आपले स्वागत आहे!

Archive for the ‘गणेश जयंती’ Category

कोल्हापूर परिसरातील नामांकित गणपती

  DSC00030  DSC00037DSC00031

बटुकेश्वर

DSC00035  DSC00033

तीन गणपती                                      मोठा गणपती

DSC00040  DSCF1512

जोतीबा

DSC00041  DSC00042a

गणेशवाडी                               औदुंबर

आम्ही पाहुण्यांच्या बरोबर भरपूर गणपती पहिले. तसेच सांगलीचा गणपती नरसोबावाडी औदुंबर हे देवस्थान पहिले. एवेढे देवदर्शन झाल्यामुळे मला व आमच्या कडे आलेल्या पाहुणे यांना छान वाटत आहे.

आम्ही कोल्हापूरहून एक मोठी कार ठरवली होती त्यामुळे सर्वांना एकत्रपणे सर्व स्थळ पाहण्यास मजा आली.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

टिळकांचा जन्म २३ जुलै इ.स. १८५६ मध्ये रत्‍नागिरीमधील मधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. टिळकांचे पूर्वज सात-आठ पिढ्यांपासून रत्‍नागिरीजवळील चिखलगावाचे खोत होते. गंगाधरपंतांचे ते तीन मुलींनंतरचे चौथे अपत्य होते. त्यांचे खरे नाव केशव ठेवले असले तरी सर्वजण त्यांना बाळ या टोपणनावानेच ओळखत असत.

त्यांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक प्रसिद्ध शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. लहानपणापासूनच टिळक अत्यंत हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना गणितामध्ये विशेष गती होती.

सार्वजनीक गणेशोत्सव

इंग्रजांचे अंधानुकरण करणार्‍या भारतीयांबद्दल टिळकांना अत्यंत चीड होती. ते म्हणत, “आपले काही तथाकथित शिक्षित देशबांधव साहेबांची पिण्यात बरोबरी करू शकतात, पण साहेबांची भारताच्या राज्यकारभारातील जागा मिळविण्याची महत्त्वाकांक्षा ते बाळगू शकतात का?” त्यांच्या मते भारतीयांच्या दुर्बलतेची कारणे त्यांचा हरवलेला आत्मविश्वास आणि एकीची भावना ही होती आणि जोपर्यंत लोकांचा त्यांच्या धर्म, संस्कृती आणि इतिहासाबद्दलचा आदर परत वृद्धिंगत होत नाही तोपर्यंत राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्याच्या गप्पा मारणे व्यर्थ आहे. मध्ये त्यांनी जुन्या काळापासून प्रस्थापित गणेशोत्सवाचे नव्या स्वरूपात पुनरूज्जीवन केले. हिंदूंमध्ये घराघरांत गणेशोत्सव अनेक शतकांपासून साजरा केला जात असे. पण टिळकांनी त्याला एका दहा दिवस चालणार्‍या सामाजिक महोत्सवाचे स्वरूप दिले.

पत्रकारिता

टिळकांनी आगरकर, चिपळूणकर आणि इतर सहकार्‍यांच्या मदतीने १८८१ साली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. यापैकी केसरी हे मराठीतून प्रसिद्ध होत होते तर मराठा हे इंग्रजीमधून.

Bal_G__Tilak  DSCF0392

रामनवमी

रामनवमी

माझे माय बाप
पिता आहे पद्माकर माता मथुरा
१३ वर्षाला केले कन्यादान
यशवंत पति दिला शोधून
सासू सासरे आहे राजघराणं
अगस्ती कुळाची झाली मी दासी
दरबार समाधीचा झाडी
आज आहे राम नवमी
दशरथ नंदन
राम आले जन्माला
आली रामाच्या वला
राम नवमी दिवशी मुलांनी केला
जन्मशताब्दी चा सोहळा
त्यांना आशीर्वाद ध्यावा !

राधाबाई माझी आई आहे आई नं हे लिखानं तिची नात श्रुती
श्रुती देशपांडे हिच्या कडून स्वत: तयार केललं काव्य लिहून घेतलं आहे. कविता लिहूनं घेतली आहे.

DSCF0447

काचेचा गणपती

* स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर  *

चैत्र कृष्णपक्ष गुरुवार संकष्ट चतुर्थी

२१ एप्रिल (४) गुरुवार संकष्ट चतुर्थी आहे.

गणपती  DSCF0348

|| मंत्र ||

कर्पुंरारती

कर्पुरगौरा | करुणावातारा | संसारसारा | भुजगेद्रहारा | सदा रहासी हृदयारविंदीं |
भवा | भवानिसहा तूज वंदीं ||१||

घालीन लोटांगण वंदीन चरण | डोळ्यांनीं पाहीन रुप तुझे | प्रेमे आलिंगींन आनंदें पूजिन | भावें ओवाळीन म्हणे नामा ||१||

त्वमेव माता च; पिता त्वमेव | त्वमेव बंधुश्र्च सखा त्वमेव | त्वमेव विद्दा द्रविणं त्वमेव | त्वमेव सर्वे मम देवदेव ||२ ||

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वां, ध्दायत्मना वा प्रकृतिस्वभावत् | करोमि यद्दत् सकलं परस्मै , नारायणा येति समर्पयामि ||३ ||

अच्युतं केशवं रामनारायणं , कृष्णदामोदरं वासुदेवं हरि | श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं , जानकीनायकं रामचंद्र भजे ||४ ||

हरे  राम  हरे राम , राम राम हरे हरे || हरे कृष्ण हरे कृष्ण , कृष्ण कृष्ण हरे हरे ||५ ||

|| मंत्र पुष्पांजली ||

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् | ते ह नाकं महिमान: सचन्त यत्र पूर्वे साध्या: सन्ति देवा: | ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे |स मे कामान् कामकामाय मह्यं कामेश्र्वरो वैश्रवणो ददातु || कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नम:| ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठयं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायी स्यात् सार्वभौम सार्वायुष आम्तादापरार्धात् || पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति तदप्येष श्लोको S भिगितो मरुत: परिवेष्टारो मरुतस्यावासन् गृहे || आविक्षितस्य कामप्रेर्विश्र्वेदेवा: सभासद इति एक दंताय धीमहि तन्नोदन्ती प्रचोदयात ||

भावें ओवाळीन भावे नामा ||१ || हे नामदेवांनी लिहिले आहे.कायेन वाचा मनसेंद्रियै र्वा ,बुध्दायत्मना हे बुध्द यांनी लिहिले आहे. पण खालील नावं कोणी लिहिली ते माहीत नाही.

मला हे म्हणता येते मी रोज म्हणते. पुस्तक पण जवळ म्हनतांना वापरते.

DSCF1047

गणपती

श्री गणेश जयंती

शुक्लपक्ष माघ चतुर्थी : शुक्लपक्ष माघ चतुर्थी (विनायक चतुर्थी) ला गणपती चा जन्म दिवस असतो. श्री गणेश जयंती म्हणून सगळीकडे गणपती चा जन्म दिवस माघ शुक्लपक्ष चतुर्थी ला जन्म उत्सव गणपती चा साजरा करतातं.

कोल्हापूर येथे ओढाच्या गणपती येथे गणपती जन्म दिवस १२|१५ दुपारी सव्वबारा वाजतां जन्म दिवस थाटातं उत्सव साजरा करतातं. खूप भाविक भक्त जन जमा होतात. मंडप च भरुन बाहेर पण भक्त भावीक उभे असतातं. गणपती जन्म सोहळा छान साजरा केला जातो. गणपती ला तिळगुळ चा लाडु देतातं. मी खूप वेळा गणपती जन्म सोहळा पाहिला आहे.

ओढा च्या गणपती देवळातं संगमरवरी दगडावर अथर्वशिर्ष व श्री नारद यांच गणपती स्तोत्र कोरलेल आहे. तसेच महादेव च देऊळ मारुती च देऊळ पण तेथे पाहण्यास दर्शन घेण्यास मनाला चांगल वाटत.

गणेश जयंती  गणपती दुर्वा

गणेश जयंती                                                  गणपती दुर्वा

%d bloggers like this: