आपले स्वागत आहे!

Archive for the ‘संस्कृत’ Category

मार्गशीर्ष पोर्णिमा

मार्गशीर्ष पोर्णिमा: स्वस्ति शालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर दक्षिणायन हेमंतऋतु मार्गशीर्ष शुक्लपक्ष शनिवार १५ पंधरा तसेच डिसेंबर १० २०११ तारीख ला मार्गशीर्ष पोर्णिमा व श्रीदत्तात्रेय जयंती आहे.

आग्रहायणी, खग्रास चंद्रग्रहण आहे.श्रीदत्त जन्म सकाळी सहा ६ वाजता दुपारी व संध्याकाळी असा वेळेला केंव्हा ही करतात.गाणगापूर वाडी व ईतर गावात श्रीदत्त जन्म करतात.

चंद्रग्रहण असले तरी वेळ पाहुन श्रीदत्त जन्म करतात. चंद्रग्रहण चंद्र उगववतांना उगोवतांना वा किंवा रात्री चंद्रग्रहण लागते. व चंद्रग्रहण सुटते रात्रीच. सूर्य पृथ्वी व चंद्र एका लाईन मध्ये एका रेषेत कक्षेत येतात.जसा पृथ्वी फिरेल तसतसे चंद्रग्रहण लागते. तसेच परत पृथ्वी फिरेल तसे चंद्रग्रहण सुटते.

पोर्णिमा ला चंद्र ग्रहण असते. अमावस्या ला सूर्य ग्रहण असते. सूर्य चंद्र व पृथ्वी एका
रेषेत येतात. व सूर्य ग्रहण लागते. पृथ्वी फिरेल तसे सूर्य ग्रहण लागते.व पृथ्वी फिरेल तसे सूर्य ग्रहण सुटते.

आज मार्गशीर्ष पोर्णिमा आहे. खग्रास चंद्रग्रहण आहे.

DSCF2132

Lunar Eclipse

श्रीमहालक्ष्मीची आरती

||श्रीमहालक्ष्मीची आरती||

जय देवी जय देवी जय महालक्ष्मी | वससी व्यापकरुपें तूं स्थूलसूक्ष्मी ||धृ.|| करविरपुरवासिनी सुरवरमुनिमाता | पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकान्ता || कमलाकरें जठरीं जन्मविला धाता | सहस्त्रवदनीं भूधर न पुरे गुण गातां ||१|| मातुलिगं गदा खेटक रविकरणीं | झळके हाटक -वाटी पियुषरसपाणी | माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी | शशिकरवदना राजस मदनाची जननी ||२|| तारा शक्ति अगम्यशिवभजकां गौरी | सांक्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारीं || गायत्री निजबीजा निगमाग सारी | प्रगटे पद्मावती नजधर्माचारी ||३|| अमृतभरिते सरिते अघदुरिते वारीं | मारी दुर्घट असुरां भव दुस्तर तारी || बारीं मायापालट प्रणमत परिवारीं | हे.रूप विद्रुप दावीं निर्धारीं ||४|| चतुराननें कुश्र्चित कर्माच्या ओळी | लिहिल्या असतील माते माझे निजभाळीं || पुसोनि चरनातळीं पदसुमनें क्षाळीं | मुक्तेश्र्वर नागर क्षीरसागरबाळीं || जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ||५||

सार्थ महालक्ष्मी स्तोत्रम्

सार्थ

|| महालक्ष्मी स्तोत्रम् ||

श्रीगणेशाय नम: |

इदं स्तोत्रं महापुण्यं लक्ष्म्यगस्तिप्रकिर्तितम् |
विष्णुप्रसादजननं चतुर्वर्गफलप्रदम् ||२९||

राजव्दारे जयश्र्चैव शत्रोश्र्चैव पराजय:
भूतप्रेतपिशाचानां व्याघ्राणां न भयं तथा ||३०||

न शस्त्रानलतो यौधाभ्दयं तस्य प्रजायते |
दुर्व्टत्तानां च पापानां बहुहानिकरं परम् ||३१||

मंदुराकरिशालासु गवां गोष्ठे समाहित: |
पठेत्तद्दोषशांत्यर्थं महापातकनाषणम् ||३२||

सर्वसौख्यकरं नृणामायुरारोग्यदं तथा |
अगस्तिमुनिना प्रोक्तं प्रजानां हितकाम्यया ||३३||


अर्थ – हे महापुण्य दायक स्तोत्र लक्ष्मी ने अगस्ती ऋषीं च्या मुखाने प्रगट केले. ते विष्णूची कृपा प्राप्त करून देते आणि चारही प्रकारचे फळे देते.(धर्म,अर्थ काम व मोक्ष देते. ||२९||

राजसभेत जय मिळेल, शत्रूचा पराभव होईल, भूत प्रेत व पिशाचे तसेच वाघापासून भीती
उरणार नाही. ||३०||

शस्त्रापासून, अग्निपासून व युध्दामध्ये त्याला भीती नसेल आणि दुर्जनांच्या दुष्कृत्यांचा समूळ नाश होईल. ||३१||

घोड्यांची पागा, पिलाखाना, गाईंचा गोठा या ठिकाणी एकाग्र चित्ताने, दोषांच्या शांतीसाठी व महापातकांपासून निवृत्ती होण्यासाठी याचे पठण करावे. ||३२||

तसेच हे स्तोस्त्र मानवांना आयुष्य व आरोग्य देणारे आणि सर्व प्रकारे सुखी करणारे आहे. हे लोकांच्या कल्याणाच्या इच्छेने अगस्ती मुनी च्या व्दारे सांगितले गेले. ||३३||

इत्यगस्तिविरचितं श्रीमहालक्ष्मीस्तोत्र संपूर्णम ||

*   *   *

सार्थ महालक्ष्मी स्तोत्रम्

सार्थ
|| महालक्ष्मी स्तोत्रम् ||
श्रीगणेशाय नम: |

|| श्रीमहालक्ष्मीस्तोत्रम् ||

किं लक्ष्मी बहुनोक्तेन जल्पितेन पुन: पुन: |
अन्यन्मे शरणं नास्ति सत्यं सत्यं हरिप्रिये ||२३||

एतच्छ्रुत्वा s गस्तिवाक्यं हृष्यमाणा हरिप्रिया |
उवाच मधुरा वाणीं तुष्ठा s हं तव सर्वदा ||२४||

लक्ष्मीरुवाच ||
यत्त्वयोक्तमिदं स्तोत्रं पठिष्यति मानव: |
श्रुणोति च महाभागस्तस्याहं वशवर्तिनी ||२५||

नित्यं पठति यो भक्त्या त्वलाक्ष्मिस्तस्य नश्यति
ऋणं च नश्यते तीव्रं वियोगं नै पश्यति ||२६||

य: पठेतत्प्रातरुत्थाय श्रध्दाभक्तिसमन्वित: |
ग्रहे तस्य सदा स्थास्ये नित्यं श्रिपतिना सह ||२७||

सुखसौभाग्यसंपन्नो मनस्वी बुध्दिमान् भवेत |
पुत्रवान् गुणवान् श्रेष्ठो भोगभोक्ता च मानव: ||२८||

अर्थ – हे लक्ष्मी, फार काय बोलू ? आणि वारंवार तेच ते कितीदा
सांगू ? हे हरिप्रिये, मी अगदी खरे खरे सांगतो की तु झ्याशिवाय
मला दुसरी कडे कुठेही शरण जावयाचे नाही. ||२३||

असे अगस्ती ऋषीं चे बोलणे ऐकून ती हरीचा वल्लभा आनंदित
झाली आणि गोड अशा आवाजाने म्हणा ली की “मी”
नेहमीच तुझ्या वर संतुष्ट आहे. ||२४||

तुझ्याकडून उच्चारले गेलेले हे स्तोत्र जो प्रीतीने म्हणेल, ऐकेल तो महाभाग्यवान होईल (कारण) मी त्याला वश होऊन राहीन.||२५||

जो याचे भक्तिपूर्वक नित्य पठण करील त्याच्या दारिद्र याचा नाश होईल.
तो डोईजड अशा कर्जा पासून मुक्त होईल आणि माझा व त्याचा वियोग होणार नाही ||२६||

जो पहाटे उठून श्रध्दा आणि भक्ती पूर्वक याचे पठण करील त्याच्या घरांत मी श्रीपतीसह सदैव स्थिर राहीन.||२७||

मग तो मनुष्य सुख व सौभाग्य युक्त, मनोबल संपन्न, पुत्र संपन्न, गुणी व श्रेष्ठ होईल
आणि सर्व प्रकारचे भोग भोगील. ||२८||

सार्थ महालक्ष्मी स्तोत्रम्

सार्थ
|| महालक्ष्मी स्तोत्रम् ||
श्रीगणेशाय नम: |

|| श्रीमहालक्ष्मीस्तोत्रम् ||

दैन्यार्तिभीतं भवतापपिडितं | धनैर्विहीनं तव पार्श्र्वमागतम् |
कृपानिधित्वान्मम लक्ष्मी सत्वरं | धनप्रदानाध्दननायकं कुरु ||१७||

मां विलोक्य जननि हरिप्रिये | निर्धनं तव समीपमागतम |
देहि मे झटिती लक्ष्मि कराग्रं | वस्त्रकांचन वरान्नमभ्दुम् ||१८||

त्वमेव जननी लक्ष्मी पिता लक्ष्मी त्वमेव च |
भ्राता त्वं च सखा लक्ष्मी विद्दा लक्ष्मी त्वमेव च ||१९||

त्राहि त्राहि महालक्ष्मि त्राहि त्राहि सुरेश्र्वरि |
त्राहि त्राहि जगन्मातर्दारिद्रयात्त्राहि वेगत: ||२०||

नमंस्तुभ्यं जगध्दात्री नमस्तुभ्यं नमो नम:
धर्माधारे नमस्तुभ्यं नम: संपत्तिदायिनि ||२१||

दारिद्रयार्णवमग्नो S हं निमग्नो S हं रसातले
मज्जंतं मां करे धृत्वा सूध्दर त्वं रमे द्रुतम् ||२२||

अर्थ – गरिबी आणि संकटे यांनी भ्यालेला,तसेच प्रपंचाच्या तापाने पीडलेला असा मी तुझ्यापाशी आलो आहे,तेव्हा तुझ्या सहज कृपाळू स्वभावानुसार मला तात्काळ प्रचुर धन दे आणि धनवंत कर. ||१७||

आई हरिप्रिये ! नर्धन असा मी तु झ्या जवळ आलो आहे तेव्हा मजाकडे दृ ष्टी टाक.हे लक्ष्मी, लौकर वस्त्रे, सोने आणि उत्कृष्ट प्रकारचे अन्न माझ्या हाती दे. ||१८||

हे लक्ष्मी, तूच आई अन् तूच बाप, तूच भाऊ आणि मित्र तसेच विद्दा ही तूच आहेस. ||१९||

हे देवांची स्वामिनी आणि जगताच्या माते महालक्ष्मी, मला तारून ने ! दारिद्र्यां मधून मला शीघ्र गतीने बाहेर काढ. ||२०||

हे जगताच्या आधारभूत अशा तुला नमस्कार, तुला नमस्कार, पुन्हा पुन्हा नमस्कार. हे धर्माला आधारभूत अस णा ऱ्या तुला नमस्कार आणि संपत्ती देणाऱ्या तुला नमस्कार. ||२१||

मी दारिद्र्य रुपी समुद्रात बुडालो आहे.मी पार रसातळाला गेलो आहे. यात ग टांग ळ्या खाना ऱ्या मला हे रमे, तू हाती धर आणि त्वरेने माझा उध्दार कर. ||२२||

सार्थ महालक्ष्मी स्तोत्रम्

सार्थ
|| महालक्ष्मी स्तोत्रम् ||
श्रीगणेशाय नम: |

पांडित्यं शोभते नैव न शोभिन्ति गुणा नरे |
शिलत्वं नैव शोभेत महालक्ष्मी त्वया विना ||१२||

तावव्दिराजते रूपं तावछ्चीलं विराजते |
तावग्दुणा नराणां च यावल्लक्ष्मी: प्रसीदति ||१३||

लक्ष्मी त्वयालंकृतमानवा ये पापैर्वित्का नृपलोकमान्या:
गुणैर्विहिनागुणिनो भवन्ति दु:शीलीन: शीलवतां वरिष्ठा: ||१४||

लक्ष्मीर्भूषयते रूपं लक्ष्मीर्भूषयते कुलम् |
लक्ष्मीर्भूषयते विद्दां सर्वाल्लक्ष्मीर्विशिष्यते ||१५||

लक्ष्मी त्वग्दुनाकीर्तनेन कमला भुयात्पलं जिह्मतां |
रुद्राद्दा रविचंद्रदेवपतयो वत्कुं च नै क्षमा: |

अस्माभिस्तव रुपलक्षनगुणान्वत्कुं कथं शक्यते |
मातर्मा परिपाहि विश्र्वजननि कृत्वा ममेष्ठं द्रुवम् ||१६||

अर्थ – हे महालक्ष्मी ! तुझ्याशिवाय विव्दत्तेला शोभा येत नाही,
मनुष्याच्या गुणांना पण शोभा येत नाही आणि त्याच्या
शिलाला पण शोभा नाही . ||१२||

जो पर्यंत लक्ष्मीचा कृपाप्रसाद आहे तो पर्यंतच
मनुष्याचे शील, गुण आणि रुप या गोष्टींचा गौरव होतो. ||१३||

हे लक्ष्मी ! तुझी कृपा ज्यांच्यावर होते ते लोक पापांपासून
मुक्त होतात आणि राजा व प्रजा यांना प्रिय होतात. गुण अंगात
नसलेला सुध्दा गुणवान होतात, तर शीलहीन लोकही श्रेष्ठ असे
शीलवान होतात. ||१४||

रूप कुळ आणि विद्दा या गोष्ठी लक्ष्मी मुळेच भूषविल्या जातात ,
म्हणूनच लक्ष्मी चे स्थान हे सर्वोपरि आहे. ||१५||

लक्ष्मी, तुझ्या गुणांचे वर्णन करता करता कमला लाजून क्षणमात्र
स्तब्ध झाली. रुद्रू आदिकरून, सूर्य चंद्र देवराजइंद्र हे सुध्दा वर्णन करू
शकत नाहीत. मग तुझे रुप गुण यांचे वर्णन करणे आम्हाला कसे बरे
शक्य होईल ? तरी आई विश्र्वमाउली, तू माझे चिरंतन स्वरूपाचे कल्याण
कर आणि मला तारून ने. ||१६||

जप

माझ्या सख्ख्या भावाची मुलगी देशपांडे माझी मोठी सख्खी भाच्ची आहे. ती रोज जप लिहित आहे. त्यातील काहीं जपाचे नमुने मी पहिले आहेत. मला ते आवडले आहेत. म्हणून मी त्यातील काहीं जपाचे लिहिलेले कागद व जपाच्या कागदाचे छायाचित्र दाखवत आहे. आपल्याला ते पाहण्यास नक्कीच आवडणार !

DSCF1920  DSCF1921

DSCF1922

संस्कृत

%d bloggers like this: