आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 23, 2019

गुणग्राहक डॉ. राजेंद्र आणि सौ. तेजश्री आठवले !

गुणग्राहक डॉ. राजेंद्र आणि सौ. तेजश्री आठवले खान्देशातील जळगाव जिल्ह्यातील जळगाव बऱ्हाणपूर रस्त्याने रावेर हे तालुक्याचं शहर आहे. येथे गेल्या 19 वर्षांपासून अखंडपणे ‘रंगपंचमी व्याख्यानमाला’ ज्यांच्या पुढाकाराने सुरू आहे ते डॉ. राजेंद्र आठवले आणि पत्रकार दिलीप वैद्य या दोहोंना जाते. या व्याख्यानमालेसाठी माझे मानसपुत्र व ज्यांनी मला ‘ब्लॉगवाल्या आजीबाई’ ही ओळख जगाला करून दिले ते जळगावचे पत्रकार किशोर कुळकर्णी यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रावेर येथे गेले होते. त्यांच्या रावेरच्या या भेटीत लेखक आणि सुंदर अक्षराचे धनी असलेले डॉ. राजेंद्र आठवले यांच्या घरी जाण्याचा योग आला. या सदिच्छा भेटीत त्यांनी माझ्यावर लिहिलेल्या ‘ब्लॉगवाल्या आजीबाई’ हे पुस्तक डॉ आठवले परिवारास भेट म्हणून दिले. दोन दिवसात संपूर्ण पुस्तक वाचून सौ. आठवले व त्यांच्या कन्येनी मला दूरध्वनीवर पुस्तकाबाबत प्रतिक्रिया दिली. ही प्रतिक्रिया माझ्यासाठी अनपेक्षीत असली तरी सुखावणारी नक्कीच आहे. फोनवर आम्ही मनसोक्त गप्पा मारल्या त्याची माहिती असलेला हा छोटासा ब्लॉग इथे मुद्दाम देत आहे. हा ब्लॉग म्हणजे आत्मस्तुती वाटेल. परंतु माझ्या सारख्या वयाच्या अठ्याहत्तर वर्षे उलटलेल्या आजीबाई संगणक शिकतात काय, वसुधालय हा ब्लॉग चालवून जगभर 6 लाखांहून अधिक वाचकांनी भेट दिली या सगळ्या गोष्टी सौ आठवले यांना अगदीच औत्सुक्याच्या वाटल्या म्हणून त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि मोकळ्या गप्पा मारल्या. त्यांच्या या बोलण्यामुळे मला फार भरून आलं. दैनंदिन जीवनातल्या पारंपरिक जुन्या विषयांवर मी माझ्या ब्लॉगमध्ये लेखन केलं आहे. त्याचे पुस्तक जळगावच्याच कृपा प्रकाशनने प्रकाशित केलं आहे. हा पुस्तक म्हणजे विविध दैनंदिन विषयाचा खजिना आहे. नव्या पिढीला हे विषय विस्मरण मुळीच होऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया सौ. तेजश्री आठवले या माझ्या वाचकाने दिली. रावेर येथील सांस्कृतिक वैभवात ज्या परिवाराने मोलाची भर घातली आहे. मराठीचे सुप्रसिद्ध लेखक व.पु. काळे, सलील कुळकर्णी, राम शेवाळकर अशा दिग्गज मंडळींनी डॉ. आठवले यांच्या घरी हजेरी लावली आहे. रावेरमधलं एक साहित्य प्रेमी, संस्कृति प्रेमी परिवार म्हणून आठवले यांचा लौकीक आहे. त्या परिवारात हे ब्लॉगवाल्या आजी हे पुस्तक जाणं म्हणजे माझ्यासाठी सौभाग्याचे आहे. डॉ. राजेंद्र आठवले हे व्यवसायाने डॉक्टर आहे परंतु त्यांचे अक्षर हे मोत्यासारखं सुंदर आहे. खरे तर डॉक्टरांचे अक्षर हे दिव्य असते. त्यांनी लिहिलेलं हे फक्त केमिस्ट किंवा मेडिकल दुकानदारच वाचू शकतो परंतु डॉक्टर आठवले हे मात्र अपवाद म्हणता येईल. दवाखाना खाली आणि डॉक्टरांचा निवासवरच्या मजल्यावर अशी व्यवस्था त्यांनी रुग्णसेवेसाठी केली आहे. त्यांच्या या कौटुंबीक वैद्यकीय व्यवसायाला 100 वर्षे झालीत म्हणजे. त्यांचा वाडा देखील शंभर वर्षाच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यांच्या घरात वैद्यकीय वारसा सुरू आहे, जनसेवा सुरू आहे. त्यांच्या मोठ्या मुलीच्या लग्नाला आहेर म्हणून त्यांनी ग्रंथ भेट देणे ही किती मोठी गोष्ट आहे. वेगळ्या ध्येयाने काम करणारे भेटलेले आठवले दाम्पत्य माझ्या मैत्रीच्या, स्नेहाच्या यादीच अग्रक्रमाने असतील हे खरे आहे. त्यांची कन्या अपूर्वा कोल्हापूरला येत असते. पुढल्यावेळी कोल्हापूरला आले की नक्की घरी या असं आग्रही निमंत्रण मी आठवले परिवाराला दिलं आहे. आठवले परिवाराशी यापूर्वी कुठलीच ओळख नव्हती परंतु माझ्या पुस्तकामुळे हा परिवार माझ्यासोबत जुळला ही देणगी किंवा याचे श्रेय हे माझ्या ब्लॉग आणि पुस्तकाला आहे हे नक्की. डॉ. राजेंद्र आठवले, रावेर यांच्यासी संपर्क साधायचा असेल तर 02584250513 येथे संपर्क साधू शकतात. – वसुधा चिवटे, कोल्हापूर दि. 23 नोव्हेंबर 2019 ————————————– फोटो – ब्लॉगवाल्या आजीबाई पुस्तक सौ. तेजश्री आठवले यांना देताना पत्रकार किशोर कुळकर्णी फोटो – आठवले परिवारास आमची आई, पासवर्ड सुंदर अक्षराचा आणि ब्लॉगवाल्या आजीबाई हे पुस्तक देताना पत्रकार कुळकर्णी

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

ab66d111-e93f-49d4-b70c-5a9efffacb10

ओम !  सौ. तेजश्री आठवले ! पत्रकार किशोर कुलकर्णी ! ब्लॉग वाल्या आजीबाई पुस्तक ! अभिनंदन !

सौ.तेजश्री आठवले यांनी आमच्या बरोबर बोलतांना पाकातल्या पुऱ्या ! पंचामृत चा उल्लेख केला !

हल्ली असे पदार्थ होत नाहीत ! चिरोटे करतात अस छान पुस्तक वाचन बद्दल बोलल्या !

मोकळे पण याने ! वसुधा चिवटे ! मी किशोर कुलकर्णी आणि त्या तिघ हि फोन मध्ये गप्पा केल्या

खूप खुश मी ! असो !

cb3be1b2-295d-4f1b-a0f5-7ab48d79eaf5 (1)

ओम !

वसुधा चिवटे, कोल्हापूर दि. 23 नोव्हेंबर 2019  ब्लॉगवाल्या आजीबाई पुस्तक सौ. तेजश्री आठवले यांना देताना पत्रकार किशोर कुळकर्णी फोटो – आठवले परिवारास आमची आई, पासवर्ड सुंदर अक्षराचा आणि ब्लॉगवाल्या आजीबाई हे पुस्तक देताना पत्रकार कुळकर्णी !

गुणग्राहक डॉ. राजेंद्र आणि सौ. तेजश्री आठवले  !  पत्रकार किशोर कुलकर्णी !

ब्लॉग वाल्या आजीबाई ! आमची आई ! पासवर्ड सुंदर अक्षर चां ! सर्व पुस्तक  !  अभिनंदन !

सौ.तेजश्री  श्री राजेंद्र ! यांची नात मीरा ! ला गोड पापा ! वसुधा  आजी ! असो !

IMG_1477[1]

ओम ! ब्लॉग वाल्या आजीबाई ! वसुधा चिवटे ! ! कोल्हापूर महाराष्ट  आमदार सतेज पाटील !

दोन देव चे नैवेद्द जोडी ! वसुधा चिवटे !

नर्सोबा वाडी चा प्रसाद !

देहु चा प्रसाद !

घेतलेला नैवेद्द !

वसुधा चिवटे यांनी !

 

dscf4003

ओम नर्सोबा वाडी चा नैवेद्द ! वसुधा चिवटे !

dscf3907

ओम देहू चा तुकाराम संत चा नैवेद्द ! वसुधा चिवटे !

dscf3913

ओम तुकाराम संत नमस्कार !

 

नैवेद्द ! प्रसाद ! चि जोडी ! वसुधा चिवटे !

 

देव  दर्शन पूर्वी करून आले !

तेथील प्रसाद पण घेतला !

कित्ती भक्त आहेत प्रसाद साठी बघा !!

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई

 

IMG_1600[1]

ओम नर्सोबा वाडी चा प्रसाद !

dscf3908

ओम देहू चा प्रसाद !

 

 

जांभळ! आवळा! याची जोडी! वसुधा चिवटे!

कोल्हापुर राजारामपुरी भारत हॉल येथे

सौ,गंगू आजीबाई सौ.सखू आजीबाई !

फळ भाजी यांची विक्री करतात  !

पाऊस उन्ह थंडी त रात्र फार असली !

तरी खूप वेळ विक्री करतात !

अस च मी त्यांना विचारून आणि त्यांनी

ऑ आजी आमचे फोटो घ्या !

बोलून घेतले आहे त ! तर मी

ऋतु तिल आवळा ! सीताफळ ! मटार

यांचा आणि जांभळ याचा फोटो जोडी लावत आहे य !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_6831[1]

ओम काय जांबळ !करवंद आहेत बघां ! सौ गंगू आजीबाई !सौ.सखू आजीबाई !

शेतकरी पण कित्ती भारदस्त रहाण ! असो ! वसुधा चिवटे !

IMG_2724

ओम आवळा !मटार !सिताफळ ! वसुधा चिवटे !

IMG_6703[1]

ओम जांभळ !वसुधा चिवटे च्या घर ची विकत आणले ली !

img_20191031_152253461-1

ओम सिताफळं !

%d bloggers like this: