आपले स्वागत आहे!

Archive for the ‘घरगुती’ Category

कैरी व शेंगदाणे चटणी

कैरी व शेंगदाणे याची चटणी : प्रथम शेंगदाने भाजून घेतले.
साल काढली. त्यातील थोडे शेंगदाने घेतले. कैरी चिरून किसून घेतली.
अंदाजा प्रमाणे मीठ घेतले ४ चार हिरव्या मिरच्या घेतल्या.फोडणी करून
गार करण्यास ठेवली.मिक्सर मध्ये प्रथम शेंगदाणे पाणी थोडसं घालून
बारीक वाटून घेतले.परत हिरवी मिरची कैरी मीठ घालून परतएक सारखे
मिक्सर मधून बारीक केले. चांगली एकत्र शेंगदाने कैरी हिरवी मिरची मीठ सर्व एकत्र
शेंगदाने चटणी केली मी.नंतर फोडणी कांही चटणी मध्ये घातली.बिन फोडणी ची चटणी
पण चांगली लागते.मूळ कैरी ची चव येते शेंगदाने चटणीला.व ही चटणी उपवास याला पण चालते.
वापरतात.खाली वस्त काचेची डिश काचेचे सट छान वाटतं बघायला. वाढायला.हे सर्व कोल्हापूर
येथे मिळतात. मी वस्त्र विणल आहे.

   

हारोळी

                                             ॐ
हारोळी : कणिक म्हणजे गव्हाचं पीठ घेतले.त्यात रोजच्या पेक्षा
जास्त चव येईल असे असं मीठ घातले.तेल पण जास्तच घातले. रोजच्या
पेक्षा घट्ट कणिक तिंबली तिंबले.भिजविली.थोड्यावेळ ठेवून हातानेच कणिक मोठी
केली.त्याला तेल लावले.परत घडी केली.परत तेल लावले परत घडी केली.पेटलेल्या ग्यास वर
चिमटा त हारोळी धरून दोन्ही बाजूने चांगली भाजून घेतली.भरपूर तेल घालून ही हारोळी नुसतीच
खातात.माझी आजी आई ची आई अशा प्रकारे हारोळी चुली च्या बाजूला भाजून आम्हाला खाण्यास देत असे.
मी थोडी जाड सर कणिक घेऊन लाटण्याने लाटून तव्यावर पण भाजून हारोळी केली आगे.कांही जणांना ग्यास चा
वास आवडत नाही.फुलके आधी तव्यावर भाजून ग्यास शेगडीवर भाजतात.

                                          DSCF2504

              DSCF2483

अंबाडा ची भाजी

                                       ॐ
अंबाडा ची भाजी: उन्हाळा मध्ये आंबाडा आंबंट भाजी पाले भाजी
म्हणून मिळते.आंबांडा भाजी ची पाने निवडून घेतली.धुवून घेतली.
मध्यम अशा प्रकारे चिरून घेतली.पातेल्यात आंबांडा भाजी चिरलेली घातली.
थोड पाणी घातले. पेटत्या ग्यास वर भाजी पाणी एकत्र केलेले पातेले ठेवले.
चांगली लगेच चं आंबांडा भाजी शिजली.आधी कुकर मध्ये तुरीची डाळ हळद पाणी घालून
चार शिट्या देऊन शिजवून घेतली.कुकर गार झाल्या नंतर आंबांडा भाजी शिजलेली डावाने हटवून
घेतली. तुरीचे डाळीचे वरण हटवून घेतले.आंबांडा भाजीत वाटीभर वरण घालून लाल तिखट मीठ थोडी हळद
कारण तुरीच्या डाळीच्या वरणात हळद घातली आहे.म्हणून थोडी हळद घालून सर्व आंबांडा भाजी तुरीचे डाळीचे वरण
तिखट मीठ हळद एकत्र हटविले,शिजवून परत एकत्र केले. नंतर तेल मोहरी याची फोडणी करून लाल मिरची घातली.
आंबांडा भाजीत घातली.भाकरी केली.भाकरी आंबांडा भाजी मस्त चवदार जेवण केले.झाले.आंबांडा भाजीचे पाणी काढून
टाकले नाही.तो आंबांडा भाजीचा आंबट पणा चांगला लागतो. उन्हाळा मध्ये चा आंबांडा भाजी मिळते. उन्हाळा मध्ये
आंबट खातात.कैरी आंबांडा भाजी.लिंबू सरबत इत्यादी.

                                               DSCF2484

पोकळा ची भाजी

                                         ॐ
पोकळा ची भाजी : पोकळा पालेभाजी आहे. कोल्हापूर येथे
पोकळा पालेभाजी बारा महिने मिळते,या भाजीला लाल देठ असतात.
पानं पाने हिरवी असतात.लाल माठ पाले भाजीला लाल देठ व पानं पण लाल
असतात.पोकळा पालेभाजी देठा सगट निवडून घेतली. धुवून घेतली. विळीने बारीक
चिरली कोणी कोणी देठा सगट पोकळा भाजी न चिरता करतात. ग्यास पेटवून ग्यास वर
पातेले ठेवले तेलाची मोहरी घालून फोडणी केली चिरलेली पोकळा भाजी फोडणीत घातली.
थोडस शिजण्या करता एक बाउल पाणी घातले.पोकळा भाजीला वाफ आणली हरबरा डाळीचे
पीठ लावले.हळद हिंग लाल तिखट मीठ घालून सर्व पोकळा भाजी हलविली.परत दोन वाफ आणली.
पोकळा हरबरा डाळीचे पीठ लाल तिखट मीठ हिंग हळद तेल मोहरी ची फोडणी सर्व एकत्र पोकळा भाजी
तयार केली मी.कांदा घालून परतून पण पोकळा भाजी तयार करतात.      DSCF2482

                                DSCF2476DSCF2480

हरबरा डाळीचे सांडगे


हरबरा डाळीचे सांडगे : अर्धा किलो हरबरा डाळ रात्री ९ वाजताकुकर मध्ये हरवरा डाळ व
भरपूर पाणी घेतले हरबरा डाळ घुवून घेतली.भरपूर पाणी कुकर मध्ये हरबरा डाळीत घातले.कुकर चे
रिंग न लावता झाकण लावले.दुसरे दिवस कुकर चे झाकण काढून हरबरा डाळीचे पाणी काढून टाकले.
परत एकदा हरबरा डाळ घुवून घेतली. सकाळी सहा ६ वाजता.नंतर मिक्सर मधून हरबरा डाळ वाटून जाड
सर वाटून घेतली.पातेल्यात वाटलेली हरबरा डाळ घेतली.वाटलेल्या हरबरा डाळीत हळद हिंग तिखट मीठ
अख्खे जिरे थोड कच्च तेल घातले.हरबरा डाळीचे सांडगे करण्या सारखे हरबरा डाळ झाली.पोळपाट व ट्रे ला
तेल लावले.छोटे छोटे गोळे केले. सांडगे तयार केले. झाले.ते उन्हात वाळविले की वाळून तळून खातात.व फोडणी
घालून पाणी घालून पाण्यात तिखट मीठ घालून सांडगे याची आमटी करतात.घरोगरी हरबरा डाळीचे सांडगे करतात.

DSCF2408DSCF2412DSCF2409DSCF2411

सज्जनगड

                                                   ॐ
सज्जनगड : सातारा शहराच्या पश्चिमेस दहा किलोमीटर सज्जनगड आहे.
समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने या गडास धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे.
एप्रिल १६७३ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहा कडून जिंकून घेतला.
त्याच वर्षी रामदास स्वामी या किल्ल्यावर वास्तव्यासाठी आले. गड चढण्यासाठी पायऱ्या
आहेत. अर्ध्या वाटेवर कल्याणस्वामीं चे मंदिर आहे.पुढे गेल्यावर एका बाजूस मारुतीचे व
दुसऱ्या बाजूस गोतमी चे मंदिर आहे.किल्ल्याचा दरवाजात श्रीधर स्वामींनी स्थापन केलेल्या
मारुती व वराहाच्या मूर्ती आहेत.प्रवेशव्दाराच्या डाव्या बुरुजाजवळ आम्ग्लाई देवीचे मंदिर आहे.
अंगापूर च्या कृष्णा नदीच्या डोहात रामादांना रामाच्या मूर्ती हीअंगलाई ची सापडली होती.आंगलाई
मंदिर समर्थांनी बांधले.रामदासांचे वास्तव्य होते शके १६०३ माघा नवमी (सन १६८२ ) समर्थांनी समाधी घेतली.
समाधीवर राममूर्ती बसवून शिष्यांनी लहान देऊळ बांधले.संभाजीने त्यावर मोठे देऊळ व सभामंडप बांधला.
श्रीराम मंदिराच्या सभामंदापात सिद्धिविनायक व हनुमानाची मूर्ती आहे.मुख्य मंदिरात राम,लक्ष्मण,सीता च्या
पंचधातूचा मूर्ती आहेत.जवळच समर्थांची धातूची मूर्ती आहे.भुयारात समर्थांचे समाधीस्थान आहे.समाधी मागील
कोनाड्यात पितळी पेटीत दत्तात्रेयाच्या पादुका आहेत.मंदिरा बाहेर एका कोपऱ्यात मारुती आहे.दुसऱ्या कोपऱ्यात
समर्थशिष्या वेणा हिचे वृंदावन आहे.मंदिरा पुढे उत्तर बाजूस आणखी एक शिष्या आक्काबाई वृंदावन आहे.माघ
वद्द प्रतिपदा ते नवमी या काळात दासनवमी चा उत्सव साजरा करतात.
सज्जन गड मी हे व आमची मुले लहान असतांना पाहिले आहे.पायऱ्या चढून सर्व पाहिले आहे.तेथे तेंव्हा रामनवमी
चं होती आम्हाला साबुदाणा खिचडी पाना च्या पत्रावळी मध्ये दिलेली आजही आठवते.

                                            DSCF2452

सुधारस !

                                                     ॐ
सुधारस : एका भांड्यात अर्धा बाऊल साखर घेतली.अर्धा बाऊल पाणी घेतले .
भांड्यात साखर व पाणी एकत्र सम सारखे घेतले.ग्यास पेटवून साखर व पाणी
एकत्र केलेले ऊकळविले पातळ पण ठेवला.
साखर व पाणी भांड्यात पाक केलेला गार करण्यास ठेवला. साखर व पाणी याचा
पाक भांड्यात गार झाला.लिंबू सुरीने कापून अर्धा लिंबू साखर व पाणी भांड्यात केलेला
पाकात पिळले.चारोळी घातली. जायफळ बारीक करून पाकात घातले रंग पण घालतात.
मी रंग घातला नाही.साखर व पाणी पाकात चारोळी चं चांगली लागते.बदाम पिस्ता काजू याची
चव वेगळी असते म्हणून मी साखर पाक ह्यात चारोळी घातली आहे.साखर पाणी एक सारखे
घेऊन एकतारी पाक करून गार झाल्या नंतर लिंबू अर्धा पिळले चारोळी जायफळ घालून सुधारस
तयार केला.झाला.मी सुधारस तयार केला आहे यं !

                                            DSCF2449

सुरणवडी

                       ॐ
सुरणवडी : हरबरा डाळीचे पाव वाटी पीठ घेतले.
पातळ सर केले.अंदाजाने मीठ घातले.हळद हिंग
तेल कांही घातले नाही.हरबरा डाळीचे पीठ पातळ केल्या
नंतर अंदाजाने मीठ घातले ग्यास पेटवून पातेल्यात पाणी
घेतले मध्यम पातेले घेतले पातेल्यात दोन मोठे बाउल पाणी घातले
पेटलेल्या ग्यास शेगडीवर पातेल्यातील पाणी उकळू दिले.छोट्या ताटात
हरबरा डाळीचे पातळ केलेले पीठ थोडेसं घातले दोन्ही हातात ताट धरून हरबरा
डाळीचे पीठ हलवून ताट भर केले.पाताल्यातील उकळलेल्या पाणी ह्यावर सरळ
ताटातील पसरलेले डाळीचे पीठ व ताट ठेवले ते शिजले पाणी पीठातील कमी नाहीसे झाले.
परत डाळीच्या पिठाचे शिजलेले ताट उलटे उकळत्या पाण्यावर ठेवले दोन्ही बाजूने डाळीचे पीठ
शिजले गेले.नंतर ताट व हरबरा डाळीचे पीठ शिजलेले ताटात गार झाल्या नंतर दोन्ही हातातील
बोटांनी गुंडाळी होते का पाहिली छान गुंडाळी झाली.मला एकदम छान मस्त वाटलं गुंडाळी होते
म्हटल्या वर मी सुक खोबर किसलेलं कोथिंबीर चिरलेली सुरणवडी करायच्या आधी किसलेलं खोबर
चिरलेली कोथिंबीर घातली.काराबरा डाळीच्या पिठाची मीठ घालून किसलेलं खोबर चिरली कोथिंबीर
याची सुरणवडी तयार केली.झाली.नंतर अशा प्रकारे चार पाचं ताटातून उकळलेल्या पाण्यावर ताट ठेवून
हरबरा डाळीचे पिठाच्या सुरण वड्या केल्या.कांही किती पातळ आहेत हे बघण्या करता हरबरा डाळीचे
पिठाचे लांबच लांब शिजलेले डाळीचे पीठ दाखविले आहे.पाहण्यास चांगले वाटणार.

                             DSCF2445.DSCF2446

चित्रान्न !

                                                       ॐ
चित्रान्न : प्रथम कुकर च्या लावायच्या भांड्यात एक बाऊल तांदूळ घेतले.
दुसऱ्या भांड्यात तूरडाळ एक बाऊल घेतली.कुकर मध्ये थोडे पाणी घातेले.
कुकरची चाळणी ठेवली.तूरडाळ धुवून घेतली.दोन बाऊल पाणी तूर डाळीत
ठेवले अर्धा पाव चमचा हळद तूर डाळीत व पाणी ह्यात घातली.दुसरा भांड्यात
तांदूळ घेतलेले धुवून घेतले दोन बाऊल पाणी तांदूळ ह्यात घातले. कुकरची रिग
झाकण लावले.प्रेशर ठेवले.४ चार शिट्या दिल्या.कुकर गार करायला ठेवला.तो
पर्यंत तेलाची मोहरी घालून फोडणी केली.फोडणीत कडीपत्ता घातला.कच्चे शेंगदाणे
परतून घेतले.त्यात डाळ घातले.फोडणी गार करण्यास ठेवली. तो पर्यंत कुकर गार झाला.
कुकर मधील भात एका पातेल्यात काढला. भात गार करण्यास ठेवला भात गार झाला नंतर
भातात हळद मीठ तेल मोहरी कडीपत्ता शेंगदाणे डाळ केलेली फोडणी भातात घातली एक लिंबू
चिरून कापून भातात पिळले.सर्व भात उलथन न्याने हलविला.हलविले.गार भात तेल मोहरी ची
फोडणी कडीपत्ता तळलेले कच्चे शेंगदाने डाळ हळद मीठ हिरवी मिरची लिंबू सर्व असा भात एकत्र केला
चित्रान्न तयार झाले.केले.खरचं चित्रान्न याची चव भाताला आली.
फोडणी चा भातात कांदा फोडणी परतून सर्व डाळ घालत नाहीत असा भात करतात. ती चव वेगळी व चित्रान्न
याची चव वेगळी मी चित्रान्न केले आहे.दाखविले आहे.कांही जणांना कोरड आवडत नाही.मी तुरीचा डाळीची
तुरीचा वरणाची आमटी केली आहे. तेलाची फोडणी केली कडीपत्ता घातला तूरीच हळद घातलेले शिजविलेले
वरण फोडणीत घातले. मीठ लाल तिखट कोथिंबीर चिंच याचं बुटकळ घातले.सांबार मसाला घातला नाही.
चिंच कडीपत्ता लाल तिखट मीठ कोथिंबीर यानच आमटीला तुरडाळ आमटी ला चव आली.कडीपत्ता व चिंच
मीठ लाल तिखट मस्त तुरीची डाळीची आमटी व भात खाण्यास चव आली.हैद्राबाद ची आमटी ची चव आली.

                                DSCF2436 

   DSCF2437

कांदा पोळी

                                            ॐ
कांदा पोळी : कणिक घेतली कणिक मध्ये तेल मीठ घातले.
पाण्यात कणिक मीठ तेल एकत्र केलेले भिजविले. तिंबले.नेहमी
प्रमाणे गोल पोळी लाटली तेल लावले कणिक लाटलेली घडी केली
परत तेल लावले. त्रिकोणी घडी केली. नंतर गोल पोळी लाटली पोळपाट
लाटणं यांनी गोल पोळी केली.ग्यास पेटलेला तापलेला तत्वावर पोळी दोन्ही
बाजूने भाजली. पोळी चांगली. फुगली.अशा सर्व पोळ्या करून घेतल्या.
त्यातील दोन २ पोळ्या घेतल्या. गार केल्या. हाताने कुसकरल्या बारीक केल्या.
एक बारीक कांदा घेतला.विळीने बारीक चिरला.कुसकरल्या पोळीत घातला.टाकला.
मीठ अंदाजाने घातले पोळीत मीठ असते ते लक्षात ठेवून घातले.लाल तिखट घातले.टाकले.
कच्च तेल घातले.टाकले.कुसकरलेली पोळी कांदा मीठ लाल तिखट कच्च तेल सर्व हाताने
कालविले.एकत्र केले.कच्चा कांदा जास्त खावां.कच्च तेल पण खावं म्हणून कच्च कांदा व कच्च
तेल घातले घातलं वापरलं आहे.अशीच तेल मोहरीची फोडणी देऊन करून कांदा चिरलेला
परतून कुसकरलेली पोळी फोडणीत घालून हिरवी मिरची किंवा लाल तिखट घालून पोळी
फोडणीत घालून कुरकुरीत करतात.वाफं आणतात त्याला फोडणी ची पोळी म्हणतात.कशा
प्रकारे पोळी कांदा लाल तिखट मीठ तेल घालून कांदा पोळी करतात.

                                           DSCF2434

साबुदाणा याचा पापड्या

                                               ॐ
साबुदाणा याचा पापड्या: दोन बाऊल साबुदाणा घेतला. रात्री ९ नऊ वाजता
पातेल्यात घेऊन पाण्यात भिजत ठेवला.पाणी साबुदाणा मध्ये थोडसं चं ठेवले.
दुसरे दिवस सकाळी साबुदाणा चांगला भिजला.हाताला चांगला मऊ लागला.
दोन बाऊल साबुदाणा भिजल्येल्या साबुदाण्यात पाणी घातले.टाकले.थोड अंदाजाने
मीठ घातले.टाकले.ग्यास पेटवून साबुदाना भिजलेला पाणी मीठ एकत्र केलेले ग्यास
च्या शेगडी वर ठेवले डावाने हलविले.थोडसं पातळ राहील असे असं अटविले.धुतलेल्या
नव्या पंचा वर साबुदाणा पापड डावाने पातळ असे असं घातले.उन्हातच वाळवितात.सकाळी
सात ७ आठ ८ वाजता च्या मध्यात घातले साबुदाणा याचे पापड नऊ वाजता उन्ह येते चांगले
उन्हात भिजलेला साबुदाणा पाणी मीठ सर्व एकत्र शिजविलेले साबुदाणा पापड्या तयार होतातं.
वाळल्या नंतर तुपात साबुदाणा पापड्या तळून खातात. मी भिजलेला साबुजाना पाणी मीठ शिजवून
साबुदाणा पापड्या केल्या आहेतं.

     DSCF2431  DSCF2429

DSCF2432

पोहे याचे पापड

                                                  ॐ
पोहे याचे पापड: चार बाउल पोहे घेतले मिक्सर मधून बारिक करून घेतले.
पिठ केले.पोहे हया पीठात लाल तिखट मीठ हिंग अंदाजाने घातले.कच्च तेल
कळत न कळत घातले पोहे चे पीठ तिखट मीठ हिंग तेल सर्व हाताने एकत्र केले.
गरम पाणी उकळलेले पोहे ह्यात घातले.गोळा केला.वाफं आणली. झाकण ठेवले.
परत थोड्या वेळा नंतर वाफं आणली. पोहे याचे छोटे गोळे केले.पोळपाट वर ठेवला
लाटण याने हाताने पातळ लाटले.दुकानात खूप मोठे पोहे याचे पापड मिळतात.मला
एवढे जमले नाही नमुना करून पाहिला एवढं चं एवढें चं .घरात तच वाळविले.दुसरे दिवस
उन्हं दिले.चवीला मात्र पोहे याचे पीठ तिखट मीठ हिंग तेल सर्व एकत्र केलेले पोहे याचे पापड
चांगले झाले.आहेत.

                            DSCF2425  DSCF2426

उडीदडाळ व मुगडाळ याचे पापड

                                                  ॐ
उडीदडाळ व मुगडाळ याचे पापड : अर्धा किलो उडीद डाळ घेतली.५० पन्नास ग्र्याम मुग डाळ घेतली.
दोन्ही डाळ एकत्र केले.गिरणीतून दळून आणले.थोडसं उडीदडाळ व मुग डाळ एकत्र केलेले पीठ घेतले.
त्या पिठात वाटलेली हिरवी मिरची घातली. काळे मिरे व पांढरे मिरे घालतात.मी हिरवी बारीक केलेली मिरची
घातली.हिरवी मिरची ची चव चांगली येते दिसायला पण चांगल दिसते दिसतं.मीठ अंदाजाने घातले.पापड खार
अंदाजाने घातला. सोडा अजिबात घातला नाही.पापड खारामुळे पापड हलका होतो.कच्च तेल थोडसं घातले.
पाण्यात घट्ट भिजविले.कळत न कळत सैल केले.तेलाचा हात लावला. सर्व पापड याचे पीठ हिरवी मिरची मीठ पापड खार
तेल सर्व एकत्र छान गोळा केला. घाला.२ दोन तासा नंतर लाट्या केल्या.गोळे केले.लाटाचे पापड पीठ लावून लाटले.उन्हात
न ठेवता घरातच.ठेवले.ह्या पापडांना दुसरे दिवस उन्हं देतात.तेल लावून लाटी पापड याचा गोळा कच्चा पण खाण्यास चांगला लागतो.
लागतात.तसेच पापड याचे भिजविलेले पीठ लाटी गोळा जाड सर लाटून पुरी सारखा तळून पण खाण्यास चांगला लागतो लागतात.
उडीदडाळ मुगडाळ याचे पीठ करून हिरवी मिरची मीठ पापड खार तेल एकत्र करून पाण्यात भिजवून पापड याचे पीठ व पापड
तयार केले मी.

                         DSCF2419   DSCF2422

बटाटा व साबुदाणा याची चकली

                                                    ॐ
बटाटा व साबुदाणा याची चकली : एक बाउल साबुदाणा घेतला. रात्री पाणी थोडसं ठेवून भिजत ठेवला.
सकाळी बटाटे सहा ६ घेतले.धुतले.दोन २ भाग केले कुकर मध्ये बटाटे घातले बटाटे भिजतील असे पाणी
कुकर मध्ये घातले.ग्यास पेटवून ग्यास शेगडी वर कुकर ठेवला ४ /५ चार /पाचं शिट्या दिल्या.कुकर गार
झाल्या नंतर बटाटे पातेल्यात काढले. बटाटे गार झाल्या नंतर बटाटा याची साल काढली.बटाटे हाताने
मऊ करून घेतले.बटाटे मऊ केल्या नंतर भिजलेला साबुदाणा लाल तिखट मीठ अंदाजाने घातले.परत
बटाटा साबुदाणा तिखट मीठ एकत्र केले कालविले.सोऱ्यां ने बटाटा साबुदाणा तिखट मीठ याची चकली केली
चकली उन्हात वाळल्या नंतर तुपात तळून खातात.छान बटाटा साबुदाणा मिठ THIKAT याची चकली तळून
खाण्यास चांगली लागते. आशाचे तुपात तवा मध्ये थालीपीठ करतात.तळून वडे पण करतात.

                  DSCF2416     DSCF2417

गुढीपाडवा

गुढीपाडवा : स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर उत्तरायण वसंतऋतु चैत्र शुक्लपक्ष नक्षत्र उत्तराभाद्रपदा राशिप्रवेश प्रवेश मीन शुक्रवार १ संवत्सरारंभ गुढी पाडवा आहे.

तसेच शुक्रवार दिनांक तारीख २३ मार्च (३) २०१२ ला गुढीपाडवा आहे.

गुढी अभ्यंगस्नान करून सूर्यदया नंतर गुढी उभी करतात.

सूर्यदय ६ वाजून २१ मिनिट यांनी आहे.

सुर्यास्ता च्या आधी गुढी उतरवितात सूर्यास्ताची वेळ ६ वाजून ३४ मिनिट आहे.
त्या आधी गुढी उतरवितात.

पंचाग वाचणे पंचांगस्थ गणपति पूजन करणे कडुलिंबाचे चूर्ण खाणे.

DSCF1480  DSCF1489DSCF2457  DSCF1612DSCF1553  DSCF1607

गवले मालत्या पोहे नखुल्या

                                                        ॐ
गवले मालत्या पोहे नखुल्या : थोडी कणिक घेतली कणिक मध्ये कच्च तेल व मिठ घातले.
पाण्यात भिजविले.दुधात पण भिजवितात. नंतर छोटा पोळपाट घेतला.पोळपाट ला हळद कुंकू
लावले.एक कणीक याचा गणपती केला.थोडा कणिक याचा गोळा घेतला.गवले केले. परत कणिक
याचा गोळा घेतला पोहे केले.परत कणिक याचा गोळा घेतला.मालत्या केल्या.परत कणिक याचा
गोळा घेतला.नखुल्या केल्या.अशा प्रकारे पोळपाटा मध्ये गणपती गवले पोहे मालत्या नखुल्या सर्व एकत्र
पोळपाट याचात आहे.खीर याचे प्रकार आहेत मुहूर्ताला असे चार गवले पोहे मालत्या नखुल्या करतात.
याची रुखवत म्हणून पण करतात.दुध साखर तूप याची खीर करतात.शेवया फेणी पण करतात. हे सर्व मी
केले आहे.यं!

                             DSCF2401DSCF1030DSCF0404   DSCF2402

गव्हाच्या चिकाच्या कुरडाया

                                                   ॐ
गव्हाच्या चिकाच्या कुर्डाया कुरडाया : तीन दिवस कुकर मध्ये गहु व पाणी घालून भिजत थेवले.
चौथे ४ दीवसला गहू मिक्सर मधून वाटून घेतले.पाणी घालून.पिठाच्या चाळणीने पातेल्यात चिक
राहील पडेल असे गहुचा चौथा हलवून गव्हाचा चिक पाताल्यात ठेवला.चोथे दिवस चिक पातेल्यातच
ठेवला पाचव्या ५ दीवस ला सकाळी गव्हाचा चिक उलथन्याने काढला एक बाउल असा तयार झाला.
एक बाउल चिक व एक बाउल पाणी कळत न कळत पाणी जास्त घातले.मीठ अंदाजाने घातले.
ग्यास पेटवून पातेल्यात चिक पाणी मीठ एकत्र केलेले शिजविले अटविले.छान चांगले शिजल्याचा
गोळा गहुचा चिकाचा गोळा केला. झालां.शेवेच्या सोऱ्याने शेव सारखा आकार गव्हाचा शिजलेला चीकाला
दिला गव्हा ची चिका ची कुरडई तयार केली झाली.ती गव्हाची चिकाची कुरडई वाळवून तेलात तळून खातात.
मी गव्हाची चिकाची कुरडई शिजवून तयार केली आहे. गव्हाच्या चौथा च्या खारोड्या वाळवून तेलात तळून
खातात.खारोड्या भाजून पण खातात.

             DSCF2391DSCF2398DSCF2388DSCF2394

गव्हाच्या खारोड्या

                                                     ॐ
गव्हाच्या खारोड्या : अर्धा किलो गहु घेतले.तीन दिवस पाण्यात गव्हाच्या वर
भिजतिल असे पाणी कुकर मध्ये गहु व पाणी तीन दिवस भिजत ठेवले.कुकर स्टील
चा असल्यामुळे कळकंत नाही.झाकण पण रिंग न लावता ठेवल्यामुळे झाकून चांगले
राहिले.चौथे ४ दिवस नंतर पाणी गव्हातील काढून टाकले.परत थोडे पाणी दुसरे घेऊन
ते पण पाणी गव्हातून काढून टाकले.मिक्सर मध्ये थोडे थोडे गहू व थोडं पाणी घालून
मध्यम बारीक गहू केले.गव्हाच्या पिठाच्या चाळणीत बारीक केलेले गहू घेतले.चालणीच्या
खाली कुकर मोकळा झालेला ठेवला.चाळणीत गहू व पाणी चाळून घेतले असे तीन चार वेळा केले.
कुकर मध्ये गव्हाचा चिक राहिला व थोडे पाणी राहिले.गहुचा चोथा झाला तो गव्हा चौथा पातेल्यात
घेतला.गव्हाच्या चौथ्यात हळद हिंग तिखट मीठ कच्च तेल घातले.ग्यास च्या पेटत्या शेगडी वर पातले
ठेवले.गव्हाचा चौथा हळद हिंग तिखट मीठ कळत न कळत भांड भर पाणी घातले.छान चांगले शिजविले.
गव्हाचा चौथा हळद हिंग तिकट मीठ पाणी सर्व शिजविलेले ट्रे ला तेल लावून गरम गव्हाचा चौथा थोडे
थोडे घेऊन थापवून उन्हात वाळविले. अधून मधून दुसरी बाजू करत गेले.छान चांगले गव्हाच्या भिविलेल्या
चौथा याचा तिकट मीठ हळद हिंग शिवलेले च्या वाळविलेल्या गव्हा च्या खारोड्या केल्या मी.कोणी याला
भूस वडे पण म्हणतात.

                                       DSCF2379                      DSCF2386

                                                                                       DSCF2384

कटाची आमटी

                                                       ॐ
कटाची आमटी : हरबरा डाळ पुरण ह्या शिजविले तेंव्हा हरबरा डाळ शिजल्या नंतर
पातेल्यात चाळणी मधून पाणी येते ते हरबरा दाली चे हळद घातलेले पाणी घेतले.त्या
पाण्यात तिखट मीठ हिंग काळा मसाला चिंच याचं बुटकळ घातले साखर हरबरा डाळ शिजविलेले
वाटलेले पुरण थोडेसे घातले.परत साखर गूळ कांही घातले नाही.तेला ची मोहरीची फोडणी केली.
कटाच्या आमटीत घातली.हरबरा डाळीचे पाणी पुरण तिखट मीठ हिंग परत हळद टाकली नाही.
मसाला चिंच तेल मोहरीची फोडणी सर्व एकत्र उकळू दिले.छान चांगली कटाची आमटी मी तयार केली आहे.
पुरण घातले की गवले किंवा शेवया ची दुध साखर शेवया तुपात परतून शेवयाची खीर करण्याची रीत पध्दत
पद्दत आहे. मी शेवया याची खीर केली आहे.

                                           DSCF2376

हरबराडाळ याचं पूरणं

                                              ॐ
हरबरा डाळ याचं पूरणं : पाव किलो हरबरा डाळ घेतली.कुकर मध्ये घातली.
पाणी घालून धुवून घेतली.कुकरमध्ये चं डाळ भिजवून खूप पाणी राहील असे
पाणी कुकर मध्ये हरबरा डाळ व पाणी एकत्र केले.एक चमचा हळद टाकली.
ग्यास पेटवून ग्यास शेगडी वर कुकर ठेवला.कुकर मध्ये हरबरा डाळ पाणी हळद
सर्व एकत्र केले.कुक र ला चार ४ पाचं ५ शिट्या दिल्या.कुकर गार झाल्या नंतर
कुकर चे झाकण काढले.एक पातेले घेतले.डाव पातेल्यात ठेवला.चाळणी पातेले डाव
वर ठेवली. कुकर मध्ये हरबरा डाळ शिजलेली व राहिलेले पाणी चाळणीत टाकले.
पातेल्यात सर्व हरबरा डाळीचे पाणी पातेल्यात आले.हरबरा डाळ परत कुकर मध्ये शिजलेली
हरबरा डाळ व पाव किलो साखर एकत्र करून परत साखर व शिजलेली हरबरा डाळ शिजविली.
घट्ट होई पर्यंत शिजविले.नंतर पुरण यंत्रात घालून वाटून घेतली.छान बारीक वाटले.
हरबरा डाळ साखर याचे वाटून पूरणं तयार मी केले आहे. साखर याचे हरबरा डाळी चे पुरण
तयार केले. झाले.

                                   DSCF2374

सतार

सतार : आमच्या ओळखीच्या सौ. लेलेबाई होत्या.आम्ही बराचं वेळा एणेजाणे घरी करता होतो. त्या सतार शिकल्या होत्या.मी सहज म्हटलं मला सतार वाजवावयाला एईल! हो! नंतर एक दिवस ठरवून त्या व मी आमच्या सर श्री नंदकुमार कुलकर्णी यांच्या कडे गेलो.सरांनी आठवडातील २ दोन दिवस सोमवार भुदवार ठरविले.दक्षिणा श्रीफळ नारळ देऊन सतार वाजविण्याचा क्लास सुरु केला.सतार वाजवितांना कसं बसावं सतार कशी धरावी सांगितले शिकविले.दावी मांडी पालथी घालायची उजव्या बाजूला सतार धरायची .
चाफेकळी बोटात नखी घालायची पण पध्दत पद्दत असते.ते शिकविले.कोमल शुध्द स्वर शिकविले.सा रे ग म प ध नी सा , सा नी ध प म ग रे सा आरोह अवरोह शिकविले कोमल शुध्द स्वर प्रत्येक रागात शिकविले.नावापुरते आलाप ताना तोडे त्रिताल आठ ८ मात्रा ची गत विलंबित १६ मात्रा झाला व राग कसा थांब वावयाचा.शिकविले.मी प्रथम सा वरून लगेचं चं शुध्द रे येत असे तर सरं म्हणाले सा वाजू द्दा ध्या बोलू द्दा ध्या सा ला बोलू द्दा द्यां म्हटलं शुध्द रे एई पर्यंत उशीर होईल नाही सा बोलतचं वाजतचं राहतो.नंतर सरांनी यमन भीमपलास सारंग भूप रागेश्री मालकंस मधुवंती बिहाग बागेश्री असे बरेच दादरा धून असे बरेच सतार मध्ये राग शिकविले.नंतर बेळगाव येथे स्पर्धा मध्ये भाग घेण्यास सांगितले.बेळगाव स्पर्धा त मला उत्तेजनार्थ कप मिळाला.कधी चं सतार एणार नाही शिकले नाही तरी उत्तेजनार्थ बेळगाव येथे सतार वाजविण्यात
उत्तेजनार्थ कप बक्षीस म्हणजे माझ्या दृष्टी ने फार महत्वाचं आहे.नंतर रोटरी क्लब मध्ये भाग घेतला तेथे सर्टफिकीट मिळाले.अशा प्रकारे मी सतार वादनात प्रगती केली कोल्हापूर येथे शिवाजी हॉल मंगळवारपेठ कॉमर्स कॉलेज येथे माझी सतार वादन
सरांच्या साक्षीने सतार वादन केले जुन्या देवल क्लब मध्ये सरांच्या साक्षीने एक परीक्षा ईतर सरांच्या समोर परीक्षा दिली त्यात मी पहिली आली.नंतर मी आमच्या घरी सतार याचा कोणताही राग घेऊन रियाज केला.

आता मी मराठी संगणक कडे वळले.

DSCF1211  DSCF0309

दुध

दुध: प्रथम पाचं सहा बदाम मिक्सर मधून बारीक पावडर करून घेतले. जायफळ नंतर बदाम मध्ये टाकले.अगदी छोटा तुकडा भाग घातला परत मिक्सर मधून बदाम जायफळ बारीक केले.थंड फ्रीज चे दुध पाऊण ग्लास काचेच्या ग्लास मध्ये घेतले.दोन चमचे साखर काचेच्या ग्लासच्या दुधात घातली साखर.नंतर बदाम पावडर जायफळ बारीक पावडर केलेले काचेच्या ग्लास च्या दुधात घातले.दुध साखर बदाम जायफळ पावडर हलविले.नंतर त्या दुधात केशर साठ पाकळ्या घातल्या. दुध गारच असल्यामुळे थंड चं आहे.दुध साखर बदाम जायफळ केशर दुध थंडाई केली. केंव्हा ही कोणताही ऋतू मध्ये असे दुध पिण्यास हरकत नाही.बाजारात दुध याचा मसाला मिळतो.पण बदाम पावडर केंव्हा ही चांगल आहे.

DSCF2371

लिंबाच सरबत

                                                  ॐ
लिंबाच सरबत : एक लिंबू कापून घेतले काचेच्या ग्लास मध्ये माठाचं पाणी पौंण
पाऊण ग्लास घेतले.दोन चमचे साखर ग्लासच्या पाण्या घातली.मीठ अंदाजाने थोडसं
ग्लासच्या पाण्यात घातले.लिंबू ग्लासच्या पाण्यात अर्धा हून कमी लिंबू ग्लास पाण्यात
पिळले.ग्लासचे पाणी साखर मीठ लिंबू सर्व एकत्र हलविले.चांगले लिंबू सरबत तयार केले.मी
झाले.याला लिंबू पाणी पण म्हणतात.करतात.घरोघरी लिंबू सरबत पितात.करतात.

                                  DSCF2367

कॉफी

                                        ॐ
कॉफी: एक कप दुध घेतले.पातेल्यात घातले.ग्यास पेटविला.
पेटविलेल्या ग्यास शेगडी वर दुधाचे पातेले ठेवले.दोन चमचे साखर घातली.
दुध उकळू दिले.नंतर त्यात BRU Instant ब्रू कॉफी एक चमचा घातली.ग्यास बंद केला.
कॉफी उकळू दिली नाही.व गाळली पण नाही.कॉफी कपात घातली.कॉफी पिण्यास तयार केली.
झाली.घरोघरी कॉफी पिण्यास करतात.

                                 DSCF2366

चहा

                                               ॐ
चहा:पेटलेल्या ग्यास वर प्रथम दुध चांगले गरम करून तापवून घेतले .
शेगडीवर पेटवून चहा च्या भांड्यात एक कप पाणी घातले.दुसऱ्या ग्यास
शेगडी पेटवून चहा पाणी भांड ग्यास वर ठेवले. चहाच्या चमचा नीं दिड चमचा
पाण्यात साखर घातली.पाणी व साखर उकळू दिले.साखर विरघळली.नंतर चहा
च्या चमचा याने दिड चमचा चहा घातला. Brooke Bond Red Label
Natural Care चहा दीड चमचा घातला.परत पाणी साखर चहा थोडा उकळू दिला.
दुसऱ्या पातेल्यात तापलेले चार चमचे अंदाजाने दुध घातले.दुधात चहा तयार झालेला
चहा च्या गाळन्याने दुधात चहा गाळला.नंतर दुधाचा अंदाज येत नाही.जास्त दुध चालत नाही.
म्हणून आधीचा दुध घातले आहे.गरम दुध गरम चहा एकत्र झाला.पिण्यास चहा तयार झाला.
हा चहा वासाचा असल्यामुळे दुध थोड जास्त चांगलं लागतं.चहा ला दुध याची चव येते.
पाणी साखर चहा दुध सर्व एकत्र चहा गरम केला. मी.घरोघरी चहा पिण्यास गरम पितात.

                           DSCF2363

                           DSCF2365

शेंगदाणे

                                  ॐ
शेंगदाणे :थोडे शेंगदाने कच्चे घेतले.थोडस डाळीचे पीठ घेतले.
डाळीच्या हरबरा डाळीच्या पिठात मीठ तिखट हळद हिंग घातले.
सर्व तयार केलेले डाळीचे पीठ भजी करतात तसे पातळ केले.
कढई मध्ये तेल घातले पेटत्या ग्यास वर कढई ठेवली.तेल तापल्या
नंतर एक एक शेंगदाणा भजीच्या पिठात घालून तळून काढले.
शेंगदाणे भजी एकत्र चांगली लागतात.शेंगदाणा पण तळला जातो.
असे भजी सारखे शेंगदाणे हातगाडी वाले कडे मिळतात.छान खाण्यास
लागतात म्हणून मी घरी करून पाहिले.खरचं छान शेंगदाणे डाळीच्या
पिठात तिखट मीठ हळद हिंग घालून पातळ पीठ करून तळलेले शेंगदाणे चांगले.
छान खाण्यास लागतात.
तसेच तापलेल्या तेलामध्ये जिरे घालून फोडणी करायची नाही.तेल जिरे तापल्या
नंतर कच्चे शेंगदाणे घालून परतून लालासर करून घेतले.शेंगदाणे लालसर झाल्या
नंतर तिखट मीठ घातले हळद हिंग घातले नाही.तेल जिरे कच्चे शेंगदाणे तिखट मीठ
परतलेले शेंगदाणे खाण्यास खूपच छान चांगले लागतात मी स्वत :भजी शेंगदाणे जिरे तेल
तिखट मीठ शेंगदाणे केले आहेत.

                                                   DSCF2349

डांगर

                                                           ॐ
डांगर: उडदाची डाळ एक बाऊल घेतली.हरबराडाळ पाव बाऊल घेतली जिरे थोडे घेतले.
प्रथम उडदाची डाळ भाजून घेतली.नंतर हरबराडाळ भाजून घेतली.जिरे भाजून घेतले.
भाजलेली उडीद डाळ भाजलेली हरबरा डाळ भाजलेले जिरे सर्व एकत्र करून मिस्कर मधून
जाडसर रवा सारखे करून घेतले.डांगर तयार झाले.डांगर याचे पीठ थोडे पातेल्यात काढले.
डांगर मध्ये तिखट मीठ हळद हिंग घातले. गरम पाणी डांगर मध्ये घातले.हलवून घेतले.
नंतर ताक घातले पातळ सर केले. तेल मोहरीची फोडणी गार डांगर मध्ये घातली.परत
डांगर तिखट मीठ हळद हिंग गरम पाणी ताक तेलाची फोडणी सर्व एकत्र हलविले.खाण्याचे
डांगर तयार झाले.डांगर पोळी भाकरी बरोबर खातात.घरोघरी डांगर तयार करतात.

DSCF2346DSCF2348

शिंकाळी

                                                                     ॐ
शिंकाळी: मी रंगीत वायरचे वायरची शिंकाळी केली.ती रंग पुसट होत असल्यामुळे पांढरे दोरे आणून शिंकाळी केली आहेय.
जुन्या घरी एका मुलीने शिकविली शिकवले आहेत.४ टेप चा एक धागा घावायाचा.असे २७ धागे करायचे.सर्व धागे टोक एकत्र
करायचे.त्याचा मध्य करायचा.मध्य मध्ये रिंग अडकून गाठ मधल्यातून सर्व धागे काढून घेतले.सर्व धागे एकत्र आले केले
२७ दोन्ही ५४ धागे झाले.परत ३ चा एक भाग करून एका याचात ९ भाग केले असे ६ भाग केले ३ धागा चा पेड ३ पेड केले मध्ये ३
चा भाग ठेवून डाव्या हातातील ३ एकत्र धागे केलेला मधल्या भागावर टाकला उजवा हातातील ३ धागे दोन्ही भागातून खाडून
घतले.असं विणताना एकाच बाजूने विणायचे म्हणजे पीळ पडतो.थोडे विणून झाल्या नंतर मधल्या घागा मध्ये मणी घालून
तसेच विणले.असे सर्व पदर ६ केले.२ पदराचे दोन व दुसाराचे २ धागे करून गाठ मारली.असे गोल गोल विणून खाली फुल
तयार केले झाले.नंतर ६ ही पदर एकत्र करून धागा ने बांधले.दोन्ही धागात मणी घातले परत दोन गाठी मारल्या घट्ट केले.
रिंग मध्ये अडकवल्या नंतर ४ भाग करून एक एक भाग एका वर एक टाकून गाठी मारल्या दांडा केला त्याचे ६ भाग करून
शिंकाळ तयार केले.मी असे भरपूर शिंकाळी केली. आमच्या घरातील शिंकाळी पाहून मला करून देता का!असे करत त्या वयात
ते शिंकाळी करण्या चा छंद लागला होता.ते शिंकाळी चे पैसे देत असतं विणकामाचे मी घेत नसत.बसने गावात जायचं धागे मणी
आणायचे रिंग आणायची सर्व मी काम आवडीने करत असतं.आजही मला मी शिंकाळी किती केली याचा आनंद आरे असं होतं वाटतं !

DSCF2061मी केलेले विणकामDSCF1961DSCF1966

शिंकाळी

हुताशनी पौर्णीमा

                                                      ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर उत्तरायण फाल्गुन शुक्लपक्ष
शिशिरऋतु नक्षत्र मघा राशिप्रवेश सिंह वार बुधवार १४ हुताशनी पौर्णीमा आहे.होळी
पौर्णिमा आहे. तसेच तारीख दिनांक ७ मार्च (३) २०१२ बुधवार ला हुताशनी पौर्णिमा आहे
होळी पौर्णिमा आहे.

DSCF0351

मनिप्ल्यंट

मनिप्ल्यंट : आमच्या घरी मी मनिल्प्यंट चं रोप लावल होत.ओळखी च्या बंगला मध्ये भरपूर मोठ्ठ बंगला च्या मातीत मनिल्प्यांट च झाडच होत मी त्यांना विचारून मनिल्प्यंट च रोप देता का विचारलं.त्या बाई म्हणाल्या हवं तेवढ घ्यां. मी आपल थोडस मनिल्यंट च थोडस रोप घेतले.
घरी आल्या नतंर पाण्यात ठेवले. दुसरे दिवस आल्या नंतर कुंडी आणली.पिशवीतून माती आणली. कुंडी मध्ये माती घातली.मनिल्यंट च रोप लावले कुंडीच्या मातीत रोप लावले.परत माती घातली. पाणी घातले.घरातील ग्यालरीत सर्व रोप लावले.थोड्या वेळा नंतर एक छोट तिवई सारखं घेतलं हॉलमध्ये ठेवलं त्यात ताट ठेवलं ताटात मनि ल्यंट च कुंडीत लावलेले लावलेलं कुंडी सगट रोप ताटात ठेवले.ठेवलं.रोज त्या रोपाला पाणी घातले.मधून मधून राख घातली.शेण घातलं.ग्यालरी चा दरवाजा दुपारी उघडा ठेवला त्यातून ऊन मनिल्यंट वर पडत असे.तेवढ ऊन पुरे व्हावयाच व्हावयाचे.अस करतं करतं मनिल्यंट चं रोप चं झाड झालं झाले.कोणी घरी आले की आरे ! काय मनिल्यंट आहे.!चकीत होत असतं. मला ही त्या मनिल्यंट कडे पाहून मन हलक व छान चांगल वाटत असे.आपण मी लावलेले लावलेलं मनिल्यंट केवढ मोठ्ठ झाल आहे. डोळे भरून मी त्या मनिल्यंट कडे पाहत असे.पाहतांना मला खूप तृप्तता वाटत असे.कांही दिवसा नतंर पिवळ पडायला लागले. कुंडी बदलली पण ते झाड वाढले नाही.खूप वाईट वाटले.परत तसं मनिल्यंट च रोप लाविन म्हंटल पण ते मनिल्यंट  लागल च नाही पण त्याचा फोटो आज ही माझ्या कडे आहे.छायाचित्र आहे.ते छायाचित्र पाहिलं की मनाला खूप छान वाटतं असत. अरे मी किती छान मनिल्यंट लावल होत याचा आज ही समाधान चांगल वाटत आहे.

DSCF1302

ब्लॉग पोष्ट ४६५ वां

ब्लॉग पोष्ट ४६५ वां : ५ मार्च (३)२०१२ ला माझा ब्लॉग पोष्ट ४६५ वां होत आहे. माझ्या ब्लॉग मध्ये वाचन करून मराठीतून संगणक मध्ये मराठी लिखान आहे. मराठी संगणक मध्ये प्रसिध्द केले आहे. मला एवढे लिखान करायला मिळाले आहे. सर्व माहिती घरातील पुस्तक वर्तमानपत्र मासिक ह्या मध्ये आहे.शोधून काढून वाचून संगणक मध्ये लिहीन हे अगदी

छान चांगल वाटत आहे. वेळ याचा उपयोग चांगला मी केला आहे.अभ्यास पण त्या बरोबर झाला आहे.आपण सर्वांनी वाचन करून प्रतिक्रिया दिल्या आहे. भेटी ३७,८३६  पण झाल्या आहेत.त्या बध्दल बद्दल धन्यवाद ! धंयवाद !

DSCF2338DSCF2330

पिठळ याची वडी


पिठळ याची वडी: पाटाची वडी : हरबरा डाळीच चणाडाळीच पीठ एक मोठ भांड घेतले.हरबराडाळीत
हिरवी मिरची वाटून तीन मिरच्या घेतल्या. हळद हिंग मीठ हिरवी मिरची डाळीच पीठ सर्व पाण्यात पातळ
सर भिजविले.भजीला जस पातळ करतात त्याहून थोडे पातळ पीठ केले. ग्यास पेटवून पातेले ठेवून पातेल्यात तेल डाव भर घातले.मोहरी घातली.फोडणी झाल्या नंतर हरबरा डाळीचे सर्व मसाला घातलेले तेला च्या फोडणीत घातले. उलथन्यानीं हलवून घट्ट होई पर्यंत शिजविले (अटविले). घट्ट गोळा झाल्या नंतर पोळपाट याला तेल लावले. लाटणं यांनी हरबरा डाळीचे शिजवलेले पीठ पसरविले. उलथन्यानीं चं वड्या केल्या पाडल्या.डिश मध्ये हरबरा डाळीचे पिठाच्या वड्या ठेवल्या. सुक खोबर किसणीने किसून बाजूला ठेवले.खर तर वडीत घालतात. पण वडी कोणत्या रंगाची केवढी आहे हे समजण्या कळण्याकरता किसलेले खोबर बाजूला ठेवले आहे. हरबरा डाळीचे पीठ हिरवी मिरची मीठ खळद हिंग तेल मोहरी फोडणी त शिजविलेले खोबर घालून पिठळ याची वडी तयार केली मी तयार केली. यालाच पाटाची वडी पण म्हणतात.घरोघरी पिठळ याची वडी करतात.

DSCF2345

मसूर याचा चिवडा

                                                     ॐ
मसूर याचा चिवडा : डाळमूठ :मसूर प्रथम चाळून घेतले.सात ७ आठ ८ तास पाण्यात भिजत ठेवले.
चाळणीत घालून मसूर ह्यातील पाणी काढून टाकले.परत धुवून घेतले.सर्व पाणी मसूर मधील कोरडे झाले.
कोरड्या कापडात मसूर घातले.पुसून घेतले. ग्यास पेटवून कढई ठेवून तेल तापवण्यास ठेवले.तापले की नाही
पाहण्याकरता एक मसूर तेलात टाकून तळून घेतला.थोडे थोडे मसूर तेलात टाकून तळून घेतले.सर्व तळलेले मसूर पातेल्यात
घातले पांदीलोन मीठ लाल मीठ घातले तिखट घातले.हळद हिंग शेंगदाने कांही घातले नाही.पांदीलोन लाल मीठ याची चव चांगली
लागते.कुरकुरीत मसूर डाळ घाली. मी मसूर डाळ तळून पांदीलोन तिखट घालून टाकून मसूर चा चिवडा मसूर डाळ केली आहे.
पांदीलोन लाल मीठ तिखट दाखविण्या करता ठेवले आहे.बघण्याकरता ठेवले आहे.एवढं पांदीलोन लाल मीठ व तिखट घातले नाही.
असेच मूगडाळ व हरबराडाळ तयार खाण्यास करतात.हातगाडी वाले दुकानात हरबराडाळ मूग डाळ मिळते.
घरोघरी मसूर हरबरा डाळ मूग डाळ खाण्यास तयार करतात.

                                                       DSCF2336

पोहे

                                                            ॐ
पोहे : पातळ पोहे शंभर १०० ग्र्याम घेतले प्रथम चाळनिणे चाळून घेतले.एक कांदा विळीने चिरून कापून घेतला.
थोडी कोथिंबीर निवडून चिरून घेतली लिंबू कापून आर्ध केलं.चाललेले पोहे कळत नळ्त गरम केले खूप गरम घाले की
आकसून जातात.गरम केलेले पोहे पातेल्यात घातले चिरलेला कांदा चिरलेली कोथिंबीर पोहे मध्ये घातली घातले.
ओल खोबर न घालता मी भाजलेले साल काढलेले शेंगदाने याचा कूट घातला.टाकला.ओल खोबर याची चव वेगळी येते व
शेंगदाने कूट याची चव वेगळी येते.लाल तिखट मीठ हळद हिंग कच्च तेल घातले.अर्धा अर्ध लिंबू पिळून पोहे मध्ये घातले.
पोहे शेंगदाने कूट लाल तिखट मीठ कोथिंबीर कांदा लिंबू कच्च तेल सर्व एकत्र कालविले.फोडणी ची चव व कच्च तेल याची चव वेगळी
लागते हिरवी मिरची व लाल मिरची ची चव वेगळी लागते.मी मुद्दाम कच्च तेल व लाल तिखट घातलेले आहे.साखर घातली नाही.
पोहे व सर्व केलेले पोहे याचाचं गोड पणा चांगला लागतो.पातळ पोहे कांदा कोथिंबीर लाल तिखट हळद हिंग मीठ लिंबू शेंगदाने कूट कच्च तेल
एकत्र केल्यावर परत गरम नाही करायचे.घरोघरी पातळ पोहे खाण्यास करतात.

            DSCF2332  DSCF2335

थालिपीठ

                                                      ॐ
थालिपीठ : ज्वारीचे पीठ एक वाटी घेतले.अर्धा वाटी हरबरा डाळीचे पीठ घेतले.
एक कांदा विळीने चिरून कापून घेतला कोथिंबीर दहा बारा देठा सगट घेतली चिरून घेतली.
ज्वारीचे पीठ हरबरा डाळीचे पीठ चिरलेला कांदा कापलेला कोथिंबीर कापलेली. हळद हिंग लाल तिखट
मीठ कच्च तेल सर्व एकत्र आधी हाताने केले.पाणी घालून आसट केले फार घट्ट केले नाही.तवा याला तेल
लावून घेतले सर्व एकत्र केलेले थालीपीठ भिजवलेले पीठ तवा याला लावले.ग्यास पेटवून तवा ग्यास वर ठेवला.
चिमटा हातात धरून तवा व थालीपीठ सगळी सगळ्या बाजूने हलविले.परत उलथ याने दुसरी बाजू ने थालीपीठ
वाफवून घेतले.शिजविले.तवा वर थालीपीठ जाड लावले.वाफेने दोन्ही बाजू शिजवून घेतल्या.गार गरम कासेपण
दही याचा बरोदर खाण्यास देतात.ज्वारीचेपीठ हरबरा डाळीचे पीठ कापलेला कांदा कोथिंबीर लाल तिखट हिंग हळद
मीठ असे तवा वरील वाफवलेले शिजवलेले थालीपीठ मी तयार केले दही बरोबर खाण्यास दिले.घरोघरी असे थालीपीठ
खाण्यास करतात.

                                            DSCF2328

पंचामृत

पंचामृत : कच्चे शेंगदाने दहा पंधरा घेतले. सुक खोबर विळीने पापळ भाग कापून दहाबारा भाग घेतले.
पेटत्या ग्यास वर पातेले ठेवले पातेल्या मध्ये तेल मोहरीची फोडणी केली. फोडणी झाल्या नंतर कच्चे शेंगदाने खोबर फोडणीत घातले. ग्लास भर पाणी घातले. फोडणी कच्चे शेंगदाने खोबर ह्यात कडीपत्ता धने जिरे पावडर हिरवी मिरची हळद मीठ तीळकुट चिंच याचे बोळकळ गूळ टाकला.अटवू दिले तीळ कूट टाकला कोणी कोणी शेंगदाने कूट टाकतात. परत फोडणी शेंगदाने खोबर मसाला शिजवू दिला खरं तर फोडणी शेंगदाने खोबर चिंच गूळ धणे जिरे पावडर घालून शिजवितात अटवितात. नुसत्या पाण्याला चिंच गूळ हिरवी मिरची पूर्वी लाल मिरची असे. मीठ याचच पाण्याला चव येत असे.मिळून येण्या करता
तीळकूट घालतात.किंवा शेंगदाणे कूट घालतात. मी कच्चे शेंगदाणे हिंग खोबर याचे काप चिंच गूळ हिरवी मिरची तीळकूट कडीपत्ता मीठ हळद जिरे पावडर धणे पावडर तीळकूट तेला ची मोहरी ची फोडणी पाणी सर्व एकत्र करून अटवून शिजवून पंचामृत केले आहे.

घरोघरी पंचामृत करतात.

DSCF2326

डाळ याची चटणी

                                                           ॐ
डाळ याची चटणी :चिवडातल डाळ असतं त्याची चटणी :एक वाटी डाळ घेतले.मिस्कर मध्ये प्रथम
एक चमचा मोहरी घातली मेथीचे दाणे दहा बारा घातले.ते प्रथम बारीक करून घेतले.डाळ मोहरी मेथीचे
दाणे बारीक केल्या मध्ये डाळ घातले.छोटा चमचा हिंग लाल तिखट चमचा हून कमी मीठ मिस्कर मध्ये
घातले.मोहरी मेथी डाळ लाल तिखट हिंग हळद मीठ परत सर्व एकत्र मिस्कर मधून बारीक केले.डाळ चटणी
तयार केली.झाली.ही चटणी कच्च तेल किंवा दही घालून पोळी भाकरी बरोबर खातात.तसेच तूप भात डाळ चटणी
घालून पण खातात.घरोघरी डाळ मोहरी मेथी हळद हिंग लाल तिखट मीठ घालून डाळ चटणी करतात.

                                    DSCF2322

लाल टोमाटो

                                                   ॐ
लाल टोमाटो :लाल टमाटो चार घेतले.धुतले. मध्यम कापले चिरले.
मिस्कर मध्ये लाल टमाटो घातले मीठ लाल तिखट हिंग गूळ याचा खडा घातला
पाणी अजिबात बारीक होण्या करता कळत नळत घातले.चांगले लाल टमाटो लाल तिखट
मीठ हिंग गूळ एकत्र गाळ केले. तेल मोहरी कांही न घालतां पातेल्यात पेटत्या ग्यास वर शिजविले.
उकळून अटविले घट्ट फार केले नाही.पण पातळ राहील असे अटविले.लाल टमाटो लाल तिखट मीठ हिंग
गूळ याची चटणी शिजवून केलीं.ह्यात तीळ शेंगदाने कूट खोबर कांही घातलेले नाही. सॉस सारखे सारखं केले.
घरोघरी लाल टमाटो लाल तिखट मीठ हिंग गूळ याची शिजवून चटणी करतात.

                                  DSCF2321

भगर

                                                                 ॐ
भगर : भगर लाचं वऱ्याचे तांदूळ म्हणतात.उपवास करतांना भगर शिजवून उपवास करतात.
आपल्याला हवी तेवढी भगर घ्यावयाची घेणे. प्रथम भगर धुवून घ्यावी घेणे.पातेले पेटविल्या ग्यास वर ठेवणे
ठेवून पातेल्यात तूप टाकणे मी तूप टाकले त्यात जिरे टाकले टाकणे.धुतलेली भगर तूप जिरे फोडणीत टाकली टाकणे.
अंदाजाने पाणी टाकले टाकणे तूप जिरे भगर पाणी ह्यात मीठ लाल तिखट टाकले.कोणी हिरवी मिरची टाकतात.लाल
तिखट चव व रंग चांगला येतो.झाकण ठेवून शिजविणे उतू जाणार नाही याची काळजी घेणे. तूप जिरे भर मीठ लाल तिखट
सर्व छान शिजते.शेंगदाने भाजलेले साल काढलेले थोडे घेतले घेणे मिस्कर मध्ये शेंगदाने मीठ लाल तिखट चिंच चं चिंचेचे कोवळे कोवळं
पाणी सर्व एकत्र करून मिस्कर मध्ये गाळ होतो करणे.परत दुसऱ्या पातेल्यात तूप जिरे ह्याची फोडणी केली करणे मिस्कर मधील
शेंगदाने मीठ लाल तिखट पाणी चिंच सर्व एकत्र केलेले तूप जिरे फोडणीत टाकले टाकणे.शेंगदाने आमटी ला उकळी दिली.गरम छान झाली.
भगर व शेंगदाने आमटी तयार केली झाली.घरोघरी भगर शेंगदाने आमटी तयार करतात.

                                            DSCF2318

सातूचं पीठ

                                                        ॐ
सातूचं पीठ: दोन बाऊल गहू घेतले एक बाऊल डाळ (चिवडा चं असत ते.)घेतले.गहुला प्रथम पाणी लावून ठेवले.
अर्धा तास नंतर गहू भाजून घेतले.गहू उडायला लागले की गहू भाजणे बंद केले.डाळ कच्च च ठेवले जिरे थोडे
भाजून घेतले. गहू भाजलेले कच्च डाळ भाजलेले जिरे एकत्र केले.गार झाल्या नंतर सर्व एकत्र गहू डाळ जिरे मिस्कर
मधून दळून काढले.छान बारीक सातूच पीठ तयार झाले.पीठ गार झाल्या नंतर एका बाऊल मध्ये तापवलेले गार दुध घेतले.
दुधात अंदाजाने गूळ किसून घातला.दुध गूळ एकत्र केले त्यात पातळ राहील असे सातूचे पीठ घातले.दुध गूळ सातूचे पीठ 30
एकत्र बाऊल मध्ये केले.व खाण्यास दिले.पूर्वी बोटानेच सातूचे पीठ दुध गूळ सातूचे एकत्र केलेले बोटानेच खात असत.
घरोघरी सातूचे पीठ तयार करतात.मी स्वत: सर्व सातूचे भाजून दुध गूळ घालून सातूचे पीठ तयार केले आहे.

                                    DSCF2314          DSCF2316

ताकातील हिरवी मिरची

                                                              ॐ
ताकातील हिरवी मिरची: आपल्याला हव्या तेवढ्या हिरव्या मिरच्या घ्यावात.
मी पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या. मिरची मध्ये कापून मिरचीचे लहान भाग
केले. तेलाची मोहरीची फोडणी केली. फोडणी मध्ये पाच सहा मेथी चे दाणे टाकले.
फोडणीत मेथीचे दाणे तांबूस केले.हिरवी चिरलेली मिरची फोडणीत टाकली.अर्धा वाटी
ताक टाकले. हळद हिंग मीठ ताक व हिरवी मिरचीत टाकले.हिरवी मिरची मेथी हळद हिंग
मीठ ताक शिजविले अटविले.मिरचीत ताक व सर्व मसाला चांगला शिजला ताकामुळे मिरची तिखट
लागत नाही.चटणी म्हणून खाण्यास करावी द्यावी.मी हरवी मिरची मेथी हळद हिंग मीठ ताक असे सर्व शिजवून
ताकातील हिरवी मिरची केली आहे.घरोघरी ताकातील हिरवी मिरची करतात.

                                           DSCF2312

पुदिना चटणी


पुदिना चटणी :प्रथम नारळ वाहून (फोडून) घ्यावे अर्धा नारळ खोवून घ्यावे. मी बसून
अर्धा नारळ दोन्ही हातात धरून विळी च्या खोवणी वर खोऊन घेतले.पुदिना ची पान देठा
सगट पंचवीस तीस घेतली.अंदाजाने पेंडी करायची.पुदिना पानाला वास खूप असतो.अंदाजाने
घ्यावी घेणे.हिरवी मिरची दोन किंवा तीन घेणे मी दोन मिरच्या घेतल्या आलं थोड तुकडा घेतला.
आलं पण तिखट असते.थोडसे थोडसं पुरते.पुरतं मीठ एक चमचा घ्यावे मी अंदाजाने घेतले आहे.
लिंबू अर्धा हून कमी पिळणे. मी प्रथम मिक्सर मध्ये हिरवी मिरची दोन आलं तुकडा मीठ पुदिना बारीक करून
घेतले.नंतर त्यातच खोवलेले खोबर अर्धा हून कमी लिंबू पिळून घातले कळत न कळत पाणी घातले.
परत हिरवी मिरची आलं मीठ पुदिनालिंबू सर्व एकत्र परत मिस्कर मधून बारीक करून घेतले.हळद टाळली नाही.
पुदिना चा हिरवा रंग चांगला येतो व पुदिना ची चव येते. तेल व मोहरी याची फोडणी करून गार केली पुदिना
चटणी मध्ये घातली.एकसारखी चमचा याने परत हलविली.ओळ खोबर पुदिना लिंबू हिरवी मिरची आलं मीठ याची पुदिना
चटणी तयार केली झाली मी तयार पुदिना चटणी केली.घरोघरी पुदिना चटणी करतात.

  DSCF2301   DSCF2299

महाशिवरात्रि

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतु
नक्षत्र श्रवण रास मकर माघ कृष्णपक्ष १४ सोमवार महाशिवरात्रि शिवरात्र शिवपूजन आहे. तसेच तारीख दिनांक २० फेब्रुवारी(२) २०१२ सोमवार आहे. महादेव याची पूजा व उपवास करतात.

तेरावे ज्योतिर्लिंग : भारतात भगवान शंकराची बारा ज्योतिर्लिंगं आहेत. परंतु तेरावे तेरावं ज्योतिर्लिंग मॉरीशस मध्ये आहे. मॉरीशस मधील एक शिवमंदिर जगातील १३ वं ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिध्द आहे.

पृथ्वीच्या नकाशात ठिपक्या एवढं दिसणारं मॉरीशस हे एक नितांत रमणीय बेट आहे.या बेटाला ‘भूतलावरचं नंदनवन’ म्हणतात.या देशाला ‘मॉरीशस’ हे नाव का पडलं यामागे इतिहास आहे.

प्रभू रामचंद्राने ज्यावेळी रावणाचा पराभव केला त्यावेळी ‘मारिच ‘राक्षसाचे वंशज ‘द्वीप’ ‘व्दीप’ या बेटावर पळून आले,त्यामुळे या बेताला ‘मॉरीशस’ हे नाव पडलं पडले. हे बेट हिंदी महासागरांत आफ्रिके जवळ आहे.याची लांबी दक्षिणोत्तर ३९ मैल आहे.पूर्व -पश्र्चिम रुंदी २९ मैल आहे.एकूण क्षेत्रफळ ७१६ चौरस मैल आहे.शेती प्रधान देश आहे. मॉरीशस मध्ये भारतीय लोकांची संख्या खूप आहे. हे मंदिर गंगा तलावाच्या काठी आहे.याला ‘परी तलाव’ पण म्हणतात.

भारतात रामेश्र्वर केदारनाथ देवळांना महत्व आहे तसेच १३ तेरावं ज्योतिर्लिंग मॉरीशस मंदिर याला महत्व आहे.

घरातं देवातं महादेव नंदी असतो त्याची पूजा केली तरी घर बसल्या महादेव याची मनोभावे पूजा करतात होते.

घरोघरी महादेव व नंदी देवातं पूजेत असतात.

तेरावे ज्योतिर्लिंग : या मंदिराचा संबंध एका चमत्कारी घटनेशी निगडीत आहे.या मंदिराच्या प्रतिष्ठापना समारोहाच्या पाचव्या दिवशीच म्हणजे २ मार्च १९८९ रोजी सायंकाळी पाचच्या ५ सुमारास अचानक आकाशांत काळे ढग जमले, विजा कडाडू लागल्या आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्याचा वेळी मंदिराच्या घुमटावर एक दिव्य ज्योती अवतरली आणि तिने त्रिशूळा द्वारे शिवलिंगात प्रवेश केला.हे सगळ
एका क्षणात घडलं.त्यावेळी तेथील कमांडिंग ऑफिसर गाभाऱ्या जवळ महाज्योती प्रज्वलीत करीत होते.या प्रकारामुळे अचानक विद्दुतप्रवाह खंडित झाला. परंतु २१ बल्ब झगमगू लागले. जनसमुदाय एक आनंद मिश्रित गंभीर लहर पसरली.त्रिशूळातून पवित्र जल वाहू लागलं. आणि बाजूलाच असलेल्या मखमली कपड्यांवर डाव्या पायाचं
निशाण उमटलं. काही वेळाने त्या पदचिन्हाचं रुपांतर गजमुखात झालं. पाऊस सतत एक तास पडत राहिला.अभिषेक च्या वेळी घडलेली ही घटना अनेक लोकांनी पाहिली.
आठव्या दिवशी गणेश पूजनाच्या वेळेश गाभाऱ्यातील देवतेने गणपती च रूप धारण केलं. शिवलिंगावर नाग व स्वस्तिकाचे चिन्ह उमटलं. असं हे चमत्कारपूर्ण मंदिर गंगा तलावाच्या काठी आहे.या तलावाला ‘परी तलाव’सुध्दा सुद्दा म्हटलं जातं.

DSCF2281

13th Jyotirling

मकाचा चिवडा

                                                                 ॐ
मकाचा चिवडा : मका याचे पातळ पोहे मिळतात.१५ रुपये पावशेर आपल्याला हवे तवढे घ्यावेत.
पेटत्या ग्यास वर कढई ठेवून तळण्यासाठी तेल भरपूर कढई घालावे.तेल चांगले तापवावे.तापले की पाहण्यासाठी
माकाचा एक पोहा टाकावा तापलेले तेल समजल्यावर थोडे थोडे मका याचे पोहे टाकून झाऱ्याने काढून पातेल्यात घालावे.
भरपूर आपल्याला हवे तेवढे मका याचे पोहे तळून झाल्यावर त्या तेलात कच्चे शेंगदाणे तळून घ्यावे.डाळ टाकू नये
कडीपत्ता तेलात तळून घ्यावा.शेंगदाणे कडीपत्ता मका यांचे पोहे तळलेले काढलेल्या पातेल्यात एकत्र करावे.त्यात
सर्व मका पोहे तळलेले पोह्यामध्ये तिखट मीठ हळद हिंग घालावे बाकी कांही मसाला लागत नाही.
मका याचे तळलेले पोहे तळलेले शेंगदाने तळलेला कडीपत्ता तिखट मीठ हळद हिंग सर्व डावाने न हलवता पातेले
खाली वर करून हलवावे म्हणजे मका याचे तळलेले पोहे तुटत नाही.गार गरम कसे ही

मका याचा पोहे तळलेला चिवडा
डिश मध्ये खाण्यास द्यावा. घरोघरी मका याचे पोहे तळलेला चिवडा घरोघरी करतात.

                               DSCF2296

                            DSCF2297

मसूर ची उसळ

                                                      ॐ
मसूर ची उसळ : आपल्याला हवी हवे तवढे मसूर घेऊन धुऊन घावेत.मोड न आलेले मसूर आहेत.
डाळच घावे.कुकर मध्ये धुतलेले मसूर घालावे भरपूर पाणी वाटी मसूर असले तर तीन वाटी पाणी घालावे
चार पाच शीट्या द्याव्यात. कुकर गार घाल्यावर कुकर चे झाकण काढून ग्यास पेटलेला वर पातेले ठेवावे.
तेल मोहरी कडीपत्ता घालावा. फोडणी झाल्यावर शिजलेले मसूर डाळ फोडणीत टाकावी.हळद हिंग लाल तिखट
मीठ घालावे.परत सर्व मसूर डाळ गरम करावी.छान शिजते.मसूर डाळ कुकर मध्ये शिजतांना कच्चे शेंगदाणे घालावे
मी घातले आहेत पण ते दिसत नाहीत.कच्चे शेंगदाणे शिजलेले चांगले लागतात.मसूर डाळ व कच्चे शेंगदाने याची
मासालां घालून केलेली उसळ चांगली लागते. घरोघरी मास्य्र डाळ व कच्चे शेगदाणे याची उसळ करतात.

                                                    DSCF2294

लाल भोपळा ची भाजी

                                                                    ॐ
लाल भोपळा ची भाजी : लाल भोपळा मध्ये बिया असतात.त्या काढून घ्यावात.उन्हात वाळवून
सोलून खाव्यात.भोपळा धुवून घ्यावा.साल काढून मोठ्या मोठ्या फोडी कराव्यात.पातेले पेटलेल्या
ग्यास वर ठेवून पातेल्यात सादूक तूप भरपूर घालावे जिरे घालावे तूप व जीरे याची फोडणी झाल्यावर
चिरलेला लाल भोपळा तूप व जीरे ह्या फोडणीत घालावे.दोन वाट्या पाणी घालावे. दोन हिरव्या माराच्या घालाव्यात.
साखर गूळ कांही घालू नये लाल भोपळा ला गोड चव असते.पाणी व लाल भोपळा शिजल्यावर त्यात मीठ व भाजलेले
साल काढलेले शेंगदाणे याचा कूट दोन चमचे घालावा.परत पाणी लाल भोपळा शेंगदाणे याचा कूट मिरची मीठ सर्व
परत थोड्यावेळ शिजवू ध्यावे.भाजी शिजतांना पातेल्यावर झाकणं ठेवावे वाफ बाहेर जात नाही उतू जात नाही याची
पण काळजी घ्यावी. लाल भोपळा तूप जीरे हिरवी मिरची मीठ शेंगदाणे कूट सर्व एकत्र लाल भोपळा याची तयार झाली.
लाल भोपळा ची भाजी उपवास याला पण चालते.घरोघरी लाल भोपळा याची करतात.

                                             DSCF2293                  DSCF2284                                DSCF2285

चाकवत ची भाजी

                                                           ॐ
चाकवत ची भाजी : चाकवत देठा सगट निवडून घ्यावा.चालणीत निवडलेला चाकवत घालून पाण्याने पाण्यानं
धुवून घ्यावा.मिक्सर मध्ये निवडलेला चाकवत थोड पाणी दोन वाटी पाणी घालावे.आंबट दही घालावे.दोन चमचे
हरबरा डाळीचे पीठ घालावे.चाकवत हरबरा डाळीचे पीठ दही पाणी सर्व एकत्र पातळ व बारीक करावे.तेलाची व मोहरीची
फोडणी करावी प्रथम कच्चे शेंगदाने तांबूस करून घ्यावेत मी घातले आहेत पण ते भाजीत दिसत नाही.नंतर चाकवत
सर्व केलेले मिश्रण फोडणी व शेंगदाने ह्यात घालावे.त्यात तिखट मीठ हळद हिंग घालावे.वाटल्यास फोडणीत लसून घालावा.
मी घातला नाही.सर्व चाकवत मिश्रण हलवावे पातेल्याला लागत नाही उकळी एई पर्यंत शिजवावे.चाकवत ताकातील भाजी पोळी
भाकरी बरोबर खाण्यास द्यावी.
घरोघरी चाकवत याची भाजी करतात.

                                                      DSCF2283

                         DSCF2286

दही पोहे

                                                           ॐ
दही पोहे : प्रथम पोहे चाळणी घेऊन चाळून घ्यावेत.पोहे पातेल्यात काढून पाण्यानं धुवून काढावे.
थोडे भिजल्यावर पोहे मध्ये हिरवी कुटलेली मिरची मीठ हळद हिंग टाकावे. दही पोहे ओले होई पर्यंत
भरपूर टाकावे. तेल मोहरी याची फोडणी करावी.फोडणी गार करावी.नाहीतर पोहे गरम होतात.फोडणी
गार घाल्यावर दही पोहे मध्ये घालावी.फोडणी दहीपोहे एक सारखे डावाने चमचा ने हलवावे.डिश मध्ये
खाण्यास द्यावे.
घरोघरी दही पोहे करतात.

                                              DSCF2267

आरोग्य

                                                               ॐ
आरोग्य : नियमित जेवण करायला हवे.स्वंयपाकात साखर गुळ याचा वापर करु नये. गोड रोज फार खावू नये
चाहा कॉफीत साखर असते तेवढी बसं होते.गोड पदार्थ आठवड्यात एकदा खाण्यास हरकत नाही.पाले भाज्या जास्त
प्रमाणात खाव्यात. कोबी फ्लावर कमी खावा.बीट काकडी गाजर भरपूर खावे.आठवड्यात एकदा वेगवेगळ्या भाज्या खाव्यात.
मुग चवळी हिरवे पांढरे हरबरे पाण्यात भिजवून मोड न आणता तसेच कुकर मध्ये पाचं सहा शिट्या देवून मीठ तिखट हळद हिंग
घालून उसळी सारखे करून खावे.रोज एक फळ खावे.संत्र केळ पपई ऋतू प्रमाणे जसे फळ मिळेल तसे खावे.ताका पेक्षा दुध प्यावे .
कधी पोळी कधी भाकरी करावी आंबलेले ईडली डोसा खावू नये नारळ खराब झालेले खावू नये.शेंगदाने दाणे तीळ वापरावे पदार्थामध्ये
लवंग दालचीनी मिरे रोज वापरू नये.मसाला फार वापरू नये.
नियमित झोप फिरणे असावे.वर्तमानपत्र नियमित वाचावे.रेडीओ वरची गाणी ऐकावी.फार सिरीयल पाहत बसू नये.एखादी पहावी.
बातम्या ऐकाव्यात.फोन करून नातेवाईक यांना आज आपण काय केले ते सांगावे.कोणतं ही लिखान रोज करावे.वहीत श्र्लोक मंत्र लिहून
काढावे.रोज सकाळ संध्याकाळ रामरक्षा महावी गणपती स्तोत्र म्हणावं.महिनात एकदा डॉक्टर ला तब्येत दाखवावी.

                                          DSCF2270

हिरवे टमाटो

                                                     ॐ
हिरवे टमाटो : हिरवे टमाटो ची चिरून हरबरा डाळी चे पीठ लावून भाजी करता.
मी हिरवे टमाटो ची चटणी केली आहे.प्रथम हिरवे टमाटो धुवून घ्यावेत.
जाडसर चिरावे.तेलावर परतून काढावे. तीळ भाजलेले बारीक मिस्कर मधून करून घ्यावेत.
गार झालेले टमाटो तीळ कूटात टाकावे. त्याबरोबर आवडी प्रमाणे हिरवी मिरची मीठ टाकावे.
परत सर्व मिस्कर मध्ये बारीक करावे.काचेच्या सटात काढावे काढावी.परत तेल मोहरी ची फोडणी
करावी.फोडणी गार करून हिरव्या टमाटो चटणी त घालावी.हळद टाकू नये.टमाटो चा हिरवा रंग चांगला
दिसतो.हिरव्या टमाटो त तीळ कूट असल्यामुळे हिरव्या टमाटो ला तिळाची चव चांगली लागते.
घरोघरी हिरवे टमाटो वापरतात.हिरव्या टमाटो ची भाजी चटणी करतात.

                                          DSCF2274                                                                     DSCF2269

%d bloggers like this: