आपले स्वागत आहे!

दिवाळी शुभेच्छा!

आकाश दिवा 

                                                 ॐ

इसवी सन २०१५ नोवेंबर ११बुधवार

मन्मथनाम संवत्सर १९३७ संवत्सर
आश्र्विन कृष्णपक्ष दर्श अमावास्या

उल्कादर्शन लक्ष्मी कुबेर पूजन      

ॐ दिवाळी त स्वच्छता साठी लक्ष्मी पूजन च्या दिवस ला

         केरसुणी            ची पूजा करतात दिवाळी शुभेच्छा

 

 

 

दिवाळी शुभेच्छा !

                                                                     

 

                                                                            श्रीयंत्र

                                                            कुबेर यंत्र

                               केरसुणी  पूजन      

दिवाळी फराळ

                       ॐ

दिवाळी शुभेच्छा !

फराळ !

शेव, अनारसा, मका चा चिवडा,
गहू रवा गूळ साटोरी

 

                                 ॐ                                           

कागदी आकाश दिवा

दिवाळी शुभेच्छा

 

झेंडू ची फुल रांगोळी

                                ॐ

दिवाळी शुभेच्छा

झेंडू ची फुल रांगोळी

                                     ॐ

दिवाळी त

माती ची पणती कापूस च्या दोन वाती तेल यांनी दिवा लावून दिवाळी साजरी करतात.

मेणबत्ती नाही

धने गूळ अक्षदा वापरतात

दिवाळी शुभेच्छा

                               ॐ

इसवी सन २०१५

शक १९३७मन्मथनाम संवत्सर

आश्र्विन कृष्णपक्ष दिवाळी शुभेच्छा

धनत्रयोदशी दिवाळी शुभेच्छा

               ॐ

इसवी सन २०१५

मन्मथनाम शक १९३७ आश्र्विन कृष्णपक्ष

दिवाळी शुभेच्छा !

ॐ दिवाळी फराळ

 

 

 


                 ॐ

इसवी सन २०१५

मन्मथनाम शक १९३७संवत्सर

आश्र्विन कृष्णपक्ष धनत्रयोदशी

दिवाळी शुभेच्छा

किल्ला

       ॐ

इसवी सन २०१५

दिवाळी शुभेच्छा

किल्ला

     ॐ                    नोवेम्बर 2015
                          आश्र्विन कृष्णपक्ष
                              दिवाळी किल्ला

ब्लॉग वाचक यांना नमस्कार!
विनंति विषेश. 

दिवाळी त किल्ला करण्याची पद्दत आहे.
मुलांना शाळे च्या सुट्ट्या लागलेल्या असतात.
राजे शिवाजी यांनी जे किल्ले जिंकले त्याची आठवण
राहण्या साठी किल्ला यांना नाव देऊन किल्ला बनवतात.
व माती त शुध्द हवा साठी खेळण्या साठी किल्ला बनवतात.
माती त हात किल्ला व झाडे लावणे आरोग्य च्या साठी पण
चांगले असते.
घरा पुढे दिवाळी आहे उच्छाह साठी किल्ला बनवतात.

मी आमच्या घरी ग्यालरीत किल्ला बनविते मस्त ह्या वय मध्ये
पण उच्छाह व मन भरून आनंद मनात असतो.

दिवाळी शुभेच्छा !

dscf1182_thumb1dscf1188_thumb

img_34931IMG_20151106_191341

img_01581_thumbdscf32742

img_3598114img_390811

                     ॐ

कोल्हापुर येथील महानगर पालिका चा निकाल

कॉंग्रेस विजयी अभिनंदन!

संगणक मधील सकाळ ची बातमी आहे.

 

कोल्हापूर – कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचे

निकाल जाहीर झाल्यानंतर

सोमवारी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी असा जल्लोष केला.

फोटो गॅलरी >>

 

                       ॐ                कोल्हापुर
                                             २ नोव्हेबंर

दुर्गा सोसायटी वास्तू

दिनांक 1984 / १९८४ साल ला
कोल्हापूर दुर्गा सोसायटी चा वास्तू चा दिवस.
आम्ही कोल्हापूर येथे ईसवी सन १९६७ साल ला आलो
भाड्याचा घरात राहत होतो. कोल्हापूर तेंव्हा पासून वास्तव्य आहे.
आता ४८ आठ्ठे चाळीस वर्ष झालीत कोल्हापूर मध्ये
खूप फरक बदल झाला आहे.

आह्मी नवरात्र मध्ये च घरात वास्तू पूजा केली व राहण्यास आलो
राहिला आलो अस पोस्ट पत्र याने सर्वांना कळविले.
सर्व सोसायटी ची वास्तू साठी सर्व कोणी राहिला आले नव्हते.
एका  वास्तू  मध्ये सोसायटी वास्तू करण्याचे ठरले.
आम्ही राहिला आल्यामुळे मी पुरण पोळी व सर्व नैवेद्द केला.
दुसऱ्या वास्तू त आरती चालू झाली आणि आमच्या घरात
पुणे येथून बाबा माझे सासरे व आत्या सासुबाई अक्का
अचानक आले. व आम्हाला खूप बरं वाटलं.
न बोलावता मन तेथे जात व आज आपण कोल्हापूर येथे जाव वाटून
सहज दोघ बरोबर वास्तू च्या वेळेला आलेत जास्त महत्व आहे
मन कसं धावत आज अण्णा कडे जाऊ असं वाटणं व जमण
याला शक्ती म्हणतात तेथ पर्यंत पोहचण्याची.
आरती झाली सर्व वास्तू चे लोक पुरण पोळी चा नैवेद्द घेण्यास
आमच्या घरी आले व आमच्या घराची पण वास्तू केली गेली
सोसायटी ची होणार साठी आम्ही होम पूजा केली नव्हती
पुरण पोळी चा नैवेद्द व बाबा सासरे व अक्का आत्या सासूबाई यांचा पण
आशीर्वाद आम्हाला मिळाला त्यांना आज पण नमस्कार !

ॐ आता प्रणव दुर्गा सोसायटी च्या घरात राहतो.
मी पुष्कर कडे किंवा कोल्हापूर येथे असते.

दुर्गा सोसायटी च्या वास्तू ला माझा नमस्कार
बाकि ठिक. छान.
वसुधालय

 

img_01512dscf1562

पंडित राहुल देशपांडे

                       ॐ           

ब्लॉग वाचक यांना नमस्कार
विनंति विषेश

शनिवार संध्याकाळ
पंडित राहुल देशपांडे यांचं गाण ऐकायला मिळाल.
खूप शात्रोक्त गायन ऐकायला मिळाल विठ्ठल विठ्ठल भजन तर
ऐकून मन व डोक याने भरलं वा.
पंडित राहुल देशपांडे लहान वय मध्ये फार छान व स्वच्छ गातात.
मराठी बोलणारे सर्व मंडळी मध्ये बसण्याचा योग आला.
तेथे जेवण पण केले.
खूप मन उच्छाह याने भरलं
आणि मी फेस बुक मध्ये राहुल देशपांडे यांना म्हटलं
मी गाण ऐकण्यास येत आहे व माझा फोटो लावला
आणि हो कार्यक्रम झाल्या नंतर राहुल देशपांडे यांना भेटले
ते म्हणाले मी आपल्याला ओळखल. मला एकदम मन भरून आलं !
सहज आपण व मी फोटो काढू असे विचारले सहज हो ! बोलून
अगदी घर च्या परिवार सारखं त्यांचा व माझा फोटो आहे.

खूप खूप राहुल देशपांडे यांच गाण व बोलण माझ्या मन मध्ये आहे.

पंडित राहुल देशपांडे यांना खूप खूप शुभेच्छा !
बाकि ठिक. छान.
वसुधालय.

 

दिनांक ३१. १० अक्टोबर

माजी प्रंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्य तिथी आहे

इंदिरा गांधी यांना वंदन नमस्कार

   

ॐ                दिनांक 31.10 ( अक्टोबर ) 2015.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार!
विनंति विशेष.

वसुधालय ब्लॉग लिखाण मी लिहित आहे.
पांच ५ / 5 वर्ष झाली आहेत.

त्याची नोंद word press यांनी घेतली आहे.

                     ॐ               

                  ACHIEVEMENT

Happy Anniversary with WordPress.com!

You registered on WordPress.com 5 years ago!

Thanks for flying with us. Keep up the good blogging!

5 Year Anniversary Achievement

img_05761

गणपति बाप्पा

                     ॐ                 दिनांक 30. 10 ( अक्टोबर ) 2015.
                                            आश्र्विन कृष्णपक्ष चतुर्थी
ब्लॉग वाचक यांना नमस्कार
विनंती विशेष

प्रणव चिवटे यांनी काढलेला गणपती आहे. .
आज संकष्ट चतुर्थी आहे. शुक्रवार आहे. .
गणपति बाप्पा प्रणव नां पाव !

गणपति ला माझा नमस्कार.
बाकि ठिक.  छान.
वसुधालय

 

aca1f8502b4ebf0e18dd9e09

                    ॐ            दिनांक 30. 10 ( अक्टोबर ) 2015.
                                              आश्र्विन कृष्णपक्ष

शुक्रवार ३ / ४ संकष्ट चतुर्थी करक चतुर्थी

करक चतुर्थी नवरा याचे आयुष्य वाढावे चंद्र पाहून जेवावे करतात.
महाराष्ट्र मध्ये हरतालिका चांगला नवरा मिळावा साठी करतात.
जेष्ठ पौर्णिमा नवरा याचे आयुष्य वाढावे जन्मो जन्मी हा चं
नवरा मिळावा साठी उपवास वृत्त करतात.
मला तर ह्या १० / १५ वर्ष मध्ये करवा चोर करक चतुर्थी
माहित झाली आहे.

मी संकष्ट चतुर्थी केल्या आहेत चंद्र पाहून जेवले आहे पण
करक चतुर्थी म्हणून कधी उपवास वृत्त केले नाही.

तरी माझे आयुष्य सफल संपूर्ण झाले आहे.
ह्यांनी माझ्या सर्व ईच्छा पूर्ण केल्या आहेत.
मूल झाली. घर झाल.
महाराष्ट्र मधील चार ४ देवी शक्ती पीठ झाली.
पत्नी बाई म्हणून सर्व ईच्छा पूर्ण झाल्या आहेत.
वट पौर्णिमा वृत्त याला मी जास्त मानते असो
करक चतुर्थी ला सर्व मना सारखं झाल साठी
मी माझ्या आयुष्य याला नमस्कार करत आहे.

बाकी ठिक. छान.
वसुधालय.

IMG_4399[2]IMG_4470[1]

ॐ                दिनांक 29. 10 ( अक्टोबर ) 2015.
                          गुरुवार.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार

ॐ देव व गुरुं ची भक्ती !

कोल्हापूर येथील राजाराम पुरी आठवी ८ गल्ली रोड
येथील दत्त देऊळ ! मंदिर आहे तेथे मी नेहमी जात असते.
दत्त यांना नमस्कार

देव असो गुरुं असो नुसतं रूप फोटो पाहून मन भरत.
मनाला एक प्रकारे तेज याने उच्छाह येतो.
सर्व देव किंवा गुरुं बद्दल माहिती पाहिजे असं नाही दर्शन
पाहून पाहून मन त्यात भरून रमून जात व सारखं सारखं पहावस वाटत
आपण देव दर्शन गुरुं दर्शन करतो घरी काही गुरुं चे फोटो रूप
असतात रोज नमस्कार करतो व मंत्र जप करतो वर्षा नं वर्ष करत आलेले असते
मन त्यात नक्की च रमत
नमस्कार दत्त देव यांना ! व सर्व गुरुं यांना पण नमस्कार !

img_38451img_04911

dscf3513dscf35141

ॐ              दिनांक 26.10( अक्टोबर ) 2015.
                     आश्र्विन शुक्लपक्ष पौर्णिमा

ब्लॉग वाचक यांना नमस्कार!
विनंति विशेष.

कोजागिरी पौर्णिमा च्या शुभेच्छा !
आश्र्विन पौर्णिमा ला
रात्री लक्ष्मी व इंद्र पूजन करतात. आकाश दिवा दान करतात
जेष्ठ पाहिल मुल मुलगा असो किंवा मुलगी असो
त्यांना ओवाळतात.
लक्ष्मी व इंद्र यांनी रात्र भर दुध मध्ये चंद्र याचे किरण
पाडून जागरण करून ते दुध प्यालेले आहेत साठी
लक्ष्मी व इंद्र याची पूजा करतात.

पाऊस संपलेला असतो चंद्र चा प्रकाश चांगला पडलेला असतो.
चंद्र याची किरण स्वच्छ असतात ते दुध पिल्याने नैसर्गिक ता येते
साठी चंद्र याचे किरण पाडून दुध पितात. खर तर रात्र भर दुध
चंद्र याचे किरण पडायला हवे म्हणतात.

मी  चंद्र       दुध मध्ये पाहते नैवेद्द दाखविते.
बाकि छान. ठिक.
वसुधालय

 

 

                       ॐ

कोल्हापूर दसरा सण शुभेच्छा

img_34735dscf31154

                                  ॐ
इसवी सन 2015 अक्टोबर
श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३७ मन्मथनाम संवत्सर आश्र्विन शुक्लपक्ष नवरात्र नमस्कार

  ॐ दसरा च्या शुभेच्छा

ॐ तांदूळ याच्या याच्या बाहुल्या काढतात.
एका बाहुलीत सोन्याची अंगठी ठेवतात.
दोन्ही बाहुली आपटे ची पान याने बाजूला करतात.
ती अंगठी ज्याची असेल त्याला देतात. सोन लुटण म्हणतात.

  ॐ
इसवी सन 2015 अक्टोबर
श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३७ मन्मथनाम संवत्सर आश्र्विन शुक्लपक्ष नवरात्र नमस्कार

सरस्वति सरस्वती विसर्जन ८ दुर्गा अष्टमी महा अष्टमी

ॐ झेंडू ची फूलं

 

img_05691img_05681

img_05761img_05672

                                      ॐ
इसवी सन 2015 अक्टोबर
श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३७ मन्मथनाम संवत्सर आश्र्विन शुक्लपक्ष नवरात्र नमस्कार

सरस्वति सरस्वती विसर्जन ८ दुर्गा अष्टमी महा अष्टमी

 

                               ॐ

                नवरात्रि

नवरात्र महालक्ष्मी सरस्वति रुपात

 

 

                                             ॐ
इसवी सन 2015 अक्टोबर
श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३७ मन्मथनाम संवत्सर आश्र्विन शुक्लपक्ष नवरात्र नमस्कार

ॐ रांगोळी चे महालक्ष्मी यंत्र मी काढलेले आहे पूर्वी

  व साधी रांगोळी ची  सरस्वती मी काढलेली आहे पूर्वी

 

नवरात्रि

                          ॐ        
नवरात्र ! नवरात्रि

कोल्हापुर येथील बिंदु चौक येथील देवी
नमस्कार

प्रणव चिवटे यांनी काढलेला फोटो

 


इसवी सन 2015 अक्टोबर
श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३७ मन्मथनाम संवत्सर आश्र्विन शुक्लपक्ष नवरात्र नमस्कार

अंबाजोगाई योगेश्र्वरी देवी लातूर जिल्हा नमस्कार

 

                       ॐ
इसवी सन 2015 अक्टोबर
श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३७ मन्मथनाम संवत्सर आश्र्विन शुक्लपक्ष नवरात्र नमस्कार

राजगिरा पिठ याचे थालीपिठ

दोन वाट्या राजगिरा पिठ घेतले.  एक उकडलेला बटाटा घेतला.
भाजलेले शेंगदाणे कुट वाटी भर घेतले कोथिंबीर थोडी घेतले.
काही ठिकाणी उपवास ला कोथिंबीर चालत नाही धने असतात साठी.
तरी घातली. जिरे थोडे मिठ चवी पमाणे लाल तिखट चवी प्रमाणे घेतले.
पाणी मध्ये सर्व छान कळविले मळले. गोल गोल गोळे केले.
तवा याला तूप लावून थापले. पातळ पसरविले. भोक पाडली.
ग्यास पेटवून तवा ठेवून राजगिरा थालीपिठ दोनही बाजूने भाजले.
तीन चार थालीपिठ केले. मस्त अख्खं थालीपिठ निघाली मला
करतांना खूप चांगल मन उच्छाह याने भरलं. सर्वांना घरात आवडलं.
लोणी बरोबर लोणचं बरोबर खाल्ली. राजगिरा थालीपिठ.
वसुधालय.

 

                                                      ॐ
इसवी सन 2015 अक्टोबर
श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३७ मन्मथनाम संवत्सर आश्र्विन शुक्लपक्ष नवरात्र नमस्कार पूर्वी सप्तश्रुंग वणी ची देवी याचे दर्शन घेतले आहे बरोबर मुलगा प्रणव चिवटे आहे

ॐ माझं  महाराष्ट्र मधील चार चार हि हि देवी देवी शक्तीपीठ
हे श्रीकांत चिवटे असतांना झालेली आहेत. परत मुलांच्या
बरोबर केली आहेत.

सप्तश्रुंग वणी देवी ला नमस्कार

 

 

                               ॐ
इसवी सन 2015 अक्टोबर

श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३७ मन्मथनाम संवत्सर

आश्र्विन शुक्लपक्ष नवरात्र नमस्कार

गहू याचे महालक्ष्मी यंत्र नमस्कार

तिसरी माळ नवरात्र

                                     ॐ                  

   इसवी सन 2015 अक्टोबर
श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३७ मन्मथनाम संवत्सर आश्र्विन शुक्लपक्ष नवरात्र नमस्कार

तिसरा दिवस नवरात्र चा तिसरी माळ देवी उच्छव व चा
देवी अंबा आई  नमस्कार !

 

 

        ॐ                    कोल्हापुर

आमच्या घरात पुस्तक छापून आली आहेत.

श्रीकांत चिवटे याचे कविता संग्रह  १ तुळसपाणी २ वसुधालय
दोनही पुस्तक महाराष्ट्र मंडळ मुंबई यांनी पैसे न घेता छापली आहेत
व १० पुस्तक फुकट दिली आहेत जास्त महत्व आहे. पुस्तक याला.

आणि हो मी वसुधालय मराठी ब्लॉग लिहित आहे त्याचे पुस्तक
किशोर कुलकर्णी जळगाव पत्रकार यांनी
ब्लॉगवाल्या आजीबाई श्रीमती वसुधा श्रीकांत चिवटे पुस्तक
पैसे न घेता छापले आहे फार चांगल पुस्तक छापले आहे
आज का विषय निघाला तर
वसुधालय पुस्तक नवरात्र मध्ये छापून आले त्याची आठवण आली
व सर्व पुस्तक एकत्र करावी साठी सर्व लिहित आहे

मस्त समाधान तृप्तता वाटत आहे पुस्तक बद्दल !
वसुधालय

 

blogwalya-aajibai

                          ॐ                 अक्टोबर 2015
                                               आश्र्विन शुक्लपक्ष

नवरात्र नवरात्रि चालु आहे.

नवरात्र ! नवरात्रि

नवरात्र मध्ये कुमारी नहान येणारी मुलगी ईला नऊ ९ दिवस जेवायला बोलावतात.
दसरा ला पूर्वी परकर पोलक चे कापड देत असत.
एका गरीब मुली चे पोट भरत असे व वस्र कापड देऊन तिला सांभाळत असे.
दिवा नऊ दिवस लावलेला असे गहू धान्य पेरून गहू आणत.
नऊ दिवस उपवास एकादशी सारखा करत.
माझी आई    वहिनी राधाबाई देशपांडे उपवास करत असे.
नवमी ला होम होत असे अजून हि माझ्या माहेरी अशोक देशपांडे होम करतात.
पुरण पोळी चा नैवेद्द दाखवितात. दसरा ला आपटे याची पान देऊन सन साजरा करतात.
कुमारी का बोलावून एक प्रकारे तिला सांभाळले जाते.
श्रावण महिना मध्ये शनिवार ला मुंजा बोलावून असे दान दिले जाते.
प्रत्येक सण याला कोणाला तरी बोलावून जेवण व दान देतात.
एक प्रकारे सेवा च आहे.

मी हे असतांना नवरात्र मध्ये महालक्ष्मी ला जात असे व एक दिवस जेवण देऊन
गजरे सर्व ओटी  देत असे. दसरा पर्यंत नवरात्र असे.
प्रत्येक सण याला कोणाला तरी जेवायला बोलावून दान करत असे.
आमच्यात गणपती व नवरात्र जास्त करून सण मनान होत असे.
नवरात्र मध्ये लोकर उठणे महालक्ष्मी ला जाणे आल्या नंतर संयपाक करुणे
सर्वजन आप आपल्या कामाला जाणे उच्छाह असे.
नवरात्र साठी कोल्हापूर महालक्ष्मी दर्शन साठी पाहुणे आमच्या घरी राहत.
कोणी उपवास करत कोणी जेवत दर्शन चांगले झाले साठी आमच्या बरोबर
छान बोलत असत.
दसरा आला कि नवरात्र पार पडले याचे खूप समाधान असे
एकदा नवरात्र मध्ये ह्यांचे वसुधालय पुस्तक छापून आले मी
देवी दर्शन ला गेले प्रणव ने पुस्तक घेतली व सरळ एक पुस्तक घेऊन
ह्यांच्या ऑफिस मध्ये ह्यांना दाखवावयाला नेली ह्यांना खूप छान वाटलं
नवरात्र मध्ये पुस्तक छापून आले साठी
नवरात्र मस्त सण साजरा करत.

नवरात्र माझा नमस्कार
वसुधालय

                            ॐ                अक्टोबर 2015.
                                            आश्र्विन शुक्लपक्ष
                                                   नवरात्र

स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३७ मन्मथनाम संवत्सर.

ॐ यंदा आम्ही नवरात्र साठी अख्खे मुग पेरले आहे. छोट ल्यास्टिक चे बाऊल घेतले त्यात माती घातली उन्ह मध्ये ठेवले रोज पाणी घातले मस्त कोंब आले शेत तयार झाले काही दिवस ठेवून ते पाणी मध्ये घालून त्याचा रस काढा पिऊ आम्ही साध पण नवरात्र वाटत देव बसले असं मन भरून वाटत

अंबा आई देवी व नवरात्र यांना माझा नमस्कार.

 

                                         

आरोग्य

                ॐ            आरोग्य

नियमित झोपणे व नियमित उठणे
स्नान करून पूजा करून स्वंयपाक करणे
शक्य तोवर फ्रीज मधील अन्न गरम करून खाऊ नये
कणिक अथवा कोणते हि पिठ भिजवून फ्रीज मध्ये ठेवून वापरू नाही
उन्हात एक तास फिरणे साखर व B . P . ची गोळी नियमित घेणे
व्यायाम साठी प्राणायाम करणे कोणतेही स्तोत्र वाचणे जिभ व उच्चार चांगले राहतात
मन चल बिचल होत नाही रोज एक रांगोळी काढणे बोट सरळ ताठ राहतात
हल्ली पेन कागद लिखाण नाही संगणक चे लिखाण आहे बोट यांना आंगठा व चाफेकळी
बोट यांना व ईतर बोट यांना व्यायाम होतो योग प्रकार करण्या पेक्षा घर काम केले तर
जास्त व्यायाम व आपण काम केले याचा उच्छाह असतो नोकरी करणारे यांना पण
वेळ काढून थोडे काम सकाळी अथवा ऑफिस मधून आल्या नंतर करण्यास हरकत नाही
कोल्हापूर येथे तर आम्हाला दुध काढायचे विकायचे असे काम असते व ऑफिस पण असते
सांगतात
माझी ७३ वय ला पण तब्येत छान आहे नियमित काम करते जेवण पण नियमित आहे
सर्वांना असे करण्यास काही च हरकत नाही घरातील कोणी या बाबतीत बोलत नाही
आपली अब्येत आपण सांभाळावी लागते
वसुधालय

2d227a47782b dscf2820

ॐ                          इसवी सन 2015 अक्टोबर

श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३७ मन्मथनाम संवत्सर आश्र्विन शुक्लपक्ष नवरात्र नमस्कार

कुंडी मध्ये माती घालतात गहू घालतात व पेरणी करून गहू आणतात जे रोप येते ते पाणी मध्ये भिजत ठेवून पाणी पितात ते पाणी औशध गुणकारी असते गहू याचा काढा म्हणतात मी दर वर्षी असे नवरात्र मध्ये रोप पेरते व रोप आले कि त्याचा काढा पिते घरी ह्यांना पण देत असे देवी घटस्थापना पण होते आणि गहू याचे औषध गुणकारी पण पिण्यास मिळते

देवी नवरात्र नमस्कार

                                       ॐ            आश्र्विन शुक्लपक्ष
                                                           नवत्रारंभ घटस्थापना

१ प्रतिपदा मंगळवार

देवी ची स्थापना करतात.
देवीचे नऊ दिवस रुप असतात.
नवमी ला  देवी   राक्षस चा वध करते
व प्रजा सुखी होऊन सोन लुटून खर पण
सोन घेतात.
आपटे झाड याची पान
पण देऊन दसरा सण साजरा करत्तात.
पूर्वी स्त्री ला महिला नां पुरुष जात व सासू व सासर चे  छळत
त्रास देत असत.
तसेच देव यांना राक्षस त्रास देत देवी शक्ती रूप घेऊन
राक्षस याला मारून टाकत व देव प्रजा सुखी राहत.

हल्ली मुली खूप अभ्यास करतात नोकरी करत्तात काम धंदा करत्तात
स्वत: मिळवून पोट उदरनिर्वाह करत्तात. महिला स्त्री शक्ती
जागृत झाली आहे. सवंत्र विचार याची झाली आहे.
तरीपण मूल होण्या करिता महिला नां पुरुष याची गरज आहे.
त्यासाठी एकत्र राहणे व संसार करणे आवश्यक आहे.
किती हि सवंत्र ता असली तरी संसार साठी पुरुष व स्त्री एकत्र
राहणे गरज आहे याची जाणीव स्त्री ने ठेवावी संसार निट करावा.
देवी रूप च स्त्री आहे राक्षस याचा वध न करता पुरुष यांना पण मानून
राहायला पाहिजे.

            ॐ
श्री महालक्ष्मी प्रसन्न ||
श्री अंबा आई प्रसन्न ||
श्री दुर्गा माता प्रसन्न ||

सर्व देवी नां नमस्कार ||

 

 

                  

                             ॐ               भाद्रपद कृष्णपक्ष
                                                   सर्वपित्री दर्श अमावास्या

भाद्रपद कृष्णपक्ष

३० सोमवार

सोमवती आमवस्या भादवी पोळा
सर्वपित्री आमवस्या अमावस्या श्राध्द

आपले आई बाप वडील माहित असतात
पूर्वज माहित नसतात पण ते कोणत्या तरी रूपाने
वारले म्हणून किंवा जन्म घेऊन कोणताही घराणं मध्ये असतात.
ते आपणास कळत नाही पण त्यांचे अस्तित्व कायम आत्मत असते.
मी पाहिले आता पर्यंत कोण जन्म ला कि त्या तारिख पूर्वज याचा जन्म असतो
साठी पूर्वज रूप नाव जन्म नाव देतात व पूर्वज पुढील पिढीला माहित करून देतात.
सर्सास असे घराणं मध्ये घडते ठेवतात. किंवा कोणी वारले कि कोणाच्या तिथीला
किंवा तारिख याला वारतात व त्या पूर्वज याची आठवण राहते व ठेवतात.
आता जरी समजले नाही तरी आपण आपल्या आई बाप यांची श्राध्द पूजा करतो
तेंव्हा पूर्वज यांची नाव घेतो पूर्वीचे माहित नसले तरी ते पूर्वज त्यात असतात व त्यांची
पूजा आठवण केली जाते.
आठवण का करायची तर
आज आपण तब्येत मूळे घराणं मूळे आपली पृकृती चांगली आहे शरीर
निट आहे. काम करू शकतो बुद्धी थोडी असली तरी व्यवहार ज्ञान असते
साठी रोजचे व्यवहार आपण घराणं यांनी दिले साठी सर्व करू शकतो साठी आठवण
व पूजा करावी.
पूर्वी अन्न व कपडे पण नव्हते आता सर्रास बाजार मध्ये जाऊन विकत आणता येते
पूर्वज शिकले साठी आपल्या ला सर्व तयार मिळत आहे याची जाण असणं जरूर आहे
साठी भाद्रपद कृष्णपक्ष पंधर वाडा ठेवला आहे.
नतंर दुर्गा देवी पूजा शांत करून आपण आपले आयुष्य निट चालू आहे साठी
दिवाळी मजा करतो.
भादवी पोळा पूर्वज यांची आठवण.

सर्व पूर्वज यांना माझा नमस्कार
वसुधालय

                                                    ओम ॐ बेसन रवा लाडू

download (4)dscf0925

                                                                       भादवी पोळा

imagesimg_03871

                        ॐ         भाद्रपद कृष्णपक्ष
                                        शिवरात्रि चतुर्दशी श्राध्द

ॐ नम: शिवाय ||

१४ रविवार

शिवरात्रि ला कोणी वारले कि महादेव शंकर
यांची पूजा करतात.

ॐ नम: शिवाय ||

माधव चिवटे
नाना भाऊजी नमस्कार ||

 

ॐ इसवी सन 1966 / १९६६ मे महिना
मला पाहण्यास प्रथम नाना भाऊजी आले.
ते स्वत: केमेष्ट्री      चे प्राध्यापक
मी मात्र S . S . C . पास मला वाटल मला नकार देऊन
आमच्या पुणे घरी कळवतील पण
मी तेंव्हा हात याने दोरा कापड याची एम्ब्रोदारी करत असे
ती कलाकृती इतकी आवडली कि
घरात राहणारी घरकाम करणारी चांगली मुलगी आहे.
आणि आमचे श्रीकांत चिवटे व मी लग्न झाले. व आमचा संसार निट झाला
लग्न जुळविणारे चांगली मध्यस्ती करतात

नाना भाऊजी नमस्कार

      वसुधालय

                                         ॐ                                      

                         ॐ भ्रद्रं कर्णेभि : शृणुयाम देवा : |                                                           

                         भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा : ||                             

                         स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभि : |                        

                          व्यशेम देवहितं यदायु : || १ ||

                          ॐ स्वस्ति न इन्द्रो  वृद्धश्रवा 😐

                           स्वस्ति न : पूषा विश्र्ववेदा :         

                           स्वस्तिनस्तार्क्ष्यो  अरिष्टनेमि : ||

                           स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु || २ ||

                         ॐ शांति : ! शांति !! शांति !!!

                                  वसुधालय

 

 

 

              

 

                                    ॐ काजू चा महादेव     

                                          ॐ                भाद्रपद कृष्णपक्ष
                                                                  शनिप्रदोष
                                                                      त्रयोदशी श्राध्द
शनिप्रदोष

पक्षपितृपक्ष शनिप्रदोष ला सकाळी उपवास करतात.
सूर्यास्त च्या सूर्य मावळ ण्या आधी जेवतात. उपवास सोडतात.
सूर्य याचा उपवास असतो.

गुरुजीं ना दक्षिणा व दुध फळ जास्त करून केळी देतात.

मी एकदा गाणगापूर येथे भिक्षावळ साबुदाणा खिचडी दिली आहे.
मला मी स्वत: साबुदाणा खिचडी आणि त्याची भिक्षावळ दत्त गुरु मंदिर येथे
सर्व लोकांना दिली. भिक्षा आहे प्रसाद म्हणून गाडीतून थांबून उतरून भिक्षा
मागितली लोकांनी. याचे आज पण बरं वाटत आहे मला.
आज पण मी अन्नदान   सर्वात पुण्यदान आहे. पैसे पेक्षा ही !
प्रदोष तिथीचे माझी आई राधाबाई देशपांडे आम्ही वहिनी म्हणतो त्यांना नमस्कार.
तसेच माझ्या आत्येसासूबाई अक्का सरस्वती आळेकर यांना नमस्कार.
आणि कोण असतील त्यांना नमस्कार.
मी तर काहीतरी कारणाने आम्ही असे केले थोर लोक असं बोलत
सांगत असते.
पक्षपितृ त चं आठवण येते असे नाही. थोर लोक यांची अमुक शिकविले
साठी सारखी नेहमी आठवण असते. नमस्कार पण असतो.
पक्षपितृ तं दान करतात. एवढ चं
वसुधालय

 

dscf27981 vahini_thumb3

                                                                             राधाबाई देशपांडे

 

dscf28273 img_03871

ॐ                     8.10 ( अक्टोबर ) 2015.
                              गुरुवार

हवाई वर्धापन दिन दिवस विमान दिवस
८३ / 83 वां वर्धापन दिवस आहे.

भारत मधील विमान याचा जन्म दिवस आहे ८३ / 83 वां
शुभेच्छा ! शुभकामनाय !

हवाई दलाचे प्रमुख मार्शल अरुप राहा आहेत.

मि विमान मध्ये बसले आहे.
खुप सुरक्षित विमान आहे.
विमान पायलट फार काळजी घेऊन विमान चालवितात.

ॐ भारत मधील विमान सेवा यांना 83 / ८३ वर्ष झाली आहेत.

ॐ भारत मधील  हवाई दल याचा जन्म दिवस ! शुभेच्च्छा ! शुभकामनाय !

पूर्वी आई व वडील यांना काशीला गंगा नदीला अंगोळ स्नान साठी
कावडीने मूल घेऊन जात असतं. आता हवाई विमान मधून
नायगारा जग प्रसिध्द नदी व धबधबा ला घेऊन जातात.

त्यांना अभिनंदन ! शुभेच्छा !

बाकि ठिक. छान.
वसुधालय

ॐ विमान याचा फोटो मि काढला आहे.
फ्रांस मध्ये विमान बदलले तेंव्हा विमान तळ येथे बस मधून
जातांना मि विमान याचा फोटो घेतला आहे मस्त वाटत आज सुध्दा !

                                               ॐ         Helicopter

                           ॐ       भाद्रपद कृष्णपक्ष
                                       इंदिरा एकादशी श्राध्द

एकादशी कोणी वारल कि मेल कि एकादशी श्राध्द करतात.
एकादशी विठ्ठल याची असते.
आरे विठ्ठल भक्त विठ्ठल कडे गेला असे मानतात.
विठ्ठल विठ्ठल हरी नामाचा गजर ||
जय हरि पांडुरंग ||
पुंडलिक वरदा हरि विठ्ठल ||

एकादशी श्राध्द यांना नमस्कार ||
जे लोक मरण पावतात  त्यांना ब्रह्म म्हणतात.
आपल्या हून  वयान लहान असो किंवा मोठ्ठा असो
तो ब्रह्म असतो.
ब्रह्म यांना नमस्कार
एकादशी श्राध्द असल्यामुळे विठ्ठल रूप
याला नमस्कार

बाकि ठिक.
वसुधालय

 

 

img_01801dscf1827_thumb1

 

दशमी श्राध्द

                                   ॐ                भाद्रपद कृष्णपक्ष
                                                           दशमी श्राध्द

श्री गोंदवलेकर महाराज श्री ब्रह्मचैतन्य महाराज
यांची दशमी ची समाधी आहे. मार्गशीर्ष कृष्णपक्ष दशमी.
चिवटे घराण यांचे गुरुं मी पण मन लावून गुरुं नां मानते.
श्री ब्रह्मचैतन्य महाराज गुरुं खूप वेळा आमच्या संसार मधील अडचणीत
मार्गदर्शन करून आमचा विश्र्वास बसेल असे काम मार्गदर्शन
श्री ब्रह्मचैतन्य गुरुं नीं केले आहे.
एकदा असे च झाले दशमी ला  फुल पाहिजे होती घरात फुल नव्हती.
ह्यांच्या ऑफिस मधील ओळखी च्या यांनी आमच्या शेता मधील झेंडू ची
फुल आहेत सांगून भरपूर फुल दिली. आरे बाप रे मनात आले व झेंडू फुल
याचा हार केला व श्री ब्रह्मचैतन्य महाराज गुरुं नां घातला किती साध व मन
पूर्ण करणार काम. मन भरून आल. येत अशा आठवणिन.

आज भाद्रपद कृष्णपक्ष दशमी आहे. आपण आठवण नात वाईक यांची तर
ठेवतो चं पण गुरुं चीं पण ठेवावी. श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांना दही आवडत असे.

श्री गोंदवलेकर महाराज श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांना नमस्कार.

                                       ॐ
                           श्री राम जय राम जयजय राम

 

नवमी श्राध्द

ॐ                  भाद्रपद कृष्णपक्ष

भाद्रपद कृष्णपक्ष ९ नवमी श्राध्द अविधवा नवमी.

सवाष्ण बायका मेल्या कि ९ नवमी श्राध्द करतात.
पुण्यवान  बाई स्त्री  समजतात. भाग्यवान बाई समजतात.
पुण्यवान बाई समजतात. खर यं. किती चांगल रूप असत.
देवी रुप च असत.

जी श्री नवरा मेल्या नंतर राहते ती आपल सर्व च वैभव काढून राहते.
पुर्वितर केस पण कापून राहत आपली सुंदरता लोक यांना
दिसू नाही व कोणी मागे लागू नाही

हल्ली नवरा जिवंत आहे का मेला आहे अस समजत नाही सर्रास कुंकू
तेही टिकली व मगंळ सूत्र घालून मिरवितात.
खर तर चार आश्रम प्रमाणे सन्यास आश्रम घेण्यास काही हरकत नाही.
पूर्वी बाई ला नवरा मेला कि मारून टाकत.

नंतर बाई आई मूल यांना मोठी करून सांभाळू लागली.
आता वय प्रमाण वाढल बाई ७०. ८० वर्ष जगते.
बाई ला काम तर काही च नसत वेळ पण जात नसतो
देव धर्म करून बसलेली असते काय करावे जीव जात नाही व जिवंत
राहवत नाही अशा प्रकारे जीवन चालू असते.

पूर्वी विधवा बाई चे जेवण पण चालत नसे आता विधवा बाई
जेथे तेथे काम जेवण याचे पण काम करतात.
खर तर चांगल नाही जेवण करणं. सर्व पवित्र मन शांती च जेवण असावं.
बाई न काय काम करावे ते पण निट सांगता येत नाही पोथी तरी किती वाचावी.
विधवा बाई पूर्वी पेक्षा स्वतंत्र आहे. पण रुख रुख आहे.
आपल सौभाग्य गेल याची.

नवरा असता नां सवाष्ण बाई चं रूप च वेगळ असतं. .
रुप पाहता लोचणी !

10384300_382775501899226_5547416724120646962_nIMG_20150715_224248

श्रीकांत चिवटे

                            ॐ
श्रीकांत चिवटे ह्यांच्या कविता सकाळ पुढारी
वर्तमान हयात छापून आलेल्या आहेत .ते अंक आज ही
आमच्या घरात जपून ठेवलेले आहेत.त्यातील एक कविता लिहित आहे.

                    ॐ
तरंग
तुळसीचे मन कशी सांजवेळा
उंबऱ्यात सान थांबेचना
कृष्ण जसा नभ राधिका हा चांद
दिशांना आल्हाद पेलवेना
रुणझुणू वाळा पांवरीचे पायी
काही ते उपायीं आकलेना
चांद म्हणे मज अधीच मी कृष्ण
वातशीत उष्ण सोसवेना
असा हा अभंग केला कृष्णार्पण
तरी कां लोचन मिटेचना
____ श्रीकांत चिवटे.

हा अंक पुढारी रविवार ,दिनांक ११.जानेवारी १९९८साल चा आहे.
पान नंबर नऊ ९ आहे.

dscf38251-e1361368668427 dscf1827_thumb1

             ॐ           4.10 ( अक्टोबर ) 2015.

 

 

फ्रेंच

राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी

पॅरिसमधील उद्यानामध्ये धावत असताना…

 

             ॐ           4.10 ( अक्टोबर ) 2015.

संगणक मध्ये बातमी वाचली
खर च व्यायाम व शुध्द हवा मध्ये फिरण
किती पण मोठे पण असले तरी आपला स्वभाव व व्यायाम व आपल् काम
पूर्ण करण मनुष्य स्वभाव आहे.

शुभेच्छा !

 

5370094901855521618_Mid 11698627_1595577750693168_756700322727449321_n

                                       IMG_20150721_131310

                                ॐ

https://vasudhalaya.wordpress.com/2011/03/26/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%87/

तुळसपाणी त्यांच्या चं पुस्तक मधील ही कविता आहे.

सागरगोटे

सागरगोटे
लहानपण छोटे
परीच्या स्वप्नाला सागरगोटे

सागरगोटे
उंचावूण झेल
सातरबाई खेळ सागरगोटे

सागरगोटे
खेळ हंडी हरु
तरी गोळा करु सागरगोटे

सागरगोटे
पाचच बोटे
षड्जाची तार सागरगोटे

सागरगोटे
जिणे अधांतर
कसे मध्यंतर सागरगोटे

पूर्वज यांचे घर

                                                ॐ

पूर्वज अण्णा श्रीकांत चिवटे यांचे कोल्हापूर चे घर

प्रणव चिवटे सांभाळतात

कसा गणपति आणून पूजा व घर स्वच्छ ठेवतात प्रणव यांना शुभेच्छा

 

                         ॐ                    भाद्रपद कृष्णपक्ष

भाद्रपद कृष्णपक्ष !

पूर्वज यांच्या आठवण ठेवून देऊळ किंवा गुरुजी नां
दक्षिणा दुध फळ देतात.
खर चं पूर्वज असतील तर घरी मनात ते आपल्या जवळ व
घरात आहेत याचे अनुभव शाक्षात्कार रूपाने अनुभव येतो.
व ते भेटतात. असे आपल मन सांगत.
देऊळ व गुरु नां देण्या पेक्षा आपण पूर्वज याच्या बद्दल किती आदर
भावना ठेवतो व आपण पूर्वज यांच्या साध साध रोज च्या व्यवहार मध्ये कसे
वागलो अस फक्त आपल्याला च माहित असत साठी आपल मन स्वच्छ असलं
कि पूर्वज यांची भिती किंवा दान नाही केले तरी चालते.
फक्त आठवण व नमस्कार बस होतो आणि तो फक्त पक्ष पितृत च करावा
असे नसून रोज नमस्कार व आपल्याला छान सुखरूप आयुष्य दिले आहे
याची जाणिव झाली कि आपण आपले मन शांत असते. पूर्वी पूर्वज यांचे फोटो
लावत व बाहेर जातांना व घरी आल्या नंतर नमस्कार करत. असे म्हणतात चेहरा पहावा
ते संकट काळी धावून येतात.
सिनेमा मध्ये देव धावून आला व सर्व वस्तू व देव दर्शन झाले दाखवितात.
श्रद्धा याला  फार महत्व आहे. पैसा उभा राहतो पण पूर्वज यांनी काय
दिले याची आठवण फार मन याला जपावी साठी पक्षपितृ तच आठवण न ठेवता
आपण पूर्वज मूळे उभे आहोत याचे मन याला पटले तर च खर जीवन सुरक्षित असत.
मी कधी पैसा मिळविला नाही पण मला कधी कमी पडले नाही जेथे राहिले तेथे प्रामाणिक राहिले
माझे मन खात नाही. साठी माझे आयुष्य याला नमस्कार करते.

सर्वांना खूप यश व किर्ती  पैसा मिळो.
बाकि ठिक. छान
वसुधालय.

 

%d bloggers like this: