आपले स्वागत आहे!

Archive for जून 14, 2020

ॐ शान्ति:|| वसुधा चिवटे !

तारिख १४ जून २०२०!

जेष्ठ कृष्णपक्ष!

ओम

ॐ शान्ति:| शान्ति: || शान्ति:|||

ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: |
भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा: ||
स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभि: |
व्यशेम देवहितं यदायु: || १ ||
ॐ स्वस्ति न इन्द्रो वृध्दश्रवा: |
स्वस्ति न: पूषा विश्र्ववेदा: ||
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि: |
स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु || २ ||
ॐ शान्ति : | शान्ति : | शान्ति : ||

अर्थ :
हे देवांनो ! आम्ही कानांनी शुभ ऐकावे. आम्ही डोळ्यांनी
पवित्र-मंगल पाहावे.स्थिर – उत्तम अवयवांनी व सुदृढ
शरीरांनी युक्त होऊन आम्ही तुमची उपासना व स्तुती करतच
तुम्ही – देवांनी दिलेले हे आयुष्य व्यतीत करावे. ( अशी आमची प्रार्थना आहे.) [ १ ]
तो महाकीर्तिमान इंद्र आमचे कल्याण करो. ज्ञानसंपन्न आणि
वैभवसंपन्न ‘पूषा ‘ देव आमचे कल्याण करो. ज्याच्या गतीला अडथळा नाही
असा तो आकाशात संचार करणारा देव आमचे कल्याण करो आणि तो
तो वाणीला अधिपती देवगुरु आम्हांला श्रेयस् प्राप्त करून देवो. [ २ ]

व्यक्तींमध्ये शांतता नांदो.
समाजात शांतता नांदो.
जगात सर्वत्र शांतता नांदो.
_____________________________

IMG_3377

ॐ जेथे असाल तेथे छान रहा ! वसुधा चिवटे ! नमस्कार !