आपले स्वागत आहे!

Posts tagged ‘Marathi language’

संस्कृत भाषा


संस्कृत मृत भाषा का?

मित्रांनो एक महत्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे भारताची जनगणना आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि या महिन्यात स्वयंसेवक पुन्हा एकदा तुमच्या कडे येतील तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची माहिती परत घेतली आणि नोंदवली जाईल.

माहिती भरतांना तुमची मातृभाषा जी काही असेल ती तुम्ही लिहाल  पण “अवगत असलेल्या भाषा” मध्ये संस्कृत भाषा न विसरता लिहा आणि खंर बघाल तर  पूर्ण जरी नाही तरी आजही आपण ती भाषा वापरतो. संध्याकाळी दिवेलागणीला म्हंटली जाणारी स्त्रोत्रे किंवा गणपतीच्या दिवसात होणारी सहस्त्र आवर्तने अगदी देवाच्या पूजेत किंवा लग्नात म्हंटले  जाणारे मंगलमय श्लोक सगळे आपल्याला माहिती आहेत काही पाठ आहेत.

हि भाषा जिवंत ठेवणं आता आपल्या हातात आहे. कारण मागील  सर्वेक्षणात संस्कृत माहिती असलेल्या लोकांची संख्या केवळ काही हजारात आहे आणि त्यामुळे तिला मृत भाषा घोषित केले जावू शकते. उलटपक्षी अरबी, फारसी माहिती असलेले लोक बरेच जास्ती आहेत कारण काही राज्यात अगदी ठरवूर ह्या भाषा पत्रकात भरल्या आहेत. मृत भाषा घोषित झाली की त्या भाषेच्या उत्कर्षासाठी कुठलाही निधी दिला जात नाही. आणि मग आपली ही पुरातन आणि पवित्र भाषा कायम स्वरूपी काळाच्या पडद्याआड जाईल.

तुमचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न ह्या भाषेला जिवंत ठेवू शकतो. आज आपल्याच भाषेवर ही वेळ येण्यास आपण सगळेच जबाबदार आहोत पण अजून वेळ गेली नाही. जेवढी जमत असेल तेवढी गम्मत म्हणून का होईना वापरा जर तुम्हाला हा विचार पटत असेल तर जरूर आपल्या मित्रांना सुद्धा सांगा.

मटार करंजी

मटार : मटार आता हिवाळ्यात भरपूर बाजारात येतो. हिरवागार ताजा मिळतं असल्यामुळे भरपूर खाल्ला जातो. गोड असल्यामुळे नुसता पण तोंडात टाकून पण खाल्ला जातो. भाजीत पण टाकतातं. पोहे व ऊपमा ह्यातही मटारचा वापर करतातं. मटार च्या करंज्या सामोसे पण करतातं. मी घरी केलेले सामेसे करंजी नमुना करतां दाखवत आहे. प्रथम मटार सोलून त्याचे मटार काढुन जाडसर वाटून घ्यावे. एक बटाटा ऊकडून घेऊन बारिक करावा. हिरवी मिरची बारीक करुन घ्यावी. थोडी कोथींबीर बारीक करुन घ्यावी. आलं पण बारीक करावं. सर्व तयार केलेले मटार मिरची चवी  प्रमाणे व मीठ पण चवी प्रमाणे टाकून घालून कोथींबीर मटार बटाटा एकत्र करावे. सारणं तयार करावे.

थोडी कणिक व थोडा मैदा एकत्र करुन त्यात तेल मीठ घालून गोळा एकत्र करावा. त्याच्या लाट्या करुन त्यात सारण तयार केलेले भरुण करंजी सामोसे मोदक असा आकार देऊन तुपातं किंवा तेलातं तलावे. पुदिनाची चटणी खोबर घालून तयार करुन त्या बरोबर सामोसे खावेतं. गोड व चवीष्ट लागतातं सर्वजण आवडीने भरपूर खातातं.

मटार बटाटा  मटार करंजी

मटार बटाटा                                         मोदक सामोसा

कोलंबो !

कोलंबो : कोलंबो ही श्रीलंकाची राजधानी ! दोन हजार वर्षापूर्वी गौतम बुध्दानं श्रीलंकेत बौध्द धर्माचा प्रसार केला. आज या देशातील सर्वाधिक लोक बौध्द धर्मीय आहेत, दोन हजार वर्षापूर्वी जिथं  गौतम बुध्दानं  बौध्द धर्माची दीक्षा दिली त्या ठिकाणी आज राजा  महाविहारा हे मंदिर बांधण्यात आलं आहे. अतिशय विस्तृत अशा या मंदिरात पहुडलेल्या बुध्दाची भव्य मूर्ती पाहायला मीळते. कुठे फसवेगिरी नाही. लबाडी नाही. देण्या-घेण्याचा योग्य व्यवहार  ठरवून आपण रिक्षानं कुठेही फिरु शकतो.

टेंपल ऑफ़ टूथ

टेंपल ऑफ़ टूथ

भाजीवाले !

भाजीवाले: मी नेहमी शाहुमिल भाजी बाझार व कपिलतीर्थ येथून भाजी आणते. आता आमच्या भागात बरीच दुकानं झाली आहे. किराणा दुकानं भाजीचं दुकानं दुध ईतर ही आमच्या भागात मिळते. मी दुघ व ईतर सामान घेतले व निघाले. भाजीवाले म्हणाले आज भाजी   कांही नको ! मग मी हिरवी वांगी भरताची छान मिळतात. ती घेतली.

मटार टोम्याटो ईकडे पावटे शेंगा छान ओल्या मिळतात. ते घेतले. कडीपत्ता आलं कोथींबीर  असं भाजी घेतली व भाजीवाले नुसतचं ओळख दाखवून या ! असे म्हणाले .

आपल्या लक्षातही न येणारे कसे ओळख दाखवतात !

शेल्फ

आमचं जुन्या घरी मोठ्ठ शेल्फ असायचं. स्वत: च्या घरातं राहण्यास आलो. एक सेल्फ़ लहान वाटायला लागलं.  मूलं कॉलेजची होती. मुलांनी घरी शेल्फ करायचं ठरवलं. मूलानी पहिल्या शेल्फच माप त्या जवळ बसेल असं माप घेतल. ह्यांना  म्हणाले  आपणच लाकडी फ़ळ्या आणू. हे पण सर्व शेल्फ घरी  करण्यास तयार झाले. मागील  बाजू  फ़्लायवूडचे पण माप घेतले. भरपूर सुळे (खीळे) आणले. दोन्ही बाजू मध्ये प्रथम दोन फळ्या मारून आकार दिला. नंतर छान शेल्फ तयार झाल. 

नंतर त्याला मागे फ़्लायवूड लावले. आकार दोन्ही शेल्फचा चांगला दिसायला लागला. जवळ जवळ दोन्ही शेल्फ सुंदरं दिसतात. मग नंतर घरीच मूलानीं रंग आणले. सर्व रंगाचं साहित्य  आणले व रंग पण घरी दिला.

घरीच एक शेल्फ बनविले. त्याचा मनापासून आनंद कौतुक आजही वाटतं आहे. रंग मात्र दोन्ही शेल्फला घरी दिल्यामूळे दोन्ही शेल्फ मनातं भरतात.

भांडी यो s..s, भांडी

आमच्या भागातं महिनात एकदा, एक नवरा बायको भोवारीण फेरी घालतात. भांडी यो s..s, भांडी असं आवाज करून फिरतातं. घरी न बोलावताहि खालूनच आवाज करून येऊ का असं विचारतात. काहीं जुने कपडे, जुनी वापरुन खराब झालेली भांडी बाहेर काढायाची. ह्यावर काय देणार म्हणून विचारयाच. नंतर थोड मोठ्ठ काहीं मागायचं. नाहीं येत काकी ह्यावर, असं करतां करतां काहीतरी भांड घ्यायचं.

जातानां काकी बरं चाललय? असं त्यांनी विचारयाच. दातं काढले वाटतं. मऊ करून खावां असं सांगून ते दोघ निघतात… दुसऱ्या ठिकाणी भांडी यो, भांडी s.. s करतं फिरतातं.

गेल्या अनेक वर्षात मी सुध्धा त्यांच्याकडून काही भांडी घेतली. त्यातील एका भांड्याचा हा फोटो.मासिक भेट

आमच्या लग्नानंतर हे मला दर महिनाला भेट देतं असतं. बटवा व कांही असं दर महिनाभर भेट दिली. पण आठवण म्हणून ही भेट (माताजींचा फोटो) आजही माझ्या जवळ आहे. मी ती जपून ठेवली आहे.

माताजींनां माझा मनापासून नमस्कार

DSCF1244 DSCF1245

खजुराहो

भारतातील त्याचप्रमाणे परादेशातील पर्यतकांचं प्रमुख आकर्षण म्हणजे खजुराहो. ही मंदिरं देवांच्या पारंपरिक मूर्तीबरोबरच शृंगारिक शिल्पांसाठीही प्रसिध्द आहेत. बरीच वर्ष ही मंदिरं तेथील जंगलामध्ये दडलेली होती. परंतु १८३८ साली एका ब्रिटिश सेनाधिकाऱ्याला या मंदिरांचा शोध लागला. मंदिरांचं खजुराहो हे नाव तिथं असलेल्या खाजुरांच्या झाडावरुन पडलेलं आहे. या सर्व   मंदिरांची रचना ‘इन्डो-आर्यन’ शैलीत आहे. हे एक संरक्षित प्रार्थनासस्थळ आहे.

दंतेश्र्वरी मंदिर

५२ शक्तिपीठांपैकी ऐक असलेल्या या पवित्र स्थानी देवीचा दात पडला असल्याची भाविकांची श्रष्दा आहे. म्हणूनच या मंदिरास दंतेश्र्वरी मंदिर म्हणतात. दक्षिणेतील चालुक्य वंशाच्या राजानं  १४ व्या शतकात हे मंदिर बांधलं. ही बस्तरच्या राजांची कुलदेवी मानली जाते. शंकिनी व दंकिनी या दोन पवित्र नद्दांच्या संगमाजवळ हे मंदिर असून भारतातील प्राचीन वास्तूपैकी हे एक आहे. बाहेरच्या जगाला या मंदिराची खूपच कमी माहिती असली तरी हे मंदिर व त्याचं आवार गतवैभाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर तंतेवाडा या तालुक्यात असून बसनं सहज जाता येण्यासाराखं   आहे.

आभार…

आई वडील यानीं आरोग्य संब्रुद्दी  दिली. त्याबद्दल आई  वडील यांचे ऋणी आहे. गुरुंनी विद्दा दिली. त्याबद्दल गुरुंची  ऋणी  आहे. मी शाळा शिकले. सतार शिकले. “श्री महालक्ष्मी यंत्र”  पूर्ण  करण्यास   सांगितले त्या गुरुंनां नमस्कार.

काका, काकु, आजीं, बाई व बापु सर्वानीं मला  वळण लावल, शिकविल त्यासर्वांची मी ऋणी आहे. सर्व भावानीं साहाय्य केलं त्याबद्दल मी त्यांची   ऋणी   आहे.

सासरी सर्वानीं मला त्यांच्यात मिसळूनं हसतं मूख ठेवलं त्याबद्दल मी सासरची ऋणी आहे.

हे तर माझे  सर्वस्वी हातभार साहय्य करणारे. मनापासून  ऋणी आहे ह्यांचीं.

मूलं सुनबाई ईतक जीव तोडुन मला सांगतात विचारतात  मला मानं देतातं. माझी  सर्व विचारपूस करतातं. मूल सूनबाई यांची मी ऋणी आहे.  मनापासून…

देशाच नागरीकत्व आहे. देशाची  मी  ऋणी  आहे. परदेशचा विसा असल्यामुळे जगाची मी ऋणी आहे.

हे  सर्व  मला देवाच्या  कृपेने मीळाल आहे. देवाला नमस्कार.

घरासमोरील झाड

हे आमच्या घरासमोरील झाड. कित्येक वर्ष झाली लाऊन.  छान वाढले आहे आता. फुलेहि छान येतात. झाडाला लहानाचे मोठे होताना बघताना एक वेगळ्याच प्रकारचा आनंद होतो. अगदी जुन्या आठवणी ताज्या होतात. झाड इतके मोठे झाले की विजेच्या तारांमध्ये  जाऊ नये म्हणून त्याच्या फांद्या बऱ्याच वेळेला कापल्या.

अजूनही टवटवीत असलेले ह्या झाड्याच्या काही फांद्या बाल्कनीतून अगदी हाताशी येतात. उन पावसात उभे असलेले हे झाड आम्हा सर्वाना वर्षानुवर्षे छान सावली व फुलं देत आहे.

जीवन असावे तर असे.

%d bloggers like this: