आपले स्वागत आहे!

Archive for the ‘विविध’ Category

शिक्षक

खरा शिक्षक तो आहे जो तुम्हाला मार्ग दाखवतो परंतु तुम्हाला स्वतंत्र पणे चालू देतो

ज्ञानी शिक्षक तो आहे जो तुम्हाला दरवाजा दाखवितो परंतु त्याच्या मागे काय आहे ह्याचा विचार तुम्हाला करू देतो 

खरा शिक्षक तो आहे जो तुम्हाला पुढाकार घ्यायला शिकवतो, मागे मागे चालायला नाही 

अंतर्ज्ञानी शिक्षक तो आहे जो स्वतः हि विध्यार्थी असतो 

सत्य शिक्षक तो आहे जो जाणतो कि विध्यार्त्याला आता मला सोडून जा असे केंव्हा सांगावे 

दयाळू शिक्षक तो आहे जो उदाहरणाने शिकवतो 

धैर्यवान शिक्षक तो आहे जो आपल्या ज्ञाना पलीकडे जायचे धैर्य दाखवतो  

सर्वात चांगला शिक्षक तो आहे जो तुमच्यातील शिक्षकाचा विकास करवतो कि तुम्ही खरे, ज्ञानी, अंतर्ज्ञानी, सत्य, दयाळू आणि धैर्यवान शिक्षक बनावे. 

उड्डाण

उड्डाण

मंद हवा कुरवाळते आहे
निसर्ग आलिंगन देण्यास उभा आहे
अशात ह्या पतंगावर आरोहण
फक्त आकाशा पर्यंत पोहोचण्यासाठी

एकटे उड्डाण वरती, हे नाही एकटेपण
हे तर एक आमंत्रण शेजारील निसर्ग शोभेत एक होण्यासाठी
उड्डाणाची जादू आणि उत्तुंग भरारी
आंतर्मन भरते क्रुतद्यतेने

एकटे उड्डाणाचा अनुभव
जसा निसर्ग म्हणतोय हेलो
हा अनुभव एव्हडा प्रचंड, जेंव्हा तो येईल
तेंव्हा विनम्रतेने माणूस झुकेलच, झुकेल

flysolo

पार्लेश्र्वर मंदिर

पार्लेश्र्वर मंदिर :
मुंबई येथे पार्ले येथे शंकर महादेव याची पिंड आहे.
महादेव पिंड च्या मागे पार्वती ची मूर्ती आहे.
मुंबई त पार्ले येथे असल्यामुळे सर्वांना
पार्लेश्र्वर मंदिर म्हणून जास्त माहित माहीत आहे.
यंदा २०१२ साल ला कार्तिकी त्रिपुरी त्रिपुरारी पौर्णिमा
ला १०० वर्ष पूर्ण झाली आहेत. पार्लेश्र्वर मंदिर ला.
पार्लेश्र्वर मंदिर म्हणत असले तरी तेथे महादेव शंकर यांची पिंड आहे.
एकच बहुमानानी शंकर यांची लिहिले लिहिली आहे.
मी हे मंदिर खूप वेळा पाहिलं आहे.

कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा ला यंदा १०० वर्ष पूर्ण झाली आहेत मी त्यावेळेला
पार्लेश्र्वर मंदिर मध्ये हजर होते. मी आमचे भाऊ सौ भावजय भाच्ची माझा मुलगा
व खूप भक्त !हजर असल्यामुळे थाटात १०० शतक महोत्सव साजरा केला गेला आहे.
मातीच्या पणत्या कापूस याची वाट तेल यांनी दिवे लावून पार्लेश्र्वर मंदिर पूर्ण आवर भर भरले होते. काही नीं रांगोळ्या काढल्या.! १०० वर्ष पार्लेश्र्वर मंदिर महादेव पिंड व पार्वती ची मूर्ती असलेले असलेलं पार्लेश्र्वर मंदिर पूर्ण पणत्या च्या दिवे लावून भारलेल दिपोत्सव साजरा केलेला आहे.

२०१२ साल ला केला आहे. व मी ह्या दिपोत्सव ला हजर असल्यामुळे मला स्वत: ला १०० वर्ष पार्लेश्र्वर मंदिर मध्ये हजर असल्याचा उत्सव पहिला मिळाल्या मुळे
मी स्वत : खूप भाग्यवान आहे. अस मला वाटत आहे. !
१०० वर्ष पार्लेश्र्वर मंदिर महादेव यांच पिंड असलेले असलेलं पार्वतीची मूर्ती असलेले.
२०१२ साल ला याला खुप महत्व आहे. हे नक्की चं निश्र्चित ! निश्र्चीत !

 

 

 

 

कैलासपति झाड

नागचाफा ( कैलासपति ) झाड :
मुंबई माझे सौ भावजय व भाऊ असतात.
मी केंव्हा तरी त्यांच्या कडे जात असते.
माझ्या भावाने १९८३ साल ला नागचाफा (कैलासपति) फुला च्या झाडाच्या बिया प्लॉट मध्ये लावून झाड वाढविले आहे.
पाहिल फुल फूल २००० साल ला आल आहे.
२५ वर्षाच झाड आहे.१५ वर्षाने फुल येतात.
मी जेंव्हा गेले की ते झाड व फूल पाहत असते.व फुल हाताने निघत नाहीत
काठीला लोखंडी आकडा ने काढावे लागतात.
मी त्रिपुरी पौर्णिमा (कार्तिकी पौर्णिमा ला मुंबई त माझ्या सौ भावजय व भाऊ यांच्या
जाऊन आले.सहज तेथील फोटो छायाचित्र झेतले.व माहिती भाऊ यांना विचारली.
ऐकताना खूप २५ वर्षाच कैलासपति (नागचाफा ) झाड आहे समजले.एकदम मन भरून
माहिती लिहिली.वाळलेल्या बिया किंवा ओल्या बिया कैलासपति झाडाच्या लावल्या की
१५ वर्षाने कैलासपति झाडाला फूल येयात.
मुंबई ठिकाणी एवढे प्लॉट मध्ये २५ वर्ष याचा नागचाफा कैलासपति च माझ्या भावान
लावलेलं झाड याला पण महत्व आहे.

  

  

   kailaspati

स्वातंत्र्य

                                         ॐ
स्वातंत्र्य : देश स्वातंत्र्य झाला.लोकशाहि आहे.खूप देशाशाठी कांहीं तरी करावे
वाटणं सहाजिक चं आहे. सर्व नागरिकांना सोयी सवलती नोकरी हवी आहे.
आपला प्रांत मोठा सोयी सवलती चा हवा आहे.हे पूर्ण पटत.
म्हणून सरकार च्या बस गाड्या इतर वाहन खराब करून कोटी चे नुकसान होते
ते भरून येत नाही दुरुस्त करणे ही होत नाही दुसऱ्या देशा चा ध्वज झेंडा जाळून कधी ही
ही चूक भरून निघणार नाही.प्रत्येक ध्वज झेंडा मध्ये प्रत्येक नागरीक असतो.ही जाणीव
ठेवणे गरजेचे आहे.
आज १५ ऑगष्ट आहे. पण पेपर वर्तमान पत्र उघडल्या नंतर माजी महाराष्ट्र मुख्यमंत्री विलासराव देशमुख
यांचे निधन बातमी !हळहळ वाटली.१५ ऑगष्ट चा दिवस झेंडा उभा केला असला तरी
मनात रुखरुख आहे सर्वांच्याच !दुसऱ्या देशा चा स्वातंत्र्य दिवस आपण त्यांचा ध्वज झेंडा जाळतो.
आपला ध्वज १५ ऑगष्ट ला कसा उभा आहे हे लक्षात येते.
कोणत ही काम विचार पूर्वक विचार पूस करून करायला हवें !

                             DSCF2729

ब्लॉग पोष्ट ७४२वां:

                               ॐ
ब्लॉग पोष्ट ७४२ वां : दिनांक तारीख ३ ऑगष्ट २०१२ साल ला
माझा ब्लॉग पोष्ट सातशे बेचाळीस ७४२ वा होत आहे. आता पर्यंत
श्रावण पौर्णिमा, दिवे,प्रयत्न, मटकीची उसळ, नागपंचमी, रवा बेसन लाडू ,
ऋतु प्रमाणे पानांची पूजा यांचे छायाचित्र फोटो लावलेले आहेत.मुख्य म्हणजे
मनाचे श्लोक श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित ( मराठी )मधून लिहिलेले मी
संगणक मध्ये लिहून काढले आहेत. चार ओळीचे एक कडव असे २०५ कडवे लिहून
मी काढली आहेत.एवढी शक्ती व इतका वेळ बसून लिहिणे मला जमले आहे.वेळ आहे
म्हणून नव्हे एवढी ताकद मला श्रीसमर्थ रामदासस्वामी यांनी दिली.श्रीरामदासस्वामी नां
माझा मनापासून नमस्कार ! एका ब्लॉग मध्ये ८ कडवे आहेत. लवकर तसे मनाचे श्लोक
लिहिले गेले आहेत हे पण महत्वाचे आहे.मनाचे श्लोक यांना एक फुली आली आहे.म्हणजे
मनाचे श्लोक पण वाचक वाचतात.
आपण सर्वांनी माझा ब्लॉग वाचन करून प्रतिक्रिया दिल्यात भेटी दिल्यात त्या बद्दल बध्दल
धन्यवाद ! धंयवाद ! भेटी आता पर्यंत ६४,५५९ आहेत.

                                    DSCF2701

ध्यानलिंग

Anyone who comes into the sphere of Dhyanalinga cannot escape the sowing of the spiritual seed of liberation – Sadhguru

ध्यानलिंग च्या  क्षेत्रांत जो येतो त्याच्या मध्ये अध्यात्माचे बीज रुतल्या शिवाय राहत नाही – सद्गुरू

http://dhyanalinga.org/architecture.htm

[youtube:http://youtu.be/vwbiGiNmkDk%5D

डिस्कवरी अंतरीक्ष विमान

अमेरिकेने डिस्कवरी नावाचे अंतरीक्ष विमान निवृत्त केले.

ह्या विमानाला वॉंशिंग्टन येथे स्मिथसोनीयन संगहालयात ठेवणार आहेत.

एक नेहमीचे विमान ह्या अंतरीक्ष विमानाला फ्लोरिडा ते वॉंशिंग्टन संग्रहालयात घेऊन गेले

त्याची हि सुंदर दृश्ये बघण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा

५०६ वा ब्लॉग पोस्ट

५०६ वा ब्लॉग पोस्ट : दिनांक तारीख ९ एप्रिल (४) २०१२ साल ला माझा ब्लॉग पोस्ट पाचशेसहा ५०६ वा ब्लॉग पोस्ट होत आहे. खरचं खूप लिखान वाचण्यास व लिहिण्यास मला मिळाले आहे. कांही घरगुती वयक्तिक सतार शिंकाळ मानिल्यंट पाककृती असे असे भरपूर विषय माझ्या ब्लॉग मध्ये आहेत. मी फोन मध्ये बोलतांना मी डांगर केले सातूचे पीठ केले असे कांही सांगितले की आम्ही पण करतो असे सांगून त्यांनी पण सातूचे पीठ घरी केले आहे.एकदम मस्त वाटलं !ताकातील हिरवी मिरची पण सर्वांनी केली.सहज रोजच जेवण पण चवदार वाटतं. येशू दर्गा सज्जनगड उज्वल त्रिकोण मी छायाचित्र फोटो काढून दाखविले आहे.घंटा सुबत्ता असे मनाचे विचार लिहिले आहेत. माझा ब्लॉग आपण वाचन करून प्रतिक्रिया दिल्या आहेत भेटी पण दिल्या आहेत त्या बध्दल बद्दल धंयवद ! धन्यवाद !

भेटी ४३,९२५

DSCF2442

सुरावट

सुरावट

सूर आद्द सूर मध्यम सूर पार जाणा
सूर जो निष्कलंक स्वच्छ प्राण जाणा
सप्त सूर तार विलय प्रारंभ तोच जाणा
नादातून शाश्वत ही झुणझुणत वीणा

सूर नाट्य सूर चित्र सूर नृत्य करूणा
आर्ध्याला अपूर्ण सूर, सूर चित्रवीणा
सूर पार दु:खातून आनंद धन झरणा
नादातून शाश्वत ही रुणझुणत वीणा

मुद्राही सूरमय अति सूर स्वाभाव राणा
सूर स्वार्त स्वरानुगातिक सूर ब्रह्म जाणा
सात सूर सप्त स्वर्ग तप्त कथन कथना
नादातून शाश्वत ही रुणझुणत वीणा

गहन तपातून येत आद्द सूर रमणा
गहन तपातून येत आद्द सूर रमणा
देहाच्या मखरातून पाझरून प्राणा
नम्रभान नमन करून अर्जवून प्रणवा
नादातून शाश्वत ही रुणझुणत वीणा

सुरा नमन स्वर वंदन प्रार्थून त्या चरणा
रसिक मना अर्पूनि सूर आनंद करणा
स्वरात सूर संगत सूर सूर . रंजन झरणा
नादातून शाश्वत ही रुणझुणत वीणा
– श्रीकांत चिवटे

Happy Saint Patrick’s day

आज १७ मार्च संत पेट्रिक दिवस… जे साजरा करतात त्यांना शुभेच्छा.

असे होऊदे की…
रस्ताच तुम्हाला येऊन भेटो
वारा आपोआप तुमच्या पाठीवर झुळूक देवो
सूर्य स्वतः तुमचा चेहरा दीपमान करो
पाउस तुमच्या शेताची सेवा करो
आणि आपल्या पुढच्या भेटी पर्यंत
देवत्व आपल्या ओंजळीत सुखरूप ठेवो
– एक आयरिश स्वदिछा

May the road rise up to meet you.
May the wind always be at your back.
May the sun shine warm upon your face,
and rains fall soft upon your fields.
And until we meet again,
May God hold you in the palm of His hand.
– Irish Blessing

उन्हाळा मधील वाळवण

                                              ॐ
उन्हाळा मधील वाळवण : खारोड्या, कुरडाया, गवले खिरीचे पदार्थ
उडीदडाळ मुगडाळ याचे पापड,हरबरा डाळीचे सांडगे.बटाटा साबुदाणा चकली.
साबुदाणा पापड्या , पोहे पापड हे सर्व मी केले आहे सविस्तर माहिती वेगवेगळ्या
ब्लॉग मध्ये एईलं हे सर्व गुढीपाडवा च्या आत करतात गुढीपाडवा ला सर्व पदार्थ नैवेद्द
म्हणून वापरतात. करतात.ब्लॉग ला खूप नंतर सविस्तर मीहिती नुसार येतील.तो
पर्यंत छायाचित्र फोटो लावलेले आहेत ते बघण्यास नक्कीच आवडेल !

DSCF2382  DSCF2398DSCF2402  DSCF2412DSCF2420  DSCF2431

DSCF2417  DSCF1030 

DSCF0404  DSCF0407

महिला दिन

                                                     ॐ
महिला दिन : ८ मार्च ला महिला दिन साजरा करतात.महिला पूर्वा पार पासून उद्दोग करतात.
पूर्वी दळन दळतांना ओवी म्हणून दळत असतं.काम करतांना पण ओवी गाणी म्हणणं पूर्वी पासून आहे.
गालीच्छे विणत असतं.नतंर महिला शाळा कॉलेज करायला शिकल्या.महिला कार मोटार श्कुटर चावायाला शिकल्या.
संगीत विभाग सुरु झाला.वाद्द वाध्य नाटकातील गाणी म्हणायला शिकल्या.वैमानिक पोलीस झाल्या गृहिणी घरातील
मुलांचे संगोपन पाहुणे यांची दखल घेणे. घर सजावट सर्व काम महिला व्यवस्थित पार पाडतात.हे एक जिम्मेदारी च चं
काम आहे.ते अगदी मनापासून पार पाडतात.हे एक कौशल्य चं ह्यात महिलांना आनंद समाधान तृप्तता मिळते.
ह्यालाच महिला दिन म्हणतात.

Sunita Williams  DSCF1512

ब्लॉग पोष्ट ४६५ वां

ब्लॉग पोष्ट ४६५ वां : ५ मार्च (३)२०१२ ला माझा ब्लॉग पोष्ट ४६५ वां होत आहे. माझ्या ब्लॉग मध्ये वाचन करून मराठीतून संगणक मध्ये मराठी लिखान आहे. मराठी संगणक मध्ये प्रसिध्द केले आहे. मला एवढे लिखान करायला मिळाले आहे. सर्व माहिती घरातील पुस्तक वर्तमानपत्र मासिक ह्या मध्ये आहे.शोधून काढून वाचून संगणक मध्ये लिहीन हे अगदी

छान चांगल वाटत आहे. वेळ याचा उपयोग चांगला मी केला आहे.अभ्यास पण त्या बरोबर झाला आहे.आपण सर्वांनी वाचन करून प्रतिक्रिया दिल्या आहे. भेटी ३७,८३६  पण झाल्या आहेत.त्या बध्दल बद्दल धन्यवाद ! धंयवाद !

DSCF2338DSCF2330

सुबत्ता

सुबत्ता आणि समाधान: भारत देश शेती प्रधान देश आहे. पूर्वी एकत्र कुटुंब शेती असे घरातील आई (आजी) सर्व अधिकार पणे पाहतं असतं. मूले व सूना सासुबाई चं ऐकत असत. शेता मध्ये गारागोटी येत असत. प्रत्येक घराणं आमचे आंबे खावयाला या एक एक दिवस असे. टोपली च जवल ठेवत असत. पूर्वी दुकानात जाऊन लुगडे घेवयाची पध्दत नव्हती घरीच नवीन कपड्याचे कपड्याला नवा वास असतो. तसे येत माझ्या काकू आई त्यातील हवे त्या रंगाचे लुगडे जोडीने घेत असत. माझ्या आई पैठणी व काकू चा शालू डोळ्या पुढे आठवतो. वडिलांचे धोतर कोट पांढरी व काळी टोपी आठवते. माझी आई नवरात्राचे उपवास करत सर्वांना भगर देत असत. पूर्वी ज्वारीच्या लाह्या असत. मोठ्ठ पातेले भर असायचे काकू सर्वांना वाटी वाटी देत असे. सुबत्ता त्या मनाने कमी होती पण लोक समाधानी असायचे.

पूर्वी घरात बाज असयाच्या सतरंजी घोंगडी हिरावळ सोलापूर चादर असायचे घराण्यात कोणी युनरसिटीत पहिला आला तर गावात पेढे वाटत असत.नातू मुलगा अमेरिकेला जात असेल तर गावातील शेतावर काम करणारे मुंबई विमानातळा वर येत असतं. मार्केट मध्ये भाजीवाले फलवाले छान राहतात.नळ दुरस्ती वाले लाईट दुरस्ती वाले मोटर सायकल फटफटी नी येतात. तसा पैसा असतो त्यांचा कडे. काम करतात. धून भांडी वाल्या बायका छान साडी नेसून हातात बांगड्या कपाळी कुंकू नाकात चमकी घालतात. कष्ट करतात, पैसा कमावून समाधानी राहायचा प्रयत्न असतो. सगळी कडे ताशे राहणीमान सुधारत आहे, हळू हळू सुबत्ता पसरत आहे.

सुबत्ते बरोबर समाधानी स्वभाव अत्यंत गरजेचा आणि ही सोपी व साधी गोष्ट लक्ष्यात आल्या नंतरच खरी प्रगती साध्य होते.

मनाचे समाधान हीच खरी सुबत्ता आहे.

लोखंड

ॐ 

लोखंड : लोखंड याचा रंग तांबूस काळसर असतो.लोखंड याचा उपयोग घर बांधतांना लोखंडी सळी चा उपयोग करतात. खिडकी चे गज करून लोखंडी सळी लावतात.गेट च दार पण लोखंड सळी नेच करतात.सुरी विळी फळ भाजी कापण्याकरता लोखंड चं वापरतात आता आता स्टील च पॉलीस देतात.स्वंयपाक याची लोखंड वर स्टील पॉलीस असते.तीवई पूर्ण लोखंड याची मिळते. हल्ली लोखंड स्टील पॉलीस ची तीवई मिळतात. खुर्च्या पण लोखंड रंगवून मिळतात.चालविणार वाहन सायकल गाडी बस रेल्वे पण लोखंड बोट विमान पत्राला पॉलीस करून रंगवून तयार करतात.इलेट्रीक वस्तू लोखंड ह्यापासून बनवतात. झाड टांगण्या करता लोखंड याचा आधार घेतात.पंखे फ्रिज पण लोखंड याचे रंगवुन वापर करतात. काही ठिकाणी लोखंड याचा शोभे चा वस्तु तयार करतात घोडा हत्ती रेल्वे गाडी बैलगाडी.मानसांचे पूतळे पण लोखंड करून स्टील पॉलीस करतात. तसेच कला कौशल्य म्हणून लोखंड याचे झाड तयार करतात. 

लोखंडी झाड असलेतरी तया लोखंडी झाडा ला मूळ फांद्या देठा सगट पान आहेत. आणि ताठ उभे आहे. पसरलेले लोखंडी झाड आहे.त्यामुळे लोखंडी झाड घरातं शोभून दिसते.

घंटा

घंटा: घंटा मी कांही ब्लॉग पूर्वी मध्ये दाखविली आहे.  घंटा पितळी स्टील चांदी मातीची पण शोभे साठी घंटा असते.

घरातील देवातं डाव्या हाताने घंटा व उजव्या हातात आरती असते.घंटा वाजवून आरती करतात. गणपती देवी दत्त महादेव बरेच देवळात घंटा टांगलेली असते.

उजव्या हातील चार बोटांनी देवळात घंटा वाजवितात. 

घंटे चा आवाज नाद मधुर असतो. घंटे ला हातातील बोटांचा स्पर्श व घंटा याचा आवाज घुमतो. घंटा ऐकून ब्रह्मांड जवळ गेल्या सारखे सारखं वाटतं.

कोल्हापूर महालक्ष्मी च्या देवळात सकाळी पाचं ५ वाजता काकड आरातीच्यावेळी घंटा वाजवितातं तो आवाज महाद्वार पर्यंत ऐकु जातो. एवढी मोठी घंटा व घंटा चा आवाज असतो. कोणी कोणी हॉल मध्ये टांगून ठेवतात. बाहेर जातांना घंटा वाजवून घंटा याचा आवाज ऐकून बाहेर पडतात. 

सतार वाजवितांना तारांचा आवाज ऐकू चांगला येतो. खूप रियाज झाला की ब्रह्मांड पर्यंत माणूस जातो. मी खूप सतार वाजविली आहे.रियाज केला आहे. कोणतही वाध्य याचा आवाज बराचं वेळ घुमतो. घर देऊळ शाळे मध्ये पण तासाला घंटा वाजवितात. तो पण आवाज घुमतो. घंटे चा आवाज, वाध्य याचा आवाज घुमून नाद मधुर होऊन ब्रह्मांड सापडतं. घर देऊळ भरून जात. घरोघरी घंटा असते.

 

मेथी व कांदा भाजी

मेथी व कांदा भाजी: मेथी ची जुडी पेंडी मोकळी करावी. थोड देठासगट मेथी ची पान घ्यावीत. मेथी निवडुन झाल्यावर निवडलेली मेथी धुवून घ्यावी.बारीक चिरावी. मी विळीने भाजी चिरते.

एक कांदा बारीक चिरावा.मेथिची भाजी व कांदा वेगवेगळे ठेवावेत. तेल व मोहरी ची फोडणी करावी.

प्रथम कांदा फोडणीत घालून परतून घ्यावा.मेथी चिरलेली कांदा मध्ये घालावी परत कांदा व मेथी परतून घ्यावी.मेथी कांदा मध्ये हळद तिखट मिठ हिंग घालावे. कळत न कळत पाणी घालावे.मेथी व कांदा मसाला घातलेले पाणी थोड घातलेले हलवून वाफ आणावी.

छान मेथी व कांदा भाजी तयार होते.

भाकरी पोळी बरोबर खान्यास द्यावी.

घरोघरी मेथी व कांदा भाजी तयार करतात खातात.

घरोघरी मेथी व कांदा भाजी करतात.

DSCF2237  DSCF1222

रथसप्तमी

ॐ 

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर उत्तरायण शिशिरऋतु नक्षत्र अश्र्विनी सात सोमवार माघ शुक्लपक्ष रथसप्तमी आहे. रथधिष्ठित सूर्य याचे पूजन करतात. तसेच दिनांक तारीख ३० जानेवारी (१) ला रथसप्तमी आहे. 

ॐ 
रथसप्तमी म्हणून मी तिळग़ूळ याची पोळी केली आहे.
प्रथम तिळ भाजून घेतले.
मिस्कर मधून बारीक करून घतले. 
ग़ूळ किसून बारीक करून घेतला.
खोबर किसून घेतले. 
खोबर तिळ कूट ग़ूळ सादूक तूप लावून सर्व एकत्र केले. 
कणिक तेल मीठ घालून पाण्यात.भिजवून गोळा केला. 
ग्यस पेटविला तवा ठेवला.
ओट्यावर पोळपाट लाटणं ठेवले.
कणीक याचा छोटा गोळा घेतला हातानेच मोठ्ठा केला कणीक गोळ्या मध्ये तिळ गूळ खोबर तूप याच सारण भरलं पोळी प्रमाणे लाटून पेटलेल्या ग्यास च्या तव्यावर तिळ गूळ पोळी भाजून घेतली.दोन्ही बाजूने परत तूप सोडले. छान खमंग व कुरकुरीत झाली. तूप व तिळ गूळ पोळी डीश मध्येकाढून खाण्यास दिली. तिळगूळ पोळी कोणी कोणी डाळीचे पीठ भाजून तिळ गूळ मध्ये घालून पण पोळी करतात. कोणी कोणी नुसता गूळ घालून गुळा ची पोळी करतात.ज्याला जशी आवडेल तशी तिळ गूळ पोळी करतात. घरोघरी तिळ गूळ पोळी करतात.

मी कसा ब्लॉग तयार करते?

मी कसा ब्लॉग तयार करते:

मी प्रथम गूगल ट्रानस्लीटरेशन वर जाते.
तेथे मराठी, संस्कृत, हिंदी, गुजराथी अशा सर्व भाषा असतात.
मी संस्कृत वर जाते. ॐ लिहिते.
मग मराठी भाषा निवडते, इंग्रजी तून मराठी स्पेलिंग करते (फोनेटिक इंग्रजी).
सर्व लिखाण झाल्यावर सिलेक्ट ऑल करते. कॉपी करते. हॉटमेल वर जाते. तेथे पेस्ट करते.
टु वर जाते. इमेल वर माझ्या ब्लॉग चा पत्ता घालते. सेंड करते.
सर्वांना मराठी वाचायला मिळते.

सर्व संगणक मध्ये गुगल प्लस ची सोय आहे.
फक्त भाषा प्रमाणे आपण स्पेलींग करून तयार करावे लागते. एवढच
सराव प्रमाणे मराठी स्पेलींग करण्यास वेळ लागतो.
सराव घाला की लगेच लगेच स्पेलींग तयार होतात.
रस्व दीर्घ पाहिजे असल्यास ट्रानस्लीटरेशन वर पोपप पट्टी येते त्यावर क्लिक करणे. म्हणजे रस्व दीर्घ पण बरोबर येते.

अशा प्रमाणे लिखाण करून ब्लॉग तयार करू शकतो.

श्रीगणेश जयंती

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर उत्तरायण शिशिरऋतु नक्षत्र शततारा
माघ शुक्लपक्ष गुरुवार विनायक चतुर्थी श्रीगणेश जयंती आहे.

तसेच गुरुवार २६ जानेवारी (१) २०१२ तारीख दिनांक ला श्रीगणेश जयंती आहे.

तिळगुळ याचा लाडु गणपती ला नैवेध्द देतात.

DSCF1535  DSCF0527

DSCF2077  aca1f8502b4e

DSCF1665

तिळगुळ घ्या गोड बोला !

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर उत्तरायण हेमंतऋतु नक्षत्र हस्त कृष्णपक्ष पौष महिना सप्तमी रविवार १५ जानेवारी (१) २०१२ तारीख दिनांक ला मकरसंक्रांति भानुसप्तामि आहे.

ह्यादिवसा पासून माघशुक्लपक्ष रथसप्तामि संक्रांति च महत्व आहे तिळगुळ हलवा तिळा ची गुळ घालून केलेली पोळी करणे हळद कुंकू करणे काही वस्तू किंवा धान्य पदार्थ देण्याची पध्दत आहे. मी तिळगुळ याची वडी व लाडू केले आहे. तीळगुळ दडी व लाडू : प्रथम तीळ भाजून घ्यावे गुळा चा कळतनळत पाणी घालून गुळ विरघळू द्यावा पाणी घातल्यामुळे गुळ जळत नाही.पाक घट्ट करावा.पाकामध्ये तीळ टाकावेत किसलेले खोबर घालावे कोणी शेंगदाने पण घालतात.मी तीळ किसलेले खोबर घातले आहे.थोड सादुक तूप तीळ पाक ह्यात घालावे. पोळपाट ला तूप लावाव. हाताने सारखे करून घ्यावे सुरुने वड्या पाडाव्यात.किंवा गोल लाडू करावे.खुपदिवस तीळ गुळा चे लाडू व वड्या राहतात.

घरोघरी तिळगुळा चे लाडू वडी पोळी असे पदार्थ करतात. तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हणतात.

तिळगुळ घ्या गोड बोला !

पुरुषांचे राहणीमान

ॐ 

पुरुषांचे राहणीमान : पुरुष धोतर कुडता (सदरा) घालातातं. कोट पण घालतात.डोक्यावर टोपी काळी किंवा पांढरी घालतात. फेटे पण बंधतात. फेटे बांधण्याचे खूप प्रकार आहेत. मध्ये गोल ठेवून मोठा काना पर्यंत फेटा बांधतात.कोणी पाठीवर फेटाचा भाग सोडून डोक्यावर काना पर्यंत फेटा बांधतात.कोणी फेटा चा मध्ये पातळ भाग ठेवून गोल फेटा बांधतात. तयार गोल ऊभे फेटे बांधतात.कोणी ह्याट डोक्यावर वापरतात. हल्ली कांही पुरुष च असे राहतात. लग्न व समारंभ याला सर्रास फेटे बांधण्याची पध्दत आहे. बिकबाळी हातात अंगठी हातात व पायात कड घालतात. नंतर पुरुष पायाजामे सदरा वापरत. नंतर पुरुष घड्याळ गळ्यात साखळी वापरायला लागले. नंतर पुरुष शर्ट प्यंट घड्याळ गळ्यात साखळी हातात. अंगठी मनगटात शाखळी किंवा कड वापरायला लागले घरोघरी अजुन ही धोतर सदरा टोपी असतोच.

स्त्रियांचे राहणीमान

राहणीमान : स्त्रिया बायका पूर्वी कपाळी मेणावर मोठ्ठ लाल कुंकू लावतं असतं. काष्टा घालून नऊवारी लुगड नेसत असतं. धारवाडी खणाची चोळी घालतं. कानात. मोत्याचा सात मोती असलेल्या कुड्या घालत.खोफा अंबाडा मध्ये सोन्याचं फूल घालतं काळे मणी असलेले दोन वाट्या सोन्याचा असलेले सोन्या मध्ये मंगळसुत्र घालतं.

मोहनमाळ चिंचपेटी सोन्या ची घालत. पायाच्या बोटा मध्ये जोडवी घालत. नाकातं मोत्याची नथ घालत. हातातं काचेच्या बांगड्या व पाटल्या गोठ बांगड्या सोन्याचे तोडे सर्रास रोज कंबरपट्टा घालतं.

हाताच्या बोटामध्ये अंगठी वापरत सोन्याचावाक्या घालण्याची पध्दत आहे. बायका घालतं असत.

नंतर सहावारी साडी नेसायची पध्दत आली.कुंकू, गंध, किंवा टिकली लावायची पध्दत आली काचेच्या बांगड्या पाटल्या बागंड्या सोन्याचा घालत. काळे मणी सोन्याची दोन वाटी असलेले मंगळसूत्र घालतातच.

पायाच्या बोटामध्ये जोडवी घालतात. पायात चांदीच्या साखळ्या घालण्याची पध्दत आली आहे.

छल्ला हल्ली वापरतात. अंगठी हाताच्या बोटं मध्ये घालतात केसाचे दोन वेण्या किंवा एक वेणी रिबिनी लावून घालायची पध्दत असे.

आता आता ड्रेस वापरतात. केस मोकळे ठेवण्याची पध्दत आली आहे.आता ही बायका पाटल्या गोठ बांगड्या तोडे वाक्या नथ चमकी वापरतात.

घरोघरी कुंकू पायातील जोडवी हातातील काचेच्या बांगड्या अंगठी चमकी घालून सहावारी साडी लांब हाताचे पोलक पदर खोचून बायका सर्रास घरात व बाहेर फिरतांना वावरतात.

सोन शरीरावर अंगावर घातल्यामुळे पूर्वी तजेल राहत असे. हल्ली कामावर नोकरी वर बायका जातात. त्यामुळे एवढ रोज सोन वापरत नाहीत. मात्र सणावाराला अजून ही लग्नात बायका सोन याचा वापर करतात.

घरोघरी थोड तरी सोन वापरून बायका राहतात.

रांगोळी

नवीन वर्षा च्या शुभेच्छा!

ॐ 

रविवार १ जानेवारी (१)२०१२ नवीन वर्ष सुरु होत आहे.
नवीन वर्षा च्या सर्व महिना ला सर्व शुभेच्छा !

लिखाण

मी पूर्वी केलेले कागदावरती व डायरीवरती लिखाण आजही पाहण्यास चांगलं वाटत आहे !

गायत्री मंत्र  DSCF1258

DSCF0901  DSCF0893

  DSCF0870  DSCF0883 

DSCF0625  DSCF0608

 DSCF2128  DSCF2127

|| श्री महलक्ष्मी यंत्र ||

DSCF2123  DSCF2118DSCF2116  DSCF2112DSCF2110  DSCF2105DSCF2103  DSCF2101DSCF2100  DSCF2107

मी काढलेले || श्री महलक्ष्मी यंत्र ||

बेट

                                                               ॐ
बेट-

बोर्निया : इंडोनेशियाच्या जावा बेटांच्या उत्तरेला हे बेट आहे.त्याचा विस्तार ७ लाख ४८ हजार १६८ चौरस किलोमीटर
इतका आहे.या बेटावरील जंगल हे जैवविविधतेने संपन्न आहे.त्यामुळे जगभरातील संशोधक या बेटा कडे आकर्षित
होत असतात.
मादागास्कर : आफ्रिकेतून जवळ असलेले हे बेट हिंदी महासागरात आहे. ८८ दशलक्ष वर्षापूर्वी ते भारतापासून अलग झाले असे
मानले जाते. या बेटाचा विस्तार ५ लाख ८७ हजार ७१३ चौरस किलोमीटर इतका आहे.
सुमात्रा : हे इंडोनेशियाचे एक बेट असून त्यावरील सर्वात मोठे शहर म्हणजे मेदान. या बेटाचा विस्तार ४ लाख ४३ हजार ०६५ चौरस
किलोमीटर इतका आहे. या बेटाला पूर्वी ‘स्वर्णव्दिप’ किंवा ‘स्वर्णभूमी’ असे संस्कृत नाव आहे.
होंशू : हे जपानचे एक बेट आहे. त्याचा विस्तार २ लाख २७ हजार ४१३ किलोमीटर आहे. इंडोनेशियाच्या जावा बेटावर त्याचा दाट
लोकसंख्ये बाबत जगात दुसरा क्रमांक लागतो.
ग्रेट ब्रिटन : हे बेट म्हणजे जगप्रसिध्द इंग्लंड देश हे सर्वात मोठे युरोपियन बेट आहे. ग्रेट ब्रिटन ची लोकसंख्या ६० दशलक्ष
इतकी आहे.या बेटाचा विस्तार २ लाख १८ हजार ०७७ चौरस किलोमीटर इतका आहे.या बेटावरील साहसी दर्यावर्दी लोकांनी
जगभर आपले साम्राज्य निर्माण केले आहे.

खोबर चटणी

                                                                 ॐ
खोबर याची चटणी : सुक खोबर किसनी ने किसून घ्यावे किंवा विळीने बारीक काप करावेत.
प्रथम मिच्कर मधुन बारीक करुन घ्यावे त्यात तिखट,मीठ लसुन सोललेला चार पाच पाकळ्या टाकाव्यात.
रंगा साठी हळद टाकावी. परत बारीक एकजीव होई पर्यंत मिच्कर मधून बारीक करावे.छान चटणी होते .
तसेच तीळ भाजून बारीक करून त्यात हळद तिखट मीठ लसून न घातल्यास चालते चालतो.परत तीळ व मसाला एकत्र बारीक
करावा. छान तीळ चटणी होते. तसेच शेंगदाने भाजून घ्यावेत साल काढावीत (ठेवली तरी चालतात ) त्यात हळद तिखट मीठ लसून घालावा.
मिच्कर मधून बारीक करावा थोडा जास्तच बारीक केल्यास त्याला तेल सुटतं ! पूर्वी कुटत असतं असचं !
अशा चटण्या खुप दिवस राहतात .रोज जेवतांना खाव्यातं !तसेच पोहे डोसा बरोबर देता येतात.वाटल्यास वांग भाजीत मसाला म्हणून वापरता
येतो.ह्या चटण्या मी घरी स्वत: केल्या आहेत.मला लिहितांना व सांगतांना चांगल वाटत आहे.

DSCF2076  DSCF2077

श्री योगेश्वरी देवी – अंबाजोगाई

अंबाजोगाई ह्या महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील गावात एक अतिशय सुंदर असे श्री योगेश्वरी देवीचे मंदिर आहे तेथे सर्व महाराष्ट्रातून मुख्यतः कोकण भागातून खूप लोक येतात. आम्हांस थोड्याच दिवसांपूर्वी येथे जाण्याचा योग आला. छोट्या प्रवेशद्वार मधून आत गेल्यावर एक अतिशय प्रसन्न असा अनुभव येतो. मन देवी कडे आकर्षित होऊन येथेच ध्यानस्थ बसावे असे वाटते. मंदिराचा गाभारा अतिशय प्रसन्न व उबदार वाटतो. देवीचे तेज व देखणी मूर्ती डोळ्यात भरून राहते.

योगेश्वरी मुकुंदराज, संत दासोपंत खोलेश्वर व इतर देवस्थानावरून अंबाजोगाई ची ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात येते. जयवंती नदीच्या तिरावर वसलेल्या योगेश्वरी च्या नावावरून अंबाजोगाई हे नाव रूढ झाल्याचे शिलालेखा वरुन समजते. पूर्ण हेमाडपंथी मंदिर असलेल्या योगेश्वरी मंदिराचा देवी अवतर ण्यात निरनिराळ्या आख्यायिका आहेत लेण्यावर आधारित कथा आहेत. मंदिराच्या वायव्य दिशेस नाडिकाठी शिवालेने आहे दगडाच्या कोरीव सभामंडपात दाराशी दोन दगडी हत्ती आहेत मंडप याच्या मध्यभागी गुहेत शंकराची मूर्ती मंडप याच्या समोर नंदीची मूर्ती आहे. मंडप यातून परळीच्या वैद्दनाथ गेलेले भुयार आहे. आश्विन व मार्गशीष महिनात योगेश्वरी चे वार्षिक उत्सव साजरे केले जातात.

श्री योगेश्वरी देवीची पालखी दर शुक्रवारी मंदिराच्या आवारात फिरते. पालखीतील उत्सव मूर्ती भक्तांना दर्शन देते व या वेळी राजराजेश्वरीचा उदो उदो व त्रिपुरसुंदरीचा असा जयघोष उत्स्फूर्तपणे केला जातो.

काळ्या दगडात बध्लेल्या ह्या मंदिरात अगदी शांततेने बसून  दर्शन घेता येते, आम्हास कोणी हि व्यक्ती मागे लागून देवीचा अभिषेक करा किंवा पैसे द्या वगैरे म्हणून मागे लागले नाहीत. देवीच्या सानिध्ध्यात तिच्या शक्तीचा अतिशय छान अनुभव आला. आपल्यास जमेल तेंव्हा जरूर अंबाजोगाई चे दर्शनास होईन या.

पांडुरंग

पांडुरंग मंदिराचा अभ्यास ड्लरी म्हणतात हे मंदिर पाचव्या शतकात असावे.विठ्ठल मंदिर डॉ ह. धी.सांकलिया यांनी पाच हजार वर्षापूर्वी असावे असे म्हटले आहे. रामायण महाभारतात रामाने सीता शोधण्यासाठी लंकेला जाताना मंदिराला भेट दिली. ज्ञानेश्वर आणि संत नामदेव काळात वाढली. महाराष्ट्रावर बाराव्या तेराव्या शतकात पंढरीची वारी सुरु सुरु झाली .

सावळ्या विठ्ठलाची उपासना भक्त विविध नांवानी करतात पंढरीनाथ , पांडुरंग पंढरीराया, विठाई, विठोबा विठूमाउली विठ्ठल गुरुराव आदी नाव आहेत. मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी चार ही दिशांना दरवाजे आहेत.जो मुख्य दरवाजा आहे त्याला महाव्दार अथवा नामदेव दरवाजा असे म्हणतात. मंदिराच्या पश्चिम बाजूला मुख्य दरवाजा आहे याला पश्चीमव्दार असे म्हणतात.उत्तर बाजूस ३ तीन दरवाजे आहेत मंदिरात एकूण ९ नऊ दरवाजे आहेत.
गर्भागारातील विठ्ठल मूर्तीचे व्यासपीठ तीन ३ फुट उंचीचे आहे. चार ४ खांबावर आधारलेल्या या व्यासपिठाला चांदीचे नक्षीदार आवरण आहे. विठ्ठलाची सावळी मूर्ती साडेतीन फुट उंचीची असून तिचे हात काटीवर (कटीवर ) आहेत मूर्तीच्या मस्तकावर शिवलिंग आहे. गर्भागारावरील ४८ फुट उंचीचे शिखर साधे असले तरी आकर्षक आहे.

दक्षिणेकडे बाहेर अंबाबाई ,उजव्या उजव्या सोंडेचा गणपती आहे. श्री रुक्मिणी मंदिर गाभरात चौथ ऱ्यावर रुक्मिणी मातेची मूर्ती आहे. आषाढ महिनात महायात्रा असते. तसेच कार्तिक महिनात एकादशी ला यात्रा असते.

कलाकौशल्य

मी केलेले कलाकौशल्य जपून ठेवलं आहे एकत्र पाहण्यास चांगलं वाटेल ‏!

DSCF0670  DSCF0980

DSCF0669  DSCF1942

DSCF1950  DSCF0401

DSCF0601  DSCF0367

DSCF1876  DSCF0347  मी केलेले विणकाम

DSCF0649

पानावर कात्रीने कापलेली चित्रं

विडाच पान वडा च पान व कोणताही झाडाच पान ह्यावर मी गंध यांनी पान रंगविली आहेत. सरस्वती श्रीयंत्र वडाच्या पारंब्या स्वस्तीक अशी मी पान रंगवली आहेत.
आता वडाचा पानावर मी कात्रीने कापून पानाचं चित्र तयार केले केलं आहे. पानावर रांगोळी पण कापून रांगोळी तयार करता येते. पान मोठे घेऊन आंबाच्या पानावर झाड मानसं अशी चित्र काढता येतात. त्याला सराव व्हावयाला हवा.

मी दाखविण्या करता पानावर रेषा व गोल फुल दाखविण्या प्रयंत्न केला आहे. तसा कात्रीने कापलेला पाना वर रांगोळी सारखं पाहण्यास नक्कीच आवडेल सर्वांना !

DSCF1943  DSCF1944  DSCF1945

वडाची पानं

DSCF1942  DSCF1950

DSCF1946  DSCF1947  DSCF1948

पिंपळाची पानं

गणेश प्रार्थना


गणेश प्रार्थना
मोरया s मोरया s अष्टविनायक मोरया s
मोरया s मोरया s अष्टविनायक मोरया s
दुर्वाकुरच्या मळ्यात झुलला, जास्वंदी पाळणा
पाळण्यात हा छान शोभतो, गौरी पुत्र देखणा
ढोल नि ताशा, झांजा गर्जे, शंखनाद दुमदुमला
मोरगांवाचा मयुरेश्वर हा, छन छन नाचतं आला
थेऊरस्थानी, श्री चिंतामणी , आनदांने हसला
सिध्दटेकचा सिध्दिवनायक, भक्तासंगे रामला
स्वरुपसुंदर, महागणपती, रांजणगावी डोले
ओझरातला श्रीविघ्नेश्वर, पाहुनी नयन निमाले
लेण्याद्रीचा गिरिजात्मजही भूरळ घालतो मना
वरविनायक, महडगावचा, पावतसे भक्तांना
बल्लाळेश्वर, पालिग्रामी, उपवनी झोके घेई
चहुंबाजूनी, भावभक्तीचा, दरवळ तरळत येई
अष्टविनायक, दैवत अमुचे, भावे ओवाळूया
नैवेद्दाचे मोदक अर्पून, गणेशास वंदूया

– अरुण तावडे कांदिवली

महाराष्ट टाइम्स संवाद रविवार ४. ९. २०११ तारीख ला पेपर मध्ये हे लिखाण आले आहे.

DSCF1934

श्रीगणेश चतुर्थी

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर दक्षिणायन वर्षा ऋतु भाद्रपद शुक्लपक्ष श्रीगणेश चतुर्थी गणेश पूजन ४ गुरुवार आहे.चित्रा नक्षत्र तुला रास चंद्र दर्शन निषेध तसेच १ सप्टेंबर २०११ तारीख ला गणपती सार्वजनिक व घरगुती बसवतात . लोकमान्य टिळक यांनी प्रथा पाडली आहे .१०० वर्ष १२५ वर्ष झाली आहेत प्रथा सुरु झाली आहे.तसेच गौरी पण आणतात. गणपती घरोघरी ५,७,१० दिवस असतात. गौरी ३ दिवस असतात. मातीचे किंवा (PLASTER OF PARIS प्लॅस्टर ऑफ पॅरीस ) चे असतात. लोक एकत्र येण्या करता मत ऐकण्या करता ही प्रथा पाडली आहे. मी आता आमच्या घरातील कांही गणपती ची छायाचीत्र दाखवीत आहे.

DSCF0384  DSCF1235

DSCF1049  DSCF1048

DSCF0920  aca1f8502b4e

DSCF0281  DSCF1838

पोळा

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर दक्षिणायन वर्षा ऋतु श्रावण कृष्णपक्ष
(१४) ३० रविवार आश्लेषा नक्षत्र सिंह रास तारीख २८ (८)ऑगस्ट २०११ ला दर्श पिठोरी अमावास्या आहे.
पोळा असं म्हणतात .मातृदिवस असं म्हणतात .सोमवार पण २९ तारीख ला पण थोडा वेळ अमावास्या आहे.
सोमवार असल्यामुळे शिवामुष्टी (सातू) महादेव देवाला दुध व सातू देतात. घालतात.इष्टी.

शेवया ची दुध साखर घालून खीर करतात. पुरी करतात. आई सर्व मुलानां शेवयाची खीर व पुरी देऊन दोरे च वाणं देते.

DSCF0957  DSCF0925

बैल

DSCF0885  DSCF0887

शेवया

DSCF1031  रांगोळी

फेणी

शेवया  DSCF0356

शेवयाची खीर                                                साटोरी

‘तुळसीची आरती’


‘तुळसीची आरती’
जयदेवी जयदेवी जय तुळसीमाते |
दर्शनानें तुझ्या मन:शांती होते ||धृ ||
प्रात:काळी उठूनी ललना पूजा करीती |
पाणी घालूनी चरणी मस्तक ठेविती |
हळदी कुंकू लावूनी हस्तक जोडीती |
फुलें वाहुनी तुज दीप ओवाळीती ||१||
आरती गाऊनी दुग्ध वाचीती |
चरणी तुझ्या अखंड सौभानैवेद्द अर्पिती |
मनोभावे वंदुनी प्रदक्षिणा घालिती |
नित्यनेमे ‘तुळसी महात्म्य’ ग्य मागती ||२||
विष्णु अन् कृष्ण त्यांची आवडती |
विवाहोत्तर तुझ्या लग्ना आरम्भ होती |
शुभाशुभ कार्याला तुला स्मरिती |
मुक्तासाठी अंती मुखी घालिती ||३||
तुळसी, सुरसा, गौरी तुजला म्हणती |
सुलभा, सरला तुझी नांवे किती ?|
कृष्ण अन् श्र्वेत द्वय भेद हे अस्ति |
पर्ण,बीज,पंचाग ओषाधात घेती ||४||
कटूतीक्तोष्ण गुण तुज अंगी असती |
सेवनाने तुझा कफवात जाती |
मुत्ररक्त रोग दूर ते पळती |
श्र्वास -कास, शूल तुला घाबरीती ||५||
वास्ताव्यानें तुझा कृमी नष्ट होती |
रोगनाशास्तव कुष्ठी तुज भक्षिती |
‘तुळसीमाळा’ घालूनी गळा जप जपिती |
आयुर्वेदात तुझे महत्व हे किती ? ||६||
———————-O ———————————–
सौ मेधा देशपांडे .
——————
१६.९.९१

प्राची भगिनी मंडळ च्या काव्य गायनातील प्रथम पारितोषिक मिळाले आहे.
माझी तुळसी ची आरती आयुर्वेदीक आहे.

DSCF0733

राजीव जी गांधी

माननीय माजी पंतप्रधान राजीव जी गांधी
यांचा २० ऑगस्ट ला वाढदिवस असतो !
त्यांना माझे मनापासून वदंन !

rajiv gandhi  DSCF1597


माझी सख्खी मोठी बहीण कमलताई ह्यांचा पण
२० ऑगस्ट ला वाढदिवस आहे.
त्यांना माझा नमस्कार !

DSCF1902  DSCF1575

श्रावण महिना

स्वस्ति शालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर दक्षिणायन वर्षाऋतु श्रावण शुक्लपक्ष नक्षत्र आश्लेषा १ प्रतिपदा रविवार जुलै ३१ २०११ तारीख श्रावण महिना सुरु होत आहे.हया महिनात दरवार ला महत्व आहे. रविवार सूर्य याची पूजा करतात. विडाच्या पानावर सुदर्शनचक्र काढतात. आदित्यराबाईची पूजा करतात. सोमवार महादेव याची पूजा करतात सकाळी ऊपवास करुन संध्याकाळी सुर्यास्तानंतर जेवन करणे ऊपवास सोडतात. महादेव याला बेल व मुग तिळ तांदुळ सातू याची शिवामुठ वाहतात. मंगळवार मंगळागौर करतात.बुधवार बुधब्रहस्पती ची पूजा करतात. गुरुवार ब्रहस्पती याची पूजा करतात. शुक्रवार ज्यूती ची पूजा करतात मुलांना आई ओवाळते. स्ववांष्ण जेवायला बोलावतात. पूरणपोळी करतात. शनिवार शनिची पूजा करतात. मुंजा मुलगा याला जेवायला बोलावतात. तसेच नागपुजा राखीपोर्णीमा कृष्णजन्म पिठोरी अमावास्या मातृदिवस असा सर्व श्रावण महिना सन साजरा करतात.

पूजा करतांना आधी पूजा च साहित्य याची तयारी करतात. हळद कुंकू देठासगट वीडा याची पान सुपारी हळकुंड अख्खे बदाम खारीक गुळ खोबर पंचामृत (दुध मध तुप दही साखर) कापूस वाती व फूलवाती तुपातल्या सहान खोडवर उगाळलेल गंध घंटा दक्षिणा लाल रक्तचंदन वासाच अत्तर तांदुळ ओले हळद कुंकू लावलेले अक्षदा फूल पत्री तुळस दुर्वा नैवेद्द साठी केळं फळ असं आधी पूजा याची तयारी करतात.

DSCF1837  DSCF1839

DSCF1843  DSCF0669

रविवारची आदित्य राणूबाईची सूर्याची पूजा करतात मी केली आहे.

वक्तीमत्व

मी ब्लॉग पोस्ट लिखाण केले आहे. वर्तमानपत्र व साप्ताहिक मासिक व मी काढलेले रांगोळ्या महात्वाचं श्रीयंत्र कागदावरचं रंगीत श्रीयंत्र तसेचं काचेवर मेंदीन काढलेले चित्र. सतार शिकले ह्याची माहिती दिली आहे .पाककृती मी केलेली लिहिली आहे.घरातील पुस्तकं इतारांच घरगुती लिखानं घरगुती ईतर थोर व्यक्ती यांची छायाचित्र तसेच लिखान करताना कांही छायाचित्र लावली आहेतं. घरातील कुंडीतील झाड ईतर फूल व बरेचं छायाचित्र व ईतर माहिती मी पोस्ट मध्ये लिहिली आहे. ह्यामुळे मी केलेलं वाचनं मी केलेलं कलाकोशल्य मी केकेली पाककृती घरातील राहणीमान नातेवाईक समाजातं वावरतांना माझं वक्ती मत्व दिसून येतं. हे सर्व लिहिताना वेळ आहे म्हणून लिहिले आहे असं वाटणारं ! एवढं वाचन कला पाककृती घर सजावटं जवळ असल्यामुळे मला हे सर्व लिखाण करायला मिळालं आहे.ह्याचं मला स्वत: ला खूपचं समाधान अभिमान वाटतं आहे. मी S.S.C.पास झाले आहे. मी मराठी टाईपराईटर वर मराठी टाईप केले आहे. परीक्षा पण दिली आहे. साडी,रुमाल पेंटिंग केले आहे. हे नक्कीचं ! ब्लॉग पोस्ट २४४ झाले आहेतं. व प्रतिक्रिया व भेटी ११०७६ झाले आहेत. आजपर्यंत तारीख २८ जुलै (७) २०११.

संगणक

संगणक करतांना मी संगणक याची काळजी घेते. प्रथम संगणक याचं लाईट चं बटन चालू करते.
संगणक दार उघढून संगणक कुक कुक असा आवाज येतो चित्र येतात E (ई मेल) S (स्काईप) ईतर संगणक मध्ये आल्यावर कनेश्नन कनेंक्ट करते.
पासवर्ड आपोआप येतो नंतर मी E S ईंटरनेट स्काईप ब्लॉग E सर्व बघून गुगल मराठी टाईप करून पेस्ट करुन छायाचित्र घालण्यास शिकले. सेंड करते. माझ्या हॉटमेल मध्ये सेंट मध्ये बघते.
बरोबर आले आहे का?ते. नंतर हॉटमेल वर येते. कनेंश्नन कनेंक्ट कानेंश्नन करते.
संगणक बंद होतो नंतर लाईट संगणक चा बंद करते. संगणक पण बंद करते. चांगली संगणक याची काळजी घेते.

Sony Vaio CR laptop

व्यासपोर्णिमा

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर दक्षिणायन ग्रीष्मऋतु आषाढ शुक्लपक्ष १५ शुक्रवार आषाढ पोर्णिमा गुरुपोर्णिमा व्यासपोर्णिमा झाली आहे. गुरुपोर्णिमा म्हणजे व्यास ऋषी यांनी गणपती ला एकादमात महाभारत सांगितले व गणपती ने एकादमात सर्व महाभारत लिहून काढले.हे तर महत्वाचे आहेच.

पण गुरु म्हणजे शिक्षक व विद्दार्थी जेंव्हा गुरु चा अभ्यास ध्यानात लक्षात ठेवुन आपण काय शिकलो काय विद्दा शिकलो याचं स्मरण ध्यानन लक्षात ठेवण गुरुंना नमस्कार करुन मान देण वंदन करण हे गुरु पोर्णिमा चं महत्व आहे. तसेच ५ सप्टेंबर पण शिक्षक दिन मानतात.

५ सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांचा वाढदिवस असतो.

शिक्षकदिन मानतात.व शिक्षक यांना त्यादिवसात पुरस्कार पण देतात.

DSCF1736

बारावी परीक्षेचे निकाल

धांदल प्रवेशाची : बारावी परीक्षेचे निकाल लागले जाहीर झाले. आता दहावीच्या परीक्षेचे निकाल लागतील. या दोन्ही कारकीर्दीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असतात.हे निकाल लागले की पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी धावपळ सुरु होते.कारकिर्दीच्या अनेक नवनवीन वाटा निर्माण होऊ लागल्या आहेत

त्यामुळे कोणता अभ्यासक्रम सुरु करावा हा विद्दार्थाला प्रश्र्न असतो. कोणता अभ्यासक्रम आपल्यासाठी सोयीस्कर आहे हे ठरवावे. एकदा घेतलेल्या निर्णयात बदल करु नये. अशी सवय लागाली की कोणत्याचं क्षेत्रात स्थिर राहणे शक्य असते.

कांही वेळेला काहींचा आत्मविश्वाश डळमळीत होतो आणी ते अभ्यासक्रम अर्धवट सोडून गावी परततात. आयुष्याचे नुकसान ही होण्याची शक्यता असते.

पालकांनी मुलांना धीर व खंबीर पाठबळ देणे आवश्यक असतें.

DSCF1678  DSCF1680

आंब्याचा रसाचा शिजविलेला गोळा  !

इराणी हॉटेल

इराणी हॉटेल मुंबईचे सांस्कृतिक भूषण : कल्पक, उद्दोजक पारशी धनिकांनी शिक्षित इराणी लोकांना आपल्या उद्दोगधंद्दांतून,आस्थापनांतून सामावून घेतले. अनेकांना हॉटेल धंदा उभारण्यास मदत केली. १९ व्या शतकाच्या अखेरपर्यंत मुंबईत भरपूर मोकळ्या जागा उपलब्ध होत्या. इराण्यांनी १८५० पासूनच कोपऱ्यावरच्या या मोक्याच्या जागा आपल्या हॉटेल धंद्दासाठी व्यापण्यास सुरुवात केली आणि हळुहळू इराणी हॉटेल मुंबईच्या संस्कृतीचा भाग होता गेली.

मध्यमवर्गीय घरात शालेय वयातील मुलांना महिन्याच्या खर्चासाठी फक्त सणासुदीला, वाढदिवसाला दोन – चार आणे देतं असतं.

त्या काळात नाक्यावरचा इराणी म्हणजे पंधरा पैशांत एका कप चहा वर परत पंख्याचा वारा व वाचायला ताजे वर्तमानपत्र फुकट. लोक यांच्या हॉटेलमध्ये चक्क ‘शब्दरंजन’ कोडी सोडवत बसतं.

ऐतिहासिक, सामाजिक आणि आर्थिक दृष्टीने इराणी हॉटेल हा एक अभ्यासाचा विषय आहे.

त्याकाळी ट्राम होत्या. मी ट्राम मध्ये बसले आहे. त्यावेळेला बग्गी पण होती. मी बग्गीत बसले आहे.

रांगोळी श्र्लोक

रांगोळी ने  नी श्र्लोक लिहीले आहेतं  ! मी स्वतः रांगोळीने श्र्लोक लिहिले आहेत. छायाचित्र पण मी स्वतः काढले आहेत.

DSCF1665  DSCF1666

DSCF1676  DSCF1673

DSCF0865  DSCF1669

DSCF1668    DSCF1675

शनैश्चर जयंती

श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर ३० बुधवार दर्श भावुका  अमावास्या, शनैशचर  जयंती

बुधवार  १ जून (६) २०११ तारीख ला दर्श भावुका अमावास्या, शनैश्चर  जयंती आहे. आरती लिहिली आहे.

श्रीशनिदेवाची आरती

जय जय श्रीशनिदेवा | पद्मकर शिंरीं ठेवा ||आरती ओंवाळितो |मनोभावें करुनी सेवा ||धृ.||

सुर्यसुता शनिमुर्ति तुझी अगाध कीर्ति || एक मुखें काय वर्णू | शेषा न चाले स्फूर्ती ||जय.||१||

नवग्रहामाजीं श्रेष्ठ | पराक्रम थोर तुझा || ज्यावरी तूं कृपा करीसी | होय रंकाचा राजा ||जय.||२||

विक्रमासारिखा हो | शककर्ता पुण्यराशी || गर्व धरितां शिक्षा केली | बहु छळियलें त्यासी ||जय.||३||

शंकराच्या वरदानें | गर्ग रावणें केला || साडेसाती येतां त्यासी | समूळ नाशासी नेला ||जय.||४||

प्रत्यक्ष गिरुनाथा | चमत्कार दावियला || नेउनि शूळापाशीं | पुन्हां सन्मान केला ||जय.||५||

ऐसे गुण किती गाऊं | धनी न पुरे गाता || कृपा करी दीनावरी | महाराजा| समर्था ||जय.||६||

दोन्ही कर जोडुनीयां रुक्मा लीन सदा पायीं || प्रसाद हाचि मागें उदयकाळ सौख्यदावी ||

जय जय श्रीशनिदेवा | पद्मकर शिरीं ठेवा. ||७||

गणपती

गणपती वर क्लिक करा आणि मग गणपतीच्या डोळ्यात पहा !

संगणकारणे बनविलेली गणपतीची प्रतिमा ईंटरणेट मध्ये सापडली आहे.
डोळे छान कोणाशी बोलतांना दिसतात. आवडणारचं ! गणपती व गणपती चे डोळे बघायला !

ATT00001

dscf1638

कुंडीतील झाडं

पूर्वी घरातचं कुंडीतं लावलेली फूल तुळस इतर लावलेली रोपं  झाड आजही अशी पाहण्यास चांगली छान वाटतात ! आता जून ७.६.२०११ उत्तरायण ग्रीष्मऋतु जेष्ठ शुल्कपक्ष  आश्लेषा नक्षत्र सुरु होईल ! सर्वजन नवीन रोप कुंडीतं लावतील ! शेतकरी नवीन बी रोपण करुन धान्य तयार करतील !

५ जून ला रोप लावतात ! जागतिक पर्यावरण दिन ! World Environment Day ! जागतिक पर्यावरण दिन हा जगभर ५ जून रोजी पाळला जाणारा दिवस आहे. २१ तारखेला दक्षिणारांभ सुरु होतं असतो. व दिवस रात्र सारखं असतं नंतर दिवस लहान होतं असतो व रात्र हळू हळू मोठी होतं असते. २० जून २१ जून २२ जून असे तीन दिवस असतातं. नंतर दक्षीणायन सुरु होतं असते. पूर्वी लावलेले कुंडीतील रोप फूल तुळस पाहण्यास आज ही छान वाटतं !

DSCF0281  गणपती दुर्वा

DSCF0825  DSCF0804

DSCF0515  DSCF0362DSCF0926  DSCF1308

फ्रीज

फ्रीज : फ्रीज म्हणजे पदार्थ चांगले राहण्याकरता वीज वर चालणारे कपाट ! त्यामध्ये भाज्या शिजविलेले पदार्थ मुंग्या पदार्थांना होऊ नये शेंगदाणे रवा ह्यांना मुंगी होण्याची शक्यता असते त्यासाठी फ्रीज मध्ये ठेवल्यास चांगले बरेचं दिवस असे पदार्थ राहातातं.

रोज शिजविलेले भाजी सांबार आंबटी फ्रीज मध्ये ठेवू नका. ठेवू नये. त्यातील सर्व पाणी कमी होऊन घट्ट होतं. व गार ईतक होतं की परत नेहमी सारखं होण्यास बरेच तास लागतातं.बाहेर निट झाकले की छान राहातातं. लगेच हवे हवं तेंव्हां पटकन खावयाला देता येयातं.आपल्याला पण पाहिजे तेंव्हा पटकन खाता येते दुपारी कांही काता येते.

उरलेले अन्न फार दिवस खाऊ नये खाऊ नका.किंवा त्यात मसाला पीठ घालून तळून काडू नये नका. पाहुणे आले की ते पण कांही बरोबर पदार्थ आणतातं

शीळ वाटल्यास गाई म्हशी शेळी ह्यांना खराब होण्याआधी खाण्यास ध्यावे धावं. कांही ठिकाणी अजूनही गाई ला रोज खाण्यास देण्याची प्रथा आहे. शहरात पण गाई असतातं. आमच्या रोज गाई ला आई (वहिनी) गाई ला खावयाला देतं. असतं ! देवळात गाई असतातं आमच्या कोल्हापूर येथे आमच्या घरा समोरचं गाई म्हशी शेळी रोज येतातं. मी पण रोज नाही पण केंव्हा केंव्हा गाई म्हशी शेळी यांना खाण्यास देतं असते. हरबरा सोललेला फळं यांची सालं एका पाहुणे आले त्यांनी भरपूर पुरण पोळी आणली घरीच ठेवली. मी बरीच गाईला दिली. सणा वाराला कांही गोड केलं पुरण पोळी केली की मी पण गाई ला घास भरविते.

videocon refrigerator

स्टँड

स्टँड : आपण स्वंयपाक करतांना ओटा व भांडी याची निट रहावं याची काळजी घ्यावयाला हवी. गरम कुकर एकदम ओटावर ठेवू नये नाही.छोटे स्टँड मिळतात १०/२० रुपया पर्यंत मिळतात. त्याचा वापर करावा. गरम भाजी आंबटी ची पातले वा बटाटा वडे तेलाची कढई लाडू केलेले पातेलं व कढई निर्लेप असो वा तांब असलेले स्टील पातेल असो असे गरम पातेली कुकर स्टँड वर ठेवावेतं. म्हणजे ओटा खराब होता नाही. चकाकी पण ओटा ला राहते. हल्ली संगम रवरी व रगींट हिरवे लाल स्वच्छ काळा दगड असलेले ओटा तयार करतातं तर हया ओटा ची आपण नक्कीचं काळजी घेण्यास हवी !

त्यासाठी गरम कुकर गरम कढई गरम तांब असलेलं स्टील पातेलं स्टँड वापरुन ओटा ची काळजी घ्यावी.

स्वंयपाक ओटा ची काळजी घेण्यास हवी !

DSCF1625   DSCF1630

%d bloggers like this: