आपले स्वागत आहे!

Posts tagged ‘India’

संस्कृत भाषा


संस्कृत मृत भाषा का?

मित्रांनो एक महत्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे भारताची जनगणना आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि या महिन्यात स्वयंसेवक पुन्हा एकदा तुमच्या कडे येतील तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची माहिती परत घेतली आणि नोंदवली जाईल.

माहिती भरतांना तुमची मातृभाषा जी काही असेल ती तुम्ही लिहाल  पण “अवगत असलेल्या भाषा” मध्ये संस्कृत भाषा न विसरता लिहा आणि खंर बघाल तर  पूर्ण जरी नाही तरी आजही आपण ती भाषा वापरतो. संध्याकाळी दिवेलागणीला म्हंटली जाणारी स्त्रोत्रे किंवा गणपतीच्या दिवसात होणारी सहस्त्र आवर्तने अगदी देवाच्या पूजेत किंवा लग्नात म्हंटले  जाणारे मंगलमय श्लोक सगळे आपल्याला माहिती आहेत काही पाठ आहेत.

हि भाषा जिवंत ठेवणं आता आपल्या हातात आहे. कारण मागील  सर्वेक्षणात संस्कृत माहिती असलेल्या लोकांची संख्या केवळ काही हजारात आहे आणि त्यामुळे तिला मृत भाषा घोषित केले जावू शकते. उलटपक्षी अरबी, फारसी माहिती असलेले लोक बरेच जास्ती आहेत कारण काही राज्यात अगदी ठरवूर ह्या भाषा पत्रकात भरल्या आहेत. मृत भाषा घोषित झाली की त्या भाषेच्या उत्कर्षासाठी कुठलाही निधी दिला जात नाही. आणि मग आपली ही पुरातन आणि पवित्र भाषा कायम स्वरूपी काळाच्या पडद्याआड जाईल.

तुमचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न ह्या भाषेला जिवंत ठेवू शकतो. आज आपल्याच भाषेवर ही वेळ येण्यास आपण सगळेच जबाबदार आहोत पण अजून वेळ गेली नाही. जेवढी जमत असेल तेवढी गम्मत म्हणून का होईना वापरा जर तुम्हाला हा विचार पटत असेल तर जरूर आपल्या मित्रांना सुद्धा सांगा.

भारतीय झेंडे

हा आहे छोटासा भारतीय झेंड्याचा इतिहास…


हा झेंडा पहिल्यांदी ७ ऑगस्ट १९०७ साली पारसी भागन चौक, कलकत्ता येथे फडकाविला होता.

हा झेंडा “सप्तरुशी झेंडा” ह्या नावाने ओळखला जातो. हा झेंडा पहिल्यांदी स्टूट्गारट मध्ये आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेस मध्ये २२ ऑगस्ट १९०७ ला फडकाविला होता.

हा झेंडा डॉ. एनी बेझंट आणि लोकमान्य टिळक ह्यांच्याशी संबधित आहे. हा झेंडा कलकत्ता येथे “Home Rule Movement” च्या वेळेस काँग्रेस अधिवेशनात फडकाविला होता.

आंध्र प्रदेशातल्या एका तरुणाने खालील झेंडा महात्मा गांधीना प्रस्तुत केला होता. गांधीजींच्या मतानुसार ह्यामध्ये पंधरा रंग वा चरखा घालण्यात आला.

हा झेंडा १९३१ सालच्या आखिल भारतीय कॉंग्रेसच्या अधिवेशनात प्रस्तुत केला होता. परंतु तो सर्वांना मान्य न झाल्याने स्वीकृत झाला नाही.

ऑगस्ट ६, १९३१ साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस ने खालील झेंडा अधिकृत स्वरुपात मान्य केला व तो पहिल्यांदी ३१ ऑगस्टला फडकविण्यात आला.

आपला राष्ट्रीय झेंडा. ह्याचा जन्म जुलै २२, १९४७ ला झाला. जवाहरलाल नेहरूंच्या शब्दात – “आता मी तुम्हाला फक्त प्रस्ताव नाही तर झेंडा प्रस्तुत करतो”. हा झेंडा सर्व प्रथम कौन्सिल हाउस वर १५ ऑगस्ट १९४७ साली फडकविण्यात आला.

मुंबई

मुंबई: महाराष्ट्र राज्याची राजधानी !

व्हिटी, चर्चगेट व मुंबई सेन्ट्रल हि मुख्य रेल्वे स्टेशन आहेत. तेथून नंतर कल्याण, बोरिवली, विरार ईतर भागात लोकल, बसेस आहेत. वेस्टर्न हरबर असे भाग आहेत. महालक्ष्मी दादर चेम्बुर मुलुण्ड असे वेगवेगळे स्टेशन आहेत.

येथे खूपच पाहण्यासारखं आहे.
– आरे कॉलनी दूध घरोघरी देण्याचं साधनं. पूर्वी काचेच्या बाटलीतुन केंद्रावर रांगेत ऊभे राहून दूध वाटप करतं असे.
– ‘टाटा इंस्टीटयूट’, ‘गेट ऑफ ईन्डीया’, ‘ ताज हॉटेल ‘ मुंबई नगरपालिका ‘ सचिवालय ‘
– केईम रुग्णालय गणपती मंदिर विरार तलाव इंजीरीयन कॉलेज.
– क्रिकेट मैदान, धोबीतलाव ईन्दिरा विमानातलं. मुंबई विद्दापीठ असे खूपचं खूप पाहण्यास मिळते.

डेक्कनचीराणी, डेक्कन क्वीन मुंबई पुण्या मध्ये सकाळ संध्साकाळ धावते, आम्ही तिने प्रवास केला आहे.

खजुराहो

भारतातील त्याचप्रमाणे परादेशातील पर्यतकांचं प्रमुख आकर्षण म्हणजे खजुराहो. ही मंदिरं देवांच्या पारंपरिक मूर्तीबरोबरच शृंगारिक शिल्पांसाठीही प्रसिध्द आहेत. बरीच वर्ष ही मंदिरं तेथील जंगलामध्ये दडलेली होती. परंतु १८३८ साली एका ब्रिटिश सेनाधिकाऱ्याला या मंदिरांचा शोध लागला. मंदिरांचं खजुराहो हे नाव तिथं असलेल्या खाजुरांच्या झाडावरुन पडलेलं आहे. या सर्व   मंदिरांची रचना ‘इन्डो-आर्यन’ शैलीत आहे. हे एक संरक्षित प्रार्थनासस्थळ आहे.

दंतेश्र्वरी मंदिर

५२ शक्तिपीठांपैकी ऐक असलेल्या या पवित्र स्थानी देवीचा दात पडला असल्याची भाविकांची श्रष्दा आहे. म्हणूनच या मंदिरास दंतेश्र्वरी मंदिर म्हणतात. दक्षिणेतील चालुक्य वंशाच्या राजानं  १४ व्या शतकात हे मंदिर बांधलं. ही बस्तरच्या राजांची कुलदेवी मानली जाते. शंकिनी व दंकिनी या दोन पवित्र नद्दांच्या संगमाजवळ हे मंदिर असून भारतातील प्राचीन वास्तूपैकी हे एक आहे. बाहेरच्या जगाला या मंदिराची खूपच कमी माहिती असली तरी हे मंदिर व त्याचं आवार गतवैभाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर तंतेवाडा या तालुक्यात असून बसनं सहज जाता येण्यासाराखं   आहे.

%d bloggers like this: