आपले स्वागत आहे!

Archive for the ‘देव दर्शन’ Category

गणपती बाप्पा मोरया

गणपती बाप्पा मोरया!
घरातील गणपती.

 

ज्योतिर्लिंग १२ – औंढा नागनाथ

हिंगोली जिल्ह्यात मधील औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचा अनुभव अगदी विस्मयकारी होता. लिंग जमिनीच्या खाली स्थापन करण्यात आले आहे. लिंग पर्यंत जाण्यासाठी वाकून ३-४ पायऱ्या उतरून जावे लागते. खाली गेल्यावर देव दर्शन साठी व बसण्यासाठी छोटीशी गुहे सारखी जागा आहे. मन अगदी पवित्र होते. ही जागा स्वतः जाऊन अनुभवण्यास पाहिजे.

नागनाथ म्हणजे नागांचा देवता. मनुष्याची कुंडलिनी योनी हि एका सर्प  सारखी मानली जाते. कुंडलिनीतील उर्जा व सर्प यांचा देवता म्हणजे नागनाथ.

आत्ता पर्यंत दर्शन झालेले सर्व ज्योतिर्लिंग यांचा अनुभव अगदी संस्मरणीय व पवित्रात्मक होता. देव कृपेने सर्व दर्शन व लिखाण पार पडले.

शिवो हं… शिवो हं!

ज्योतिर्लिंग ११ – वैजनाथ

परळी वैजनाथ येथील वैजनाथ शिव मंदिर हे ११ वे ज्योतिर्लिंग आहे. अगदी प्रसन्न वातावरण आहे, मुख्य मंदिरा कडे जाताना थोड्या पायऱ्या चढून जावे लागते. मंदिरा च्य जवळच एक सुंदर असे छोटे दुसरे गोलाकार शिव मंदिर असून मध्यभागी लिंग आहे. अगदी छान गाभारा आहे.

वीरशैव समाजाने बांधलेल्या ह्या मंदिर वीरभद्र ची एक मोठी मूर्ती सुध्धा आहे. जेंव्हा आपल्या वडिलांकडून यज्ञाचे निमंत्रण शिव व सती यांना मिळाले नाही, तेंव्हा सती ने रागाच्या भरात यज्ञात उडी घेतली. हे ऐकून, रागावलेल्या शिवाने आपला एक केस उपटून जमिनीवर फेकला व त्यातून वीरभद्र, शिवाच्या रागाचे प्रतीक म्हणून निर्माण झाला. अशी आख्याईका आहे.

शिव शिव!

ज्योतिर्लिंग १० – घृष्णेश्वर

 
औरंगाबाद जवळ घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग च्या दर्शना साठी सकाळी ७ वा. पोहोचलो. काळ्या दगडांनी बांधलेले हे मंदिर नेटके व छान दिसले.
 
आम्ही फुलं, नारळ व इतर पूजा साहित्य घेऊन मनाप्रमाणे लिंग दर्शन घेतले. लिंगास हात लावून नमस्कार करून अगदी जवळून आपल्याला कृतज्ञ होता येते. पुरुषांना शक्यतो  वरती उघड्या अंगाने गाभार्यात जावे लागते. असे म्हणतात की मेस्र्दंड उघडा असल्यास उर्जा स्वीकारण्यास सोपे जाते.
 
ओम  नमः शिवाय!
 

ज्योतिर्लिंग ९ – रामेश्वर

 
तामिळनाडू मध्ये रामेश्वरम येथील  रामनाथस्वामी ज्योतिर्लिंग  मंदिरास तीन नारायणांनी  प्रतिभा आणली आहे. हे तीन नारायण म्हणजे – अपार, सुंदरर आणि तीरुग्णन सम्बंदर हे होत. हे मंदिर १२ व्या शतकात बांधले आहे. ह्या मंदिराचा गाभारा सर्व हिंदू मंदिरांमध्ये मोठा असल्याचे म्हंटले जाते.
 
ज्योतिर्लिंग म्हणजे ज्योतीचे लिंग किंवा एक स्तंभ जो ताठ आणि निश्चल उभा आहे, म्हणून त्याला ज्योतीचा स्तंभ असेही संबोधतात. हे रामेश्वर चे मंदिर १२ ज्योतिर्लिंग पैकी ९ वे  ज्योतिर्लिंग आहे.
 

ज्योतिर्लिंग ८ – त्रंबकेश्वर

महाराष्ट्रातील नाशिक जवळ त्रंबक गावात गोदावरी काठी त्रंबकेश्वर चे प्रसिध्द ज्योतिर्लिंग आहे. गोदावरी हि भारतातील सर्वात मोठी नदी. त्रंबकेश्वर नाशिक पासून अतिशय सहज जाण्या सारखे आहे.

त्रंबकेश्वर मधील लिंगा मध्ये आणखीन तीन लिंगं आहेत. त्यांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश असे मानतात. हे तीन देव इथे वसले म्हणून नाव त्रंबकेश्वर. हि जागा गजबजलेली आहे, आणि दर्शन घेण्यास वेळ लागू शकतो पण अतिशय उत्साहवर्धक वातावरण आहे.

आम्ही पहिल्यांदी महाकुंभ येथे हात पाय ओले केले, येथे दर १२ वर्षांनी शिव पूजक एकत्र जमतात. महाकुंभातील पाणी गोदावरी च्या उगमस्थाना पासून येते असे म्हणतात.

नंतर केदारेश्वराचे दर्शन घेतले. केदारेश्वराच्या बाबतीत ५ व्या ज्योतिलिंग ह्या ब्लॉग मध्ये लिहिले होते. त्या केदारेश्वराची प्रतिमा त्रंबकेश्वर येथे आहे. नंतर चिंतामणी पाषाण (गणपती) चे दर्शन घेऊन त्रंबकेश्वर चे मनापासून दर्शन झाले.

ज्योतिर्लिंग ७ – काशी विश्‍वनाथ

उत्तर प्रदेश मध्ये वाराणशी येथील  काशी विश्‍वनाथ शिव मंदिर अत्यंत पवित्र मानले जाते. आयुष्यात एकदा ह्या मंदिराची तीर्थयात्रा घडो अशी भक्तांची इच्छा असते. हे सातवे ज्योतिर्लिंग आहे.
 
येथे मुख्य प्रतिमा विश्वनाथ किंवा विश्वेश्वराय म्हणजे विश्वाचा ईश्वर ह्यांची आहे. हे शहर ३५०० वर्षान इतके जुने असून, जगातले सर्वात जुने गाव मानले जाते.
 

ज्योतिर्लिंग ६ – भीमाशंकर

 भीमाशंकर हे सहावे ज्योतिर्लिंग शिरढोण जिल्ह्यात पुण्यापासून १२७ किलो मीटर वर आहे. आम्ही हायवे सोडून घाट व गर्द  झाडांच्या सुंदर रस्त्या तून चाललो होतो. छान रंग दरी व उंच डोंगरांमध्ये दिसत होते. रस्ता छोटा व खड्यांचा होता. पण आमच्या ज्योतिर्लिंग च्या दर्शनाची आस साक्षात भगवान शिव ने उलाखाली असे वाटले जेंव्हा त्याच्या दूता सारखा एक सर्प आमच्या रस्त्यात आला. त्याच्या साठी थांबून आम्ही  रस्ता दिला प्रथम त्याचे दर्शन झाले व पुढे निघालो.
 
काळ्या दगडात  बांधलेले हे मंदिर एका छोट्या दरीत वसले आहे. साधारण पणे २०० पायऱ्या खाली उतरून जावे लागते. ह्या मंदिराच्या समोर एक नांदी व एक १७२९ सालची घंटा आहे. शिव लिंग अंधारात साधारण पणे ५ फूट जमिनी खाली आहे. खाली पायऱ्या उतरून जावे लागते. शिव लिंगाचे दर्शन आणि स्पर्श ज्योतिर्लिंगाचे तेज अंतर मना वर बिंबवते.

जोतिर्लिंग ५ – केदारनाथ

हिमालयातील रांगा मध्ये गढवाल येथे भगवान शिव चे अत्यंत पवित्र असे केदारनाथ मंदिर मंदाकिनी नदीच्या काठी वसलेले आहे. खराब हवामानामुळे हे मंदिर फक्त एप्रिल पासून कार्तिक पौर्णिमे पर्यंतच उघडे असते. हिवाळ्यात केदारनाथ मधील मूर्ती उकिमठ येथे आणून पुजल्या जातात. केदार खांदा चा भगवान असे म्हणून शिव ह्याला पूजले जाते.

गौरीखंड येथून १४ किलो मीटर चा खडतर प्रवास करून केदार नाथ जा जावे लागते. केदार नाथ हे १२ ज्योतिर्लिंगा पैकी ५ मानले जाते.

ध्यानलिंग

Anyone who comes into the sphere of Dhyanalinga cannot escape the sowing of the spiritual seed of liberation – Sadhguru

ध्यानलिंग च्या  क्षेत्रांत जो येतो त्याच्या मध्ये अध्यात्माचे बीज रुतल्या शिवाय राहत नाही – सद्गुरू

http://dhyanalinga.org/architecture.htm

[youtube:http://youtu.be/vwbiGiNmkDk%5D

श्रीगणेश जयंती

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर उत्तरायण शिशिरऋतु नक्षत्र शततारा
माघ शुक्लपक्ष गुरुवार विनायक चतुर्थी श्रीगणेश जयंती आहे.

तसेच गुरुवार २६ जानेवारी (१) २०१२ तारीख दिनांक ला श्रीगणेश जयंती आहे.

तिळगुळ याचा लाडु गणपती ला नैवेध्द देतात.

DSCF1535  DSCF0527

DSCF2077  aca1f8502b4e

DSCF1665

श्री योगेश्वरी देवी – अंबाजोगाई

अंबाजोगाई ह्या महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील गावात एक अतिशय सुंदर असे श्री योगेश्वरी देवीचे मंदिर आहे तेथे सर्व महाराष्ट्रातून मुख्यतः कोकण भागातून खूप लोक येतात. आम्हांस थोड्याच दिवसांपूर्वी येथे जाण्याचा योग आला. छोट्या प्रवेशद्वार मधून आत गेल्यावर एक अतिशय प्रसन्न असा अनुभव येतो. मन देवी कडे आकर्षित होऊन येथेच ध्यानस्थ बसावे असे वाटते. मंदिराचा गाभारा अतिशय प्रसन्न व उबदार वाटतो. देवीचे तेज व देखणी मूर्ती डोळ्यात भरून राहते.

योगेश्वरी मुकुंदराज, संत दासोपंत खोलेश्वर व इतर देवस्थानावरून अंबाजोगाई ची ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात येते. जयवंती नदीच्या तिरावर वसलेल्या योगेश्वरी च्या नावावरून अंबाजोगाई हे नाव रूढ झाल्याचे शिलालेखा वरुन समजते. पूर्ण हेमाडपंथी मंदिर असलेल्या योगेश्वरी मंदिराचा देवी अवतर ण्यात निरनिराळ्या आख्यायिका आहेत लेण्यावर आधारित कथा आहेत. मंदिराच्या वायव्य दिशेस नाडिकाठी शिवालेने आहे दगडाच्या कोरीव सभामंडपात दाराशी दोन दगडी हत्ती आहेत मंडप याच्या मध्यभागी गुहेत शंकराची मूर्ती मंडप याच्या समोर नंदीची मूर्ती आहे. मंडप यातून परळीच्या वैद्दनाथ गेलेले भुयार आहे. आश्विन व मार्गशीष महिनात योगेश्वरी चे वार्षिक उत्सव साजरे केले जातात.

श्री योगेश्वरी देवीची पालखी दर शुक्रवारी मंदिराच्या आवारात फिरते. पालखीतील उत्सव मूर्ती भक्तांना दर्शन देते व या वेळी राजराजेश्वरीचा उदो उदो व त्रिपुरसुंदरीचा असा जयघोष उत्स्फूर्तपणे केला जातो.

काळ्या दगडात बध्लेल्या ह्या मंदिरात अगदी शांततेने बसून  दर्शन घेता येते, आम्हास कोणी हि व्यक्ती मागे लागून देवीचा अभिषेक करा किंवा पैसे द्या वगैरे म्हणून मागे लागले नाहीत. देवीच्या सानिध्ध्यात तिच्या शक्तीचा अतिशय छान अनुभव आला. आपल्यास जमेल तेंव्हा जरूर अंबाजोगाई चे दर्शनास होईन या.

पुष्कर ब्रह्मदेव मंदिर

ॐ 

पुष्कर ब्रह्मदेव मंदिर: राजस्थानातील अजमेर जिल्ह्यात पुष्कर गावात श्री ब्रह्मा चे प्रसिध्द मंदिर आहे. पुष्कर गाव भारतातील एक सर्वात पौराणिक जागां पैकी एक असून ही पुष्कर तळया च्या काठी बसलेले आहे. तेथे लहान मोठी अशी पाचशे मंदिर आहेत पुष्कर येथील ब्रह्मदेवाचं मंदिर हे प्रमुख देवस्थान आहे. हे मंदिर दोन हजार वर्ष जुनं आहे. महर्षी विश्र्वामित्रानं हे बांधलं असल्याचं भाविक मानतात. स्वत: ब्रह्मदेवानं ही जागा निवडली अशी भाविकांची श्रध्दा आहे. या मंदिरात आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या गर्भगृहात फक्त संन्यस्त ब्रह्मचारीच जाऊन पूजाअर्चा करु शकतात.

कार्तिक पौर्णिमे ला तेथे उत्सव साजरा केला जातो. याच काळात कालावधीत कॅमक फेअर’ नावानं ओळखला जाणारा उंटाचा मेळाही तिथं भरतो.

नवरात्रारंभ, घटस्थापना, महालक्ष्मी यंत्र

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर दक्षिणायण शरद ऋतु आश्र्विन शुक्लपक्ष बुधवार २८ सप्टेबंर (९) २०११ तारीख ला नवरात्रारंभ, घटस्थापना सुरु होत आहे.

हा उत्सव विजया दशमी दसरा पर्यंत असतो. दसरा गुरुवार आश्र्विन शुक्लपक्ष १० दशमी ६ अक्टोबर पर्यंत आहे.

समई तेल कापसाची वात नऊ दिवस पुरेल अशी करतात व दिवस रात्र नऊ दिवस समई तेल वात ठेवतात.

कुंडी मध्ये धान्य पेरतात नऊ दिवस साबुदाणा भगर रताळी केळी फळ खातात व उपवास करतात.

देवी दर्शन दसरा पर्यंत करतात दसरा ला शमी दसरा ला देतात. असा नवरात्र उत्सव करतात.

मी महालक्ष्मी यंत्र काढलेले आपणास पाहाण्यास नक्कीच आवडेल.

mahalaxmi yantra  DSCF0468 

DSCF0774  DSCF0773DSCF0772  DSCF0771DSCF0770  DSCF0769DSCF0768  DSCF0767 

मी काढलेले महालक्ष्मी यंत्र

गणेश प्रार्थना


गणेश प्रार्थना
मोरया s मोरया s अष्टविनायक मोरया s
मोरया s मोरया s अष्टविनायक मोरया s
दुर्वाकुरच्या मळ्यात झुलला, जास्वंदी पाळणा
पाळण्यात हा छान शोभतो, गौरी पुत्र देखणा
ढोल नि ताशा, झांजा गर्जे, शंखनाद दुमदुमला
मोरगांवाचा मयुरेश्वर हा, छन छन नाचतं आला
थेऊरस्थानी, श्री चिंतामणी , आनदांने हसला
सिध्दटेकचा सिध्दिवनायक, भक्तासंगे रामला
स्वरुपसुंदर, महागणपती, रांजणगावी डोले
ओझरातला श्रीविघ्नेश्वर, पाहुनी नयन निमाले
लेण्याद्रीचा गिरिजात्मजही भूरळ घालतो मना
वरविनायक, महडगावचा, पावतसे भक्तांना
बल्लाळेश्वर, पालिग्रामी, उपवनी झोके घेई
चहुंबाजूनी, भावभक्तीचा, दरवळ तरळत येई
अष्टविनायक, दैवत अमुचे, भावे ओवाळूया
नैवेद्दाचे मोदक अर्पून, गणेशास वंदूया

– अरुण तावडे कांदिवली

महाराष्ट टाइम्स संवाद रविवार ४. ९. २०११ तारीख ला पेपर मध्ये हे लिखाण आले आहे.

DSCF1934

श्रीगणेश चतुर्थी

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर दक्षिणायन वर्षा ऋतु भाद्रपद शुक्लपक्ष श्रीगणेश चतुर्थी गणेश पूजन ४ गुरुवार आहे.चित्रा नक्षत्र तुला रास चंद्र दर्शन निषेध तसेच १ सप्टेंबर २०११ तारीख ला गणपती सार्वजनिक व घरगुती बसवतात . लोकमान्य टिळक यांनी प्रथा पाडली आहे .१०० वर्ष १२५ वर्ष झाली आहेत प्रथा सुरु झाली आहे.तसेच गौरी पण आणतात. गणपती घरोघरी ५,७,१० दिवस असतात. गौरी ३ दिवस असतात. मातीचे किंवा (PLASTER OF PARIS प्लॅस्टर ऑफ पॅरीस ) चे असतात. लोक एकत्र येण्या करता मत ऐकण्या करता ही प्रथा पाडली आहे. मी आता आमच्या घरातील कांही गणपती ची छायाचीत्र दाखवीत आहे.

DSCF0384  DSCF1235

DSCF1049  DSCF1048

DSCF0920  aca1f8502b4e

DSCF0281  DSCF1838

कोल्हापूर परिसरातील नामांकित गणपती

  DSC00030  DSC00037DSC00031

बटुकेश्वर

DSC00035  DSC00033

तीन गणपती                                      मोठा गणपती

DSC00040  DSCF1512

जोतीबा

DSC00041  DSC00042a

गणेशवाडी                               औदुंबर

आम्ही पाहुण्यांच्या बरोबर भरपूर गणपती पहिले. तसेच सांगलीचा गणपती नरसोबावाडी औदुंबर हे देवस्थान पहिले. एवेढे देवदर्शन झाल्यामुळे मला व आमच्या कडे आलेल्या पाहुणे यांना छान वाटत आहे.

आम्ही कोल्हापूरहून एक मोठी कार ठरवली होती त्यामुळे सर्वांना एकत्रपणे सर्व स्थळ पाहण्यास मजा आली.

जोतीबा

आमच्या घरी पाहुणे आले असताना आम्ही व आमचे पाहुणे यांच्या बरोबर जोतीबा पन्हाळा टेंबलाबाई शालिनी पॅलेस व सिद्धगिरी व येथील सिमेंट चे संग्रहालय पाहीले आहे. त्यातील काहीं छायाचित्र लावली आहेत. ती आपणास पाहण्यास छानच वाटेल !

DSC00004  DSC00005DSC00001  DSC00003 

DSC00008  DSC00018DSC00009  DSC00014  DSC00015  DSC00016

DSC00028  DSC00020  DSC00025  DSC00021

Kumbhaar  Village paanvataha

श्रावण शनिवार

श्रावण शनिवार : शनिवार मारूती चा वार .तसेच श्रीनृसिंह चा वार प्रल्हाद याचा वार.

शनिवार ला शनि ला व मारूती देवळात तेल घालतात. तसेच शनि ची पत्री रुई ची पत्री चा हार घालतात. मुंजा मुलगा जेवणास बोलावतात. गोड खायला जेवन देऊन त्याला दक्षिणा देतात. प्रल्हाद वडील यांना सगळीकडे देव आहे. लाकडी खांबात पण देव आहे.

व लाकडी खांबातून देव येतो. देवावर श्रध्दा भक्ती ठेवली की मानासारखं होत. घडत.

लहान मुलांच पण मोठ्या मानसानीं ऐकायला हव.

मुलाचं सांगण आई व वडील यांनी ऐकायला हव.

ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.

आम्ही हे व मी शनीला तेल सात वर्ष दर शनिवारला तेल घातलं आहे. शाहूपुरीत असतांना.

DSCF1866  DSCF1853

महालक्ष्मी मंदीर

२५ वर्षापूर्वी कोल्हापूर महालक्ष्मी देवी ची ९ वारी (लुगड) साडी व ईतर ओटीचं साहित्य घरुनचं घेऊन सकाळी ५ पाचं वाजतां महालक्ष्मी देवळातं गेलो पोहचलो. मी हे आमची पुष्कर व प्रणव मूलं माझे सासरे बाबा व आत्यासासूबाई आक्का सर्व बरोबर होतो.

सोळ्यातं हेव बाबा यानीं अभिषेक पूजा छान केली. आम्ही दिलेली साडी देवीला नेसविली. आम्हा सर्वांना त्यावेळेला खोपचं चांगल वाटलं. गुरुजी नीं मला ओटीतं नारळ व ईतर प्रसाद दिला.

मी त्यावेळेला देवळात जाताना चप्पल घरुनच घातली नव्हती. सोळ्यात चांगल कराव वाटलं. आजही त्यावेळेची आठवण आहे. महालक्ष्मी मंदिरात महिलांनाही प्रवेश कोल्हापूर. हे असं कधी लक्षातं चं आल नाही. देवदर्शन घेत होतो. घरी येत. येते !

ह्यातल काहीं कळतं नाही.

kolhapur mahalakshmi   DSCF1528

महालक्ष्मी मंदीर                                           दवणा

सप्तश्रुंग देवी व महालक्ष्मी देवी

सप्तश्रुंग वणी ची देवी : खुपचं खूप पूर्वी १९७५ / १९७६ साली मी आमच्या च्यां बरोबर माझे सौ आई वडील भाऊ (बाळं) सौ वाहिनी त्यांचा मुलगा आकाश व माझी बहीण कमलाताई आमची मूलं पुष्कर व प्रणव असे सर्वजण नाशिक ला गेलो तेथे धर्मशाळेतं राहिलो

सकाळी ४ वाजतां ऊठून डोंगर चढण्यास सुरुवातं केली.केवढा मोट्ठा डोंगर.बापरे त्यावेळेला होतां ! मोठमोठे दगड असे.आम्ही सर्वजण डोंगर चढूण सकाळी ७ वाजतां पायरी पाशी आलो

तेथे गुरुजी नां पुरणपोळी चा नैवेद्द सांगुन सर्व आटपून पायऱ्या चढण्यास सुरुवातं केली.व छान मनासारखं सर्वाचं चं सप्तश्रुंग वणी देवी चं चांगलं चं दर्शन झालं आमचं सर्वाचं आज ही ती आठवण मनातं आहे. भरते. नंतर नैवेद्द प्रसाद खाऊण परत डोंगर ऊतर ण्यास सुरुवातं केली.व ७ वाजतां नाशिक ला आलो. नंतर मुंबईत आलो. मी व आमची मूले पुणे कोल्हापूर असं घरी आलो.

कोल्हापूर महालक्ष्मी : कोल्हापूर देवी दर्शन नवरात्रात आलो होतो तेंव्हा तिसरी माळ चालू होती. नवरात्रातं मी दसरा पर्यंत बरेच वर्ष महालक्ष्मी देवी दर्शन केलं आहे. वास्तु पण नवरत्रातं झाली आहे. ह्यांचं वसुधालय पुस्तक नवरात्रात चं छापून आलं आहे.

Goddess Saptashrungi Devi of Vani near Nasik city Maharashta     mahalaxmidevi

सप्तश्रुंग देवी                                             महालक्ष्मी देवी

रेणुका देवी व तुळजापूर देवी

मी चार देवी दर्शन केले आहे हे लिहिले आहे. माहुर रेणुका देवी दर्शन नुकतेचं माघ महाशिवरात्र ला छान दर्शन झाल्याचं लिहिले आहे.

तुळजापूर देवी दर्शन लग्ना आधी माझ्या चुलत बहिण सौ. निशा हिच्या लग्नाला उस्मानाबादला गेले होते. त्यांच्या बरोबर नंतर देव दर्शन म्हणून तुळजापूर देवी दर्शन केले. नंतर माझं लग्न झाल्यावर मी हे व आमची मूले सर्वजण मिळून मी परत तुळजापूर देवी दर्शन केले आहे. त्यावेळा पंढरपूर पण विठोबा चं देव दर्शन केले आहे. कोल्हापूर महालक्ष्मी देवी दर्शन लिहिले आहे. सप्तशृंग देवी दर्शन लिहीनं.

mahur renuka devi    Tulajapur Bhavani

Mahur Renukadevi                           Tulajapur Bhavanidevi

%d bloggers like this: