आपले स्वागत आहे!

Archive for the ‘मी देव जाणला’ Category

पार्लेश्र्वर मंदिर

पार्लेश्र्वर मंदिर :
मुंबई येथे पार्ले येथे शंकर महादेव याची पिंड आहे.
महादेव पिंड च्या मागे पार्वती ची मूर्ती आहे.
मुंबई त पार्ले येथे असल्यामुळे सर्वांना
पार्लेश्र्वर मंदिर म्हणून जास्त माहित माहीत आहे.
यंदा २०१२ साल ला कार्तिकी त्रिपुरी त्रिपुरारी पौर्णिमा
ला १०० वर्ष पूर्ण झाली आहेत. पार्लेश्र्वर मंदिर ला.
पार्लेश्र्वर मंदिर म्हणत असले तरी तेथे महादेव शंकर यांची पिंड आहे.
एकच बहुमानानी शंकर यांची लिहिले लिहिली आहे.
मी हे मंदिर खूप वेळा पाहिलं आहे.

कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा ला यंदा १०० वर्ष पूर्ण झाली आहेत मी त्यावेळेला
पार्लेश्र्वर मंदिर मध्ये हजर होते. मी आमचे भाऊ सौ भावजय भाच्ची माझा मुलगा
व खूप भक्त !हजर असल्यामुळे थाटात १०० शतक महोत्सव साजरा केला गेला आहे.
मातीच्या पणत्या कापूस याची वाट तेल यांनी दिवे लावून पार्लेश्र्वर मंदिर पूर्ण आवर भर भरले होते. काही नीं रांगोळ्या काढल्या.! १०० वर्ष पार्लेश्र्वर मंदिर महादेव पिंड व पार्वती ची मूर्ती असलेले असलेलं पार्लेश्र्वर मंदिर पूर्ण पणत्या च्या दिवे लावून भारलेल दिपोत्सव साजरा केलेला आहे.

२०१२ साल ला केला आहे. व मी ह्या दिपोत्सव ला हजर असल्यामुळे मला स्वत: ला १०० वर्ष पार्लेश्र्वर मंदिर मध्ये हजर असल्याचा उत्सव पहिला मिळाल्या मुळे
मी स्वत : खूप भाग्यवान आहे. अस मला वाटत आहे. !
१०० वर्ष पार्लेश्र्वर मंदिर महादेव यांच पिंड असलेले असलेलं पार्वतीची मूर्ती असलेले.
२०१२ साल ला याला खुप महत्व आहे. हे नक्की चं निश्र्चित ! निश्र्चीत !

 

 

 

 

ॐकार वंदना

ॐ 

ॐकार वंदना 

भद्र भाद्रात प्रथमईशा लवूनी करतो वंदना 

तू शिवांकित गौरीवंदन पूर्ण साकार कामना 

दैवभास्करा कमलावरा मी करितो आवाहना 

रत्नजडीत किरीटधारी पूर्ण तूं चंद्रानना 

सूर्यप्रभा नयाने झरे तोषविसी या मना 

स्वरूप सुंदर कर्ण गजसे कर उदार सज्जना 

ॐकार उदरा मूषकधारा वर्णनी जो माईना

सकल विद्दा जाणिता तो सकल कला संयोजना 

अंतरीचे रूप मोहक सारखे लुचते मना 

तूंच इच्छा तूंच कर्ता तूंच साक्षात विश्वना 

विश्वातले मांगल्य तूंची साकार व्हावे पूजना 

भद्र भाद्रात प्रथम ईशा लवूनी करतो वंदना 

२४.८.९० श्रीकांत चिवटे

सर्व ओळीत शेवटी ना आले आहे.

DSCF2719

मनाचे श्लोक


|| श्रीहरि: ||
मनाचे श्लोक ( मराठी )
|| श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित

क्रियेवीण नानापरी बोलिजेतें |
परी चीत दुश्र्चीत तें लाजवीतें |
मना कल्पना धीट सैराट धावे |
तया मानवा देव कैसेनि पावे || १०४ ||
विवेकें क्रिया आपुली पालटावी |
अती आदरें शुध क्रिया धरावी |
जनीं बोलण्यासारिखें चाल बापा |
मना कल्पना सोडि संसारतापा || १०५ ||
बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा |
विवेकें मना आवरी स्नानभ्रष्टा |
दया सर्व भूतीं जया मानवाला |
सदा प्रेमळु भक्तिभावें निवाला || १०६ ||
मना कोपआरोपणा ते नसावी |
मना बुधि हे साधुसंगीं वसावी |
मना नष्ट चांडाळ तो संग त्यागीं |
मना होइ रे मोक्षभागीं विभागी || १०७ ||
सदा सर्वदा सज्जनाचेनि योगें |
क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे |
क्रियेवीण वाचाळता ते निवासी |
तुटे वाद संवाद तो हीतकारी || १०८ ||
जनीं वाद वेवाद सोडूनि द्दावा |
जनीं सुखसंवाद सूखें करावा |
जगीं तो चि तो शोकसंतापहारी |
तुटे वाद संवाद तो हीतकारी || १०९ ||
तुटे वाद संवाद त्यातें म्हणावें |
विवेकें अहंभाव यातें जिणावें |
अहंतागुणें वाद नाना विकारी |
तुटे वाद संवाद तो हीतकारी || ११० ||
हिताकारणें बोलणें सत्य आहे |
हिताकारणें सर्व शोधूनि पाहें |
हिताकारणें बंड पाषांड वारी |
तुटे वाद संवाद तो हीतकारी || १११ ||

श्री योगेश्वरी देवी – अंबाजोगाई

अंबाजोगाई ह्या महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील गावात एक अतिशय सुंदर असे श्री योगेश्वरी देवीचे मंदिर आहे तेथे सर्व महाराष्ट्रातून मुख्यतः कोकण भागातून खूप लोक येतात. आम्हांस थोड्याच दिवसांपूर्वी येथे जाण्याचा योग आला. छोट्या प्रवेशद्वार मधून आत गेल्यावर एक अतिशय प्रसन्न असा अनुभव येतो. मन देवी कडे आकर्षित होऊन येथेच ध्यानस्थ बसावे असे वाटते. मंदिराचा गाभारा अतिशय प्रसन्न व उबदार वाटतो. देवीचे तेज व देखणी मूर्ती डोळ्यात भरून राहते.

योगेश्वरी मुकुंदराज, संत दासोपंत खोलेश्वर व इतर देवस्थानावरून अंबाजोगाई ची ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात येते. जयवंती नदीच्या तिरावर वसलेल्या योगेश्वरी च्या नावावरून अंबाजोगाई हे नाव रूढ झाल्याचे शिलालेखा वरुन समजते. पूर्ण हेमाडपंथी मंदिर असलेल्या योगेश्वरी मंदिराचा देवी अवतर ण्यात निरनिराळ्या आख्यायिका आहेत लेण्यावर आधारित कथा आहेत. मंदिराच्या वायव्य दिशेस नाडिकाठी शिवालेने आहे दगडाच्या कोरीव सभामंडपात दाराशी दोन दगडी हत्ती आहेत मंडप याच्या मध्यभागी गुहेत शंकराची मूर्ती मंडप याच्या समोर नंदीची मूर्ती आहे. मंडप यातून परळीच्या वैद्दनाथ गेलेले भुयार आहे. आश्विन व मार्गशीष महिनात योगेश्वरी चे वार्षिक उत्सव साजरे केले जातात.

श्री योगेश्वरी देवीची पालखी दर शुक्रवारी मंदिराच्या आवारात फिरते. पालखीतील उत्सव मूर्ती भक्तांना दर्शन देते व या वेळी राजराजेश्वरीचा उदो उदो व त्रिपुरसुंदरीचा असा जयघोष उत्स्फूर्तपणे केला जातो.

काळ्या दगडात बध्लेल्या ह्या मंदिरात अगदी शांततेने बसून  दर्शन घेता येते, आम्हास कोणी हि व्यक्ती मागे लागून देवीचा अभिषेक करा किंवा पैसे द्या वगैरे म्हणून मागे लागले नाहीत. देवीच्या सानिध्ध्यात तिच्या शक्तीचा अतिशय छान अनुभव आला. आपल्यास जमेल तेंव्हा जरूर अंबाजोगाई चे दर्शनास होईन या.

पुष्कर ब्रह्मदेव मंदिर

ॐ 

पुष्कर ब्रह्मदेव मंदिर: राजस्थानातील अजमेर जिल्ह्यात पुष्कर गावात श्री ब्रह्मा चे प्रसिध्द मंदिर आहे. पुष्कर गाव भारतातील एक सर्वात पौराणिक जागां पैकी एक असून ही पुष्कर तळया च्या काठी बसलेले आहे. तेथे लहान मोठी अशी पाचशे मंदिर आहेत पुष्कर येथील ब्रह्मदेवाचं मंदिर हे प्रमुख देवस्थान आहे. हे मंदिर दोन हजार वर्ष जुनं आहे. महर्षी विश्र्वामित्रानं हे बांधलं असल्याचं भाविक मानतात. स्वत: ब्रह्मदेवानं ही जागा निवडली अशी भाविकांची श्रध्दा आहे. या मंदिरात आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या गर्भगृहात फक्त संन्यस्त ब्रह्मचारीच जाऊन पूजाअर्चा करु शकतात.

कार्तिक पौर्णिमे ला तेथे उत्सव साजरा केला जातो. याच काळात कालावधीत कॅमक फेअर’ नावानं ओळखला जाणारा उंटाचा मेळाही तिथं भरतो.

‘ श्री दत्ताचा दरबार ‘

                                                        ॐ

               ‘ श्री दत्ताचा दरबार ‘

                                  दत्ताच्या दरबारी |                              
                                 आनंद दाटे उरी S S S  S
                                            दत्ताच्या दरबारी ||धृ ||
                                दत्ताच्या दरबारी |
                                आनंद दाटे ऊरी S S S S 
                                          दत्ताच्या दरबारी |
                               तिर्थ क्षेत्र  गाणगापुरी |
                               गुप्त वास श्री दत्त करी |
                               श्रध्दा भावे भक्ति जे करी |
                               दत्त दर्शन देई अंतरी S S S S 
                                                    दत्ताच्या दरबारी  |
                              आनंद दाटे उरी S S S S दत्ताच्या दरबारी ||१||
                              भीमामरज्या नदीच्या तिरी |
                              स्नान करुन संगमावरी |
                              करी प्रदक्षिणा औदुंबरावरी |
                              रोग मुक्त तो त्याला करी S S S S
                                                     दत्ताच्या दरबारी |
                              आनंद  दाटे उरी S S S S दत्ताच्या दरबारी ||२||
                              मध्यान्हीला दत्त मंदिरी |
                              पूजा = पाठ , पूर्ती जो करी |
                              भिक्षा – दानाने पुण्यपडे  पदरी
                              इच्छा त्याची तो करी पूरी S S S S
                                                      दत्ताच्या दरबारी |
                              आनंद दाटे उरी S S S S दत्तच्या दरबारी ||३||

                              थाट असे पालखीचा भारी |
                              बसे  ऐटीत गुरुंची स्वारी |
                              भजंनाने स्तुती –  स्तवन जो  करी |
                              दृष्टांताने त्याला अंगकिरी S  S  S  S
                                                             दत्ताच्या दरबारी |
                             आंनद दाटे उरी S S S S  दत्ताच्या दरबारी ||४ ||
                             दत्त भेटीचा ध्यास धरी |
                             मुखें अखंड नाम करी |
                             नित्य जाई जो गाणगापूरी |
                             जन्म –  मरणाची त्याला नसे फेरी S S S S
                                                               दत्ताच्या दरबारी |
                            आनंद दाटे उरी S S S S  दत्ताच्या दरबारी || ५ ||
                                                              दत्ताच्या दरबारी
                                                              दत्ताच्या दरबारी
                                                                          सौ. मेधा शरद देशपांडे
                                                                     ३० -११ – ९१
                                                                             गाणगापूर

DSCF0650

सौ. मेधा शरद देशपांडे

‘श्री घृष्णेश्वर’

आजच्या आधुनिक जगात स्थापत्य कलाशास्त्राचा उत्कृष्ट नमुना ठरावा असे वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग ‘श्री घृष्णेश्वर’ आहे. वेरुळ येथे या ज्योतिर्लिंगाबरोबरच, लक्ष विनायक हे देवस्थान आहे. पर्यटनदृष्ट्या महत्व लाभलेले हे गाव नैसर्गिक वानराई, डोंगराच्या कुशीत वसले आहे. त्यामुळे पर्यटक व भाविकांना निसर्गाचे आल्हाददायक अनुभवावयास मिळते. वेरुळ येथील ‘श्री घृष्णेश्वर’ हे बारावे व शेवटचे ज्योतिर्लिंग असल्याने, या ठिकाणी ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण होते. याबाबत पौराणिक ग्रंथांमध्ये माहिती आढळते, याचा उल्लेख शिवपुराण, स्कंदपुराण रामायण, महाभारत या ग्रंथांमध्ये आढळतो.

श्री घृष्णेश्वर मंदिर लाल दगडात बांधलेले असून, आकर्षक कोरिव काम करण्यात आले आहे. सभामंडप २४ खांबांवर आधारलेला आहे. लिंग पूर्वाभिमुख आहे. या मंदिराचे काम सन ७५० मध्ये राष्ट्रकुल घराण्यातील दन्तदुर्ग यांनी सुरु केले. वेरुळ येथे मंदिर विश्वस्त मंडळातर्फे धर्मशाळेचे काम सुरु आहे. वेरूळ येथे जगप्रसिध्द वेरूळ लेण्या आहेत. ऐतिहासिक स्मारक, शहाजीराजे भोसले यांची गढी आहे. दोन दिवस निवांतपणे दर्शन व पर्यटन करण्यासारखे हे स्थळ आहे.

|| देवस्थान विशेषांक सकाळ || मे २००२

'श्री घृष्णेश्र्वर'     Ghrishneshwar

‘श्री घृष्णेश्वर’

Grhishneshwar_Temple

श्री चक्र

श्री चक्र किंवा श्री यंत्रात एका बिंदू भोवती नऊ त्रिकोण एकमेकात जोडलेले असतात. मधला बिंदू भौतिक जग आणि जे आकारात नाही (अव्यक्त) यांना जोडणारा संगम आहे असे मानतात. हा बिंदू श्री देवी ललीता महात्रिपुरसुन्दरीचा (पार्वती देवीचा एक अवतार) प्रतिक मानतात. चार त्रिकोणांची दिशा वरती असते आणि ते शिव किंवा पौरुष्य दर्शवतात. पाच त्रिकोणांची दिशा खाली असते आणि ते शक्ती किंवा स्त्रीत्व दर्शवतात. नऊ त्रिकोण असल्यामुळे ह्या यंत्राला नवयोनी चक्र असेही म्हणतात.  नऊ जोडणाऱ्या त्रिकोणांच्या आत ४३ छोटे त्रिकोण असतात व हे संपूर्ण विश्वाचे प्रतिक मानतात. तसेच ह्या चक्राला सृष्टीची कोख असेही प्रतीकारूपी मानतात.

मी “श्री चक्र”  देवळातं कोरलेले  पाहिले. मला ते खूप काढावे वाटले. मी पुस्तक आणले. व पाहून काढण्यास शिकले. यावयाला लागले आवड निर्माण झाली. रोज कागदावर काढू लागले. मग एवढे काढले की ओळखीच्या लोकांना दिले नातेवाईक यांना दिले. अधीक महिना आला तेंवा पुजारीबाई यांच्याकडे १० श्री यंत्र कागदावर काढून दिले. सर्वांना देवळातं आवडले. मी मध्येच दर्शानासाठी गेल तर पुजारीबाई म्हणाल्या आज यंत्र आणले नाही? मी परत १०,१० अशी श्री यंत्र दिली. मला अधीक मास! याचं आपण कांहीं केलं याचं मनाला समाधान हलकं वाटलं त्यावेळेला.

sri chakra1 sri chakra3JPGsri chakra2

श्रीदत्त जयंती

दत्त जयंती: माझ्या भावाकडे छान दत्तजयंती चा ऊत्सव करतात. मी बरेचं वेळेला दत्तजयंती म्हणून माझ्या माहेरी भाऊ सौ. भावजय यांच्याकडे गेलेली आहे. तेथे बरेचं पाहुणे जमतात. माझ्या बरोबर कधी कधी आमचा मुलगा प्रणव पण येतो. परदेशातून माझा भाच्चा आकाश पण येत असतो. भावाच्या मुली पण असतात. ईतर नातेवाईकं जमतात. गुरुचरित्र पठन व पूजा सर्व यथासांग घरीच भाऊ करतात. सौ. भावजय व मी ईतर सर्वजण नैवेद्द स्वंयपाक घरीच सार्वजन मिळूण करतात. काय छान प्रसन्न सर्व वाटत. त्या दत्तजयंती दिवशी! नंतर काहीं जण मी प्रणव भाऊ सौ. भावजय भाच्ची दत्त मंदिरात जन्माला  जात. बारशे असल्यासारखे  पैठणी नेसूण मी व सार्वजन जात. संध्याकाळी ६ वाजता दत्त जन्म सोहळा झाल्यावर आह्मी पण प्रसाद म्हणूण मंदिराताच सुकामेवा काजु बदाम दिले. सर्व मानासारखं झाल्या सारखं वाटत. आजही!

मी व ह्यांणी औदुम्बर पाहिले आहे.

नर्सिंहवाडी

नर्सिंहवाडी

खजुराहो

भारतातील त्याचप्रमाणे परादेशातील पर्यतकांचं प्रमुख आकर्षण म्हणजे खजुराहो. ही मंदिरं देवांच्या पारंपरिक मूर्तीबरोबरच शृंगारिक शिल्पांसाठीही प्रसिध्द आहेत. बरीच वर्ष ही मंदिरं तेथील जंगलामध्ये दडलेली होती. परंतु १८३८ साली एका ब्रिटिश सेनाधिकाऱ्याला या मंदिरांचा शोध लागला. मंदिरांचं खजुराहो हे नाव तिथं असलेल्या खाजुरांच्या झाडावरुन पडलेलं आहे. या सर्व   मंदिरांची रचना ‘इन्डो-आर्यन’ शैलीत आहे. हे एक संरक्षित प्रार्थनासस्थळ आहे.

दंतेश्र्वरी मंदिर

५२ शक्तिपीठांपैकी ऐक असलेल्या या पवित्र स्थानी देवीचा दात पडला असल्याची भाविकांची श्रष्दा आहे. म्हणूनच या मंदिरास दंतेश्र्वरी मंदिर म्हणतात. दक्षिणेतील चालुक्य वंशाच्या राजानं  १४ व्या शतकात हे मंदिर बांधलं. ही बस्तरच्या राजांची कुलदेवी मानली जाते. शंकिनी व दंकिनी या दोन पवित्र नद्दांच्या संगमाजवळ हे मंदिर असून भारतातील प्राचीन वास्तूपैकी हे एक आहे. बाहेरच्या जगाला या मंदिराची खूपच कमी माहिती असली तरी हे मंदिर व त्याचं आवार गतवैभाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर तंतेवाडा या तालुक्यात असून बसनं सहज जाता येण्यासाराखं   आहे.

गोंदवले

 ॐ

गोंदवले, छोट खेडे गावं पण महान, मनानं मोठ्ठ गावं आहे. श्रीब्रह्मचैतन्य महाराज गुरुंचं गावं. त्यांचा जन्म माघ शुध्द व्दादशी शके १७६६. पुण्यतीथी मार्गशीर्ष वद्द दशमी १८३५. मार्गशीर्ष महिनात. १० दिवस तेथे उत्सव असतो. आता ही भक्त भावीक जनसमुदाय तेथे येतात. काहीं जण ८/८ दिवस आधीच येतात. राहतात. तेथे नारळाची फ़ूलाचीं दुकान आहेत. जपमाळा त्याचीं पुस्तक फोटो छायाचित्र मिळतात. चहा काहीं खाण्यासाठी खाणावळं आहेत. १२ वाजता आरती झाली कीं जेवढे भावीक भक्त जणं असतील सर्वाणां प्रसाद जेवनं दिले जाते. भक्त भावीक प्रसादांनी दर्शनं छान झालं  म्हणून तृप्त होतात. परत दर्शन घेऊन नमस्कार करतात. आपआपल्या उद्योग, कामाला आपल्या गावीं रवाना होतातं.

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य सदगुरनां. नमस्कार!

गोंदवले येथे गुरूं ब्रह्मचैतन्य महाराजाचं दर्शन घेण्याकरता आम्ही मनातं येईल तेंव्हा जात असतो. एकदा मी व माझी बहीण माझ्या वाढदिवसाला गेलो होतो. मला व माझ्या बहिणीला तेथे दर्शन व प्रसाद मिळाल्या मूळे मला व माझ्या बहिणीला खूपचं मनाला शान्त व समाधान वाटल, त्या वेळेला.

यात्रा

माझ्या आयुष्यभरात ठिकठिकाणच्या तीर्थस्थानी देवदर्शन झाले. मी टिटवालाचा गणपती पाहिला. चिंचवडचा गणपती, सांगलीचा गणपती व रत्नागिरी पालीचा गणपतीही पाहिला. पालीच्या गणपतीला बाहेरुन प्रदक्षिणा घालावी लागते ती मी घातली.

शक्तीपिठातील चार देवी दर्शन केले. तुळजापुर कोल्हापूर शप्तश्रुंग (वणी), माहूर (रेणुका देवी) असें चार देवी दर्शन केले.

नरसोबावाडी, गाणगापूरही झाले. गाणगापूरला तर मी नथ घालून पूरणपोळीची भिक्षावळ दिली.

तुळजापूर देवी दर्शन झाले, त्याच यात्रेत आम्ही (हे, मी व मुले) पंढरपूर येथे विठोबाचे दर्शन घेतले.

औदुंबर येथे १४ जानेवारिला कविता संमेलन असते. ह्यांनी तेथे स्वतः ची कविता वाचनं केले. मी पण त्यांच्या बरोबर औदुंबरला गेले होते. त्यामुळे माझे औदुंबर दर्शन झाले.

गाणगापूरला माझा भाऊ, भावजय, भाच्ची, बहीण व मी सर्वजण होतो.

जेजुरीला माझ्या चुलत भावाची मुंज होती. त्यावेळा मी माझे आई वडील, काका काकू ईतर सर्वजण जेजुरीला गेलो होतो. त्यामुळे माझे जेजुरी दर्शन झाले.

हे सर्व माझ्या कडून घडलं. देवाची कृपा. सर्व देवानां माझां नमस्कार.

श्र्लोक

ॐ 
ॐ भूर्भव स्व: ॐ तस्त्यवितुर्वरेण्यं   भर्गोदेवस्य धीमही |
धियो योन:  प्रचोदयात:


एकदंताय   विघ्महे   वक्रतुण्डाय     धीमहि |
तन्नो   दंति:  प्रचोदयात   ||
 
ॐ 
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटी समप्रभ:|
निर्विग्न्म  कुरुमेदेव सर्व कार्येषु सर्वदा: ।।
 
ॐ 
जयाच्या जनि जन्म नामार्थ झाला |
जयाने सदा वास नमात   केला ||
जयाच्या मुखी सर्वदा नामकिर्ति|
नमस्कार त्या ब्रह्म  चैतन्यमूर्ती ||
 

पुंडलिक वरदा हरी विठ्ठल  |
 

गुरु ब्रह्मा गुरु विंष्णु गुरुदेवो महेश्र्वरा   |
गुरु साक्षात परब्रह्म  तस्मै श्री गुरवे नम:  ||

श्री गणपतिस्तोत्रं

मी रोज पूजेच्या वेळेला गणपती स्तोत्र म्हणते. पुस्तकात पाहून म्हणत असे. म्हणून म्हणून पाठ झाले आहे. तरिपण पुस्तक जवळ ठेवते. तसेच ईतरही श्र्लोक म्हणते. ते पण मला पाठ आहेत. मोठयाने म्हठंळ की घरभर आवाज घुमतो. घरात छान प्रसन्न वातावरण असतं. तसेच मी बाजारात गेले की फ़ुलवाडीतून फ़ुले आणत असते. गुलाब केवडा ईतर काहीं फ़ुल आणत असते.

॥ श्री गणपतिस्तोत्रं ॥
॥ श्री गणेशाय नाम: ॥
॥ नारद उवाच ॥

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ॥
भत्त्कावासं स्मरेन्नित्यमायु: कामार्थसिध्दये ॥१॥

प्रथमं वक्रतुंडं च एकदंतं व्दितियकमं ॥
तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥२॥

लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च ॥
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टममं ॥३॥

नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकमं ॥
एकादशं गणपतिं व्दादशं तु गजाननमं ॥४॥

व्दादशैतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर: ॥
न च विघ्नभयं तस्य सर्वसिध्दीकरं प्रभो ॥५॥

विविद्दार्थी लभते विद्दां धनार्थी लभते धनम् ॥
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थि लभतेगतिमं ॥६॥

जपेद्गणपतिस्तोत्रं षड्र्भिमासै: फलं लभेत् ॥
संवत्सरेण सिध्दि च लभते नात्र संशय: ॥७॥

अष्टभ्यो ब्राःमनेभयश्र्च लिखित्वा य: समर्पयेत
तस्य वि द्द। भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत:॥ ८ ॥

॥ ईति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम श्रीगणपति स्तोत्रं संपुर्णमं ॥

देवदर्शन

“देवदर्शन”
गड चढू ग जेजूरी
आत्मा नांदतो तिथे मल्हारी
नऊ लाख दगड ग पायरीला
बेल भंडारा वाहू चला “१”

दूरुनि पाहिला ग कळस
भक्ता मनीं झालासे उल्हास
येळकोट, येळकोट नामघोष केला
बेल भंडारा वाहू चला “२”

गुळ खोबर ग नैवेद्दाला म्हाळसा बसे शेजारी
भक्त येतील दर्शनाला
बेल भंडारा वाहू चला “३”
– राधाबाई वहिनी

 

 

 

Vahini  

अथर्वशीर्ष‏


ॐ भद्रं  कर्णे भी:   शृ  णुयाम     देवा भर्दं
पश्येमाक्षभिर्यजत्रा:  ।
स्थिरै रंगै स्तुष्टुवांस्तनु भि   र्व्य शे म     देवहितं
यदायु:  ॥
ॐ   स्वस्ति  न इन्दो  वृ ध्दश्र वा:  स्वस्ति   न:  पूषा
विश्र्ववेदा:  ।
स्वस्ति   नस्ता  र्क्ष्यो  s   अरिष्टनेमि:  स्वस्ति  नो
बृहस्पतिर्दधातु   ॥
ॐ   शान्ति:   शान्ति:   शान्ति:     ॥
अथ श्रीगणे शाथर्व शी र्ष व्याख्यास्याम: ।।
ॐ नमस्ते गणपतये ।
त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि ।।
त्वमेव केवलं कर्ता s सि ।।
त्वमेव केवलं धर्ता s सि ।।
त्वमेव केवलं हर्ता s सि ।।
त्वमेव सर्व खल्विदं ब्रह्मासि ।।
त्वं साक्षादात्मा s सि नित्यमं ।।१।।
ऋतं   वच्मि  ।   सत्यं   वच्मि ॥ २ ॥
अव त्वं   मा म् ।  अव  वक्तार म्  ।
अव शरोतार म्  ।  अव दातार म्   ।
अव धातार म् ।    अवानूचानमव   शिष्य म् ।
अव पश्चात्ता त् ।  अव पुरस्ता त्  ।
अवोत्तरात्ता त्  ।  अव दक्षिणात्ता त्  ।
अव चोर्ध्वा त्ता त् ।  अवाधरात्ता त्
सर्वतो  मां   पाहि पाहि   समंता त्   ॥ ३ ॥
त्वं वाड्. मयस्त्वं चिन्मय: ॥
त्वमानंदमयस्त्वं ब्रह्ममय: ॥
त्वं सच्चि दानंदाव्दितियो s सि ॥
त्वं प्रत्यक्ष ब्रह्मासि ॥
त्वं ज्ञानमयो ज्ञानमयो s सि ॥ ४ ॥
सर्व  जगदिदं  त्वत्तो  जायते  ॥
सर्व  जगदिदं   तत्त्वस्तिष्ठति ॥
सर्व   जगदिदं   त्वयि   लयमेष्यति  ॥
सर्व   जगदिदं   त्वयि   प्रत्येति  ॥
त्वं  भूमिरापो s  निलो   नभ:  ॥
त्वं चत्वारि वाकपदानि  ॥ ५ ॥
त्वं  गुणत्रयातीत:  ॥
त्वं  अवस्थात्रायातीत:  ॥
त्वं   देहत्रयातीत:  ||  त्वं   कालत्रयातीत:  ॥
त्वं   मूलाधारस्थतोsसि  नित्यं   ॥
त्वं   शत्कित्रयात्मक:  ॥
त्वं  योगिनो  ध्यायंति  नित्यं   ॥
त्वं  ब्रह्मा  त्वं   विष्णुस्त्वं
रुद्रस्त्वं   इ द्रस्त्वं  अग्निस्त्वं
वायुस्त्वं सूर्यस्त्वं  चंद्रमास्त्वं
ब्रह्मभूर्भुव: स्वरोमं  ॥ ६ ॥
गणादिं   पूर्वमुच्चार्य   वर्णादिं   तदनंतर म्    ॥
अनुस्वार:  परतर:  ॥
अर्धैन्दुलसितं  ॥   तारेण   ऋध्द म्   ॥
एतत्तव  मनुस्वरूप म्   ॥   गकार: पूर्वरूप  म्   ॥
अकारो  मध्यमरूप  म्   ॥
अनुस्वारश्र्चां त्यरुप म्   ॥
बिम्दुरुत्तररुप  म्  ॥   नाद:  संधान म्   ॥
संहिता   संधि: ।   सै षा  गणेशवि   द्या ॥
गणक  ऋ षी:  ॥   नि  चट्  द् गाय  त्री  छंद:  ॥
गणपतिर्देवता   ॥
ॐ   ग गणपतेय  नम:  ॥ ७ ॥


गणपत्यथर्वशीर्ष
एकदन्ताय   विद्महे   वक्रतुण्डाय   धीमहि  ।
तन्नो   दन्ति:   प्रचोदया त्  ॥ ८ ॥


एकदन्तं   चतुर्हस्तं   पाशमंकुशधारि ण  म्   ॥
रदं   च   वरदं   हस्तै   र्बि  भ्रा  णं   मु ष  कध्वज  म्  ॥
रत्त्कं   लंबोदरं   शूर्पकर्णकं    रत्त्कवासस म्   ॥
रत्त्कगंधानुलि प्तांगं   रत्त्कपुष्पै: सुपूजित म्   ॥
भक्ता      नुकंपिनं  देवं   जगत्कारणमच्युत   म्   ॥
आविर्भूतं   च स्ट  ष्टया दौ   प्रकृते:  पुरषात्पर  म्   ॥
एवं   ध्यायति   यो   नित्यं   स   योगी   योगिनां   वर:   ॥९  ॥   

नमो   व्रातपतये   नमो   ग  ण  पतये   नम:
प्रथमपतये    नमस्ते   अस्तु   लंबोदरायै कदं ताय
विघ्ननासिने   शिवसुताय
वरदमूर्तये   नम:  ॥ १० ॥


एतदथर्व  शी र्ष   यो  s  धीते  ॥
स ब्रह्मभूयाय   कल्पते   ॥
स सव्रवुघ्नैर्न    बाध्यते  ॥
स सर्वत:  सुखमेधते   ॥
स  पंचम        हापापात्प्रमुच्यते     ॥
सायमधीयानो   दिवसकृतं   पापं नाशयति   ॥
सायं   प्रात:  प्रयुंजानो s अपापो   भवति ॥
सर्वत्राधियानो s  पविघ्नो  भवति ॥
धर्मार्थकाममोक्षं  च विंदति ॥
एदमथार्वशी     र्षमशी    ष्याय  न   देयं  ॥
यो यदि  मोहाधास्यति    dhya
स  पापीया न्
स पापीया न्  भवति  ॥
सहस्त्रावर्तना  त्  ॥
यं यं काममधीते
तं   तमनेन   साधये  त्   ॥ ११ ॥


अनेन   गणपतीम भि षिं  च ति  ॥
स वाग्मी   भवति  ॥
चतु र्थ्यामनश्रनजपति   स वि द्द।वा न्  भवति
इ त्यथर्व ण वाक्य म्  ॥
ब्रह्माद्द।वर   णं  विद्द। त्  ॥
ण बिभेति   कदाचनेति   ॥ १२ ॥


यो  दूर्वांकु रै र्यजति   ॥
स वै श्रव णोपमो   भवति   ॥
यो लाजैर्यजति   स      यशोवा न्  भवति   ॥
यो मेघावा  न्   भवति   ॥
यो मोदक   सहस्त्रे ण  यजति   स
वां छितफलमवाप्नोति   ॥
य:  साज्यसमिध्दिर्यजति   स   सर्व   लभते   स
सर्व   लभते   ॥ १३ ॥


अष्टो   ब्राह्म  णा न्  सम मया ग्र्गा  हयित्वा
सूर्यवर्चस्वी   भवति   ॥
सूर्यग्रहे   महान द्यां   प्रतिमासं   निधौ   वा   जप्त्वा
सधद मंत्रो   भवति   ॥
महाविघ्ना  त्प्र       त्मुच्यते   ॥
महादोषा  त्प्र मुच्यते    ॥
महापापात्प्रमुच्यते   ॥
स  सर्ववि ध्दवति   ससर्वविध्दवति
य   एवं    वेद   ॥ १४ ॥    इत्युपनिष   त्  ॥


ॐ सहनाववतु   ॥    सहनौ   भुनत्कु    ॥
स ह वी  र्य    करवाव   है   ॥
तेजस्वि  ना व धी  त म स्तु   मा    विव्दि  षाव है   ॥


ॐ भद्रं  कर्णे भी:   शृ  णुयाम     देवा भर्दं
पश्येमाक्षभिर्यजत्रा:  ।
स्थिरै रंगै स्तु ष्टु वां स्तनु भि   र्व्य शे म     देवहितं
यदायु:  ॥
ॐ   स्वस्ति  न इन्दो  वृ ध्दश्र वा:  स्वस्ति   न:  पूषा
विश्र्ववेदा:  ।
स्वस्ति   नस्ता  र्क्ष्यो  s   अरिष्टनेमि:  स्वस्ति  नो
बृहस्पतिर्दधातु   ॥
ॐ   शान्ति:   शान्ति:   शान्ति:     ॥

ॐ इति   सार्थ   श्रीग णप त्य थ र्व शी  र्ष   समाप्त  म्  ॥

%d bloggers like this: