आपले स्वागत आहे!

Archive for जून 17, 2019

बाप आणि समुद्र ! सारख काम ! जिव्हाळा !

नामदेव कोळी !

25552161_1663752717020001_8083910286599605595_n

■ समुद्र न पाहिलेला माणूस

बापानं समुद्र पाहिला नाही
मग त्याची गाज ऐकणं…
वाळूपात्रात शिंपले शोधणं…
लाटांशी बेधुंद खेळणं…
किनाऱ्यावरून क्षितिज न्याहाळणं…
या गोष्टींना पारखाच –
समुद्र न पाहिलेला माणूस.

पिंपळपारावरून येणाऱ्या जाणाऱ्याला
मुंबईत राहणाऱ्या लेकाचं कौतुक सांगताना
ढवळून निघायचा त्याचा तळ
भरून यायचे अथांग डोळे काठोकाठ
वाटेला आलेल्या अमवास्यांशी झुंजताना…
रानात आभाळ भरुन येताना…
वाघूरच्या पुराचा चहाळ घेताना…
टम्म चरून आलेली गुरं पाहताना…
लेकरांचा डोळ्यातला आनंद न्याहाळताना…
मी बापाच्या चेहऱ्यावर
उधाणलेला समुद्र पाहिलाय…
■■
Namdev Koli | नामदेव कोळी

25552161_1663752717020001_8083910286599605595_n

dscf0578-e1339896487498

यशवंत देशपांडे  यांचे सौ लेकी स पत्र !वसुधा चिवटे !

बाप मुला चा असो !लेकी चा असो !

समुद्र प्रमाणे अथांग ! जिव्हाळा न सांगणारा !

 

 

वड झाड ! वृक्ष ! वसुधा चिवटे !

वड वृक्ष !  झाड !

एक फांदी लावली असणार ! त्याच झाड वृक्ष झाल आहे !

पारंब्या पण कित्ती आहेत बघां ! खूप जून वड झाड आहे .

काही निर्मिती किंवा लिखाण करायचं असेल तर !

भरपूर माहिती मिळवावी लागते. लोकांना भेटावे लागते .

वाचन करावे लागते .कागद पेन ने लिहून एकत्र लिखाण ठेवावे लागते .

तेंव्हा कोठे सगळी माहिती एकत्र  करून  येऊन परत वाचून दुरुस्त करून

त्याची  निर्मिती होते . त्यात  भरपूर दिवस वेळ जातो !

आपल जीवन पण तसच आहे .

लहान पण च काम , तरुण पण च काम म्हतार पण च काम

एकत्र करून त्याच  झाड बनत !

त्यासाठी आपण केले ले कष्ट ,काम ,अभ्यास.

एकत्र करून ठेवणे जरूर आहे .

त्याची दखल आपोआप होत असते !

ती दखल खरी आणि बरी राहते !

जीवन  याच झाड तयार करा ! वृक्ष तयार करा !

छान छान माहिती लिहा ! वृक्ष तयार करा !

18700053_809905239186248_7484633714774059101_n

IMG_2291

 

 

%d bloggers like this: