आपले स्वागत आहे!

बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे चौधरी वाड्यात
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा 3 डिसेंबरला 68 स्मृतिदिन

बहिणाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे चौधरीवाडा, जुने जळगाव येथे खान्देशच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा ६८ वा स्मृतिदिन दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता साजरा होत आहे. या कार्यक्रमासाठी साहित्यिक बी.एन. चौधरी व डॉ. संजीवकुमार सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टच्या संचालिका सौ. ज्योती जैन, श्रीमती स्मिता चौधरी, दिनानाथ चौधरी व चौधरी परिवारातील सदस्य, अनुभूती स्कूलमधील मराठी विषयाचे विद्यार्थी, साहित्यिक उपस्थित असतील.
जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे जळगावच्या चौधरी वाड्यातील बहिणाबाईंच्या घराचं रूपांतर संग्रहालयात झालेले आहे. बहिणाबाई चौधरी यांच्या रोजच्या वापरातील शेतीची अवजारं, स्वंयपाकाच्या वस्तू, भांडी, पुजेचं साहित्य ह्यांची जपवणूक केली आहे. हा अलौकिक ठेवा पुढील पिढीला पाहता येत आहे. अरे संसार संसार म्हणत संसारातील सुख दुःखांच्या साक्षीदार असलेल्या अनेक गोष्टी या संग्रहालयात बघायला मिळतात. हे संग्रहालय फक्त बहिणाबाईंच्या वस्तूंचं, आठवणींचंच संग्रहालय नाही तर या भागातील कृषीजन संस्कृतीत राबणाऱ्या, कष्टकरी महिलांच्या आठवणींचा, श्रमाचा हा ठेवा आहे. जळगावात जेव्हा लेखक कवी येतात तेव्हा ते आवर्जून ह्या वाड्याचं दर्शन घेतात.
साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन बहिणाबाई चौधरी स्मृती कार्यक्रमाच्या आयोजकांनी केले आहे.

dc8c51d2-4474-46a7-93bf-76d0c9c33593 (1)

42a02e22-e117-4eec-899d-0910a280be33

ॐ छान कार्यक्रम !

6de6b3a0-9d03-4849-b1a0-edcb0dcbb77f

ॐ अभिनंदन !

e757020a-9516-4977-825a-c4af7c8f2224

ॐ कित्ती काळ असला तरी समाज कार्य स्वत: चे कार्य टिकून राहत चं ! नमस्कार !

 

img_20191130_072816185

वसुधा चिवटे !

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: