आपले स्वागत आहे!

Archive for the ‘करंजी’ Category

मटार करंजी

मटार : मटार आता हिवाळ्यात भरपूर बाजारात येतो. हिरवागार ताजा मिळतं असल्यामुळे भरपूर खाल्ला जातो. गोड असल्यामुळे नुसता पण तोंडात टाकून पण खाल्ला जातो. भाजीत पण टाकतातं. पोहे व ऊपमा ह्यातही मटारचा वापर करतातं. मटार च्या करंज्या सामोसे पण करतातं. मी घरी केलेले सामेसे करंजी नमुना करतां दाखवत आहे. प्रथम मटार सोलून त्याचे मटार काढुन जाडसर वाटून घ्यावे. एक बटाटा ऊकडून घेऊन बारिक करावा. हिरवी मिरची बारीक करुन घ्यावी. थोडी कोथींबीर बारीक करुन घ्यावी. आलं पण बारीक करावं. सर्व तयार केलेले मटार मिरची चवी  प्रमाणे व मीठ पण चवी प्रमाणे टाकून घालून कोथींबीर मटार बटाटा एकत्र करावे. सारणं तयार करावे.

थोडी कणिक व थोडा मैदा एकत्र करुन त्यात तेल मीठ घालून गोळा एकत्र करावा. त्याच्या लाट्या करुन त्यात सारण तयार केलेले भरुण करंजी सामोसे मोदक असा आकार देऊन तुपातं किंवा तेलातं तलावे. पुदिनाची चटणी खोबर घालून तयार करुन त्या बरोबर सामोसे खावेतं. गोड व चवीष्ट लागतातं सर्वजण आवडीने भरपूर खातातं.

मटार बटाटा  मटार करंजी

मटार बटाटा                                         मोदक सामोसा

%d bloggers like this: