ॐ
तारिख २५ जुलै २०२०!
श्रावण शुक्लपक्ष पंचमी! नागपंचमी!
ओम
नागपंचमी सन ला हाताला मेंदी लावतात!
झोका खेळतात!आत्ता सर्व मुली बायका काम करतात !
एवढा वेळ आणि जागा पण नाही खेळायला
झोका बांधायला! पूर्वी झाडालाच झोका बांधून खेळत!
माहिती लिहिली!
मात्र नाग याची पूजा करतात! कोल्हापुर येथे
||श्री महालक्ष्मी देऊळ || येथे नाग घेऊन बसत !
माती चे नाग पण विकायला येत! च्या वर्षी करोना साठी
दारावर पण माती चे नाग आले नाहीत!
हो घरी रांगोळी ने खडू ने कागद येथे नाग काढून
नाग पूजा करता येते! ज्वारी च्या लाह्या नागोबा ला देतात!
मी खडू ने नाग काढून दुध देऊन करणार आहे!
शेती पेरणी धान्य पेरणी झालेली असते शेतात नाग येतात !
साठी नाग पूजा पूर्वज यांनी ठेवली आहे! आपण शेती करत नाही !
पण धान्य शेती चे खातो साठी नाग पूजा घर बसल्या करावी!
आज विळी चा कात्री चा वापर करू नये पूजा करतात!
तवा च खाऊ नये उकड भाजक खातात!
मी वरण भात खाणार उपमा भाजक खाणार!
तवा च आज खाणार नाही!
दिंड पुरण ण वाटता उकडून करतात!
असं मस्त लागतात पुरण पोळी पेक्षा हि!
आणि हो माझ्या माहेरला मराठवाडा औरंगाबाद ला
भाऊ च्या मागे उभ राहून पाठीला हात लावून
काकडी हाताने बहीण फोडते ! लहान असताना सर्व केले मी !
लग्न नंतर पत्र फोन करते आत्ता! मात्र वर्ष तून एक वेळ तरी
माहेर पण करते! आणि हो आम्ही भावंड चुलत सख्ख एकत्र राहत !
चुलत भाऊ सौ भावजय यांना भेटते! सौ भावजया चुलत
ब्लॉग साठी फोटो घेत असते तर म्हणतात चेष्टेत म्हणतात
फोटो काढून दमल्या! इतक मोकळ बोलण असत ७८ वय मध्ये पण!
नाग पूजा भाऊ माहेर छान रहाव साठी पण करतात!
माहेर सासर नाग सर्वांना नमस्कार!
वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ पुरण ण वाटलेले डाळिंब म्हणतात त्याला त्याचे उकडून दिंड केली!
वसुधा चिवटे कोल्हापुर येथे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ हं हं कस भाऊ बहीण आहे णां छान ! अशोक देशपाण्डे वसुधा चिवटे!
नागोराव काका ची आठवण आली! काका णां नमस्कार!
ओम सर्वजण छान छान रहा! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
प्रतिक्रिया व्यक्त करा