तलाक चा प्रश्र्न सुटला ! वसुधा चिवटे !
ॐ
तलाक चा प्रश्र्न सुटला !
मोठ्ठी माणसं ! आणि पोर त्रास देतात !…
तो प्रश्र्न कसा सोडविणार !
वसुधा चिवटे !
वसुधा चिवटे !
ॐ
तलाक चा प्रश्र्न सुटला !
मोठ्ठी माणसं ! आणि पोर त्रास देतात !…
तो प्रश्र्न कसा सोडविणार !
वसुधा चिवटे !
वसुधा चिवटे !
ॐ
तारिख ३१ जुलै २०१९.
कोथिंबीर पेंडी ! जुडी !
दहा ! १० ! 10 ! रुपये मिळाली . काल आणली.
आज सकाळी धुवून निवडून विळी ने बसून चिरली.
पातेल्यात घातली. हरबरा डाळ पिठ एक वाटी घेतले.
हिरवी मिरची दगडी खल बत्ता त कुटली. मिठ घातले.
अंदाज कच्च तेल घातले. गार पाणी घातले.
एक सारखे केले.चमचा ने.कुकर चा डबा ला तेल लावले .
कुकर मध्ये पाणी घालून ग्यास पेटता ठेवला .
कोथिंबीर ढोकळा पिठ मध्ये अर्धा चमचा युनो घातला .
कुकर च्या एका भांड्यात पाणी ठेवले.दुसरा भांड मध्ये
तेल लावलेले कुकर भांड मध्ये ढोकळा पिठ घातले .
झाकण लावून वाफ आणली.एल शिट्टी पण दिली .
मधल अच्च राहत नाही . छान हलका फुगलेला
कोथिंबीर चा हरबरा डाळ चा ढोकळा केला .
तेल मोहरी ची फोडणी दिली .
मस्त झकास मी च ढोकळा चा फोटो घेतला.
प्रणव व मी मस्त कोथिंबीर ढोकळा खाल्ला !
हलक सर खाण केल . बाकि ! ठिक !!
वसुधा चिवटे.
ॐ
दिवा दिवा दिपत्कार | कानिकुण्डल मोतीहार ||
दिवा लावला देवा पाशी | माझा नमस्कार सर्व देवापाशी ||
विठ्ठल | विठ्ठल || विठ्ठल |||
ॐ
तारिख ३१ जुलाई २०१९.
आषाढ अमावास्या ! दिवाची अमावास्या !
श्रावण महिना खूप रोज पूजा असते.
तर त्यासाठी दिवा लावतात.
घरातील समई , निरांजन स्वच्छ करून ठेवतात .
स्वच्छ केलेल्या समई ची पूजा करतात .
साधा दिवा तुळशी चा लावतात आज .
श्रावण पासून नविन स्वच्छ केलेले.
दिवा लावण्यास सुरुवात करतात .
पूर्वी काचेचे कंदील, चिमण्या असतं. घासलेट,
रॉकेल घालून कंदील ची वात पातळ आणि
चिमणी ची वात गोल लावून लहान मोठ्ठी ठेवून दिवा लावत .
मी सातवी असतांना औरंगाबाद खाराकूआ येथे
राख घेऊन कंदील चिमणी ची काच पुसली आहे
मऊ जून साडी ची वस्त्र फडक याने परत स्वच्छ केले आहे .
घासलेट घालून वात लहान मोठ्ठी करून ठेवत असे .
आज पण अशा काम याची छान आठवण आहे.
आत्ता सध्या देखणा छोटा शोभेचा हिरवा कंदील आहे
कोल्हापूर घरी .
छान वाटतं हिरवा कंदील .किरण शहा यांनी दिला आहे .
शहा ची आठवण पण छान आहे .
तर आषाढ अमावास्या ! दिवा ची अमावास्या !
दिवा ने दिवा लावा . उजेड बघून उच्छाह ने काम करा .
आषाढ अमावास्या ! दिवा ला नमस्कार !
वसुधा चिवटे
नमस्कार !
आषाढ अमावास्या ! दिवा ची अमावास्या ! नमस्कार !
ॐ
तारिख ३० जुलै २०१९.
पुढारी वर्तमान पत्र ची बातमी ! वाचली ! मी लिहीत आहे.
ॐ
आषाढ महिना !
आषाढ महिना पाऊस महिना ! पारिजातक च झाड फुल आणि पाऊस च पाणी !
कसं छान आहे बघां !
विठ्ठल ! तुळस चा महिना!
लग्न सोहळा चा महिना !
गुरुं चां महिना !
संत नामदेव चा महिना !
दिवा ची आमावस्या !
सर्व आषाढ महिना ! छान आहे . पाऊस छान झाला आहे. काही धरण भरली आहेत.
शेतकरी पण पाऊस पाणी मुळे तृप्त असणार !
पाऊस! पाणी ! ला नमस्कार !
ॐ
श्री नामदेव गाथा
[ ३१ ]
मयुरादि पक्षी करताती | नद्दा वाहताती दोन्ही थड्या || १ ||
भूमीवरी सडे केशर कस्तुरी | आनंद अंतरी सकळांचा || २ ||
विमानांची दाटी सुरवर येती | गंधर्व गाताती सप्तस्वरें || ३ ||
मंदमंद मेघ गर्जना करिती | वाद्दें वाजताती नानापरी || ४ ||
नामा म्हणे स्वर्गी नगारे वाजती | अप्सरा नाचती आनंदानें || ५ ||
[ ३२ ]
दशरथें मारिला तोची होता मास | वर्षा ऋतू असे कृष्णपक्ष || १ ||
वसुनाम तिथीं बुधवार असे | शुक सांगतसे परीक्षिती || २ ||
रोहिणी नक्षत्र दोन प्रहररात्र | माया घाली वस्त्र रक्षपाळा || ३ ||
नवग्रह अनुकूल सर्वांचें जें मूळ | वसुदेव कपाळ धन्य धन्य || ४ ||
जयाचा हा वंश तयासी आनंद | माझ्या कुळीं गोविंद अवतरला || ५ ||
अयोनीसंभव नोहे कांहीं श्रमी | नामयाचा स्वामी प्रगटला || ६ ||
ॐ
श्रीनामदेव गाथा
[३]
गणेश नमूं तरी १तुमचा नाचणा | म्हणोनि नारायणा नमन २माझें ||१||
सारजा नमूं तरी तुमची गायणी | म्हणोनि चक्रपाणि नमन माझें ||२||
इंद्र नमूं तरी तुमचिया भुजा | म्हणोनि गरुडध्वजा नमन माझें ||३||
ब्रम्हा नमूं तरी तुमचिये कुसी | म्हणोनि ह्रषीकेशी नमन माझें ||४||
शंकर नमूं तरी तुमची विभूति | म्हणोनि कमळापति नमन माझें ||५||
वेद नमूं तरी ती तुझा स्छापिता | म्हणोनि लक्ष्मीकांता नमन माझें ||६||
गंगा नमूं तरी तुमच्या अंगुष्टी | म्हणोनि जगजेठी नमन माझें ||७||
लक्ष्मी नमूं तरी तुमच्या पायांतळीं | म्हणोनि वनमाळी नमन माझें ||८||
३नामा म्हणे भेटी जालिया पैं राया | कोण गणि वायां सेवकासि ||९||
अभंग ३ – १ ‘ तुमचा ‘ या शब्दाऐवजी ‘ तुझा ‘ असा शब्द
काही हस्तलिखितांत सर्व अभंगभर सापडतो.(पं.व शि. )
२ काही हस्तलिखितांत ‘ माझें ‘ च्या ऐवजी ‘ तुज ‘ असे सर्वत्र
सापडते.
३ ऐसें नमन माझें सकळिकां देवा | नामा म्हणे केशवा नमन माझें ||१||
(पं. शि. व आ. )
गोड खाऊ !
ॐ
नामदेव !
संत नामदेव पुण्यतिथी
आषाढ कृष्णपक्ष शिवरात्र
पुण्यतिथी आहे .
नमस्कार !
संत नामदेव यांचा जन्म पंढरपुर येथे झाला.
दामसेठ वडील व गोणाबाई आई
…
कार्तिक शुक्लपक्ष एकादशी
प्रभवनाम संवत्सर ११९२
रविवार
इंसवीसन १२७० आक्टोबर २६
जय संत नामदेव
नमस्कार
वसुधा चिवटे !
संत नामदेव !
ॐ
तारिख २९ जुलै २०१९ ला
संगणक मध्ये लावले ले पुस्तक
मिडिया वाचक यांनी पाहिलेले पुस्तक
लिंक !
https://1drv.ms/b/s!AmrLLJMXaeydgxN2KSfannAVnRc2
स्वीट डिश !
आत्या सासूबाई ! अनारसे वाण ! अधिक महिना !
ॐ
पाचं वर्ष च्या मुलांना चष्मा लागतो !
वसुधा आजी !
ॐ
नेहमी महिला मोटर सायकल! स्कूटर वर बसतांना
साडी ! पदर चे पट्टे अडकू नाही अथवा
ओडणी अडकू नाही याची काळजी घ्यावी .
वाहन चालविणारे यांना पण त्रास होतो .मागील बाजू काही दिसत नाही .
खड्डे रस्ता तिल !पाऊस सर्व पाहून वाहन चालवावे लागते .
पूर्वी बर होत रिक्षा ने जात किंवा बस ने गावात फिरत .
हल्ली स्वत: चे वाहन वापरतात व महिला च्यां ओडणी
एकट्या असल्या तरी लांब लांब असतात चाक मध्ये अडकतात .
समजत नाही शरीर झाकण्या पेक्षा त्याची हेलसाड च जास्त होते .
तरी साडी चे पट्टे ! ओडणी निट सावरून बसावे !
वाहन मध्ये .सरळ ओडणी पिशवीत घालावी नंतर वापरावी .
बघां !महिला नौ ! पटत कां !
मी सरळ रिक्षा करून च मुला च्यां बरोबर गावात जाते .
तुमचे तुम्ही वाहन चालवा सांगते .मी घरच्या मोटर सायकल वर,
बसून प्रवास अथवा गावात पण फिरत नाही.
सरळ मला बसता येत नाही स्कूटर वर सांगते .
कोणी सोडू का विचारले तर !
आपण !आपलं माणूस सांभाळा ! वाहन ! पण !
वाहन चा उपयोग घेतांना ! खरं ! आणि बरं !
असो . बाकि ठिक वसुधा चिवटे !
ॐ
मनात होत आपण टी. व्ही त मुलाखत यावी !
तर टी. व्ही लोकमत मध्ये आले.
एफ एम रेडीओ त मुलाखत केली .
आकाशवाणी कोल्हापूर केंद्र येथे मुलाखत केली .
मन शक्ती ! ईच्छा शक्ती काम करते !
खर ! आणि बर ! बाकि ठिक
वसुधा चिवटे !
फेस बुक येथील फोटो !
ॐ
आषाढ महिना ! शेवट चा शनिवार !
काही वर्षापूर्वी शनिवार ला
अख्ख नारळ मारुती ला दिलेली आहे .
असे अकरा ११ शनिवार दिले आहेत .
दोन अडीच महिने लागोपाठ दिले आहे.
अमेरिका येथे सौ.सुनबाई पुष्कर कडे,
पण मला ते मारुती ला नेऊन आणत.
आणि मारुती ला नारळ दिली आहेत.
कोठे हि अडथळा आला नाही.
जास्त महत्वाच आहे.
आज कोल्हापूर येथे सहज दुकान मध्ये नारळ दिसले .
२५ रुपये चे एक घेतले.घरी आले तर आरे आज शनिवार .
नारळ मी च वाढविले .गोड पाणी पिले.
खूप च गोड पाणी नारळ चे मिळाले .
विळी ने नारळ खोवून,
साखर घालून थोड दुध घालून शिजविले .
ओटा येथे च ठेवले . घट्ट झाले कि वडी होईल .
नाही तर तसे च मउ पण खाता येईल .
मारुती ला अख्ख नारळ दिल गेल,
आणि घरी गोड नारळ नैवेद्द पण दिला गेला.
शनिवार ला !
सहज कस छान शनिवार ला,
नारळ गोड वडी केली गेली बघां !
ॐ
जुलै आषाढ महिना पाऊस पडण्याचे दिवस !
तर रेल्वे प्रवास असो बस असो .
आपले कित्ती महत्वा चे काम आहे , पाहून
प्रवास करावा .
तारिख २७ जुलै २०१९ ला मुंबई येथे खूप पाऊस झाला .पडला .
महालक्ष्मी रेल्वे थांबली .प्रवास करणारे अडकले .
बोटी ने विमान बस ने प्रवासी सुखरूप पोहचले
त्यात लहान मुल . जेष्ठ नागरिक होते .
त्यांना खर च च प्रवास ची गरज होती का !
सरकारी काम करणारे पाऊस मध्ये भिजवून हातात हात घेऊन
नागरिक यांना बोटीत घेत पाऊस च पाणी जड उचलणे,
कित्ती त्रास दाईक झाले असणार .
तर प्रवास करतांना नागरिक यांनी सर्व
हवामान पाऊस चा विचार करून बाहेर पडावे .
नुकतेच रिक्षा संप ऐकला आणि
मी कोल्हापूर ते पुणे जवळ असून जाणे रद्द केले .
पण संप मिटला ऐकले आणि
पुणे येथे जाऊन आले . कोल्हापूर येथे आले .
आपले किती महत्वाचे काम व प्रवास ठरवावे !
असो ! बाकि ! ठिक !
वसुधा चिवटे !
.
ॐ
आमच्या माळी कॉलनी जवळ चं टाकाळा येथे
सौ मामी चं छोटस दुकान आहे.
पोलक , फॉल अस शिवण करतात. तेथे च पिशव्या विकतात.
मी एक पिशवी त्यांच्या कडे घेतलेली पण ती लहान आहे.
.साठी त्यांना मी मोठ्ठी पिशवी आणण्यास सांगितली.
त्यांनी मोठ्ठी पिशवी आणली मी विकत आणली. घेतली.
खरेदी व पिशवी कोठे हि मिळतात पण
या सौ मामी निं ह्वॉट सप मध्ये माझी वसुधा चिवटे ची ,
लोकमत ची बातमी पाहिली ! आणि हो ! सर्व टाकाळा परिसर मध्ये,
लोकमत बातमी वसुधा आजी चिं संगणक चिं बातमी पसरविली .
मला थांबवून त्यावेळा खूप लोक बोलत माझ्या बरोबर .
आत्ता हि बोलतात व मी भेटले कि !
ओळख हसून ! हात करून !बोलून !दाखवितात .
तर खरेदी पिशवी चा उच्छाह वेगळा चं च आहे.
एवढ च मला सांगायचं आहे . खरं आणि बरं !
सौ मामी च्यां दुकान मधील पिशवी ! टाकाळा येथील दुकान ! शुभेच्छा !
ॐ
तारिख इसवी सन २६ जुलै १९९९ ला !
कारगिल येथे भारत देश ने विजय मिळवीला !
आज २० / 20 / विस वर्ष झाली आहेत !
दोन महिने युध्द चालू होते !
पूर्व पंतप्रधान वाजपयी होते !
काश्मीर येथील कारगिल जिल्हा येथे
पाकिस्तान भारत युद्ध झाले .
मेजर आचार्य आणि क्याप्टन सौरभ
मुख्य ! भारत देश चे . लढाई जिंकून दिली .
जे लढाई करतांना मरण पावले त्यांना वंदन !
जे जिंकून आहेत त्यांना अभिनंदन
जय भारत ! जय जवान !
जय भारत ! जय हिंद !
पूर्व पंतप्रधान वाजपयी ! नमस्कार !
ॐ
आज सकाळी थोडे कडवे वाल घेतले. उडीद डाळ घेतले .
कुकर मध्ये घालून धुतले.पाणी घातले.कुकर ला चार शिट्टी दिल्या.
गाग कुकर करून तेल मोहरी ची फोडणी केली.पुदिना घातला.
मिठ काळा मसाला तिखट घातले.हळद घातली उकळू दिले .
मस्त उडीद डाळ , कडवे वाल याची आमटी केली.
भिजत घालून वाटून पिटल सारख पण करतात.
उडीद डाळ. कडवे वाल .
ॐ
इंग्लंड मध्ये महिला पूर्वी घर काम करायच्या .
आणि जेवल्या नंतर !
गार किंवा गरम पाणी ने हात धुतल्या नंतर
धातू च्या प्लेट मध्ये.
गुलाब पाणी ने हात धुवावयाच्या .
धातू चा वापर पंरपंरा चालू करण्या करता .
महिला नां टेनिस विजेता नां धातू ची प्लेट देतात.
इंग्लंड पंरपरा जपतात. अभिनंदन !
टेनिस ! महिला ! लंडन ! अभिनंदन
टेनिस ! महिला ! लंडन ! अभिनंदन
ॐ
खरं चं चं छान पुस्तक आहे . ज्यांनी पहिले ! वाचले असेल त्यांना पण आवडले असणार !
छान छान माहिती पुस्तक! घर गृहिणी च लिखाण ! पुस्तक छान !
ॐ
वसुधालय ब्लॉग च्या उजव्या बाजूला
ब्लॉग ची च पुस्तक तयार केली आहे
आणि लावली आहे .
मिडिया! लोक! छान पुस्तक बघतात .
पुस्तक छापायची गरज नाही .
ब्लॉग ची संगणक मध्ये सहा ! ६ ! 6 ! पुस्तक आहेत .
कित्ती फोटो माहिती लिहिली आहे बघां !
आज छान छान माहिती पुस्तक पाहिलं आहे . लिंक देते !
https://1drv.ms/p/s!AmrLLJMXaeydgxr_1FkYVLmK_oNg
छापिल पुस्तक !वसुधालय !
ॐ
मी वसुधा चिवटे ! रोज पोळी भाजी चं खात असते.
नुकते च पुणे येथे लग्न कार्य साठी जाऊन आले.
तेथे घरी आणि कार्यात पण छान मऊ दही भात खाल्ला.
ती चव छान वाटली .आणि आज कालची पोळी होती .
पोळ्या करायला नको साठी कुकर मध्ये पातेल्यात च
तांदूळ आणि पाणी जास्त घालून मऊ भात केला.
भात मध्ये दही दुध साय घातली.मिठ घातले .
खूप तेल खूप मोहरी घातली .फोडणी केली .
दही भात मध्ये घातली . हिरवी मिरची घातली गेली च नाही .
तरी पण भरपूर मोहरी ची तिखट चव छान लागली .
मस्त दही , साईच दुध मीठ मऊ भात.
पोटभर खाल्ला मी !
ॐ
ॐ
आषाढ महिना ! जुलै महिना !
काही ठिकाणी खूप पाऊस पडला ! पूर येण्या इतका पाऊस आला !
तर काही ठिकाणी गरम आणि जमीन कोरडी च आहे .
सूर्य पूजा करावी ! पाणी पूजा करावी !
आमच्या कोल्हापूर येथे पंचगंगा नदी चे पाणी देवी ला देतात पूजा करतात !
छान पाऊस आहे ! छान उन्ह आहे ! सूर्य ! पाणी ! यांना नमस्कार !
पाणी ! सूर्य ! पूजा !
ॐ
माझ्या कडे मोबाईल फोन आहे .तेथे पण
एफ एम मध्ये रेडीओ आहे !
कित्ती जवळ ठेवून रेडीओ ऐकता येतो !
मोबाईल रे डी ओ ! वसुधा चिवटे !
छान छोट छोट काम ! छोटा छोटा मोबाईल फोन ! रे डी ओ ! पण !
ॐ
तारिख २३ जुलै १९२७ .ला
भारत मध्ये ! पहिले आकाशवाणीकेंद्र !
मुंबई आकाशवाणी केंद्र प्रसारण !
पहिले आकाशवाणी केंद्र सुरूं झाले आहे.!
92 / ९२ ब्याण्णव वर्ष झाली आहेत.
अभिनंदन ! शुभेच्छा !
ओम !
आता कोल्हापूर येथे पण !
आकाशवाणी केंद्र सुरु झाले आहे!
मला सांगण्यास लिहिण्यास छान उच्छाह येत आहे.
माझी मुलाखत कोल्हापूर आकाशवाणी केंद्र येथे !
तारिख १० नोव्हेंबर २०१८ ला ! ब्लॉग वाल्या आजीबाई !
साठी मुलाखत झाली आहे.
आकाशवाणी केंद्र ! अभिनंदन ! शुभेच्छा !
तनुजा कानडे कोल्हापूर आकाशवाणी केंद्र प्रमुख अधिकारी ! वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई !
सुजाता कहाळेकर मुलाखत अधिकारी ! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !
तेजा दुर्वे मुलाखत टेप अधिकारी ! वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई !
ॐ
आषाढ महिना तुळस आणि विठ्ठल महिमा !
आमच्या सौ. सूनबाई पुष्कर कडे अमेरिका येथे
पण तुळस लावलेलीआहे. मी अमेरिका येथे असतांना
सौ सूनबाई ने तुळस रोप दिल व मी कुंडीत लावलं .
पाणी घालून वाढविल. मी भारत मध्ये असतांना
पुष्कर ने पाणी घालून दिवा लावणे चालू केले.
संस्कार आणि आवड दोन हि घरात आहे.
छान तुळस आहे.
ब्लॉग वाल्या आजीबाई ! अमेरिका येथे !
ॐ
अस च छान छान काम ! छान छान ओळख असल कि !
पृथ्वी गोल आहे अस वाटत . बोलतात पण !
मी माझ्या वसुधालय ब्लॉग मध्ये काही कारण करता
पृथ्वी ची आकृती काढली आहे..
पुस्तक खूप असतात . पण ब्लॉग ची
आणि ब्लॉगवाल्या आजीबाई च पुस्तक कोठे सापडत नाही .
कित्ती छान ब्लॉगवाल्या आजीबाई पुस्तक छोट पण
भरपूर माहिती विषय असलेल पुस्तक आहे
पृथ्वी गोल आहे. मी काढलेलं. रांगोळी चित्र !
चित्र ब्लॉग मधील दाखवित आहे.
पृथ्वी गोल आहे ! वसुधा चिवटे पृथ्वी च चित्र काढलेलं !काही तरी माहिती दिली आहे .ब्लॉग मध्ये !
पृथ्वी ब्लॉग मधिल ल च आहे. WoradPress दाखवितात .मिडिया यांनी पाहिलेली.
ॐ
ॐ शान्ति:| शान्ति: || शान्ति:|||
ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: |
भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा: ||
स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभि: |
व्यशेम देवहितं यदायु: || १ ||
ॐ स्वस्ति न इन्द्रो वृध्दश्रवा: |
स्वस्ति न: पूषा विश्र्ववेदा: ||
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि: |
स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु || २ ||
ॐ शान्ति : | शान्ति : | शान्ति : ||
ॐ
अर्थ :
हे देवांनो ! आम्ही कानांनी शुभ ऐकावे. आम्ही डोळ्यांनी
पवित्र-मंगल पाहावे.स्थिर – उत्तम अवयवांनी व सुदृढ
शरीरांनी युक्त होऊन आम्ही तुमची उपासना व स्तुती करतच
तुम्ही – देवांनी दिलेले हे आयुष्य व्यतीत करावे. ( अशी आमची प्रार्थना आहे.) [ १ ]
तो महाकीर्तिमान इंद्र आमचे कल्याण करो. ज्ञानसंपन्न आणि
वैभवसंपन्न ‘पूषा ‘ देव आमचे कल्याण करो. ज्याच्या गतीला अडथळा नाही
असा तो आकाशात संचार करणारा देव आमचे कल्याण करो आणि तो
तो वाणीला अधिपती देवगुरु आम्हांला श्रेयस् प्राप्त करून देवो. [ २ ]
व्यक्तींमध्ये शांतता नांदो.
समाजात शांतता नांदो.
जगात सर्वत्र शांतता नांदो.
_____________________________
ॐ
पूर्वी च्या कॉग्रेस च्या दिल्ली च्या शीला दिक्षीत !
जग सोडून गेल्या ! निधन !
तारिख २० जुलै २०१९ ! जन्म ३१ मार्च १९३८ ! ८१ वय !
दिल्ली च्या तिन वेळा मुख्यमंत्री होत्या.
दिल्ली त सुधारणा केली.
दिल्ली च्या कॉग्रेस शीला दिक्षीत ! कसं छान ओळख !
नमस्कार !
ॐ शान्ति:| शान्ति:|| शान्ति:|||
शीला दिक्षीत !
ॐ
अंदाज याने ज्वारी चे पीठ घेतले. हरबरा डाळ याचे पीठ घेतले .
लाल तिखट.मिठ, हळद. कच्च तेल. पाणी घालून पातळ केले .
लोखंडी तवा तापवून पाणी तेल लावले.
तेल लावले पातळ धिरड पीठ घातले.
तवा गोल गोल फिरवून धिरड भाजू दिले.
दुसऱ्या बाजूने धिरड तवा त टाकले. भाजू दिले.
नंतर दही,लिंब लोणच बरोबर खाल्ले.
भरपूर केली धिरडी ! ज्वारी चे पीठ आणि हरबरा डाळ याची.
हरबरा डाळ आणि ज्वारी चे पीठ याचे धिरड ! लोखंडी तवा !
ॐ
पूर्वी काचे च्या गोट्या घरी होत्या .त्याचे मी वायरने द्राक्ष केलेली .
तर आज काच च्या गोट्या पूर्वी लावलेल्या फोटो त
लोक ! मिडीया ! यांनी पहिल्या !Word Press दाखवितात .
ॐ
साधी रांगोळी काढणे ! देऊळ मध्ये जाणे ! गिरणीत जाणे !
लिहून लिहून छोट छोट लिखाण ! पण लोक उच्छुक तेने बघतात .
आणि ते काम खुप मोठ्ठ मोठ्ठ प्रसिद्ध होत ! जात !
काम याला सुरुवात करावी !
आपल्या जगण्याचा शोध ! आनंद ! तृप्तता घ्यावी !
बाकि ठिक ! छान ! वसुधा चिवटे !
मुग डाळ लाडू साठी दळून आणले होते !
कोल्हापूर महालक्ष्मी देऊळ येथे रांगोळी काढलेली !
ॐ
किशोर कुलकर्णी जळगाव यांची प्रतिक्रिया ! पत्रकार !
ॐ
ओळख ! ब्लॉग साठी !
ब्लॉगवाल्या आजीबाई लेख ! मूळे आमदार सतेज पाटील ! व्यासपीठ येथे आले मी ! अभिनंदन ! शुभेच्छा !
ॐ
गोड खाऊ खावां !
काय होत सकाळी ११ वाजता शुगर ची साखर ची औषध गोळी घेते.
३ / ४ वाजता ताकद कमी होते. गळल्या सारखं होत.
तर हल्ली मी थोड गोड खाण्यास लागले.एक पोळी पण खाते.
चार वाजता खाते. बर वाटत .तर थोड गोड खावयाला हव
नुसती औषध गोळी घेऊन थांबू नये.
लग्न सोहळा येथे पण मी थोडा गोड लाडू ,आयस्क्रीम ,
शिरा खाल्ला माझी लग्न सोहळा येथे तब्येत छान राहिली .
जास्त बरं आणि खरं आहे.
तर थोड गोड खाण्या साठी पुरोहित मधून.
हायटेष्ट येथून खाऊ आणला .
ॐ
ढोबळी हिरवी मिरची !
ढोबळी मिरच्या पिवळी ! लाल ! हिरवी ! हल्ली असतात.
मी हिरवी ढोबळी मिरची १० रुपये ची आणली .
थोडी ढोबळी मिरची बी सगट विळी ने बसून बारिक चिरली.
लोखंडी कढईत तेल मोहरी ची फोडणी केली.त्यात
ढोबळी मिरची चिरलेली घातली. थोड मऊ होण्या साठी पाणी घातले.
हल्ली पाणी घालून मऊ भाजी करते .चावण्या साठी पचण्यासाठी .
शिजवू दिले.शेंगदाणे कूट घातला.मिठ, हळद घातले .
शिजवू दिले . लोखंडी कढई त केल्याने आयर्न मिळते .
परतले कि भाजी खमंग होते .मस्त ढोबळी हिरवी मिरची भाजी
यम ! यम ! खमंग ! चविष्ठ केली .
ॐ
ॐ
कित्ती खेळ आहेत बघां !
जगभर चे खेळ !
पण आंतर राष्ट्रीय खेळ मध्ये
भारत मधील खो ! खो ! हु. तू .तू . ! विट्टी दांडू !लगोरी ! काठी !
लेझीम ! सागर गोटे ! असे खेळ आंतरराष्ट्रीय नाहीत !
असे करायला हवेत !
खेळ दिसत नाहीत !
टेनिस ! TENNS !
KRIKET ! क्रिकेट !
बॉक्सिंग BOKSIMG !
फुट बॉल ! BHUT BO !
भूट बॉल !
BUDHDI BAL ! बुद्धी बळ !
ॐ
वसुधा चिवटे ! ची ओळख !
कविता किंवा ललित लिखाण साठी नाही !
तर मराठी भाषा संगणक चा प्रचार प्रसार साठी आहे.
पाककृती . रांगोळी . खेळ , ओळख . सणवार माहिती .
गुरुं बद्दल माहिती असं थोड थोड लिखाण ची ओळख आहे .
संगणक मध्ये केले ली वसुधालय ब्लॉग च्या उजव्या बाजूला
लावलेली पुस्तक वाचक बघतात !
आणि हो ! मला !
ब्लॉग वाल्या आजीबाई ! नेटकरी आजीबाई ! वसुधा आजी !
अशा प्रकारे माझी ओळख जास्त चांगली आहे .
याच मला खूप बरं आणि खरं वाटतं !
शुभेच्छा ! अभिनंदन !
ॐ
तारिख १६ जुलै २०१९ मंगळवार !
गुरुं पौर्णिमा !!
माननिय संतोष विनायक नागापूरकर !
यांचा गुरुं पौर्णिमा ला
जन्म दिवस आहे . वाढदिवस आहे .
शुभेच्छा
संतोष विनायक नागापूरकर !
माझे मामा भाऊ आहेत ! सख्खे मामे भाऊ आहेत !
वाढदिवस साठी ! इतर साठी ! खूप खूप शुभेच्छा !
वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !
संतोष नागापूरकर ! सौ.सुजाता नागापूरकर ! वसुधा चिवटे !
शुभेच्छा ! अभिनंदन !
ॐ
तारिख १६ जुलै २०१९. मंगळवार !
गुरुं पौर्णिमा !
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज !
नमस्कार !
नमस्कार गोंदवले !
नमस्कार !
ॐ
तारिख१६ जुलै २०१९ .
मंगळवार .
गुरुं पौर्णिमा ! दत्त गुरुं नां नमस्कार !
अनारसा खाऊ दिलेला !
दत्त गुरुं नमस्कार ! अनारसा नैवेद्द !
साटोरी नैवेद्द !
नर्सोबा वाडी प्रसाद !
ॐ
मी ! वसुधा चिवटे !
अमेरिका येथे योग चा एक क्लास केला !
तर गुरुं नां !
मी काढले ले || श्री यंत्र || || महालक्ष्मि यंत्र ||
दिले आहे दक्षिणा ! पैसे सगळे जण देतात !
आपली कला जास्त देण चांगल !
आणि गुरुं पण सर्व हॉल मध्ये म्हणाले !
इंग्रजी त ! Droimg ! मिळाले !
सर्व हॉल मध्ये सर्व जण यांनी ऐकले .
मला आणि आमच्या घरी ज्यांनी मला क्लास दिला,
त्यांना पण बरं वाटलं .
खरं आणि बरं च चालू आहे .
गुरुं नां ! नमस्कार !
कित्ती कोरिव आल आहे बघां ! || श्री यंत्र || नमस्कार !
रंगोली ! रांगोळी ! श्र्लोक !
योगा क्लास मध्ये फुट बॉल खेळतांना ! वसुधा चिवटे ! अमेरिका !
ॐ
Novak Djokovic celebrates with the Wimbledon championship trophy after defeating Roger Federer on Sunday. (Tim Ireland / Associated Press)
ॐ
तारिख १६ जुलै २०१९ .
आषाढ पौर्णिमा ! व्यास पौर्णिमा ! गुरुं पौर्णिमा !
खूप गुरुं ची विद्या मिळाली मला.
शाळा शिकले.S.S.C. पास झाले. पार्ले मुंबई येथे पास झाले .
महाराष्ट्र टाइम्स मध्ये माझा परीक्षा नंबर आला.
मी औरंगाबाद येथे होते तेथे,
मला माझी बहिण कमल ताई ने तार केले ली आठवत.
नंतर हलवा दागिने शिकले,विडा च पान यात रांगोळी काढण्यास शिकले.
शिंकाळी करण्यास शिकले. सतार शिकले. स्वंयपाक करण्यास शिकले.
कागद कला, रांगोळी .स्वच्छता. टापटिप पणा ! सर्व खूप शिकले.
संगणक शिकले मराठी लिखाण करू लागले .थोड थोड पण
खूप शिकले. सर्व गुरुं नां माझा नमस्कार !
व्यास पौर्णिमा ! गुरुं पौर्णिमा अगदी तृप्त अगदी !
खरं आणि बरं वाटत आहे. शुभेच्छा ! अभिनंदन !
आपली
ब्लॉग वाल्या आजीबाई ! नेटकरी आजीबाई ! वसुधा आजी !
वसुधा चिवटे !
ॐ
Novak Djokovic celebrates with the Wimbledon championship trophy after defeating Roger Federer on Sunday. (Tim Ireland / Associated Press)
ॐ
Novak Djokovic celebrates with the Wimbledon championship trophy after defeating Roger Federer on Sunday. (Tim Ireland / Associated Press)
Novak Djokovic जिंकले !
ॐ
मराठी भाषा संगणक मध्ये किति पसरली ! नोंद वर्तमान पत्र ने घेतली आहे !
धन्यवाद ! अभिनंदन ! वसुधालय मराठी ब्लॉग ! वसुधा चिवटे !
ॐ
माझे चुलत भाऊ केदार देशपांडे सौ माया देशपांडे यांच्या
मुलाच देवाशीष सौ पूजा च लग्न पुणे येथे झाले .
मी कोल्हापूर येथून पुणे येथे जाऊन आले.
तारिख१० जुलै २०१९ ला लग्न झाल .
मी तारिख ९ जुलै ला पुणे येथे घरी गेले .
तारिख ९ जुलै ला रिक्षा चा संप आहे.
समजल मी जाण रद्द केल .पण
तारिख ९ जुलै २०१९ ला सकाळी भाऊ चा फोन आला
संप संपला .तू आत्ता निघाली तर ५ वाजे पर्यंत घरी येशील .
पुणे येथे गर्दी आहे वाहन चालविण्यास दोन दोन /२ तास लागतिल.
तर रिक्षा करून घरी ये .
मी कोल्हापूर घरातून ११ वाजता निघाले.रिक्षा केली.
रिक्षा वाले यांना विचारले कि का संप करणार होते.
भाड वाढवून हवे का ! नाही आत्ता च भाड वाढले आहे
गिऱ्हाईक येणार नाहित.तर जुन्या रिक्षा काढा नविन रिक्षा घ्या .
सरकार सांगत.नविन रिक्षा दोन लाख रुपये ला आहेत परवडत नाही .
साठी मिटिंग चालू आहे. संप मागे घेतला आहे.
मला पुणे ची बस मिळाली १२ वाजता सकाळी .
आधार कार्ड दाखवून तिकीट घेतले
मध्ये एक तास बस थांबली.
पुणे येथे ५ वाजता स्वारगेट येथे पोहचले .
दोन तिन रिक्षा नाही म्हणाल्या.
दीडशे रुपये भाड ठरवून रिक्षात बसले .
घर जवळ आले भाऊ ला फोन केला
कस घरी येऊ .रिक्षा वाले निं निट घरी पोहचविले .
एकटी ७६ वय ची मी सामान घेऊन घरी आली
बर वाटल खर वाटल .
तारिख१० जुलै २०१९ ला भाऊ च्या गाडी तून
कार्यालय येथे गेलो .बहिण सौ भावजय बरोबर .
भाऊ म्हणाले वय ने एवढी मोठ्ठी एकटी सामान घेऊन
घरी छान पोहचली आणि स्वारगेट येथे पाउस च्या सर मध्ये
ओली झाली.
. माझ्या धाकटी बहिण ला सांगत राहिले.
कार्यालय लग्न सोहळा येथे जळगाव चे किशोर कुलकर्णी चे
ओळखीचे भेटले. तेथे किशोर कुलकर्णी चिं आठवण काढली.
मला किशोर कुलकर्णी माहित आहे असे मला म्हणाले .
मला खूप छान वाटल. येथे पण किशोर कुलकर्णी
ओळखतात आणि मला पण याच च जास्त बर ! खर वाटल !
लग्न सोहळा येथे मला विचारले तुम्हाला कोठे तरी पाहिलं .
तुम्ही ब्लॉग करता का ! मी हो !सांगितलं !
मराठी संगणक मध्ये ब्लॉग करते .
तुम्ही मला लोकमत टी. व्ही. बातम्या मध्ये पाहिलं असणार !
माझी मुलाखत झाली आहे . बघा !किती मराठी भाषा चा आणि
वसुधा चिवटे यांचा प्रचार पोहचला ! बेंगलोर मध्ये पण
एक जण भेटले ते पण म्हणाले तुम्हाला मी टी.व्ही. त पाहिलं.
छान वसुधालय मराठी संगणक लिखाण वाचल जात .
याच च जास्त मला खरं आणि बरं वाटत आहे.
लग्न सोहळा झाला.पुणे कोल्हापूर येथे येण्यास निघाले .
माझी मोठ्ठी बहिण रिक्षाने सौअनुराधा गरुड कडे गेलो .
एकादशी चा फराळ केला.
त्यांच्या आई वडील यांनी आमच लग्न जुळविल.
त्याची आठवण जाण साठी त्यांच्या कडे गेले.
पुणे येथे खूप घर चे पाहुणे आहेत.पूर्वी येण जाण असे.
पण हल्ली १० वर्षात कमी झाले.साठी सरळ घरी आले.
स्वारगेट येथे कोल्हापूर बस घेतली.
खालीच खिडकीत आधार कार्ड दाखविल. तिकीट घेतलं.
कोल्हापूर येतांना पण बस एक तास नाष्टा साठी बस थांबली.
चार ४ वाजता कोल्हापूर एस्टी बस ठिकाण येथे बस थांबली .
रिक्षा करून घरी आले .
आमचा मुलगा प्रणव माझी वाट पाहत च होता.
त्यांनी मला पाणी चहा दिला .सर्व आवरून
दिवस सुरु केला.
असा लग्न सोहळा चा प्रवास
कोल्हापूर पुणे कोल्हापूर
कोठे हि त्रास न होता उच्छाह ने
महोच्छव केला लग्न सोहळा चा
लग्न सोहळा छान गाजवून आले.
जास्त चांगल बरं आणि खरं वाटत आहे.
लग्न सोहळा येथे!
मराठी संगणक मध्ये मराठी वसुधालय ब्लॉग आणि
लोकमत टी. व्ही. बातमी छान गाजली !
छान वाटत आहे !
सर्वांना शुभेच्छा !अभिनंदन !
बाकि! ठिक! छान! क्षेम!
आपली
वसुधा चिवटे !
ब्लॉग वाल्या आजीबाई ! नेटकरी आजीबाई ! वसुधा आजी !
ॐ
आपण मानानं ! वय ! मोठ्ठे असो कि ! आपण मानानं ! वय ! लहान असो !
भेटी करण कोणा कडे घरी जाणं मन चं असतं !
त्यासाठी शब्द पाळण पण मन असतं !
शब्द पाळण अवघड असलं तरी ! असतं !
ते करण ते जास्त चांगल असतं !
मन तृप्त असतं ! शान्त मन असतं !
चुकल असं आजिबात वाटत नसतं !
तसं घडल कि काही वाटत नसतं !
असतं !
शुभेच्छा ! अभिनंदन ! असतं !