आपले स्वागत आहे!

Archive for the ‘नवरात्र’ Category

दसरा

१ आपटा २ कांचन ३ शमी म्हणजे दसरा ला देणारी पान. ह्यांना संस्कृत मध्ये ‘वनराज’ म्हणतात. याचा उपयोग अवजारे हत्यारे करण्या करता करत असतं. तंतुमय साली पासून मजबुत व टिकाऊ दोर बनविले जात. जमिनी चा कस वाढविण्यासाठी व धूप थांबविण्यासाठी उपयोग केला जातो. पित्त कफ या आजारावर उपयोग व गुणकारी आहे. पानांचा वापर सोन म्हणून होत आहे. शास्त्रीय भाषेत ‘बॉहिनिया व्हॅरिएगाहा’ असे आहे.पाने वाकाच्चा शेंगा भाजी साठी उपयोग करतात. कळ्यांचे लोणचे करतात. फुल म्हणजे आर्किड म्हणतात इंग्रजी मध्ये ‘ऑर्कीड ट्री’ असे नाव आहे. मराठी त खेजडी उर्फं सौदड म्हणतात.

Orchid Tree  OrchidTree

नवरात्र व कडकणी

नवरात्र व कडकणी : पाण्यात साखर भिजत ठेवावी साखर साखर पाण्यात विरघळ ली की नंतर मोहन गारच पाण्यात तेल घालावे. त्या पाण्यात रवा मैदा भिजेल सैल सर भिजावा.

२. दोन तासा नंतर छान घट्ट भिजला रवा मैदा भिजल्यावर पुरी सारखे लाटुन त्याला कडकणी
साच्याने आकार देऊन तुपात तळावे तळावं कडकणी साचा नसल्यास गोल पुरी करावी व करंजी च्या चमचा साचा घेऊन आकार देतातं.

कडकणी नेहमी करंजी चा आकाराचीच असते म्हणुन तिला नवरात्रात कडकणी नवरात्रातील कडकणी म्हणतात.

कडक असते खूप दिवस राहते टिकते.

DSCF1984

सार्थ महालक्ष्मी स्तोत्रम्

सार्थ
|| महालक्ष्मी स्तोत्रम् ||
श्रीगणेशाय नम: |

रक्ष त्वं देवदेवेशी देवदेस्य वल्लभे |
दारिद्र्यात्त्राहि मां लक्ष्मी कृपां कुरु ममोपरि ||६||

नमस्त्रैलोक्यजननि नमस्त्रैलोक्यपावनि |
ब्रह्मादयो नमंति त्वां जगदानंददायिनि ||७||

विष्णुप्रिये नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं जगध्दिते |
आर्तिहन्त्री नमस्तुभ्यं समृध्दीं कुरु मे सदा ||८||

अब्जवासे नमस्तुभ्यं चपलायै नमो नम: |
चंचलायै नमस्तुभ्यं ललितायै नमो नम: ||९||

नम: प्रद्दुम्नजननि मातस्तुभ्यं नमो नम: |
परिपालय भो मातर्मां तुभ्यं शरणागतम् ||१०||

शरण्ये त्वां प्रपन्नो S स्मि कमले कमलाये |
त्राहि त्राहि महालक्ष्मी परित्राणपरायणे ||११||

अर्थ – देवाम्चा देव अर्थात विष्णूच्या प्रयतमे आणि स्वामिनी हे
लक्ष्मी, मला दारिद्र्यातून तारुन ने आणि माझ्यावर कृपा कर.||६||

हे तिन्ही लोकांच्या माते, तुला नमस्कार. तिन्ही लोक पावन पावन करणाऱ्या
तुला नमस्कार. जगताला आनंद देणाऱ्या तुला ब्रह्मदेवा पासून सर्वच नमन करतात.||७||

विष्णू च्या प्रिये, तुला नमस्कार. हे जगाच्या कल्याण रुपिणी, तुला नमस्कार. संकटांचा
नायनाट करणाऱ्या तुला नमस्कार. तू माझी सदैव भराभराट कर. ||८||

कमळात राहणाऱ्या तुला नमस्कार. हे चपले, तुला पुन्हा पुन्हा नमस्कार.
हे चंचले, तुला नमस्कार आणि हे ललिते, तुला नमस्कार ! नमस्कार ! ||९||

हे प्रद्दुम्नाच्या माते, तुला नमस्कार. हे माउली, तुला वारंवार नमस्कार.
आई , मी तुला शरण आलो आहे; तू माझा सांभाळ कर. ||१०||

कमळात राहणाऱ्या व शरण जाण्यास योग्य अशा कमले मी तुला शरण
आलो आहे. तेव्हा रक्षण करण्यास तत्पर असणाऱ्या महालक्ष्मी तू
माझे रक्षण कर ! रक्षण कर ! ||११||

नवरात्र


नवरात्र मी काढलेल्या रांगोळ्या

अश्विन नवरात्र  DSCF1103बुध बृहस्पति  कमळरांगोळी  DSCF1109

DSCF1884  DSCF1131

DSCF1983

नवरात्रारंभ, घटस्थापना, महालक्ष्मी यंत्र

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर दक्षिणायण शरद ऋतु आश्र्विन शुक्लपक्ष बुधवार २८ सप्टेबंर (९) २०११ तारीख ला नवरात्रारंभ, घटस्थापना सुरु होत आहे.

हा उत्सव विजया दशमी दसरा पर्यंत असतो. दसरा गुरुवार आश्र्विन शुक्लपक्ष १० दशमी ६ अक्टोबर पर्यंत आहे.

समई तेल कापसाची वात नऊ दिवस पुरेल अशी करतात व दिवस रात्र नऊ दिवस समई तेल वात ठेवतात.

कुंडी मध्ये धान्य पेरतात नऊ दिवस साबुदाणा भगर रताळी केळी फळ खातात व उपवास करतात.

देवी दर्शन दसरा पर्यंत करतात दसरा ला शमी दसरा ला देतात. असा नवरात्र उत्सव करतात.

मी महालक्ष्मी यंत्र काढलेले आपणास पाहाण्यास नक्कीच आवडेल.

mahalaxmi yantra  DSCF0468 

DSCF0774  DSCF0773DSCF0772  DSCF0771DSCF0770  DSCF0769DSCF0768  DSCF0767 

मी काढलेले महालक्ष्मी यंत्र

%d bloggers like this: