आपले स्वागत आहे!

Posts tagged ‘Maharashtra’

श्री चक्र

श्री चक्र किंवा श्री यंत्रात एका बिंदू भोवती नऊ त्रिकोण एकमेकात जोडलेले असतात. मधला बिंदू भौतिक जग आणि जे आकारात नाही (अव्यक्त) यांना जोडणारा संगम आहे असे मानतात. हा बिंदू श्री देवी ललीता महात्रिपुरसुन्दरीचा (पार्वती देवीचा एक अवतार) प्रतिक मानतात. चार त्रिकोणांची दिशा वरती असते आणि ते शिव किंवा पौरुष्य दर्शवतात. पाच त्रिकोणांची दिशा खाली असते आणि ते शक्ती किंवा स्त्रीत्व दर्शवतात. नऊ त्रिकोण असल्यामुळे ह्या यंत्राला नवयोनी चक्र असेही म्हणतात.  नऊ जोडणाऱ्या त्रिकोणांच्या आत ४३ छोटे त्रिकोण असतात व हे संपूर्ण विश्वाचे प्रतिक मानतात. तसेच ह्या चक्राला सृष्टीची कोख असेही प्रतीकारूपी मानतात.

मी “श्री चक्र”  देवळातं कोरलेले  पाहिले. मला ते खूप काढावे वाटले. मी पुस्तक आणले. व पाहून काढण्यास शिकले. यावयाला लागले आवड निर्माण झाली. रोज कागदावर काढू लागले. मग एवढे काढले की ओळखीच्या लोकांना दिले नातेवाईक यांना दिले. अधीक महिना आला तेंवा पुजारीबाई यांच्याकडे १० श्री यंत्र कागदावर काढून दिले. सर्वांना देवळातं आवडले. मी मध्येच दर्शानासाठी गेल तर पुजारीबाई म्हणाल्या आज यंत्र आणले नाही? मी परत १०,१० अशी श्री यंत्र दिली. मला अधीक मास! याचं आपण कांहीं केलं याचं मनाला समाधान हलकं वाटलं त्यावेळेला.

sri chakra1 sri chakra3JPGsri chakra2

पुस्तकं

पुस्तकं :आमच्या घरातं श्री तुकाराम गाथा, नामदेवाची अभंग गाथा व इतरहि धार्मिक पुस्तकं आहेत. नामदेवांच्या गाथेला ३०० वर्ष पुरी झाली व संपूर्ण पुनमुद्रण हि १९५० साली झाले होते. अजूनही इ.स. १९७३ सालची पुस्तकं घरातं आहेत. बरेचं अभंग वाचून झाले. मुंबई शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयात  १९७० ची श्री नामदेव गाथा आमच्या घरातं आजही आहे, आता ती मात्र मी अजून वाचायची आहे.

राजर्ष्री शाहू गौरव ग्रंथ सचिवालय मुंबई २३ फेब्रुवारी १९७६ साल पुस्तक आजही आमच्या घरी आहे, हे माझे वाचून झाले. महात्मा फुले गौरव ग्रंथ  जुलै १९८२ मुंबई  श्री गोंदकर महाराज चरित्र (तेव्हांची किंमत १० रुपये). दुसरी व तिसरी आवृत्ती हे पुस्तक मी पूर्ण वाचलं आहे.

ह्यांचा तुळसपाणी हा कविता संग्रह महाराष्ट्रराज्य सांस्कृतिक मंडळाच्या पुढाकाराने डिसेंबर १९९३ ला प्रसिद्ध झाला, तेव्हांचे मूल्य सत्तावीस फक्त होते.  तसेच नदीची वाट हे सुनीती रे. देशपांडे यांच्या कविता संग्रह पुस्तक ही छानच आहे. श्री R.Y. Deshpande यांच्या इंग्रजी कविता पुस्तक पण आहे.

संगणकची पण भरपूर पुस्तक आहेत. मी घरगुती लिखाण केलेले कागद व सकाळ मध्ये छापून आलेले माझे लिखाणं पण आमच्या घरातं आहे ईतरही पुस्तक भरपूर आहेतं.

अश्या अनेक वेगवेगळी पुस्तकांचे वाचन मनाच्या मंदिरात सरस्वतीचा वावर जागा ठेवतात.

बी. एम. सी. सी.
बी. एम. सी. सी.  Who’s Who 2005
BMCC Past Students' Association
BMCC Past Students’ Association – ह्यांचा फोटो

मुंबई

मुंबई: महाराष्ट्र राज्याची राजधानी !

व्हिटी, चर्चगेट व मुंबई सेन्ट्रल हि मुख्य रेल्वे स्टेशन आहेत. तेथून नंतर कल्याण, बोरिवली, विरार ईतर भागात लोकल, बसेस आहेत. वेस्टर्न हरबर असे भाग आहेत. महालक्ष्मी दादर चेम्बुर मुलुण्ड असे वेगवेगळे स्टेशन आहेत.

येथे खूपच पाहण्यासारखं आहे.
– आरे कॉलनी दूध घरोघरी देण्याचं साधनं. पूर्वी काचेच्या बाटलीतुन केंद्रावर रांगेत ऊभे राहून दूध वाटप करतं असे.
– ‘टाटा इंस्टीटयूट’, ‘गेट ऑफ ईन्डीया’, ‘ ताज हॉटेल ‘ मुंबई नगरपालिका ‘ सचिवालय ‘
– केईम रुग्णालय गणपती मंदिर विरार तलाव इंजीरीयन कॉलेज.
– क्रिकेट मैदान, धोबीतलाव ईन्दिरा विमानातलं. मुंबई विद्दापीठ असे खूपचं खूप पाहण्यास मिळते.

डेक्कनचीराणी, डेक्कन क्वीन मुंबई पुण्या मध्ये सकाळ संध्साकाळ धावते, आम्ही तिने प्रवास केला आहे.

कोल्हापूर

महाराष्ट्रात कोल्हापूर हे शहर आपलं विशेष स्थान राखून आहे. ही भूमी आहे कलावंतांची, ही भूमि आहे आधयात्माची आणि ही माती आहे शूरवीर मर्द मराठयांची!   

याठिकाणी काय काय पाहाल?

१)  देवळं:  महालक्ष्मी मंदिर,  ज्योतिबा,  त्रिंबुली मंदिर, नरसिंवाडी,  कात्यायनी  मंदिर विश्र्वेश्र्वर, खिद्रापूर,  बाहुबली,  कामेरी,  शंकराचार्य  
२)  ऐतिसिक  स्थळं:  न्यू  पेलेस,  शालिनी पेलेस, भवानी मंडप, टाऊन हॉल, शिवाजी विद्दापीठ, विशाळगड किल्ला, पन्हाळा किल्ला
३)  तलाव:   रंकाळा,  कोटीतीर्थ  
४) अभयारण्य – दाजीपूर   अभयारण्य

कोल्हापूरहून जाताना कोल्हापुरी साज  नक्की घेऊन जा! मन कोल्हापुरी काळ्या आईच्या गंधाने आणि तन कोल्हापुरी साजाने सजून जाईल.

%d bloggers like this: