आपले स्वागत आहे!


श्री नामदेव गाथा
[ ३१ ]
मयुरादि पक्षी करताती | नद्दा वाहताती दोन्ही थड्या || १ ||
भूमीवरी सडे केशर कस्तुरी | आनंद अंतरी सकळांचा || २ ||
विमानांची दाटी सुरवर येती | गंधर्व गाताती सप्तस्वरें || ३ ||
मंदमंद मेघ गर्जना करिती | वाद्दें वाजताती नानापरी || ४ ||
नामा म्हणे स्वर्गी नगारे वाजती | अप्सरा नाचती आनंदानें || ५ ||
[ ३२ ]
दशरथें मारिला तोची होता मास | वर्षा ऋतू असे कृष्णपक्ष || १ ||
वसुनाम तिथीं बुधवार असे | शुक सांगतसे परीक्षिती || २ ||
रोहिणी नक्षत्र दोन प्रहररात्र | माया घाली वस्त्र रक्षपाळा || ३ ||
नवग्रह अनुकूल सर्वांचें जें मूळ | वसुदेव कपाळ धन्य धन्य || ४ ||
जयाचा हा वंश तयासी आनंद | माझ्या कुळीं गोविंद अवतरला || ५ ||
अयोनीसंभव नोहे कांहीं श्रमी | नामयाचा स्वामी प्रगटला || ६ ||


श्रीनामदेव गाथा
[३]
गणेश नमूं तरी तुमचा नाचणा | म्हणोनि नारायणा नमन माझें ||१||
सारजा नमूं तरी तुमची गायणी | म्हणोनि चक्रपाणि नमन माझें ||२||
इंद्र नमूं तरी तुमचिया भुजा | म्हणोनि गरुडध्वजा नमन माझें ||३||
ब्रम्हा नमूं तरी तुमचिये कुसी | म्हणोनि ह्रषीकेशी नमन माझें ||४||
शंकर नमूं तरी तुमची विभूति | म्हणोनि कमळापति नमन माझें ||५||
वेद नमूं तरी ती तुझा स्छापिता | म्हणोनि लक्ष्मीकांता नमन माझें ||६||
गंगा नमूं तरी तुमच्या अंगुष्टी | म्हणोनि जगजेठी नमन माझें ||७||
लक्ष्मी नमूं तरी तुमच्या पायांतळीं | म्हणोनि वनमाळी नमन माझें ||८||
नामा म्हणे भेटी जालिया पैं राया | कोण गणि वायां सेवकासि ||९||

अभंग ३ – १ ‘ तुमचा ‘ या शब्दाऐवजी ‘ तुझा ‘ असा शब्द
काही हस्तलिखितांत सर्व अभंगभर सापडतो.(पं.व शि. )
२ काही हस्तलिखितांत ‘ माझें ‘ च्या ऐवजी ‘ तुज ‘ असे सर्वत्र
सापडते.
३ ऐसें नमन माझें सकळिकां देवा | नामा म्हणे केशवा नमन माझें ||१||
(पं. शि. व आ. )

DSCF2559

IMG_2449

गोड खाऊ !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: