आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 19, 2019

जळगाव किशोर कुलकर्णी ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

किशोर कुलकर्णी जळगाव यांची प्रतिक्रिया !  पत्रकार !

ओळख  ! ब्लॉग साठी !

  1. Kishor Kulkarni said:
  2. आजीबाई नमस्कार,
    खूप छान लिहिलं तुम्ही. नागापूरकर साहेबांचा आणि माझा खूप जुना परिचय आहे. जैन इरिगेशनच्या माध्यमातून ते मला भेटले… दरम्यानच्या काळात सात आठ वर्षे भेट नाही, संपर्क नाही. परंतु ते जळगावला कंपनीत आले असता इतक्या वर्षांनी मला बरोबर ओळखले. पृथ्वी गोल असते असं म्हणतात. त्याचा अऩुभव मी घेतला. योगायोगाने वसुधालयची लिंक मला मिळाली आज्जीबाईंवर लेख लिहिला आणि त्या म्हणजे झाकलं माणकं… त्यांच्यावर लिहिलं त्यांचा फोन नंबर मिळविला आणि त्यांच्याशी बोलून तरुण भारतात लेख लिहिला. आज्जीबाईंना हे अनपेक्षीत होते. त्यावेळी काही सोशल मीडिया इतका स्ट्रॉंग नव्हता. त्यांना तरुण भारतचा अंक पोस्टानं कोल्हापूरला पाठविला. नंतर एकातून एक गोष्टी घडत गेल्या. मग मी आणि विभाकर कुरंभट्टी आम्ही बॉगवाल्या आजीबाई हे पुस्तक केलं. ओळखी वाढत गेल्या. आग्रहाने मला कोल्हापूरला बोलावून घेतलं जन्मदिवस आज्जीबाईंनी साजरा केला त्यासाठी मी कोल्हापूरला त्यांच्या घरी मुक्कामी पोहोचलो. टिव्हीवर पण झळकल्या. आज्जीबाई अशा पद्धतीने सेलिब्रेटीच झाल्या की ओ… आपणं निमित्त मात्र…
    खूप आनंद वाटला मला. कुणाला दुःख देणं सोप्प असत परंतु दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवणं हे खूप आनंददायी असते बघा… इनफिनिटी ठाउक आहे का तुम्हा. म्हणजे आडव्या इंग्रजी आठ अंकांचे चिन्हं. म्हणजे आपणं दुसऱ्यासाठी आनंद पेरला तर आपल्यापर्यंत तो आनंद बरोबर येऊन मिळतो. असेच काही से केले मी माझ्या जीवनात. 78 वर्षांच्या माझ्या या मैत्रिणीवर मी चिडलो देखील पणं त्या निर्मळ प्रेमच करत राहतात. आमची आई मुलाची स्नेहाची ही मैत्री आहे.

    1. ओम !अभिनंदन ! आपण लेख पुस्तक करून ब्लॉगवाल्या आजीबाई चिं जगभर ओळख करून दिलीत !आणि हो क्यालिफोर्निया विश्र्वसंवाद येथे मंदार कुलकर्णी येथे पुस्तक आणि लेख ब्लॉग वाल्या आजीबाई चिं ओळख पण बोलून दाखविली . मी खूप खुश आहे . खरं आणि बरं ! शुभेच्छा ! अभिनंदन !

untitled

56398377_1256069701236464_3806232556387434496_n

IMG_1477[1]

ब्लॉगवाल्या आजीबाई लेख ! मूळे आमदार सतेज पाटील ! व्यासपीठ येथे आले  मी ! अभिनंदन ! शुभेच्छा !

 

गोड खाऊ खावां ! वसुधा चिवटे !

गोड खाऊ खावां !

काय होत सकाळी ११ वाजता शुगर ची साखर ची औषध गोळी घेते.

३ / ४ वाजता ताकद कमी होते. गळल्या सारखं होत.

तर हल्ली मी थोड गोड खाण्यास लागले.एक पोळी पण खाते.

चार वाजता खाते. बर वाटत .तर थोड गोड खावयाला हव

नुसती औषध गोळी घेऊन थांबू नये.

लग्न सोहळा येथे पण मी थोडा गोड लाडू ,आयस्क्रीम ,

शिरा खाल्ला माझी लग्न सोहळा येथे तब्येत छान राहिली .

जास्त बरं आणि खरं आहे.

तर थोड गोड खाण्या साठी पुरोहित मधून.

हायटेष्ट येथून खाऊ आणला .

IMG_2418

 

 

 

 

ढोबळी हिरवी मिरची भाजी ! वसुधा चिवटे !

ढोबळी हिरवी मिरची !

ढोबळी मिरच्या पिवळी ! लाल ! हिरवी ! हल्ली  असतात.

मी हिरवी ढोबळी मिरची १० रुपये ची आणली .

थोडी ढोबळी मिरची बी सगट विळी ने बसून बारिक चिरली.

लोखंडी कढईत तेल मोहरी ची फोडणी केली.त्यात

ढोबळी मिरची चिरलेली घातली. थोड मऊ होण्या साठी पाणी घातले.

हल्ली पाणी घालून मऊ भाजी करते .चावण्या साठी पचण्यासाठी .

शिजवू दिले.शेंगदाणे कूट घातला.मिठ, हळद घातले .

शिजवू दिले . लोखंडी कढई त केल्याने आयर्न मिळते .

परतले कि भाजी खमंग होते .मस्त ढोबळी हिरवी मिरची भाजी

यम ! यम ! खमंग ! चविष्ठ केली .

IMG_2422

IMG_2419

 

 

 

ओळख ! वसुधा चिवटे !

ओळख !
कित्ती छान ओळख आहे बघां !
संतोष विनायक नागापूरकर
लग्न सोहळा त माझ्या बरोबर बोलतांना
सांगतात !
किशोर कुलकर्णी मला माहित आहे.
त्यांना मी फोन करतो.
तुमच्या आजीबाई माझ्या.​
तू आत्या बहिण आहे .
आणि खरं चं संतोष नागापूरकर यांनी
किशोर कुलकर्णी यांना फोन केला आहे.
आणि किशोर कुलकर्णी  पण मला म्हणाले.
तुमचे नागापूरकर यांचा मला फोन आला .
तुम्ही आत्या बहिण आहात.
मी नागापूरकर यांना   २००२ पासून ओळखत आहे.
आमची ! ओळख आहे !
जास्त मला सांगायचं आहे.
आजीबाई  चिं ओळख निघाली .
जास्त खरं आणि बरं  वाटतं आहे .
सर्वांना शुभेच्छा ! अभिनंदन !
किशोर कुलकर्णी यांना
 
सौ.अनुराधा गरुड पण माहित आहे त.
 
आणि मला पण दोघ ओळखतात .
संगणक मूळे खूप छान ओळख पसरली आहे.
माझी !
वसुधा चिवटे !
66337712_1330453757131391_3053223020148555776_n
संतोष नागापूरकर ! सौ,सुजाता नागापूरकर ! वसुधा चिवटे !
IMG_1403[1]
किशोर कुलकर्णी ! ब्लॉग वाल्या आजीबाई !
66394816_1330457283797705_12800183658086400_n
सौ. अनुराधा गरुड ! वसुधा चिवटे !
%d bloggers like this: