आपले स्वागत आहे!

Archive for the ‘वाचन संस्कृती’ Category

शिक्षक

खरा शिक्षक तो आहे जो तुम्हाला मार्ग दाखवतो परंतु तुम्हाला स्वतंत्र पणे चालू देतो

ज्ञानी शिक्षक तो आहे जो तुम्हाला दरवाजा दाखवितो परंतु त्याच्या मागे काय आहे ह्याचा विचार तुम्हाला करू देतो 

खरा शिक्षक तो आहे जो तुम्हाला पुढाकार घ्यायला शिकवतो, मागे मागे चालायला नाही 

अंतर्ज्ञानी शिक्षक तो आहे जो स्वतः हि विध्यार्थी असतो 

सत्य शिक्षक तो आहे जो जाणतो कि विध्यार्त्याला आता मला सोडून जा असे केंव्हा सांगावे 

दयाळू शिक्षक तो आहे जो उदाहरणाने शिकवतो 

धैर्यवान शिक्षक तो आहे जो आपल्या ज्ञाना पलीकडे जायचे धैर्य दाखवतो  

सर्वात चांगला शिक्षक तो आहे जो तुमच्यातील शिक्षकाचा विकास करवतो कि तुम्ही खरे, ज्ञानी, अंतर्ज्ञानी, सत्य, दयाळू आणि धैर्यवान शिक्षक बनावे. 

श्रीदत्त दर्शन २३


श्रीदत्त दर्शन
नरसिंह सरस्वतीं च्या अवतार चरित्राचा प्रभाव गेल्या
पाच शतकांवर उमटला आहे.औदुंबर,नरसोबा ची वाडी आणि
गाणगापूर ही त्यांच्या निवासमुळे उदयास आलेली दत्तक्षेत्रे म्हणजे साधनेच्या
क्षेत्रांतील जागत्या ज्योती आहेत.
दत्तात्रेय बालब्रह्मचारी, अनिकेत ( म्हणजे कोठेच कायमचे वास्तव्य न करणारे )
अयाचित ( म्हणजे याचना न करता मिळेल तेवढयावर संतोषाने राहणारे ) व
परिव्राजक ( म्हणजे संन्यासी ) असा आहेत. ‘ योगीश्र्वर ‘, ‘ अवधूत ‘ असेही त्यांचे
वर्णन आढळते .
दत्तात्रेयांचे अवतार चिरंतन, चिरंजीव असा आहे.राम व कृष्ण या अवतारां प्रमाणे
दत्तत्रेयांचा अवतार केवळ दुस्कृत्यांचा विनाश करण्यासाठी नसुन अज्ञानरुपी अंध:काराचा
नाश करण्यासाठी आहे. या अवताराची सुजाण जाणीव श्रीधर स्वामींच्या
‘ अवतारही उदंड होती । सर्वेचि मागुती विलया जाती ।
तैशी नव्हे श्रीदत्तात्रेयमूर्ति । नाश कल्पान्ती असेना ।। ”
( रामविजय -१३ -२१ )
या चरणात प्रभावीपणे प्रगट झाली आहे. किंबुहुना दत्तात्रेयांच्या
अवताराअचा प्रमुख उद्देश अखंड ज्ञानदानाने प्रबोधन हाच आहे.
दत्तत्रेयांचा अवतार म्हणजे साक्षात परब्रह्ममूर्ती सद् गुरुचा अवतार.
शांडिल्योपानिषदांत यांना ‘ विश्र्वगुरू ‘ म्हटले आहे. दत्तत्रेयंच्या
सगुणमूर्ती उजवे अंग गुरुरुप असून डावे मायाधिपती ईश्र्वररूप आहे.
दत्तात्रेय हे ‘ गुरुतत्वाचे प्रतीक ‘, ‘ गुरुतत्वाचा अंतिम आदर्श ‘ आहेत
आणि म्हनुणच अन्य संप्रदाय ही त्यांना आद्दगुरु समजून अग्रपूजेचा
मान देत असल्यास नवल ते काय !
गुरुदेव दत्तत्रेयांत ‘ ईश्र्वर ‘ आणि ‘ गुरु ‘ अशी दोन्ही रूपे सामावलेली
असल्यामुळे उपासकांना श्रीगुरु व ईश्र्वर या दोघांची उपासना एकाच
वेळी घडते व तिचे दुहेरी फल ही मिळते, हा या अवताराचा प्रमुख विशेष
होय आणि यावरुन त्यांच्या ‘ श्रीगुरुदेवदत्त ‘ हा जयघोष अगदी
अर्थपूर्ण वाटतो.
दत्तात्रेय नुसतेच गुरुदेव नसून ते ‘ अवधूतचिंतन गुरुदेव दत्त ‘
या स्वरुपात आहेत. अवधूत मूर्ती ची पूजनियता पुढील ओविवरुण दिसून येते.
” सकळ ब्रह्मांडींची दैवते धावती | अवधूतमूर्ती पहावया || ”
‘ अवधूत ‘ हा शब्द अध्यात्ममार्गात परमोत्कर्षाचा वाचक आहे.
अवधूत म्हणजे मूर्तिमंत ज्ञानवैराग्य ” ते चालते ज्ञानाचे बिंब.”
जीवन्मुक्त.

DSCF3533 DSCF2852

DSCF3507 DSCF3513

ॐकार वंदना

ॐ 

ॐकार वंदना 

भद्र भाद्रात प्रथमईशा लवूनी करतो वंदना 

तू शिवांकित गौरीवंदन पूर्ण साकार कामना 

दैवभास्करा कमलावरा मी करितो आवाहना 

रत्नजडीत किरीटधारी पूर्ण तूं चंद्रानना 

सूर्यप्रभा नयाने झरे तोषविसी या मना 

स्वरूप सुंदर कर्ण गजसे कर उदार सज्जना 

ॐकार उदरा मूषकधारा वर्णनी जो माईना

सकल विद्दा जाणिता तो सकल कला संयोजना 

अंतरीचे रूप मोहक सारखे लुचते मना 

तूंच इच्छा तूंच कर्ता तूंच साक्षात विश्वना 

विश्वातले मांगल्य तूंची साकार व्हावे पूजना 

भद्र भाद्रात प्रथम ईशा लवूनी करतो वंदना 

२४.८.९० श्रीकांत चिवटे

सर्व ओळीत शेवटी ना आले आहे.

DSCF2719

अधिकमास

अधिकमास

अधिक असे पुण्याचा | मंत्र दिधे कल्याणाचा | पूज्यभाव हो तयाचा |
आचाराते लाभो गती | ॐ विष्णवे नम: | ॐ पुरुषोत्तमाय नम : |
ॐ श्रीकृष्णाय नम : | ॐ दामोदराय नम : |ॐ मुरलीधराय नम : |
|| ॐ शांति : शांति : शांति : ||

आरती श्रीकृष्णाची
येउनि मानवदेहा भुललो संसारी | धन सुत जाया माझी म्हणुनिया सारीं ||
नाही स्मरलो तुजला क्षणही कंसारी | वारी भवदु:खाते शरणागत तारी ||१||
जय देव जय देव जय राधारमणा | चकवी लक्ष योनी चौऱ्यांशी भ्रमणा ||धृ o ||
जाणत जाणत आपुले केले अनहीत | स्वेच्छे रतलो विषयी त्यजुनीया विहित ||
गेला जन्म सज्जनसंगा विरहित | त्वत्पदकमलीं मिनलें नाही हे चित्त ||जय o ||२||
केसे अगणित पातक आतां तुज पाहीं || आलों शरणागत रक्षीं लवलाही ||
करुणादृष्टी पूर्ण दीनाकडे पाही | विभवी कृष्ण दास मनिं येउनि राहीं ||जय o ||३||

अधिकमास

अधिकमासाचा इतर काही कथा

अधिकमासाच्या इतर कथा आहेत.पोथी-पुराणांत तया आढळतात.अधिकमासाचं महत्व त्यातही विशद केलेले आहे.अधिकमासाचे प्रिय वस्तूचा वा पदार्थाचा त्याग करावा. पुरुषोत्तम (श्रीकृष्ण)याची भक्ती करावी.त्यानं मनास सुख,शांती व समाधान लाभते.सर्वांचं
कल्याण होत.

इतर कथांमधून ही अशाच स्वरूपाचा उल्लेख आढळतो.’ गुणसुंदरी ‘,’द्रौपदी’ चंद्रकलाराणी इत्यादी च्या कथा या दीपपूजेच्या नेम,अधिकमास याचं महत्व विशद करतात.स्मिताविलासिनी इंद्रलोकीची अप्सरा, दुर्वास ऋषीच्या गळ्यात तिनं हार घातला.दुर्वासांना क्रोध आला. त्यांच्या शापानं अप्सरा पिशाच बनली.एका तपस्विनी नं तिला पुण्य दिलं.त्यामुळे तिचा उध्दार झाला. दुसऱ्यांच्या बागेतील फळं चोरून खाल्ली ‘म्हणून कदर्य नावाचा गृहस्थ पुढील जन्मी वानर बनला. तळ्याकाठच्या झाडावर वानर उद्या घेत होतं ते तळ्यात पडले,अधिकमास यात स्नानयोग घडला. त्या पुण्याई नं त्यानं स्वर्गलोक गाठला.रूपवती व मुग्धा सख्ख्या दोन जावा.अवंतपुरच्या त्या रहिवासी ! एकीला व्रताचरण केल्यानं मुरलीधर प्रसन्न झाले.तर पाहिलीस पश्चाताप झाला.काहीतरी पुण्यकर्म व्हावं ‘ अधिकमास ‘ याचं व्रत करावं व आपलं कल्याण साधावं.

ही अधिकमासाची साठा उत्तरांची कहाणी पाचां उत्तरी सुफल संपूर्ण |

धोंडामास

द्रौपदीचा अपराध : पांडवांना द्दूत खेळण्याचा छंद होता.द्दूत म्हणजे जुगार,सट्टा !
द्दूतात पांडवांचा पराजय झाला. त्यांनी त्यांचे राज्य पणाला लावले.नंतर त्यांनी स्वत:ला व द्रौपदी ला पणास लावले.त्यातही त्यांचा पराजय झाला. त्यांच्या नशिबी १२ वर्ष वनवास व एक वर्षाचा अज्ञातवास आला.वनवासात असताना पांडवांस विविध क्लेशांस व व्यथांस तोंड द्दावे लागले;त्यामुळे त्यांनी श्रीकृष्णा चा धावा केला. पांडव म्हणाले,”भगवंता ! तुम्ही द्रौपदी चे बंधू आणि आमचे पाठीराखे ! आमचे हाल तुम्हाला बघावतात तरी कसे ?”

भ.श्रीकृष्ण म्हणाले. ” त्याला मी काय करणार ? ही सारी तुमच्या कर्माची फळं ! ती तुम्हाला भोगावीच लागणार |
द्दूतक्रीडेचा छंद तुम्हास भोवला.तुमच्या नशिबी अज्ञातवास आला.तुमच्याबरोबर तिलादेखील हे हाल भोगावेच लागणार ! पांडव आश्चर्याने म्हणाले,” ते कसे काय ?”

भ.श्रीकृष्ण म्हणाले,द्रौपदीचा अपराध पण तसाच आहे;पूर्वजन्माची मेधावी ब्राह्मणाची ती कन्या | आई बालपणी वारली. वडिलांनी तिंच लालन-पालन केलं. तिचं लग्न होण्यापूर्वीच त्यांना पण मरण आलं; मग मेधावतीनं शंकराची आराधना केली. ” मेधावातीची तपश्चर्या चालूच होती. तेवढ्यात नारदमुनी तेथे आले.ते म्हणाले,|”मुली, तू अधिकमास याचं व्रत कर. मुरलीधर ची पूजा कर.तुला उत्तम वर लाभेल.”

मेधावती म्हणाली, ” मी शंकरभक्त आहे.त्यांची मी आराधना करते.प्रत्यक्ष परमेश्वरा पुढे त्या मुरलीधराची काय कथा ? तेवढ्यात दुर्वास मुनी आले.त्यांना मेधावती च्या संभाषण याचा राग आला.ते म्हणाले,” मुली,तू पुरुषोत्तम याला कमी लेखतेस ? अधिकमास याचं व्रत तुला तुच्छ वाटतं. याचा परिणाम तुला भोगावा लागेल.पुढील जन्मी तुझे हाल होतील.ते तुला भोगावे लागतील.हा माझा तुला शाप आहे.”

” वरील शाप देऊन दुर्वास निघून गेले.मेधावतीला त्याचा पश्चात्ताप झाला.मेधावती पुढील जन्मी द्रौपदी बनली.आता ती फळं भोगीत आहे;पूर्वजन्माची ! मुनीने दिलेल्या शापाची ! !” पांडव म्हणाले, ” ही कथा झाली;पण आमच्या नशिबी आलेल्या व्यथांचं काय ? ”

श्रीकृष्णांनी मग पांडव यांची समजूत घातली.अधिकमास याचं व्रत पांडव यांना करण्यास सांगितलं. पांडव यांनी ते व्रत केले.पुण्यकर्मं केली.त्यांना त्यांचं राज्य परत मिळालं. ते सुखी-समाधानी झाले.

कहाणी

व्यास : लोक पुरुषोत्तमाची भक्ती करायला लागले.त्यांची पापं नष्ट झाली.त्यांचं जीवन फुललं.त्यांच्या इच्छा फळाला आल्या.असतो अधिकमास पुण्यमास ठरला. आता त्याची कहाणी ऐकुया.

गुणसुंदरीचं भाग्य:

दृढधन्वा नावाचा राजा होता.हैहय हे त्याचं राज्य. त्याला एक राणी होती.तिचं नाव गुणसुंदरी. दोघही गुणवान, रूपवान होते.राज्यात सुख-शांती-समृद्धी होती.अशी समृद्धी पण विनाशास कारणीभूत ठरते. राजाला नेहमीच शंका यायची.एवढं सुख आपल्याला कसं बरं मिळालं ? जगात दु:खी लोक आहेत.त्यांना वेगवेगळ्या व्यथा आहेत.आज आपण सुखी आहोत.कदाचित उद्दा दु:खी असू;असं तर होणार नाही ना ?

वरील विचार मनात यायचे.राजा दु:खी व्हायचा.त्याचं मन त्याला खायचं. राणी त्याची समजूत घालायची, म्हणायची.” आतातरी आपण सुखी आहोत ना ? उद्दाचा विचार कशाला ? मात्र राजाचं विचारचक्र चालूच असायचं. तो आपल्याच मनाशी स्वप्न बघायचा ! आपल्याच वाट्याला एवढं सुख का यावं ? लोक तर भयंकर दु:खी आहेत. त्यांना खायला नाही.प्यायला नाही,मग आपणच सुखी कसे ?

राजाला वाटलं, आपण आज शिकारीला जावं. बंदूक घेतली.राजा घोड्यावर बसला.पुढे जंगलात जाऊ लागला. तो बराच दमला.त्याला पुढे तलाव दिसला.तलावात स्वच्छ पाणी होतं.आजूबाजूला झाडं होती. झाडांवर वेगवेगळे पक्षी होते.त्यांचं गुंजन सुरु होतं.राजा घोड्यावरून उतरला.तलावाच्या काठी बसला.  राजाचं विचारचक्र चालूच होतं.तेवढ्यात झाडांवरील पोपट बोलू लागला.
“राजा,कसलं तुमचं वैभव ! हे वैभव इंद्रियाचं आहे.त्याचं हे सुख आहे.ते सुख आत्म्याचं नाही. आत्म्याचं सुख वेगळं असतं.ते सुख मनाला शांती देतं.मनाची शांती मोठी असते.दान करा,धर्म करा.

त्यानं मनाला शांती मिळेल.तुम्हाला सुख लाभेल,परमार्थ घडेल,पुण्य घडेल.पुढील जन्मी ते तुम्हाला उपयोगी येईल.” राजा खुष झाला.पोपटाचा उपदेश त्याला पटला.त्याचं मन सुखावलं.पोपट उडून गेला.राजा घोड्यावर बसला. राजधानीत आला.त्यानं अंत:पूर गाठले.राणीची भेट घेतली.एकांतात तिला हकीगत सांगितली. राणीलाही पोपटाचा उपदेश पटला. ” राणी, हे आपलं भाग्याच  पोपटानं खरं सांगितलं. आपण चैन करतो,चैन म्हणजे मनाची शांती नाही.

ते खरं सुख नाही.पोपट शहाणा आहे.त्यानं आपल्याला उपदेश केला.तो का बरं केला असेल ? ” राणीचे विचार सुरु झाले.राजासारखीच ती विचार करू लागली. दिवसामागून दिवस गेले.बराच काळ लोटला.एक दिवस चमत्कार घडला. राजाचे विचार सुरुच होते.तो सिंहासनावर बसला होता.अचानक वाल्मीकी ऋषी आले. पहारेकऱ्यानं वर्दी दिली.राजानं त्यांना राजवाड्यात आणलं, त्यांचं स्वागत केलं.

राणीलाही आनंद झाला,तीही सोबत येऊन बसली.तिचे विचारचक्र चालू झाले. अचानक ती वाल्मीकींना म्हणाली, राणी : ” एवढ वैभव कसं बरं मिळालं असेल ? ते आम्हाला खुपतं.त्याचं दु:ख आम्हाला सलतं, पोपटानं ते राजाला सांगितलं.राजानं ते मला सांगितलं.

वाल्मीकी ऋषी : राणी,जरा शांत व्हा. विचार करायला वेळ द्दा. राजा-राणी ऋषीं पुढं बसली. मुनींनी ध्यानधारणा केली.तिचा त्याला उबग आला.वाल्मीकी ऋषी पुढे बोलू लागले. ” राजन, तुमच्या पुण्याईचं हे फळ आहे.पूर्वपुण्याचं हे प्रतीक आहे.पूर्वण्याईचं फळ फार मोठं असतं.”

मुनींनी त्याबात एक कहाणी सांगितली – प्राचीन काळी द्रविड देशात ताम्रपर्णी नावाची नदी वाहत होती.त्या नदीकाठी एक आश्रम होता. तिथले तुम्ही मूळचे रहिवासी. तेव्हा तुमचं नाव होतं,सुदेव व पत्नीचं गौतमी.दोघेही आनंदात रहात होता. बरेच दिवस झाले. पोटी संतान नव्हतं. म्हणून तुम्ही दु:खी झालात. मग तुम्ही विष्णूची आराधना केली. तेव्हा विष्णुदेव प्रसन्न झाले.” पुत्र संतान सोडून इतर काहीही मागा.”  असं ते म्हणाले.तेव्हा गरुडानं मध्यस्थी केली.गरुड म्हणाला,” देवा ! भक्ताची इच्छा पुरी करा. त्यातच तुमचा मोठेपणा आहे.तुमचं महत्व आहे.त्याना तुम्ही पुत्रसंतान द्दायला हवं .”

भगवान ‘ तथास्तु ‘ म्हणाले, ” पुत्रसुख अन् पुत्रशोकदेखील ! ”

कहाणी

व्यास : लोक पुरुषोत्तमाची भक्ती करायला लागले.त्यांची पापं नष्ट झाली. त्यांचं जीवन फुललं.त्यांच्या इच्छा फळाला आल्या.असतो अधिकमास पुण्यमास ठरला. आता त्याची कहाणी ऐकुया.

गुणसुंदरीचं भाग्य

दृढधन्वा नावाचा राजा होता.हैहय हे त्याचं राज्य. त्याला एक राणी होती.तिचं नाव गुणसुंदरी. दोघही गुणवान, रूपवान होते.राज्यात सुख-शांती-समृद्धी होती.अशी समृद्धी पण विनाशास कारणीभूत ठरते. राजाला नेहमीच शंका यायची.एवढं सुख आपल्याला कसं बरं मिळालं ? जगात दु:खी लोक आहेत.त्यांना  वेगवेगळ्या व्यथा आहेत.आज आपण सुखी आहोत.कदाचित उद्दा दु:खी असू;असं तर होणार नाही ना ?

वरील विचार मनात यायचे.राजा दु:खी व्हायचा.त्याचं मन त्याला खायचं. राणी त्याची समजूत घालायची, म्हणायची.” आतातरी आपण सुखी आहोत ना ? उद्दाचा विचार कशाला ? मात्र राजाचं विचारचक्र चालूच असायचं. तो आपल्याच मनाशी स्वप्न बघायचा ! आपल्याच वाट्याला एवढं सुख का यावं ? लोक तर भयंकर दु:खी आहेत. त्यांना खायला नाही.प्यायला नाही,मग आपणच सुखी कसे ?

राजाला वाटलं, आपण आज शिकारीला जावं. बंदूक घेतली.राजा घोड्यावर बसला.पुढे जंगलात जाऊ लागला. तो बराच दमला.त्याला पुढे तलाव दिसला.तलावात स्वच्छ पाणी होतं.आजूबाजूला झाडं होती. झाडांवर वेगवेगळे पक्षी होते.त्यांचं गुंजन सुरु होतं.राजा घोड्यावरून उतरला.तलावाच्या काठी बसला. राजाचं विचारचक्र चालूच होतं.तेवढ्यात झाडांवरील पोपट बोलू लागला.
“राजा,कसलं तुमचं वैभव ! हे वैभव इंद्रियाचं आहे.त्याचं हे सुख आहे.ते सुख आत्म्याचं नाही. आत्म्याचं सुख वेगळं असतं.ते सुख मनाला शांती देतं.मनाची शांती मोठी असते.दान करा,धर्म करा. त्यानं मनाला शांती मिळेल.तुम्हाला सुख लाभेल,परमार्थ घडेल,पुण्य घडेल.पुढील जन्मी ते तुम्हाला उपयोगी येईल.”

राजा खुष झाला.पोपटाचा उपदेश त्याला पटला.त्याचं मन सुखावलं.पोपट उडून गेला.राजा घोड्यावर बसला. राजधानीत आला.त्यानं अंत:पूर गाठले.राणीची भेट घेतली.एकांतात तिला हकीगत सांगितली. राणीलाही पोपटाचा उपदेश पटला. ” राणी, हे आपलं भाग्याच ! पोपटानं खरं सांगितलं. आपण चैन करतो,चैन म्हणजे मनाची शांती नाही. ते खरं सुख नाही.पोपट शहाणा आहे.त्यानं आपल्याला उपदेश केला.तो का बरं केला असेल ? ”

राणीचे विचार सुरु झाले.राजासारखीच ती विचार करू लागली. दिवसामागून दिवस गेले.बराच काळ लोटला.एक दिवस चमत्कार घडला. राजाचे विचार सुरुच होते.तो सिंहासनावर बसला होता.अचानक वाल्मीकी ऋषी आले. पहारेकऱ्यानं वर्दी दिली.राजानं त्यांना राजवाड्यात आणलं, त्यांचं स्वागत केलं. राणीलाही आनंद झाला,तीही सोबत येऊन बसली.तिचे विचारचक्र चालू झाले.
अचानक ती वाल्मीकींना म्हणाली, राणी : ” एवढा वैभव कसं बरं मिळालं असेल ? ते आम्हाला खुपतं.त्याचं दु:ख आम्हाला
सलतं, पोपटानं ते राजाला सांगितलं.राजानं ते मला सांगितलं.

वाल्मीकी ऋषी : राणी,जरा शांत व्हा. विचार करायला वेळ द्दा. राजा-राणी ऋषीं पुढं बसली. मुनींनी ध्यानधारणा केली.तिचा त्याला उबग आला.वाल्मीकी ऋषी पुढे बोलू लागले. ” राजन, तुमच्या पुण्याईचं हे फळ आहे.पूर्वपुण्याचं हे प्रतीक आहे.पूर्वण्याईचं फळ फार मोठं असतं.”

मुनींनी त्याबात एक कहाणी सांगितली –
प्राचीन काळी द्रविड देशात ताम्रपर्णी नावाची नदी वाहत होती.त्या नदीकाठी एक आश्रम होता. तिथले तुम्ही मूळचे रहिवासी. तेव्हा तुमचं नाव होतं,सुदेव व पत्नीचं गौतमी.दोघेही आनंदात रहात होता. बरेच दिवस झाले.पोटी संतान नव्हतं. म्हणून तुम्ही दु:खी झालात. मग तुम्ही विष्णूची आराधना केली. तेव्हा विष्णुदेव प्रसन्न झाले.” पुत्र संतान सोडून इतर काहीही मागा.” असं ते म्हणाले.तेव्हा गरुडानं मध्यस्थी केली.गरुड म्हणाला,” देवा ! भक्ताची इच्छा पुरी करा. त्यातच तुमचा मोठेपणा आहे.तुमचं महत्व आहे.त्याना तुम्ही पुत्रसंतान द्दायला हवं .”

भगवान ‘ तथास्तु ‘ म्हणाले, ” पुत्रसुख अन् पुत्रशोकदेखील ! ” काही दिवसांनी ‘ गौतमीला ‘ पुत्ररत्न झाले.त्याचं नाव शुकदेव ठेवलं.शुकदेव हुशार अन् सुंदर सद्गुणी होता.दिवसामागून दिवस गेले.शुकदेव मोथा झाला. खूप शिकला. एके दिवशी फिरत-फिरत तो नदीवर आला.नदीला भरपूर पाणी होतं.त्याला पोहायची इच्छा झाली.तो पाण्यात शिरला.पोहू लागला;पण कर्म आड आलं.एके ठिकाणी खूप खोल पाणी होतं.पोहत पोहत तो तिथं आला.पाण्यात बुडाला अन् मरण पावला. गावात वार्ता पसरली.गौतमी-शुकदेव नदीतीरावर आले.पुत्र मेलेला दिसला.बाळाला त्यांनी मांडीवर घेतलं. ते शोक करीत बसले.पावसास सुरुवात झाली.त्यांच्या उपवास होता.

अधिकमासाचं व्रत त्यांनी केलं होतं.पुरुषोत्तमाची भक्ती घडली.ते पुण्यकर्म होतं. पुरुषोत्तम प्रसन्न झाले.त्यांनी शुकदेव यास जीवदान दिलं.शुकदेव-गौतमीस वर दिला. पुढील जन्मी तुम्ही राजा-राणी व्हाल !

अशी तुमची पुण्याई ! पूर्वजन्मी तूनही पुण्य केलं. त्याचं तुम्हाला फळ मिळालं.मी तुमचा पूर्वजन्मीचा पुत्र ! माझं नाव शुकदेव | ” पोपट म्हाणाला, अधिक महिना आहे. तुम्ही आता स्नान-दान करा. पुण्य करा.तुम्हालाही सुख-शांती व समाधान लाभेल ! ”

कहाणी अधिकमासाची

कहाणी अधिकमासाची

ऐका कहाणी अधिकमासाची. आहे ही प्राचीन काळाची.आहे तिची घडण चंद्रसूर्याची. मानवंदना आहे देवदेवतांची | ही कहाणी कोणी कोणाला सांगितली,ते चित्त देऊन ऐका.

एकदा सर्व ऋषी-मुनी तपोवनात एकत्र बसलेले होते. तेव्हा व्यास महर्षीचे आगमन झाले.ते सर्व ऋषीमुनींना संबोधून म्हणाले,”आपण सर्वजण धर्माचे पालन करतोच.आपल्याला या वर्षात अधिकमासाचे आचरण करावयाचे आहे.”
ऋषींनी : “हा कोणता अधिकमास ? ”
व्यास : अधिकमास म्हणजे जास्तीचा महिना. वर्षाचे एकूण महिने बारा.तेरावा म्हणजे अधिकमास.
ऋषी : तो कशासाठी?
व्यास : चंद्रसूर्याच्या गतीमुळे दर वर्षी दहा दिवसांचा फरक पडतो.तीन वर्षांनंतर असा एकूण एक महिनाचा
फरक पडतो.एक महिना अधिक धरून कालगणनेचा मेळ बसविला आहे.हाच ‘अधिकमास.’याला ‘पुरुषोत्तम मास ‘
असेही म्हणतात.

आता सांगतो,तेराव्या महिना ची कहाणी.नीट ठेवावी ध्यानी.त्याला मान द्दावा सर्वांनी. सांगितली मला नारदमुनीं नी !
सारेजण शांत झाले.मन लावून ऐकू लागले.व्यास महर्षीं बोलू लागले –

नारदमुनी भूतलावर फिरत होते.जगातील सुखदु:खाचा आढावा घेत होते.मृत्युलोकातील माणसं नाना प्रकारची
सुखदु:ख भोगत आहेत ; पण त्यात सुखी लोकांचं प्रमाण फार कमी आहे.त्याचं काय बरं कारण असावं ?
नारदमुनी विचार करू लागले.विचार करीत करीत ते वैकुंठाला पोहोचले.भगवान विष्णू ध्यानस्थ बसले होते.

‘नारायण S नारायण S ‘ असा बराच जयघोष नारदांनी केला.नंतर नारदमुनी श्री विष्णूस म्हणाले,
“तुम्ही सर्वश्रेष्ठ देव आहात. पृथ्वीवरील लोकांचे लालान-पालनकर्ते आहात.मग तुम्ही कुणाची ”
आराधना करता,आणि ती कशासाठी करता,हे मला सांगू शकाल का ?”
विष्णू : ” नारदमुनी, तुम्ही म्हणता ते खरं आहे.तुम्ही आता बघून आलात. लोक पापं करताहेत.
त्यात पुण्याचं प्रमाण कमी आहे;पण त्यांनी केलेल्या पापं चं काय ?
त्यांची तर भरपाई झाली पाहिजे.
नारद : ती भरपाई कशी होईल ?
विष्णू : होईल, ती भरपाई पण होऊ शकेल.ती भरपाई करणारा अधिकमास आता येणार आहे.
नारद : अधिकमास ?
विष्णू : हो.पापांची भरपाई करणारा अधिकमास. या मासाचं आराध्य दैवत श्री पुरुषोत्तम आहेत. पुरुषोत्तम याची भक्ती करण्यानं सर्वांना सुख लाभेल आणि तो सुखाचा मार्ग मी दाखवीन. चंद्रसूर्य यांच्या गतीत फरक पडतो.त्याचा मेळ हा महिना घालतो.दर तीन वर्षांनी तो येतो.महिन्यात सूर्य संक्रमण नसते,म्हणून या महिन्यास ‘मलमास’ ही म्हणतात.या महिन्यात लग्नादी मंगल कार्ये करीत नाहीत. अधिकमास दु:खी झाला. आपली गाऱ्हाणी तो सांगू लागला. सर्व जण माझा तिरस्कार करतात. हौस नाही.मौज-मजा नाही.मला वाईट वाटले.मी ज्योतीत रत्नजडित सिंहासन आहे.त्या सिंहासन यावर पुरुषोत्तम (मुरलीधर) बसले आहेत,त्या त्या पुरुषोत्तमा चं दर्शन विष्णूं नी मालामासाला घडविलं.दर्शनान चमत्कार केला.त्या अधिकमासाला दिव्यरूप आलं. लोखंड याच सोनं झालं.
नारदमुनी : म्हणजे, मलमास याचं महत्व वाढलं म्हणायचं.
व्यास : हो.त्या महिन्यात पुण्यकर्म वाढलं.दीपदान, व्रत,नियम,उपवास इत्यादी.
नारदमुनी : त्या महिन्यामुळं मग काय झालं ?
व्यास :लोक पुरुषोत्तम याची (मुरलीधर )भक्ती करायला लागले.त्यांची पापं नष्ट झाली.
त्यांचं जीवन फुललं. त्यांच्या इच्छा फळाला आल्या.असा तो अधिकमास पुण्यंमास ठरला.

अधिक महिना

* चैत्र महिना पासून आश्विन महिना पर्यंत कोनताही एक आणि क्वचित फाल्गुन हे महिने अधिक येतात.
* पौष आणि माघ हे महिने कधीच अधिक येत नाहीत. मात्र मार्गशीर्ष, पौष आणि माघ हेच महिने काही  ( १२२, १४१, १९ अशा ) वर्षांनी क्षयमास होतात.
* एकदा आलेला अधिक महिना १९ वर्षांनी पुन: तोच अधिक येतो.
* क्षयमास आलेल्या वर्षात अधिक महिने २ येतात. क्षयमासापूर्वीचा अधिक हा सर्व कामांकरिता निषिध्द मानला जातो.
* पूर्वीच्या संवत्सरात ज्या महिन्यात कृष्ण पंचमीला सूर्यसंक्रांत असेल, तोच महिना पुढील वर्षी अधिक महिना येतो.

अधिक महिना मध्ये जावाई ला चांदीचे ताट व २१ अनारसे देतात.लेकीला हळद कुंकू साडी चोळी जोडवी देतात. सर्व सवाष्ण बाई जोडवी अधिक महिना त बदलतात.काचेच्या बांगड्या बदलतात.घालतात.गुरुजींना दिवा याचे वाण देतात.जेवण देतात.स्नान नदी समुद्र ह्या ठिकाणी करतात. गार पाणी याने स्नान करतात.नामस्मरण कुलदेवतेचे नामस्मरण करतात.नामस्मरण याने पुण्यलाभ होतो.देवदर्शन करतात.देवाचे चिंतन करतात.व्यथाचे निवारण होते.पोथी-वाचन करतात.ब्राह्मणाला पोथी दान करतात.

faral2

श्री अधिकमास महात्म्य

|| श्री अधिकमास महात्म्य ||( व्रत व उपासना )

अधिकमास म्हणजे जास्तीचा महिना. दर तीन वर्षांनी येणाऱ्या या महिनास ‘अधिकमास ‘धोंडामास ‘ असे म्हणतात. शक संवत्सरात ३५५ दिवस, तर इंग्रजी वर्षात ३६५ दिवस असतात. त्या साठी शास्त्रकारांनी अधिकमास ठरविला आहे.दर तीन वर्षांनी (३२ महिने १६ दिवसांनी ) या अधिकमासा चे आगमन होते.

सूर्य प्रत्येक महिन्यास एक राशीचे संक्रमण करतो.अधिक महिन्यात सूर्याचे संक्रमण नसते; म्हणून अधिकमासास ‘मलमास’ असेही संबोधतात. या महिन्यात लग्नादी मंगलकार्य निषिद्ध असतात.

अधिकमासाचा स्वामी मुरलीधर श्रीकृष्ण आहे.अधिकमासात तीर्थस्थान, दानधर्म, उपवास, व्रते इत्यादी पुण्यकर्मे करतात.अधिकमासाचे आराध्य दैवत श्रीकृष्ण असल्याने त्याची मन:पूर्वक भक्ती करतात.

पुराणात अधिकमासाच्या कथा पुष्कळ आहेत. ‘ क्षयमास व अधिकमास ‘ अधिकमासात कोणत्याही राशीत सूर्याचे संक्रमण नसते.तसाही चमत्कार एखाद्दा महिनात घडून येतो.तेव्हा सूर्य दोन राशींचे संक्रमण करतो. त्या विशिष्ट महिन्यास ‘क्षयमास ‘असे म्हणतात.अशा वर्षात क्षयमास पाळण्याची पध्दत नसते. ते वर्ष १२ – १ = महिन्यांचे होईल ! या वर्षात दोन अधिक महिने येतात, म्हणजे ते वर्ष एकूण ११ +२ =१३ महिन्याचे होते. या दोन अधिक महिन्यांपैकी क्षयमासापूरवी अधिक महिना मंगलकार्य व पुण्यर्मास उपयुक्त नसतो. क्षयमासानंतर येणारा अधिक महिना वरील कार्यास उपयुक्त ठरतो.

क्षयमासाच्या या गणितात अनेक गमती-जमती आढळतात. १८२२ मध्ये क्षयमासाचे आगमन झाले होते. १९६३ मध्ये कार्तिकमासाचा क्षय झाला. या दोन कालावधीत १४१ वर्षांचे अंतर आहे.१९८२-८३ मध्येही म्हणजेच १९ वर्षांनी पौष महिन्याचा क्षय झाला, म्हणजेच पांचांगात पौष महिनाच नव्हता म्हणजे मार्गशीर्ष नंतर एकदम माघ महिना आला होता.

पौषातील संक्रांती चा नित्याचा सण १४ जानेवारी लाच आला होता. म्हणजेच मार्गशीर्ष कृष्ण अमावास्या हा पुण्यकाळ होता. आता २१०४ मध्ये क्षयमास यावयाचा आहे.क्षयमास सर्वसाधारण पणे कार्तिक, मार्गशीर्ष, पौष यापैकी एकच क्षयमास म्हणून संबोधला जातो.क्षयमास व त्यापूर्वी येणारा अधिकमास सर्व शुभ कार्यास वर्ज्य मानले जातात; तर क्षयमासानंतर येणारा अधिकमास पुण्यकार्यास उत्तम मानतात.

श्रीज्ञानदेव-हरिपाठ

           ॐ
|| श्रीज्ञानदेव-हरिपाठ ||
नामसंकीर्तन साधन पैं सोपें |
जळतील पापें जन्मांतरींचीं ||१||
न लगती सायास जावें वनांतरी |
सुखें येतो घरा नारायण ||२ ||
ठाईंच बैसोनि करा एकचित्त |
आवडी अनंत आळवावा ||३||
रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा |
मंत्र हा जपावा सर्वकाळ ||४||
याहूनि आणीक नाही पैं साधन |
वाहतसे आण विठोबाची ||५||
तुका म्हणे सोपें आहे सर्वांहूनि |
शहाणा तो धणी घेत आहे ||६||
देव गुज सांगे पंढरीसी या रे |
प्रेमें चित्ती घ्या रे नाम माझें ||१||
सकळही चालवी भार त्यांचा ||२||
भवसिंधु तारीन घ्या रे माझी भाक |
साक्ष पुंडलिक करुनि बोलें ||३||
हे जरी लटिकें नामयासी पुसा |
आहे त्या भरंवसा नामीं माझ्या ||४||
देवाचिये व्दारी उभा क्षणभरी |
तेणें मुक्ति चारी साधियेल्या ||१||
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा |
पुण्याची गणना कोण करी ||२||
असोनि संसारीं जिव्हे वेगु करी |
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ||३||
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे |
व्दाराकेचे राणे पांडवां घरीं ||४||

श्रीज्ञानदेव-हरिपाठ

            ॐ
|| श्रीज्ञानदेव-हरिपाठ ||
एक तत्व नाम दृढ धरीं मना |
हरिसी करुणा येईल तुझी ||१||
तें नाम सोपें रे रामकृष्ण गोविंद |
वाचेसी सद्गद जपे आधीं ||२||
नामापरतें तत्व नाहीं रे अन्यथा |
वायां आणिक पंथा जाशी झणीं ||३||
ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरीं |
धरोनि श्रीहरि जपे सदा ||४|| ध्रु || O ||
सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी |
रिकामा अर्धघडी राहूं नको ||१||
लटिका व्यवहार सर्व हा संसार |
वायां येरझार हरिवीण ||२||
नाममंत्र जप कोटी जाईल पाप
कृष्णनामीं संकल्प धरूनिराहे ||३||
निजवृत्ति काढी सर्व माया तोडी |
इंद्रियां सवडी लपूं नको ||४||
तीर्थव्रतीं भाव धरीं रे करुणा |
शांति दया पाहुणा हरि करी ||५||
ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवीं ज्ञान |
समाधि संजीवन हरिपाठ ||६|| ध्रु o ||
अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस |
रचिले विश्र्वासें ज्ञानदेवें ||१||
नित्य पाठ करी इंद्रायणी तीरीं |
होय अधिकारी सर्वथा तो ||२||
असावें स्वस्थ चित्त एकाग्रीं मन |
उल्हासें करून स्मरण जीवीं ||३||
अंतकाळी तैसा संकटाचे वेळीं |
हरि तया सांभाळी अंतर्बाह्य ||४||
संतसज्जनांनीं घेतली प्रचिति |
आळशी मंदमति केवीं तरे ||५||
श्रीगुरु निवृत्ति वचन प्रेमळ |
तोषला तात्काळ ज्ञानदेव ||६|| ध्रु o ||

श्रीज्ञानदेव-हरिपाठ

           ॐ
|| श्रीज्ञानदेव-हरिपाठ ||
नित्य नेम नामीं ते प्राणी दुर्लभ |
लक्ष्मीवल्लभ तयांजवळी ||१||
नारायण हरि नारायण हरि |
भुक्ति मुक्ति चारी घरीं त्यांच्या ||२||
हरिवीण जन्म नरकचि पैं जाणा |
यमाचा पाहुणा प्राणी होय ||३||
ज्ञानदेव पुसे निवृत्तिसी चाड |
गगनाहूनि वाड नाम आहे ||४|| ध्रु || O ||
सात पांच तीन दशकांचा मेळा |
एकतत्वीं कळा दावी हरि ||१||
तैसें नव्हे नाम सर्व मार्गां वरिष्ठ |
तेथें कांहीं कष्ट न लगती ||२||
अजपा जपणें उलट प्राणाचा |
तेथेंही नामाचा निर्धार असे ||३||
ज्ञानदेवा जिणें नामेंवीण व्यर्थ |
रामकृष्णीं पंथ क्रमियेला ||४|| ध्रु O ||
जप तप कर्म क्रिया धर्म |
सर्वांघटीं राम भाव शुध्द ||१||
न सोडी हा भावो टाकी रे संदेहो |
रामकृष्णीं टाहो नित्य फोडी ||२||
जाति वित्त गोत कुळशीळ मात |
भजें कां त्वरित भावनायुक्त ||३||
ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं |
वैकुंठभुवनीं घर केलें ||४|| ध्रु || O ||
जाणीव नेणीव भगवंतीं नाहीं |
उच्चारणीं पाहीं मोक्ष सदा ||१||
नारायण हरि उच्चार नामाचा |
तेथें कळिकळाचा रीघ नाहीं ||२||
तेथील प्रमाण नेमवें वेदांसी |
तें जीवजंतूंसी केवीं कळे ||३||
ज्ञानदेवा फळ नारायण पाठ |
सर्वत्र वैकुंठ केलें असे ||४|| ध्रु O ||

श्रीज्ञानदेव-हरिपाठ

             ॐ
|| श्रीज्ञानदेव-हरिपाठ ||
हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन |
हरिवीण सौजन्य नेणें काहीं ||१||
त्या नरा लाधलें वैकुंठ जोडलें |
सकळही घडलें तीर्थाटन ||२||
मनोमार्गें गेला तो येथें मुकला |
हरिपाठीं स्थिरावला तोचि धन्य ||३||
ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी |
रामकृष्णिं आवडी सर्वकाळ ||४|| ध्रु O ||
नामसंकिर्तन वैष्णवांची जोडी |
पापें अनंत कोडी गेलीं त्यांचीं ||१||
अनंत जन्मांचें तप एक नाम |
सर्व मार्ग सुगम हरिपाठ ||२||
योग याग क्रिया धर्माधर्म माया |
गेले ते विलया हरिपाठीं ||३||
ज्ञानदेवा यज्ञ याग क्रिया धर्म |
हरिवीण नेम नाहीं दुजा ||४|| ध्रु O ||
वेदशास्त्रप्रमाण श्रुतीचें वचन |
एक नारायण सार जप ||१||
जप तप कर्म हरिवीण धर्म |
वाउगाची श्रम व्यर्थ जाय ||२||
हरिपाठीं गेले ते निवांतचि ठेले |
भ्रमर गुंतले सुमनकळिके ||३||
ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचें शस्त्र |
यमें कुळगोत्र वर्जियेलें ||४|| ध्रु O ||
काळ वेळ नाम उच्चरितां नाहीं |
दोन्ही पक्ष पाहीं उध्दरती ||१||
रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण |
जड जीवां तारण हरि एक ||२||
नाम हरि सार जिव्हा या नामाची |
उपमा त्या दैवाची कोण वानी ||३||
ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ |
पुर्वजां वैकुंठ मार्ग सोपा ||४|| ध्रु O ||

श्रीज्ञानदेव-हरिपाठ

          ॐ
|| श्रीज्ञानदेव-हरिपाठ ||

हरिबुध्दि जपे तो नर दुर्लभ |
वाचेसी सुलभ रामकृष्ण ||१||
रामकृष्ण नामीं उन्मनी साधली |
तयासी लधली सकळ सिध्दि ||२||
सिध्दि बुध्दि धर्म हरिपाठीं आले |
प्रपंची निवाले साधुसंगे ||३||
ज्ञानदेव नामें रामकृष्ण ठसा |
तेणें दशदिशा आत्माराम ||४|| ध्रु O ||
हरिपाठ कीर्ति मुखें जरी गाय |
पवित्र तो होय देह त्याचा ||१||
तपाचें सामथ्यें तपिन्नला अमूप |
चिरंजीव कल्प वैकुंठिं नांदे ||२||
मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार |
चतुर्भुज नर होउनि ठेले ||३||
ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाभलें |
निवृत्तीनें दिधलें माझे हातीं ||४|| ध्रु O ||

श्रीज्ञानदेव-हरिपाठ

          ॐ
|| श्रीज्ञानदेव-हरिपाठ ||
समाधि हरिची समसुखेंवीण |
न साधेल जाण व्दैतबुध्दि ||१||
बुध्दिचें वैभव अन्य नाहीं दुजें |
एका केशवराजें सकळ सिध्दि ||२||
ऋध्दि सिध्दि निधि अवघीच उपाधि |
जंव त्या परमानंदीं मन नाहीं ||३||
ज्ञानदेवा रम्य रमलें समाधान |
हरिचें चिंतन सर्वकाळ ||४||ध्रु O ||
नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी |
कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टीं ||१ ||
रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप |
पापाचे कळप पळती पुढें ||२||
हरि हरि हरि हा मंत्र शिवाचा |
म्हणती जे वाचा तयां मोक्ष ||३||
ज्ञानदेवा पाठ नारायण |
पाविजे उत्तम निजस्थान ||४|| ध्रु O ||
एक नाम हरि व्दैतनाम दुरी |
अव्दैतकुसरी विरळा जाने ||१||
समबुध्दि घेतां समान श्रीहरि |
शमदमावरी हरि झाला ||२||
सर्वांघटीं राम देहादेहीं एक |
सूर्य प्रकाशक सहस्त्ररश्मि ||३||
ज्ञानदेवा चित्तीं हरिपाठ नेमा |
मागिलिया जन्मां मुक्त झालों ||४|| ध्रु O ||

श्रावण अमावास्या

                                         ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर दक्षिणायन वर्षाऋतु
आश्लेषा नक्षत्र कर्क राशिप्रवेश शुक्रवार श्रावण कृष्णपक्ष ३० दर्श पिठोरी अमावास्या
तसेच दिनांक तारीख १७ ऑगस्ट २०१२ साल आहे.
पोळा मातृदिन आहे.
हा दिवस पोळा अमावास्या भारतीय पंचाग प्रमाणे मातृदिन साजरा करतात.
बैल याची पूजा करतात.शेवया ची खीर करतात.साधी कणिक याची पुरी करतात.
मुलगा व मुलगी यांना आई दोरे याला हळद कुंकू लावून वाण देते.शेवया ची खीर पुरी देते
अशा प्रकारे पोळा श्रावण अमावास्या मातृदिन साजरा करतात.

                    DSCF2733 शेवया

                  DSCF2723    DSCF0356

श्रीज्ञानदेव-हरिपाठ

        ॐ
|| श्रीज्ञानदेव-हरिपाठ ||
त्रिवेणी संगमीं नाना तीर्थें भ्रमीं |
चित्त नाहीं नामीं तरी तें व्यर्थ ||१||
नामासी विन्मुख तो नर पापिया |
हरिवीण धांवया न पवे कोणी ||२||
पुराणप्रसिध्द बोलिले वाल्मीक |
नामें तिन्ही लोक उध्दरती ||३||
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचें |
परंपरा त्याचें कुळ शुध्द ||४||ध्रु O ||
हरि उच्चारणीं अनंत पापराशी |
जातील लयासी क्षनमात्रें ||१||
तृण अग्निमेळें समरस झालें |
तैसें नामें केलें जपतां हरि ||२||
हरि उच्चारणीं मंत्र पैं अगाध |
पळे भूतबाधा भेणें तेथें ||३||
ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ |
न करवे अर्थ उपनिषदां ||४|| ध्रु O ||

तीर्थ व्रत नेम भावेंवीण सिध्दि |
वायांचि उपाधि करिसी जना ||१||
भावबळें आकळे एऱ्हवीं नाकळे |
करतळीं आंवळे तैसा हरि ||२||
पारियाचा रवा घेतां भूमीवरी |
यत्न परोपरी तैसें ||३||
ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण |
दिधलें संपूर्ण माझे हातीं ||४||ध्रु O ||

श्रीज्ञानदेव-हरिफाठ

         ॐ
|| श्रीज्ञानदेव-हरिफाठ ||
संतांचें संगति मनोमार्ग गति |
आकळावा श्रीपति येणें पंथें || १ ||
रामकृष्ण वाचा भाव हा जिवाचा |
आत्मा जो शिवाचा रामजप || २ ||
एक तत्व नाम साधिती साधन |
व्दैताचें बंधन न बाधिजे || ३ ||
नामामृत गोडी वैष्णवां लाधली |
योगियां साधली जीवनकळा || ४ ||
सत्वर उच्चार प्रल्हादीं बिम्बला |
उध्दवा लाधला कृष्णदाता || ५ ||
ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ |
सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे || ६ ||
विष्णुवीण जप व्यर्थ त्याचें ज्ञान |
रामकृष्णिं मन नाहीं ज्याचें || १ ||
उपजोनि करंटा नेणें अव्दय वाटा |
रामकृष्णिं पैठा कैसेनि होय || २ ||
व्दैताची झाडणी गुरुविणें ज्ञान |
त्यां कैचें कीर्तन घडे नामीं || ३ ||
ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान |
नामपाठ मौन प्रपंचाचें || ४ || ध्रु O ||

श्रीज्ञानादेव-हरिपाठ

                 ॐ
|| श्रीज्ञानादेव – हरिपाठ ||
साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला |
ठायींच मुराला अनुभवें || १ ||
कापुराची वाती उजळली ज्योति |
ठायींच समाप्ति झाली तैसी || २ ||
मोक्षरेखें आला तो भाग्यें विनटला |
साधूंचा अंकिला हरीभक्त || ३ ||
ज्ञानदेवा गोडी संगति सज्जनीं |
हरी दिसे जनीं वनीं आत्मतत्वीं || ४ || ध्रु ||
पर्वताप्रमाणें पातक करणें |
वज्रलेप होणें अभक्तांसी || १ ||
नाहीं ज्यासी भक्ति तो पतित अभक्त |
हरिसी न भजत दैवहत || २ ||
अनंत वाचाळ बरळती बरळ |
त्यां कैसेनि गोपाळ पावे हरि || ३ ||
ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान |
सर्वांघटीं संपूर्ण एक नांदे || ४ || ध्रु O ||

श्रीज्ञानदेव – हरिपाठ

        ॐ
|| श्रीज्ञानदेव – हरिपाठ ||
भावेंविण भक्ति भक्तिवीण मुक्ति |
बळेंवीण शक्ति बोलूं नये || १ ||
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित |
उगा राहे निवांत शिणसी वायां || २ ||
सायास करिसी प्रपंच दिननिशीं |
हरिसी न भजसी कोण्या गुणें || ३ ||
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणें |
तुटेल धरणें प्रपंचाचें || ४ || ध्रु O ||
योगयाग विधि येणें नोहे सिध्दि |
वायांचि उपाधि दंभ धर्म ||१ ||
भावेंवीण देव न कळे नि:संदेह |
गुरुविणें अनुभव कैसा कळे || २ ||
तपेंवीण दैवत दिधल्याविण प्राप्त |
गुजेंवीण हित कोण सांगे || ३ ||
ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात |
साधूंचे संगतीं तरणोपाय || ४ || ध्रु O ||

श्रीज्ञानदेव-हरिपाठ

        ॐ
|| श्रीज्ञानदेव – हरिपाठ ||
चहुं वेदीं जाण षट्शास्त्रीं कारण |
अठराही पुराणें हरिसी गाती || १ ||
मंथुनि नवनीता तैसें घे अनंता |
वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग || २ ||
एक हरि आत्मा जीव शिव समा |
वायां तूं दुर्गमा न घालीं मन || ३ ||
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ |
भरला घनदाट हरि दिसे || ४ || ध्रु O ||
त्रिगुण असार निर्गुण हें सार |
सारासार विचार हरिपाठ || १ ||
सगुण निर्गुण गुणाचें अगुण |
हरिवीण मन व्यर्थ जाय || २ ||
अव्यक्त निराकार नाहीं ज्या आकार |
जेथुन चराचर हरिसी भजे || ३ ||
ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं |
अनंत जन्मोनि पुण्य होय || ४ || ध्रु O ||

श्रीज्ञानदेव – हरिफाठ

        ॐ
|| श्रीज्ञानदेव – हरिफाठ ||
( भजनं – जय जय राम कृष्ण हरि || )
सुंदर तें ध्यान उभें विटेवरी |
कर कटावरी ठेवूनियां || १ ||
तुळसीहार गळां कांसे पितांबर |
आवडे निरंतर हेंचि ध्यान || २ ||
मकरकुंडलें तळपती श्रवणीं |
कंठीं कौस्तुभमणि विराजित || ३ ||
तुका म्हणे माझें हेंचि सर्व सुख |
पाहीन श्रीमुख आवडीनें || ४ ||
देवाचिये व्दारीं उभा क्षणभारी |
तेणें मुक्ति चारी साधियेल्या ||१ ||
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा |
पुण्याची गणना कोण करी || २ || ध्रुपद||
असोनि संसारीं जिव्हे वेगु करी |
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा || ३ ||
ज्ञानदेव म्हणे व्यासांचिये खुणे |
व्दाराकेचे राणे पांडवां घरीं || ४ || ध्रुपद ||

हेतू व बोध

     ॐ
हेतू व बोध
परमेश्र्वरासंबंधाने ज्यांनी म्हणून आजवर विचार
केला, त्या सर्वांना आपल्या मनास पटल्या त्या ईशप्रात्पीच्या
दिशा दाखवून दिल्या. कोणी अग्नीची तर कोणी सूर्याची योग्यता
विशेष आहे असे मानून त्याच्या उपासनेचे गाइले.
कांलांतराने सर्व शक्तींचे अधिष्ठान एकच परमेश्र्वर आहे असे ठरले.
सूर्य, चंद्र,वायू,अग्नी,तारांगण,महासागर याम्च्याव्दारे परमेश्र्वराच्या
अगाधत्वाबाद्दल कल्पना होत असून त्यांच्या उपासनेच्या योगाने
परमपदाची प्राप्ती करून घेण्याचा पंथ खरोखर उदात्त स्वरूपाचा होय.
श्रीसूर्यनारायण सर्वांस आयुरारोग्य व ज्ञानप्रकाश देवो हीच त्याच्या
चरणी प्रार्थना आहे.
  * * *

सूर्योपासना

सूर्योपासना
सूर्योपासना करण्याची पध्दती वेदकाली होती हे
सूर्यासंबंधीच्या प्रार्थनावरून स्पष्ट दिसते.सूर्य
आपल्या पापांचे क्षालन करतो अशी प्राचीन आर्यांची
भावना असल्यामुळे त्यांनी आपल्यास पापमुक्त
करण्यासाठी सूर्याची प्रार्थना केलेली ऋग्वेदात आढळते.
आठवड्यातील पहिल्या वारास जुन्या कालापासून सूर्याचे
नाव देण्यात आले आहे.यावरून जगात सर्वत्र सूर्याबद्दल प्राचीन
काळापासून पूज्यभाव व्यक्त होत आहे असे दिसते.ज्याप्रमाणे
शिवोपासकांना शैव,विष्णूच्या भक्तांना वैष्णव, त्याचप्रमाणे
सूर्यभक्तांना सौर असे म्हणतात. सूर्यनारायणाची प्रार्थना त्रिकाळ
करणे हे आजतागायत वैदिक धर्माचे एक प्रधान अंग होऊन बसले आहे.

DSCF2702

शास्त्रोक्त विधी व रूढी

               ॐ
शास्त्रोक्त विधी व रूढी
या सप्तमीला पूर्वदिवशी उपोषण करावे व रात्र
संपताच अरुणोदयसमयी मस्तकावर दीप धारण
करून स्वच्छ व निश्र्चल अशा पाण्यात शिरावे,तेथे
सूर्योदयापर्यंत स्नान केल्यानंतर पुन्हा मस्तकावर दीप
घेऊन सूर्याचे ध्यान करावे व तो दिवा पाण्यात सोडून
द्दावा तसेच दुसरेही दिवे सूर्याप्रीत्यर्थ पाण्यात तरंगत
सोडावेत स्नानाच्या वेळी रुईची, बोरीची सातसात
पाने मस्तकावर ठेवून घ्यावी.स्नान व श्रीसर्यनारायणाची
प्रार्थना करून घरी आल्यावर देव तर्पण करून तुळसीवृंदानासमोर
सूर्यासह सात घोडे जुंपलेल्या रथाचे चित्र काढावे व त्याची पूजा करून,
गोवऱ्या पेटवून त्यांच्यावर मातीचा भाड्यांत तयार केलेल्या दह्याच्या
खिरीचा सूर्यास नैदेद्द दाखवावा. ब्राह्मणास धनधान्याचे दान द्दावे,ब्राह्मण व
सुवासिनी यांच्यासमवेत भोजन करावे.आपल्याकडे रथसप्तमीप्रीत्यर्थ खीर
करण्याचा संप्रदाय प्राय: सर्वत्र दिसून तेतो.

रथसप्तमी

   ॐ
रथसप्तमी
माघ शुध्द सप्तमीला रथसप्तमी म्हणातात.हा
दिवस सूर्यदेवाप्रीत्यर्थ पाळावा असे भविष्यादिक
पुराणात सांगितले आहे.सूर्य हा एक तेजोमय गोल
आहे व त्याच्याभोवती पृथ्वीसारखे इतर कित्येक
गोल फिरत असतात हे खरे आहे.तथापि सूर्याकडून
मानवी सुखास साह्यभूत अशा गोष्टी घडून येत
असल्यामुळे त्याला प्राचीनकाळी देव मानू लागले व
अर्थातच त्याची पूजा सुरु झाली. सूर्यापासनेचा
मुख्य हेतू आरोग्य व तदनुषंगाने उत्पन्न होणारे सुख
भोगावे हा आहे.
हा मन्वतराचा पहिला दिवस असून या दिवशी
सूर्यनारायणाची स्वारी सात घोडे जुंपिलेल्या नवीन
रथातून आकाशमार्गाने फिरावयास निघते या समजुतीने
त्याला रथसप्तमी हे नाव मिळाले आहे.

               DSCF2703

मेरीची जीत

    ॐ
मेरीची जीत
ऑलिम्पिक पदक निश्चित (निश्र्चित)
अभिनंदन !
ऑलिम्पिक मध्ये प्रथम च समावेश आलेल्या महिला बॉक्सिंग मध्ये
भारताचे आशास्थान असलेल्या जगज्जेत्या कोमने पहिले पदक निश्चित केले आहे.
उपांत्यपूर्व फेरीत ५१ किलो वजनी गटात ट्युनिशिया च्या मारुआ रहाली हिच्यावर १५-६
अशी माता करीत मेरिने उपांत्य फेरीत धादक मारली.शेवट च्या फेरीत खेळ उंचावत
मेरीने आणखी ४ गुण मिळवले मिळविले व दिमाखदार विजय मिळविला .
ही माहिती महाराष्ट्र टाइम्स मुंबई मंगळवार ७ ऑगस्ट २०१२. १ पहिला पाना मध्ये आहे

                          DSCF2717

श्रीमंगळागौरीची आरती

      ॐ
श्रीमंगळागौरीची आरती
जयदेवी मंगळागौरी || ओंवाळीन सोनियाताटीं ||
दिवे माणिकांच्या वाती ||हिरेया मोती ज्योती || धृ o ||
मगंलमूर्ती उपजली कार्या || प्रसन्न झाली अल्पायुषी राया ||
तिष्ठली राजाबाली || अयोपण द्दावया || जय o || १ ||
पूजेला ग आणिती जाइजुइच्या कळ्या सोळा तिकटी सोळा दुर्वा ||
सोळा परीची पत्री || जाई जुई आबुल्या || शेवंती नागचाफे ||
पारिजातकें मनोहर || गोकर्ण महाफुलें || नंदेटें तगरें ||
पूजेला ग आणिली जय o ||साळीचे तांदूळ मुगाची डाळ ||
आळणी खिचडी रांधिती नार || आपुल्या पतीलागीं ||
सेवा करिती फार || जय o || ३ ||डुमडुमें डुमडुमें वाजंत्री वाजती ||
कळावी कांकणें गौरीला शोभती || शोभती बाजुबंद ||
कानीं कापांचे गवे || ल्यायली अंबा शोभे || जय o || ४ ||
न्हाउनी माखुनी मौनी बैसली || पाटावाची चोळी क्षीरोदक नेसली ||
स्वच्छ बहुत होऊनी || अंबा पुजूं लागली || जय o || ५ ||
सोनियाचे ताटी घातिल्या पंचारती || मध्यें उजळती कापुराच्या वाती ||
करा धूप दीप || आतां नैवेद्द षडूस पक्वानें || ताटीं भरा बोनें जय o ||६ ||
लवलाहें तिथें कासी निघाली || माउली मंगळागौर भिजवूं विसरली ||
मागुती परतुनिया आली || अंबा स्वयंभू देखिली || देऊळ सोनियाचें ||
खांब हिरीयांचे || वरती कळस मोतियांचा || जय O || ७ ||

                           DSCF2711  DSCF2710

सूर्याष्टकम्


सूर्याष्टकम्
श्रीगणेशाय नम: || सांब उवाच ||
आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर |
दिवाकर मनस्तुभं प्रभाकर नमो S स्तु ते || १ ||
सप्ताश्र्वथमारुढं प्रचण्डं कश्यपात्मजम् |
श्रेतपद्मधरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम् || २ ||
लोहितं रथमारूढं सर्वलोकपितामहम् |
महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम् || ३ ||
त्रैगुण्यं च महाशूरं ब्रह्माविष्णुमहेश्र्वरम् |
महापापहरं देवं तं सूर्यं प्रनमाहम् || ४ ||
बृंहितं तेज:पुंज च वायुमाकाशमेव च |
प्रभुं च सर्व लोकानां तं सूर्यं प्रणमाम्यहम् || ५ ||
बंधूकपुष्पसंकाशं हारकुंडलभूषितम् |
एकचक्रधरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम् || ६ ||
तं सूर्यं जगत्कार्तारं महातेजा:प्रदीपनम् |
महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम् ||७ ||
तं सूर्यं जगतां नाथं ज्ञानविज्ञानमोक्षदम् |
महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम् || ८ ||
सूर्याष्टकं पठेन्नित्यं ग्रहपीडाप्रणाशनम् |
अपुत्रो लभते पुत्रं दिरिद्रो धनवान्भवेत् || ९ ||
आमिषं मधुपानं च य: करोति रवेद्रिने |
सप्तजन्म भवेद्रोगी प्रतिजन्म दरिद्रता || १० ||
स्त्रितैलमधूमांसानि यत्यजेत्तु रवेद्रिने |
न व्याधि:शोकदारिद्रयं सूर्यलोकं स गच्छति || ११ ||
|| इति श्रीसूर्यंष्टकस्तोत्रं संपूर्णम् ||

श्रीसूर्यस्तुती


श्रीसूर्यस्तुती
जयाच्या रथा एकची चक्र पाहीं |
नसे भूमि आकाश आधार कांहीं ||
असे सारथी पांगुळा ज्या रथासी |
नमस्कार त्या सूर्यनारायाणासी || १ ||
करीं पद्म माथां किरीटी झळाळी |
प्रभा कुंडलांची शरीरा निराळी ||
पहा रश्मि ज्याची त्रिलोकासि कैसी |
नमस्कार त्या सूर्यनारायणासी || २ ||
सहस्रव्दयें दोनशें आणि दोन |
क्रमी योजने जो निमिषार्धतेन ||
मना कल्पवेना जयाच्या त्वरेसी |
नमस्कार त्या सूर्यनारायणासी || ३ ||
विधीवेदकर्मासि आधारकर्ता |
स्वधाकार स्वाहादि सर्वत्र भोक्ता ||
असे अन्नदाता समस्तां जनांसी |
नमस्कार त्या सूर्यनारायणासी || ४ ||
युगें मंत्रकल्पांत ज्याचेनि होती |
हरिब्रह्मरुद्रादि ज्या बोलिजेती ||
क्षयांती महाकाळरूप प्रकाशी |
नमस्कार त्या सूर्यनारायणासी || ५ ||
शशी तारका गोवुनी जो ग्रहातें |
त्वरें मेरू वेष्टोनियां पूर्वपंथें ||
भ्रमे जो सदा लोक रक्षावयासी |
नमस्कार त्या सुर्यनारायणासी || ६ ||
समस्तां सुरांमाजि तूं जाण चर्या |
म्हणोनीच तूं श्रेष्ठ त्या नाम सूर्या ||
दुजा देव तो दाखवी स्वप्रकाशी |
नमस्कार त्या सूर्यनारायणासी || ७ ||
महामोह तो अंधकारासि नाशी |
प्रभा शुध्द सत्वाचि अज्ञान नाशी ||
अनाथां कृपा जो करी नित्य ऐसी |
नमस्कार त्या सूर्यनारायणासी || ८ ||
कृपा ज्यावरी होय त्या भास्कराची |
न पाहुं शके शत्रु त्याला विरिची |
उभ्या राहती सिद्धी होऊनि दासी |
नमस्कार त्या सूर्यनारायणासी || ९ ||
फळें चंदनें आणि पुष्पेंकरोनी |
पुजावें बरें एकनिष्ठा धरोनी |
मनीं इच्छिलें पाविजे त्या सुखासी |
नमस्कार त्या सूर्यनारायणासी || १० ||
नमस्कार साष्टांग बापा स्वभावें |
करोनी तया भास्करालागिं घ्यावें ||
दरिद्रें सहस्त्रादि जो क्लेश नाशी |
नमस्कार त्या सूर्यनारायणासी || ११ ||
वरी सूर्य आदित्य मित्रादि भानू |
विवस्वान इत्यादिही पादरेणू ||
सदा VAAMCHCHITI पूज्य ते शंकरासी |
नमस्कार त्या सूर्यनारायणासी || १२ ||

ॐ श्रीसवितासूर्यनारायण नम:

                 ॐ
ॐ श्रीसवितासूर्यनारायण नम: |
मित्र रवि सूर्य भानु खग पूष हिरण्य गर्भ
मरीचयादित्य सवित्रर्कभास्करेभ्यो नमो नम: |
नमस्कार घालून झाल्यावर खालील श्र्लोक म्हणावे व
तीर्थ घ्यावे.
आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने |
जन्मान्तरसहस्त्रेषु दारिद्र्यं नोपजायते || १ ||
अकालमृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनम् |
सूर्यपादोदकं तीर्थ जठरे धारयाम्यहम् || २ ||
अनेन व्दादश नमस्काराख्येन कर्मणा
श्रीसावितृसूर्यनारायण: प्रियताम् |

सूर्याची बारा नावे

सूर्याची बारा नावे
  १) ॐ मित्राय नम: |
  २) ॐ रवये नम : |
  ३) ॐ सूर्याय नम: |
  ४) ॐ भानवे नम: |
  ५) ॐ खगाय नम: |
  ६) ॐ पूष्णे नम: |
  ७) ॐ हिरण्यगर्भाय नम: |
  ८) ॐ मरीचये नम: |
  ९) ॐ आदित्याय नम: |
१०) ॐ सवित्रे नम: |
११) ॐ अर्काय नम: |
१२) ॐ भास्कराय नम: |

पाऊस !

                                               ॐ
पाऊस : स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर आषाढ महिनात
व तसेच २०१२ साल मध्ये जून महिनात पाऊस कमी पडला.पडला नाही च म्हटले तरी
चालेल, पण श्रावण शुक्लपक्ष जुलै महिनात पाऊस तसा चांगला झाला.
राधानगरी धरण बुधवार सकाळी भरले दोन दरवाजे उघडले. ११ वाजता पूर्ण क्षमतेने
भरल्याने धरणाचे ३ आणि ६ क्रमांकाचे दोन स्वयंचलित दरवाजे ११ वाजता ५० मिनिटांनी
उघडले.त्यामुळे धरणाच्या दारावादातून २८०० क्युसेक्स तर वीज निर्मितीतून दोन हजार असा
एकूण ४ हजार ८०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरु आहे.यामुळे भोगावती ची
पातळी वाढली आहे.धरणात ८ हजार २७५.४ द.ल.घ.फुट पाणीसाठा असून ३४७.४५ फुट पाणी पातळी आहे.
ही माहिती पुढारी २ ऑगस्ट २०१२ गुरुवार च्या कोल्हापूर पान ३ अंकात पेपर मध्ये आहे.
महाबळेश्वर, कोयना वारणा राधानगरी सर्वच धरणात पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.
कोयना धारण ५४ टक्के भरले आहे.ही माहिती महाराष्ट्र टाइम्स २ ऑगस्ट २०१२ पान ५ अंकात पेपर
मध्ये आहे.

                              DSCF2712  DSCF2713  DSCF2715

मनाचे श्लोक

     ॐ
|| श्रीहरि: ||
श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित
मनाचे श्लोक (मराठी )
अती जीर्ण विस्तीर्ण तें रूप आहे |
तेथें तर्क संपर्क तोही न साहे |
अती गूढ तें दृढ तत्काळ सोपें |
दुजेवीण जे खूण स्वामीप्रतापें || १९९ ||
कळे आकळे रूप तें ज्ञान होतां |
तेथें आटली सर्व साक्षी अवस्था |
मना उन्मनीं शब्द कुंठीत राहे |
तो गे तो चि राम सर्वत्र पाहे || २०० ||
कदा वोळखीमाजि दूजें दिसेना |
मनीं मानसीं व्दैत कांही वसेना |
बहूतां दिसां आपुली भेटि जाली |
विदेहीपणें सर्व काया निवाली || २०१ ||
मना गूज रे तूज हें प्राप्त जालें |
परी अंतरीं पाहिजे येत्न केले |
सदा श्रवणें पाविजे निश्र्चयासी |
धरीं सज्जनसंगती धन्य होती || २०२ ||
मना सर्वही संग सोडूनि द्दावा |
अती आदरें सज्जनाचा धरावा |
जयाचेनि संगें महां दु:ख भंगे |
जनीं साधनेंवीण सन्मार्ग लागे || २०३ ||
मना संग हा सर्व संगास तोडी |
मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी |
मना संग हा साधकां शीघ्र सोडी |
मना संग हा व्दैत निशेष मोडी || २०४ ||
मनाचीं शतें ऐकतां दोष जाती |
मतीमंद ते साधना योग्य होती |
चढें ज्ञान वैराग्य सामथ्यें आंगीं |
म्हणे दास विश्र्वासतां मुक्ति भोगी || २०५ ||
|| जय जय रघुवीर समर्थ ||
____________________________________

मनाचे श्लोक

    ॐ
|| श्रीहरि: ||
श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित
मनाचे श्लोक ( मराठी )
मना ना कळे ना ढळे रूप ज्याचें |
दुजेवीण तें ध्यान सर्वोत्तमाचें |
तया खूण ते हीण दृष्टान्त पाहे |
तेथें संग निसंग दोनी न साहे || १९२ ||
नव्हे जाणता नेणता देवराणा |
न ये वर्णितां वेदशास्त्रां पुराणां |
नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा |
श्रुती नेणती नेणती अंत त्याचा || १९३ ||
वसे हृदयीं देव तो कोण कैसा |
पुसे आदरें साधकु प्रेष्ण ऐसा |
देहे टाकितां देव कोठें रहातो |
परी मागुता ठाव कोठें पाहतो || १९४ ||
वसे हृदयीं देव तो जाण ऐसा |
नभाचे परी व्यापकु जाण तैसा |
सदा संचला येत ना जात कांहीं |
तयावीण कोठें रिता ठाव नाहीं || १९५ ||
नभीं वावरे जो अणुरेणु कांहीं |
रिता ठाव या राघवेंवीण नाहीं |
तया पाहतां पाहतां तेंचि जाले |
तेथें लक्ष आलक्ष सर्वै बुडालें || १९६ ||
नभासारिखें रूप या राघवाचें |
मनीं चिंतितां मूळ तूटे भवाचें |
तया पाहतां देहबुधी उरेना |
सदा सर्वदा आर्त पोटीं पुरेना || १९७ ||
नभें व्यापिलें सृष्टीस आहे |
रघूनायेका ऊपमा ते न साहे |
दुजेवीण जो तोचि तो हा स्वभावें |
तया व्यापकु व्यर्थ कैसें म्हणावें || १९८ ||

श्रावण पौर्णिमा

                               ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
श्रावण शुक्लपक्ष बुधवार १४ नारळी पौर्णिमा आहे.
तसेच १ ऑगस्ट २०१२ साल आहे.
त्या निमीत्त मी नारळ साखर तांदूळ तूप व इतर एकत्र करून नारळ याचा
नारळीभात केला आहे.
पाऊण बाऊल आंबेमोहर बारीक तांदूळ घेतले एक नारळ फोडून विळी वर बसून खोवून
खोऊन घेतले.पाऊण बाऊल साखर घेतली.लवंग ४/५ घेतल्या.सादुक तूप अर्धी वाटी घेतले.
बदाम थोडे घेतले.चारोळी,केशर रंग,जायफळ असे थोडे घेतले.
तांदूळ भांड्यात काढून धुतले.कुकर च्या ठेवण्याच्या भांड्यात तूप व लवंग गरम केले.
धुतलेले तांदूळ तूप व लवंग ह्यात घातले.थोडे परतले कुकर मध्ये पाणी घातले.
गॅस पेटवून कुकर ठेवला.कुकर च्या पाण्यात तांदूळ तूप लवंग हे पातेले ठेवले त्यात
दोन बाऊल पाणी गरम घातले.भात तांदूळ नेहमी सारखे चार शिट्या देऊन शिजवून घेतले
घेतला.कुकर गार झाल्या नंतर दुसरे पातेले गॅस पेटवून ठेवले.त्यात पण सादुक तूप ,लवंग ,
खोवलेले खोबर नारळ घातले.सर्व एकत्र केले.त्यात शिजलेले भात घातला.रंग ,जायफळ ,केशर ,
बदाम,चारोळी व साखर घातली.सर्व एकत्र हलवून वाफ आणली.साखर खोबर नारळ ओल असल्यामुळे
व भात पण ओला असल्यामुळे पाणी घालण्याची गरज नाही.छान वाफ आणली.परत चांगली वाफ आणली.
मस्त साखर भातात विरघळून नारळ,साखर,तांदूळ,तूप,लवंग,जायफळ,रंग व केशर यांचा एकत्र नारळा चा
नारळीभात गोड हवा तेवढा केला. झाला.मी नारळीभात केला आहे.जास्त गोड हव असल्यास साखर थोडी वाढवावी.
पण जास्त फार गोड झाल्यास जास्त भात जात नाही.म्हणून जेवढे तांदूळ तेवढीच साखर पुरते.

                        DSCF2705

                                      DSCF2709

मनाचे श्लोक

       || श्रीहरि: ||
श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित

मनाचे श्लोक ( मराठी )
नव्हें तें चि जालें नसे तें चि आलें |
कळों लागलें सज्जनाचेनि बोलें |
अनुर्वाच्य तें वाच्य वाचे वदावें |
मना संत आनंत शोधीत जावें || १८४ ||
लपावें अती आदरें रामरूपीं |
भयातीत निश्र्चीत ये सस्वरूपीं |
कदा तो जनीं पाहतां ही दिसेना |
सदा ऐक्य तो भिन्न भावें वसेना || १८५ ||
सदा सर्वदा राम सन्नीध आहे |
मना सज्जना सत्य शोधून पाहें |
अखंडीत बेटी रघूराज योगु |
मना सांडि रे मीपणाचा वियोगु || १८६ ||
भुतें पिंड ब्रह्मांड हें ऐक्य आहे |
परी सर्व ही सस्वरूपीं न साहे |
मना भासलें सर्व कांहीं पहावें |
परी संग सोडूनि सूखी रहावें || १८७ ||
देहेभान हें ज्ञानशस्त्रें ख्रुडावें |
विदेहीपणें भक्तिमागें चि जावें |
विरक्तीबळें निंद्द सर्वै तजावें |
परी संग सोडूनि सूखें रहावें || १८८ ||
मही निर्मिली देव तो वोळखावा |
जया पाहतां मोक्ष तत्काळ जीवा |
तया निर्गुणालागि गूणीं पहावें |
परी संग सोडूनि सूखें रहावें || १८९ ||
नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टिभर्ता |
परेहूनि पर्ता न लिंपे विवर्ता |
तया निर्विकल्पासि कल्पीत जावें |
परी संग सोडूनि सूखें रहावें || १९० ||
देहेबुधिचा निश्र्चयो ज्या टळेना |
तया ज्ञान कल्पांतकाळीं कळेना |
परब्रह्म तें मीपणें आकळेना |
मनीं शून्य अज्ञान हें मावळेना || १९१ ||

मनाचे श्लोक

   ॐ

|| श्रीहरि: ||
श्रीसमर्थरामदासस्वामीविरचित
मनाचे श्लोक
जगीं व्दादशादीत्य हे रुद्र आक्रा |
असंख्यात संख्या करी कोण शक्रा |
जगीं देव धुंडाळितां आढळेना |
जनीं मुख्य तो कैसा कळेना || १७६ ||
तुटेना फुटेना कदा देवराणा |
चळेना ढळेना कदा दैन्यवाणा |
कळेना कळेना कदा लोचनासी |
वसेना दिसेना जगीं मीपणासी || १७७ ||
जया मानला देव तो पूजिताहे |
परी देव शोधूनि कोण्ही न पाहे |
जगीं पाहतां देव कोट्यानकोटी |
जया मानली भक्ति जे तेचि मोठी || १७८ ||
तिन्ही लोक जेथूनि निर्माण जाले |
तया देवरायासि कोण्ही न बोले |
जगीं थोरला देव तो चोरलासे |
गुरुवीण तो सर्वथा हीं न दीसे ||१७९ ||

गुरु पाहतां पाहतां लक्ष कोटी |
बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी |
मनीं कामना चेटकें धातमाता |
जनीं वेर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता || १८० ||
नव्हे चेटकी चाळकु द्रव्यभोंदु |
नव्हे निंदकु मछरु भक्तिमंदु |
नव्हे उन्मतु वेसनी संगबाधु |
जगीं ज्ञानिया तो चि अगाधु || १८१ ||
नव्हे वाउगी चाहुटी काम पोटी |
क्रियेवीण वाचाळता ते चि मोठी |
मुखें बोलीयासारखें चालताहे |
मना सद्गुरु तो चि शोधूनि पाहे |
जनीं भक्त ज्ञानी विवेकी विरागी |
कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी |
प्रभु दक्ष वित्पन्न चातुर्य जाणे |
तयाचेन योगें समाधान बाणे || १८३ ||

मनाचे श्लोक

    ॐ
|| श्रीहरि: ||
श्रीसमर्थरामदासस्वामीविरचित
मनाचे श्लोक ( मराठी )
करी वृत्ति जो संत तो संत जाणा |
दुराशागुणें जो नव्हे दैन्यवाणा |
उपाधी देहेबुधितें वाढवीते |
परी सज्जना केवि बाधूं शके ते || १६८ ||
नसे अंत आनंत संता पुसावा |
अहंकार विस्तार हा नीरसावा |
गुणेंवीण निर्गूण तो आठवावा |
देहेबुधिचा आठऊं नाठवावा || १६९ ||
देहेबुधि हे ज्ञानबोधें तजावी |
विवेकें तये वस्तुची भेटि घ्यावी |
तदाकार हे वृत्ति नाहीं स्वभावें |
म्हणोनी सदा तें चि शोधीत जावें ||१७० ||
असे सार साचार तें चोरलेंसे |
येहीं लोचनीं पाहतां दृश्य भासे |
निराभास निर्गूण तें आकळेना |
अहंता कल्पितां हीं कळेना || १७१ || स्फुरे विषयीं कल्पना ते अविद्दा |
स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुचिता |
मुळीं कल्पना दों रूपें ते चि जाली |
विवेकें तरी सस्वरूपीं मिळाली || १७२ ||
स्वरूपीं उदेला अहंकार राहो |
तेणें सर्व आछ्यादिलें व्योम पाहों |
दिशा पाहतां ते निशा वाढताहे |
विवेकें विचारें विवंचूनि पाहे || १७३ ||
जया चक्षुनें लक्षितां लक्षवेना |
भवा भक्षितां रक्षितां रक्षवेना |
क्षयातीत तो आक्षै मोक्ष देता |
दयादक्ष तो साक्षिनें पक्ष घेतो || १७४ ||
विधी निर्मितां लिहितो सर्व भाळीं |
परी लिहिता कोण त्याचे कपाळीं |
हरू जाळितो लोक संव्हारकाळीं |
परी शेवटी शंकरा कोण जाळी || १७५ ||

श्रावण


श्रावण
श्रावण आले
किती उंच बांधले
पोरींनी हिंदोळे
श्रावण आले
घन आनंदले
तेज धुंद झाले
हिरव्या राईने
गाणे गायिले –
धुंद गंध हवा
धुंद अर्थ नवा
नव्या पावसाने
ऊन्हपाहीले –
वाऱ्याने गायिला
सुंगधितराणा
नवा अर्थ येई
हिरव्या सुरांना
गोड स्वप्न कसे चाफ्याला पडले
श्रावण आले
श्रीकांत
७.८.१९६७.
पुणे

मनाचे श्लोक

     ॐ
|| श्रीहरि: ||
श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित
मनाचे श्लोक ( मराठी )
नको रे मना वाद हा खेदकारी |
नको रे मना भेद नाना विकारी |
नको रे मना सीकऊं पूढिलांसि |
अहंभाव जो राहिला तूजपासीं || १६० ||
अहंतागुणें सर्व ही दुख होतें |
मुखें बोलिलें ज्ञान तें व्यर्थ जातें |
सुखी राहतां सर्व ही सूख आहे |
अहंता तुझी तूं चि शोधूनि पाहें || १६१ ||
अहंतागुणें नीति सांडी विवेकी |
अनीतीबळें श्लाघ्यता सर्व लोकीं |
परी अंतरी सर्व ही साक्ष येते |
प्रमाणांतरें बुद्धि सांडूनि जाते || १६२ ||
देहेबुधिचा निश्र्चयो दृढ जाला |
देह्यातीत तें हीत सांडीत गेला |
देहेबुधि ते आत्मबुद्धी करावी |
सदा संगती सज्जनाची धरावी || १६३ || मनें कल्पिता वीषयो सोडवावा |
मनें देव निर्गूण तो वोळखावा |
मनें कल्पितां कल्पना ते सरावी |
सदा संगती सज्जनाची धरावी || १६४ ||
देह्यातील प्रपंच हा चिंतियेला |
परी अंतरी लोभ निश्र्चीत ठेला |
हरीचिंतनें मुक्तिकांता वरावी |
सदा संगती सज्जनाची धरावी || १६५ ||
अहंकार विस्तारला या देह्याचा |
स्त्रियापुत्रमित्रादिकें मोह त्यांचा |
बळें भ्रांति हे जन्मचिंता हरावी |
सदा संगती सज्जनाची धरावी || १६६ ||
बरा निश्र्च्यो शाश्र्वताचा करावा |
म्हणे दास संदेह तो विसरावा |
घडीने घडी सार्थकाची करावी |
सदा संगती सज्जनाची धरावी || १६७ ||

मनाचे श्लोक

|| श्रीहरि: ||
श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित
मनाचे श्लोक ( मराठी )
बहूतां परी कूसरी तत्वझाडा |
परी पाहिजे अंतरी तो निवाडा |
मना सार साचार तें वेगळें रे |
समस्तांमध्यें येक तें आगळें रे || १५२ ||
नव्हें पिंडज्ञानें नव्हे तत्वज्ञानें |
समाधान कांहीं नव्हे तानमानें |
नव्हे योगयागें नव्हे भोगत्यागें |
समाधान ते सज्जनाचेनि योगें || १५३ ||
महांवाक्य तत्वादिक पंचिकणें |
खुणें पाविजे संतसंगे विवणें |
व्दितियेसि संकेत जो दाविजेतो |
तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो || १५४ ||
दिसेना जनीं तें चि शोधूनि पाहें |
बरें पाहतां गूज तेथें चि आहे |
करीं घेउं जातां कदा आडळेना |
जनीं सर्व कोंदाटलें तें कळेना || १५५ ||म्हणे जानता तो जनीं मूर्ख पाहे |
अतर्कासि तर्की असा कोण आहे |
जनीं मीपणें पाहतां पाहवेना |
तया लक्षितां वेगळें राहवेना || १५६ ||
बहू शास्त्र धुंडाळितां वाड आहे |
जया निश्र्चयो येक तो ही न साहे |
मती भांडती शास्त्रबोधे विरोधें |
गती खुंटली ज्ञानबोधें प्रबोधें || १५७ ||
श्रुति न्याय मीमांसकें तर्कशास्त्रें |
स्मृती वेद वेदांतवाक्यें विचित्रें |
स्वयें शेष मौनावला स्थीर पाहे |
मना सर्व जाणीव सांडून राहे || १५८ ||
जेणें मक्षिका भक्षिली जाणिवेची |
तया भोजनाची रुची प्राप्ति कैची |
अहंभाव ज्या मानसींचा विरेना |
तया ज्ञान हें अन्न पोटीं जिरेना || १५९ ||

मनाचे श्लोक


|| श्रीहरि: ||
श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित
मनाचे श्लोक ( मराठी )
जगीं पाहतां साच तें काय आहे |
अती आदरें सत्य शोधूनि पाहें
पुढें पाहतां पाहतां देव जोडे |
भ्रमें भ्रांति अज्ञान हें सर्व मोडे || १४४ ||
सदा विषयो चितिंतां जीव जाला |
अहंभाव अज्ञान जन्मासि आला |
विवेकें सदा स्वस्वरूपीं भरावें |
जिवा ऊगमीं जन्म नाहीं स्वभावें || १४५ ||
दिसे लोचनीं तें नसे कल्पकोडी |
अकस्मात आकारलें काम मोडी |
पुढें सर्व जाईल कांहीं न राहे |
मना संत आनंत शोधूनि पाहें || १४६ ||
फुटेना तुटेना चळेना ढळेना |
सदा संचलें मीपणें तें कळेना |
तया एकरूपासि दूजें न साहे |
मना संत आनंत शोधूनि पाहें || १४७ || निराकार आधार ब्रह्मादिकांचा |
जया सांगता सीणली वेदवाचा |
विवेकें तदाकार होऊनि राहें |
मना संत आनंत शोधूनि पाहें || १४८ ||
जगीं पाहतां चर्मचक्षीं न लक्षे |
जगीं पाहतां ज्ञानचक्षीं न रक्षे |
जगीं पाहतां पाहणें जात आहे |
मना संत आनंत शोधूनि पाहें || १४९ ||
नसे पीत श्र्वेत ना शाम कांहीं |
नसे वेक्त आवेक्त ना नीळ नाहीं |
म्हणे दास विश्र्वासतां मुक्ति लाहे |
मना संत आनंत शोधूनि पाहें || १५० ||
खरें शोधितां शोधितां शोधताहे |
मना बोधितां बोधितां बोधताहे |
परी सर्व ही सज्जनाचेनि योगें |
बरा निश्र्चयो पाविजे सानुरागें || १५१ ||

मनाचे श्लोक


|| श्रीहरि: ||
श्रीसमर्थ रामदास्वामीविरचित
मनाचे श्लोक (मराठी)
भयें व्यापिलें सर्व भ्रह्मांड आहे |
भयाभीत तें संत आनंत पाहें |
जया पाहतां व्दैत काहीं दिसेना |
भय मानसीं सर्वथा ही असेना || १३६ ||
जिवां श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले |
परी जीव अज्ञान तैसेचि ठेले |
देहेबुधिचें कर्म खोटें टळेना |
जुनें ठेवणें मीपणें आकळेना || १३७ ||
भ्रमें नाडळे वीत ते गुप्त जालें |
जिवा जन्मदारिद्र टाकूनि आलें |
देहेबुधिचा निश्र्चयो ज्या टळेना |
जुनें ठेवणें मीपणें आकळेना || १३८ ||
पुढें पाहतां सर्व ही कोंदलेंसे |
अभाग्यास हें दृश्य पाषाण भासे |
अभावें कदा पुण्य गांठी पडेना |
जुनें ठेवणें मीपणें आकळेना || १३९ || जयाचें तया चूकलें प्राप्त नाहीं |
गुणें गोविलें जाहलें दुख देहीं |
गुणावेगळी वृत्ति ते ही वळेना |
जुनें ठेवणें मीपणें आकळेना || १४० ||
म्हणे दास सायास त्याचे करावे |
जनीं जाणता पाय त्याचे धरावे |
गुरुअंजनेंवीण तें आकळेना |
जुनें ठेवणें मीपणें तें कळेना || १४१ ||
कळेना कळेना कळेना ढळेना |
ढळे नाढळे संशयो ही ढळेना |
गळेना गळेना अहंता गळेना |
बळें आकळेना मिळेना मिळेना || १४२ ||
अविद्दागुणें मानावा ऊमजेना |
भ्रमें चूकलें हीत तें आकळेना |
परीक्षेविणें बांधलें दृढ नाणें |
परी सत्य मिथ्या असें कोण जाणे || १४३ ||

मनाचे श्लोक

     ॐ
|| श्रीहरि: ||
श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित
मनाचे श्लोक ( मराठी )
मना वासना वासुदेवीं वसों दे |
मना कामना कामसंगी नसों दे |
मना कल्पना वाउगी ते न कीजे |
मना सज्जना सज्जनीं वस्ति कीजे || १२८ ||
गतीकारणें संगती सज्जनाची |
मती पालते सूमती दुर्जनाची |
रतीनायिकेचा पती नष्ट आहे |
म्हणोनी मनातीत होऊनि राहें || १२९ ||
मना अल्प संकल्प तो ही नसावा |
मना सत्य संकल्प चित्तीं वसावा |
जनीं जल्प वीकल्प तो ही तजावा |
रमाकांत येकांतकाळी भाजावा || १३० ||
भजाया जनीं पाहतां राम येकु|
करी बाण येकु मुखीं शब्द येकु |
क्रिया पाहतां उधरे सर्व लोकु |
धारा जानकीनायकाचा विवेकु || १३१ || विचारुनि बोले विवंचूनि चाले |
तयाचेनि संतप्त ते ही निवाले |
बरें शोधिल्याविण बोलों नको हो |
जनीं चालणें शुध नेमस्त राहो || १३२ ||
हरीभक्त वीरक्त विज्ञानरासी |
जेणें मानसीं स्थापिलें निश्र्चयासी |
तया दर्शनें स्पर्शनें पुण्य जोडे |
तया भाषणें नष्ट संदेश मोडे || १३३ ||
नसे गर्व आंगी सदा वीतरागी |
क्षमा शांति भोगी दया दक्ष योगी |
नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा |
यहीं लक्षणीं जाणिजे योगिराणा || १३४ ||
धरीं रे मना संगती सज्जनाची |
जेणें वृत्ति हे पालटे दुर्जनाची |
बळें भाव सद्बुधि सन्मार्ग लागे |
महां क्रूर तो काळ विक्राळ भंगे || १३५ ||

मनाचे श्लोक

|| श्रीहरि: ||

श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित

मनाचे श्लोक ( मराठी )

विधीकारणें जाहला मछ वेगीं |
धरी कूर्म धरा पुष्टिभागीं |
जना रक्षणाकारणें नीच योनी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी || १२० ||
महां भक्त प्रल्हाद हा कष्टवीला |
म्हणोनी तयाकारणें सिंह्य झाला |
न ये ज्वाळ वीपाळ संन्नीध कोण्ही |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी || १२१ ||
कृपा भाकितां जाहला वज्रपाणी |
तयाकारणें वामनु चक्रपाणी |
व्दिजांकारणें भार्गव च्यापापानी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी || १२२ ||
अहिले सतीलागि आरण्यपंथे |
कुढावा पुढें देव बंदी तयातें |
बळें सोडितां घाव घाली निशाणी |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी || १२३ || तये द्रुपदीकारणें लागवेगें |
त्वरें धांवतु सर्व सांडूनी मागें |
कळीलागि जाला असे बोध्य मौनी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी || १२४ ||
अनाथां दिनाकारणें जन्मताहे |
कलंकी पुढें देव होणार आहे |
जया वर्णितां सीणली वेदवाणी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी || १२५ ||
जनाकारणें देव लीलावतारी |
बहूतांपरी आदरें वेषधारी |
तया नेणती ते जन पापरूपी |
दुरात्मे महां नष्ट चांडाळ पापी || १२६ ||
जगीं धन्य तो रामसूखें निवाला |
कथा ऐकतां सर्व तल्लीन जाला |
देहेभावना रामबोधें उडाली |
मनोवासना रामरूपीं बुडाली || १२७ ||

मनाचे श्लोक मराठी

|| श्री हरि: ||

मनाचे श्लोक मराठी
रामदासस्वामीविरचित

येथासांग रे कर्म तें हि घडेना |
घडे धर्म तें पुण्य गांठी पडेना |
दया पाहतां सर्व भूतीं असेना |
फुकाचे मुखीं नाम तें हि वसेना || १०० ||
जया नावडे नाम त्या येम जाची |
विकल्पें उठे तर्क त्या नर्क ची ची |
म्हणोनी अती आदरें नाम घ्यावें |
मुखें बोलतां दोष जाती स्वभावें || १०१ ||
अती लीनता सर्वभावें स्वभावें |
जना सज्जनालागिं संतोषवावें |
देहे कारणीं सर्व लावाति जावें |
सगूणीं अती आदरेंसी भजावें || १०२ ||
हरीकीर्तनें प्रीति रामीं धरावी |
देहेबुधि निरूपणीं वीसरावी |
परद्रव्य आणीक कांता परावी |
येदर्थी मना सांडि जींवी करावी || १०३ ||

मनाचे श्लोक


|| श्री हरि: ||
मनाचे श्लोक ( मराठी )
श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित
अती आदरें सर्व ही नामघोषें |
गिरिकंदरें जाइजे दूरि दोषें |
हरी तिष्ठतु तोषला नामतोषें |
विशेषें हरा मानसीं रामपीसें || ९२ ||
जगीं पाहतां देव हा अन्नदाता |
तया लागली तत्वता सार चिंता |
तयाचें मुखी नाम घेता फुकाचें |
मना सांग पां रे तुझें काय वेचे || ९३ ||
तिन्ही लोक जाळूं शके कोप येतां |
निवाला हरू तो मुखें नाम घेतां |
जपे आदरें पार्वती विश्र्वामाता
म्हणोनी म्हणा तें चि हें नाम आतां || ९४ ||
अजामेळ पापी वदे पुत्रकामें |
तया मुक्ति नारायणाचेनि नामें |
शुकाकारणें कुंटणी राम वाणी |
मुखें बोलतां ख्याती झाली पुराणीं || ९५ || महां भक्त प्रह्लाद हा देत्यकुळीं |
जपे रामनामावळी नित्यकाळीं |
पिता पापरूपी तया देखवेना |
जनीं दैत्य तो नाम मूखें म्हणेना || ९६ ||
मुखी नाम नाहीं तया मुक्ति कैंचि |
अहंतागुणें यातना ते फुकाची |
पुढें अंत येईल तो दैन्यवाणा |
म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा || ९७ ||
हरीनाम नेमस्त पाषाण तारी |
बहू तारिले मानवदेहधारी |
तया रामनामीं सदा जो विकल्पी |
वदेना कदा जीव तो पापरूपी || ९८ ||
जगीं धन्य वाराणसी पुण्यरासी |
तयेमाजि जातां गती पूर्वजांसी |
मूखें रामनामावळी नित्यकाळीं |
जिवा हीत सांगे सदा चंद्रमोळी || ९९ ||

%d bloggers like this: