आपले स्वागत आहे!

पोवाडा

१२.४.२०११

मंगळवार रामनवमी

राधाबाई शताब्दी सोहळा

पोवाडा

ऐका मेधा सांगते तुम्हाला
राधाबाईचा शताब्दी सोहळा SS SS जी जी जी जी SS
सन एकोणीससे अकरा सालात
नागापूरच्या कुलकर्णी घरात
चंपाबाई नावाने आल्या जन्माला SS SS जी जी जी जी SS
दिसण्यात सडसडीत
पाहण्यात तरतरीत
कसा ! ठसठसीत बांधा शोभला SS SS जी जी जी जी SS
अशिक्षित त्यांचे शिक्षण
पण सुशीक्षीताच्या वरताण
कष्टाचा करुन कळस, भाग्य आले उदयाला SS SS जी जी जी जी SS
यशंवताच्या जीवनात आल्या
देशपांड्याचा उध्दार केला
आला भर संपत्तीच्या वैभवाला SS SS जी जी जी जी SS
नाती गोती सांभाळून
संसारी आदर्श ठेवून
परमार्थ करीत राहील्या अखेर अंरवीदांच्या सेवेला SS SS जी जी जी जी SS
गणेशाच्या कृपाप्रसादाने
खंडेरायाच्या आशीर्वादाने
क्षण आला शताब्दी सोहळा भाग्याला SS SS जी जी जी जी SS
सुवासीक फुलांचे मखर
मखमली आसन जरतार
रांगोळ्याच्या आरासाने घर लागले शोभायला SS SS जी जी जी जी SS
सुवर्णालंकार अम्गाखांद्दात शालू शेला श्रीफळ हातात
वेद – मंत्राचा घोष कसा दूमदूमला SS SS जी जी जी जी SS
पंचपक्वाने चांदी ताटात
पांच फळे चंदनी परडीत
गोड गुळाची तुला करुन केली अर्पण गणेशाला SS SS जी जी जी जी SS
शंभर दिव्यांचे देदीप्यमान
लेकी सुना नातींनी केले अवक्षण
राधाबाईंना नमस्कार करुन गुळाचा खडा भरविला SS SS जी जी जी जी SS
राधाबाईंनी आशीर्वाद दिला
प्रेमाने हात फिरविला
गणेशाला म्हणतात कश्या !
पारावर नाही आनंदाला SS SS जी जी जी जी SS
सौ मेधा शरद देशपांडे.

DSCF1575

Comments on: "पोवाडा" (1)

यावर आपले मत नोंदवा