आपले स्वागत आहे!

Archive for मे 20, 2020

Whats App ऑनलाईन ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख २० मे २०२०!

Whats APP!  ऑनलाईन !

येथे सर्व माहिती आपल्या ला मिळते च असे नाही!

शिकावी लागते!  मी तरी शिकते!

हल्ली ऑनलाईन मध्ये १० वी चा अभ्यास पण शिकवितात!

आमच्या शेजारी राहणाऱ्या सौ बने बाई शिकवितात!

मला पण पुष्कर चिवटे  व्हिडीओ कसा घ्यावयाचा !फोन बंद पडला कि

कसा चालू करायचा! खूप च माहिती लिहून बोलून देतात!

तसेच ब्लॉग साठी सौ. कविता देशपांडे लिहून पाठवतात!

मी फोटो मागते ते फोटो देतात मी ब्लॉग पण करते !

सौ.ज्योत्स्ना खेर्डे पण माहिती देतात मी ब्लॉग करते!

नुकतेच PONDICHERRY येथे  कमल मावशी यांनी

तुळस व ईतर बाग चे फोटो पाठविले कित्ती छान

एक नंबर ब्लॉग आहे तुळस चा ! व्वां ! सर्व जन

तुळस पाहून मावशी णा फोन पण केले !

आणि हो!

किशोर कुलकर्णी पण ब्लॉग साठी छान चं माहिती देतात !

मी असेच WhatsApp चा उपगोग करते !

तसेच आपण पण एवढ छान मशीन चा उपयोग करा !

उच्छाह ठेवा ! काम करा!

कुणाला कशा साठी माहिती द्यावयाची अस नसतं!

शेवटी आपली ईच्छा ! आपला प्रश्र्न!

पूर्वी मला संगणक मध्ये!

माझे मोठ्ठे सख्खे  भाऊ R.Y. Deshpande!  आणि पुष्कर चिवटे!

प्रणव चिवटे संगणक मध्ये शिकवीत!

मि संगणक मराठी शिकले!

फेस बुक करते! मराठी ब्लॉग करते! Whats App करते!

करोना असो!  इतर  दिवस असो माझ काम

शिकण ! आणि माहिती देण ! मस्त उच्छाह च च राहते!

त्या साठी मी आजीबाई चि ओळख साठी प्रसिध्द आहे य !

आणि हो !मला समजल तर च आणि पटल तर च!

मी ब्लॉग करते नाही तर नाही ब्लॉग करत!

ब्लॉग वाल्या आजीबाई ! नेटकर करी आजीबाई !

रांगोळी  आजीबाई ! वसुधा चिवटे ! व्वां !आणि काय हव यं!

IMG_3346

ॐ ब्लॉग वाल्या आजीबाई  चां नैवेद्द !  कोल्हापुर घर!img_20200401_123819657कोल्हापुर घर ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

Whats App येथील मी घेतलेला फोटो ! मस्त उच्छाह चं काम!

 

गिरीश कुळकर्णी विद्यार्थी मित्र व संवादक! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख २१! २२!  २३! मे २०२० शिबीर महत्व !

करोना मधील काम च महत्व !

गिरीश  कुळकर्णी  !

ऑनलाईन!

ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या घरून याला हजर होता येईल!
मार्गदर्शन
आणि विद्यार्थी!
घरीच असतील!

आशा फौंडेशनच्या तीन दिवसीय ऑनलाईन उन्हाळी शिबिरात सहभाग का ?

आशा फौंडेशन गेली १२ वर्षे उन्हाळ्याच्या सुट्टीत शिबिरांचे आयोजन करीत आहे. विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक व भावनिक विकास व्हावा हाच या शिबिरांमागील उद्देश असतो. यापूर्वीच्या अनेक शिबिरांनी हे सिद्ध झाले आहे. शिबिराचे नियोजन करतांना शिबिराची “मध्यवर्ती संकल्पना” महत्वाची ठरते. किशोरवयीन मुलांना समजून घेत त्यांच्या वर्तनाला विचारांची दिशा देण्याचे काम अलीकडच्या शिबिरातून करण्यात आले. मागील वर्षी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्वामी विवेकानंद अध्यासन केंद्राच्या सहकार्याने “मला काही सांगायचंय !” या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य उद्देश मुलांना डोस पाजण्याऐवजी त्यांचे म्हणणे ऐकून घेणे. त्यांना काही म्हणायचे असते आणि दुर्दैवाने ते ऐकायला कोणालाही वेळ नाही. चार दिवसांच्या निवासी शिबिरात आम्ही ते ऐकून घेतले आणि त्याचा अपेक्षित परिणाम साधला.

यावर्षीची संकल्पनाही अशीच हटके आहे. “मला कोणी सांगेल का ?” हि ती संकल्पना ! दैनंदिन जीवनात संपर्कातील व्यक्ती सांगत असलेल्या गोष्टी आणि प्रत्यक्ष जीवन यात तफावत दिसते आणि त्यामुळे संभ्रम वा द्विधा मनस्थिती निर्माण होते. त्यातून विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. काही प्रश्न दिसतांना खूपच सोपे असतात मात्र त्यांची योग्य उत्तरे माहिती नसतात. असे प्रश्न कसे विचारावे हा त्यांचा प्रश्न. जिज्ञासेपोटीही काही प्रश्न पडतात. या सर्व प्रश्नांची वैज्ञानिक व तर्कशुद्ध उत्तरे त्यांना या वयात मिळाली तर त्यांच्या मनात ती जीवनमूल्ये म्हणून कायमस्वरूपी रुजतात व त्यातूनच त्यांचे जीवन घडत असते. अशा प्रश्नांची यादी काढतांना सर्वसामान्यांचे प्रश्न, विचार प्रवण करणारे प्रश्न व चाकोरी बाहेरचे प्रश्न असे वर्गीकरण करता येईल. साधारण १८ प्रश्नांमधील ६ प्रश्नांची उत्तरे या पहिल्या तीन दिवसीय ऑनलाईन शिबिरात शोधण्यासाठी आपण मदत करणार आहोत. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात पुढील प्रश्नाचा विचार करण्यात येईल. पालकांना मुलांकडून अपेक्षित असलेले वर्तन शिबीर पश्चात अनुभवता येईल.

या शिबिरात मित्र का ? कशासाठी ? कोणते ? व वाचन का ? कशासाठी ? कोणते ? या दोन विषयावर पहिल्या दिवशी सत्र होतील. कला का ? कशासाठी ? कोणती ? व सिनेमा का ? कशासाठी ? कोणता ? या विषयावर दुसऱ्या दिवशी तर जेवायचे का ? कशासाठी ? काय ? व खेळायचे का ? कशासाठी ? कोणते ? या विषयावर तिसऱ्या दिवशी सत्र होतील. प्रत्येक सत्र दीड तासाचे असेल यात साधारण ४५ मिनिटांची विषयाची मांडणी अपेक्षित असून तेव्हढीच वेळ प्रश्नोत्तरांसाठी राखीव ठेवली आहे. सत्र घेणाऱ्या व्यक्ती त्या त्या क्षेत्रातील अभ्यासक असून विद्यार्थ्यांशी बोलण्याची विशेष आवड व त्यांच्यासाठी अधिक काही करणाऱ्या आहेत. प्रत्येकाचा अनुभव मुलांना वैचारिकदृष्ट्या समृद्ध करणारा असेल.

ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी त्वरित शुल्क भरुन नोंदणी करावी. फॉर्म भरुन दिल्यावर त्यांना सहा सत्रांच्या सहा लिंक देण्यात येतील ज्यावर त्यांनी आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. यामुळे सत्राच्या १० मिनिटे अगोदर त्यांना आपली उपस्थिती लावता येईल. सहभागी विद्यार्थ्यांसाठी संस्थेने काही विशेष गोष्टी देण्याचे निश्चित केले असून त्याबद्दल शिबिराच्या काळात सांगण्यात येईल. आपली नोंदणी करून आपल्या नात्यातील मुले, मुलांचे मित्र व परिचितांची मुले यांना सहभागी होण्यासाठी संस्थेच्यावतीने आवाहन करावे हीच अपेक्षा ! पुढच्या पिढीला वैचारिकदृष्ट्या परिपक्व करण्याची जबाबदारी आपण सर्व मिळून पार पडू या…

गिरीश कुळकर्णी
विद्यार्थी मित्र व संवादक
आशा फौंडेशन

59594d20-3d2c-404b-9db2-0f0c8cca6124

ॐ गिरीश कुळकर्णी नमस्कार ! ब्लॉग वाल्या आजीबाई !वसुधा चिवटे !

7cb85e08-5ca2-43f7-b613-53ec5dc12378

ॐ  विद्दार्थी शुभेच्छा ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

img_20200401_123819657

ॐ मराठी संगणक लिखाण ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

%d bloggers like this: