे, जोडण्याचे काम सखाराम महाराजांनी केले. 1818 मध्ये संत सखाराम महाराजांचा समाधी सोहळा साजरा होण्याचा संस्थानचे दुसरे परंपराधिपती गोविंद महाराज प्रघात सुरू केला. हा सोहळा थेट 11 वे विद्यमान परंपराधिपति श्रीगुरू प्रसाद महाराज यांच्यापर्यंत अखंडपणे सुरू राहिला आहे. किंबहुना त्या त्या परंपराधिपतिंनी हा उत्सव अधिक लोकाभिमुख केलेला आहे. या सोहळ्याचे यंदा 200 वे वर्ष आहे. या निमित्त विविध आध्यात्मिक, धार्मिक प्रवचन, कीर्तन असे उपक्रम राबविले जात आहेत संस्थान राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती.
संत सखाराम महाराज एक महान सत्वपुरुष होते. त्यांच्या चरित्रात त्यांच्या गुणांची महती वर्णण केलेली आहे. पंढरपूर – आळंदी पायीवारी, चातुर्मासात पंढरी क्षेत्रात भजन, महाराष्ट्राच्या विविध भागातून श्रीक्षेत्र पैठण, त्र्यंबकेश्वर, मुक्ताईनगर आदी क्षेत्रांच्या निमित्ताने प्रवास, अखंड अन्नदान, वैदिक धर्म परिपालनाचे आग्रहपूर्ण संवर्धन दीन-दुःखीतांच्या मदतीला जाणे हे संत कार्ये त्यांनी केले. खान्देशात संत सखाराम महाराजांना गुरू म्हणून मानणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. 21 ते 29 एप्रिल या काळात होणाऱ्या दैनंदिन कार्यक्रमांमध्ये पहाटे 4 ते 6 काकडा भजन भुपाळी, सकाळी 6 ते 7 संत सखाराम महाराज समाधी अभिषेक, 7 ते दुपारी 1 श्री महाविष्णू पंचायतन याग-पुजन-हवन, 1 ते 3 महाप्रसाद, साडे तीन ते साडेचार दरम्यान अभ्यागत सतांचे पहिल्या सत्राचे प्रवचन यामध्ये , दि. 22 रोजी समर्थभक्त भूषणस्वामी महाराज सज्जनगड, 23 रोजी वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले सातारा, दि. 24. वेदमूर्ति घनपाठी शांतारामजी भानोसे नाशिक, दि. 25 हभप जयंतमहाराज बोधले पंढरपूर, 26 रोजी हभप गुरूबाबा महाराज औसेकर, आणि 28 रोजी हभप दादा महाराज जोशी यांचे संत सखाराम महाराज चरित्र साडेतीन ते सहा दरम्यान होईल. प्रवचनाच्या दुसऱ्या भागात सायंकाळी पाच ते साडेसहा दरम्यान अनुक्रमे हभप शंकरमहाराज बडवे, पंढरपूर, श्रद्धेय दत्तभक्त बाबा महाराज तराणेकर, हभप ज्ञानेश्वर महाराज चातुर्मास्ये, पंढरपूर, हभप माधवदास महाराज तपोवन नाशिक, हभप बाळासाहेब देहूकर, पंढरपूर, हभप योगीराज महाराज गोसावी, पैठण, हभप दादा महाराज जोशी जळगाव यांचे प्रवचन होईल. 22 ते 29 एप्रिल दरम्यान दररोज रात्री 8 ते 10 दरम्यान हरिकीर्तन होईल त्यात अनुक्रमे हभप ज्ञानेश्वर महाराज नामदास, पंढरपूर, हभप दादा मराराज शिरवळकर पंढरपूर, हभप अमृतानंद महाराज जोशी बीड, हभप संदीपान महाराज शिंदे हांसेगावकर, हभप चकोर महाराज बाविस्तक यावल, हभप विठ्ठल महाराज वासकर पंढरपूर, हभप चंद्रशेखर महाराज देगलूरकर आणि 29 रोजी सकाळी साडेनऊ ते 12 वाजेच्या दरम्यान हभप चैतन्य महाराज देगलुरकर यांचे कीर्तन असा दैनंदिन कार्यक्रम होतील.
संत सखाराम महोत्सव काळात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालायण, श्री एकनाथी भागवत पारायण, श्री दासबोध पारायण, संत सखाराम महाराज चरित्र पारायण, श्रीगजाननविजय ग्रंथ पारायण, श्रीगुरूचरित्र पारायण, श्री भागवत संहिता पारायण, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पाठ याच बरोबर चतुर्वेद पारायण देखील होईल.
  सद्गुरू संत सखाराम महाराज व्दिशताब्दी समाधी सोहळ्याच्या औचित्याने कीर्तन, प्रवचन, 108 कुंडात्मक श्रीमहाविष्णु पंचायतन महायाग अशा विविध आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल होणार आहे. वारकरी आणि भाविकांची मांदियाळीच इथे नजरेस पडेल.
वसुधा चिवटे
On Sun, Apr 14, 2019, 15:53 Vasudha Chivate <vasudhasc@hotmail.com wrote:

From: Kishore Kulkarni <kkjalgaon@gmail.com>
Sent: Sunday, April 14, 2019 3:44 PM
To: Vasudha Chivate
Subject: Re: काम याच सार्थक ! कित्ति इच्छा पूर्ण झाली बघा !

लेख
On Thu, Apr 4, 2019, 09:29 Vasudha Chivate <vasudhasc@hotmail.com wrote:
ॐ तारिख २९ मार्च २०१९ ला काळा मसाला घरी भाजला ! मी वसुधा चिवटे! यांनी! तर प्रतिक्रिया … दुसरा पोष्ट ला आले ली प्रतिक्रिया !Vaishali Dohole Raverkar धन्य आहात..उत्साहाला सॅल्युट Hide or report…
IMG_1525[1]

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: