आपले स्वागत आहे!

Archive for the ‘घरगुती’ Category

मेथीमीठहिंगमिरची

                                    ॐ
हिरवी लवंगी मिरची 5 पाच रुपये ची आणली.धुतली.
मेथी चे पिवळे दाणे 100 शंभर ग्र्याम घातले.मीठ चवी प्रमाणे घतेले.
हिंग वासाला थोडा घतेला. मेथी चे दाणे मिक्सर मधून बारीक पूड
करुन घातले.त्यात मीठ हिंग घालून एकत्र केले.
मिरची देठा सगट मध्य कापून घातली मिरची मध्ये मेथी ची पूड हिंग मीठ एकत्र
केलेले मिरची मध्ये भरले.अशा भरपूर हिरव्या मिरच्या बरल्या .आता छान
ऊन येते त्या मिरच्या चाळणीत ठेवून उन्हात वाळवत ठेवल्या. अशा मेथी मीठ
तळलेली मिरची दही ह्यात घालून हाताच्या चा बोटाने करुन दहित घालतात.
दही मेथी मीठ हिंग याची चव तोंडी लावण्यास मस्त लागते.
हिंग भरलेली हिरवी मिरची वाळवून तळून तोंडी लावण्यासाठी तयार करतात.

DSCF3687 DSCF3689

शाकंभरी भाजी

                                        ॐ
शाकंभरी भाजी
एक काकडी घेतली.दोन गाजर घातले.ढोबळी मिरची दोन घेतल्या.
लंनंगी मरची दोन घेतल्या मटार दाणे सोलून थोडे घेतले.आल किसून घेतले.
बटाटा दोन घेतले कच्चे शेंगदाणे थोडे घेतले.भाजी धुवून विळिने चिरून घेतली.
गयास पेटवून प्यान थेवले.तेल मोहरी ची फोडणी केली. त्यात सर्व भाजी घातली
पाणी भरपूर घालून शिविली.एकीकडे गव्हाचा रवा भाजुन घेतला. भाजी शिजली.
त्यात गव्हाचा रवा भाजलेला घातला. मीठ हळद हिंग घातले.
परत थोडे पाणी घातले.गव्हाचा रवा व भाज्या मीठ हळद हिंग शिजवुन
गव्हाचा उपना भाज्या सगट तयार केला.
असा उपमा मी व ही बेंगलोर येथे श्री गोंदवले महाराज यांचे देऊळ आहे.
वाडयात आहे.तेथे प्रथम असा उपमा खाल्ला !
आमची सौ सूनबाई अनु असा उपमा फार च चांगला तयार बनवते.

DSCF3683 DSCF3684

DSCF3686 DSCF3665

                                          ॐ
काही भाजी राहिली ती भाजी दुसरे दिवस ला अशा प्रकारे चिरुन शिजविली.
त्यात शेंगदाणे न टाकता तीळ भाजलेले याचा कूट घातला. लाल तिखट मीठ
हिंग हळद घातली. बाजरी ची भाकरी केली. तीळ न लावता केली.भाजी त
खूप तीळ भजलेले कूट घातला आहे.ती तिळ कूट ची चव बाजारी च्या भाकरी ला
पुरे होते. !लिंबु थेवले. भाजीत दोन टम्याटो चिरून दोन्ही भाजीत घातले आहे.
लिंबू ची चव व टम्याटो ची चव वेगळी लागते त्यासाठि लिंबू पण वापरले आहे.
कदिपत्ता चा वास पण चांगला आला आहे.आल याची चव पण वेगळी च
मस्त लागली आहे. दोन दिवस मस्त शाकंभरी भाजी करण्यास मला
खुप मना पासून चांगले वाटले !
खाण्यास पण भाजी उपमा ! भाजी बाजरी ची भाकरी गोड चव आता हि
लागते. !

DSCF3692 DSCF3693

                 DSCF3664

गोड धिरडी

                                        ॐ
गोड धिरडी
छोटा गूळ याचा खडा घेतला .किसनी ने किसला.
एका पातेल्यात गूळ याचा किसलेला किस घातला थेवला.
थोड पाणी एक वाटी पाणी गूळ हयात घातले. अर्धा तास पाणी गूळ
पातेल्यात भिजत ठेवले.त्यात कणिक गव्हाचे पीठ घातले.दोन डाव
गव्हाचे पीठ घातले.पातळ सर ठेवले ही धिरडी जाडसर च चांगली लागतात.
पातळ हवी असल्यास कणिक गूळ याचे पीठ पातळ करावे.मी जाडसर ठेवले
आहे.मऊ छान होतात. गयास पेटवून पेटलेल्या ग्यास वर तवा ठेवला.
तवा तापू दिला.तूप तवावर टाकले.उलथन्याने च तूप पसरविले.
डावाने कणिक व गूळ याचे एकत्र केलेले पातळ पीठ डावा ने घातले.
उलथन्याने ते पीठ तवा त पसरविले.दोन्ही बाजूने छान भाजले.
मस्त जाळी धीरड याला पडली आहे.
हे धिरडे धिरडी दूध बरोबर काण्यास चांगली लागतात.
वाटल्यास दूध हयात गूळ घालून जास्त गोड खाता येते करता येते.
पण जास्त गोड फार जात नाही थोड्या वेळ चांगले लागते.फार गूळ ही
फार खाऊ नये .
मस्त गूळ पाण्यात बिजवून कणिक गव्हाचे पीठ पातळ सर करून
त्याची धिरडी गावन डोसा तयार केला आहे मी !
असेच तांदुळ याचे नुसते पीठ पाण्यात पातळ करून डोसा करतात.
त्यात गूळ घालु नये व तो दूध गूळ एकत्र करून ह्या बरोबर तांदूळ पीठ
याचा डोसा खातात.मी आपला गव्हाचे पीठ कणिक याचे धिरडी गूळ एकत्र
करून दुध व थोडा गूळ घालून तयार केले आहे.

DSCF3669 DSCF3671

शंगदाणे गूळ तूप गोड

                         ॐ
शंगदाणे व गूळ याचे गोड दाणे
मुठभर कच्चे शेंगदाणे घेतले थोडा मूठभर गूळ घेतला.
दोन चमचे सादूक तूप घेतले.गयास पेटविला त्यावर पातेले
ठेवले.दोन चमचे तूप घातले.गूळ घातला पातळ करुन घेतला.
त्यात कच्चेच सालासगट शेंगदाणे घातले. तूप व गूळ कच्चे शेंगदाणे
ला गूळ लागे पर्यंत सारखे केले.शेंगदाणे गूळ व सादूक तूप सारखे एकत्र
केले चिकी केली नाही .सुटे शुटे शेंगदाणे खाता येतील असे ठेवले.
एक एक गूळ तूप लागलेला शेंगदाणा निघाला
गूळ तूप तळलेला चिकट थोडा गोड सादूक तूपाचा खमंग पणा
गोड गूळ लावलेला चांगला चविष्ट लागतो गोड लागतो.
आता 14 जानेवारी १४ ला आली आहे तीळ गूळ याचे चकी लाडू
रेवडी पोळ्या केल्या जातील व वाटणे लुटणे होईल !
तरी पण गूळ तूप कच्चे शेंगदाणे गोड खाण्यास चांगले एक एक
तोंडात टाकण्यास नक्कीचं आवडणार ! फार तीळ खाऊन उष्ण
होण्याची शक्यता असते !

DSCF3585 DSCF3586

                             DSCF3578

मुळा पाला थालिपीठ

                                      ॐ
मुळा व मुळाचा पाला याचे थालिपीठ :
एक मुळा पाला सगट 8 / ८ आठ रुपये ला घेतला आणला.मिळाला .
मुळा व पाला धुतला पाला विळी ने बसून कापला चिरला.मुळा किसनी ने किसला.
त्यात पाणी न घालता ज्वारीचे पीठ हरबरा डाळी चे पीठ अंदाजाने घातले.
मीठ लाल तिखट हिंग हळद कच्चतेल मोहन म्हणून घातले.सर्व एकत्र
गोळा केला.तवा वर तेल हाताने लावून पसरविले.त्यावर मुळा चा केलेला गोळा
ठेवून हाताने पसरविला भोक पाडली. ग्यास पेटवून तवा थालीपिठा चा ठेवला दोन्ही
बाजूने मुळा चे थालीपीठ भाजले भाजून घेतले मस्त मुळा पाला ज्वारीचे पीठ हरबरा डाळीचे
पीठ मीठ हिंग लाल तिखट कच्च तेल तवा वर ग्यासवर भाजलेले थालीपीठ तयार झाले केले.
दही बरोबर खाण्यासा मुळा व पाला याची चव एकदम छान आली आहे.

DSCF3574 DSCF3575

DSCF3576 DSCF3577

ढोभळीहिरवीमिरची मेथी पुऱ्या

                                 ॐ
ढोभळी हिरवी मिरची व मेथी च्या पुऱ्या
दहा १० रुपये च्या ढोभळी मिरची आणली.
एका जुडी मेथीची पेंडी दहा रुपये १० ला आणली.
मेथी निवडून घेतली मेथी व मिरची धुवून घेतले.घेतली.
बसून विळीने मेथी व ढोभळी मिरची चिरून कापून घेतली.
मिक्सर मध्ये घालून थोडेसे पाणी घालून बारीक पातळ सर केले.
त्या मेथी व मिरची मध्ये मीठ हळद हिंग घातले व कणीक व
हरबरा डाळीचे पीठ घातले.गोळा केला त्याचे छोटे गोळे करून
पुऱ्या केल्या ग्यास वर कढई त तेल ठेवून तेल तापवू दिले तेलात
मेथी व हिरवी ढोभळी मिरची चे केलेले पुऱ्या तळून काढल्या.
मेथी व ढोभळी मिरची हिरवी असल्यामुळे कणिक हरबरा डाळीचे पीठ व
हिंग मीठ मोहन तेल हळद सर्व तयार केलेले पुऱ्या तळून हिरव्या गार केल्या
झाल्या. ढोभळी मिरची व मेथी ची मीठ हळद हिंग याने चव चांगली आली येते.

DSCF3545 DSCF3546

DSCF3550 DSCF3429

उड्डाण

उड्डाण

मंद हवा कुरवाळते आहे
निसर्ग आलिंगन देण्यास उभा आहे
अशात ह्या पतंगावर आरोहण
फक्त आकाशा पर्यंत पोहोचण्यासाठी

एकटे उड्डाण वरती, हे नाही एकटेपण
हे तर एक आमंत्रण शेजारील निसर्ग शोभेत एक होण्यासाठी
उड्डाणाची जादू आणि उत्तुंग भरारी
आंतर्मन भरते क्रुतद्यतेने

एकटे उड्डाणाचा अनुभव
जसा निसर्ग म्हणतोय हेलो
हा अनुभव एव्हडा प्रचंड, जेंव्हा तो येईल
तेंव्हा विनम्रतेने माणूस झुकेलच, झुकेल

flysolo

उकडी चे मोदक

                                        ॐ
उकडी चे मोदक : एक नारळ याचे खोबर खोवून घेतले.
एक बाउल खोबर कीस एक बाउल केले झाले.त्यात एक बाउल
गूळ घातला. खोबर गूळ व खोबरातील पाणी एका पातेल्यात घेतले.
नारळ याचे पाणी प्यायले तर नैवेद्द उष्टा होतो. व नारळ याचे पाणी
सर्वांना मिळते.नारळ खोबर गूळ नारळ याचे पाणी पेटत्या गॅस वर पातेले
ठेवले.चांगले शिजविले फार घट्ट केले नाही.कडक होते.
दुसऱ्या पातेल्यात एक बाउल पाणी घातले.थोड मीठ घातले.तेल एक चमचा
घातले. पाणी उकळू दिले.एक बाउल तांदूळ याचे पीठ घातले.चांगली वाफ आणली.
झाकण ठेवले.
तांदूळ पीठ याची उकड चांगली केली.झाली.
एका ताटात थोडी थोडी तांदूळ याची उकड घेतली.तांदूळ याचा गोळा करून त्यात
नारळ याचे खोबर गूळ नारळ याचे पाणी याचे केलेले सारण भरले.अकरा ११ मोदक
केले झाले. दोन २ कारंजी केल्या.हे सर्व कुकर मध्ये पाणी घालून भांड्यात तांदूळ याचे
उकडी चे मोदक याला कुकर चे झाकण ठेवून वाफ आणली शिट्टी दिली नाही.
अशा प्रकारे तांदूळ पीठ नारळ खोबर नारळ पाणी गूळ सर्व एकत्र मोदक तयार केले.
झाले. मी केले ! आकार हाताने च मोदक यांना दिला.नीट नाही आला.
पण आमचा प्रणव म्हणाला मोदक चं छान झालेत ! आणि काय हवे ! हवं !

             DSCF2918 DSCF2913

 DSCF2914 DSCF2915DSCF2910

गणपती बाप्पा मोरया

गणपती बाप्पा मोरया!
घरातील गणपती.

 

भूईमुगाच्या शेंगा

                                    ॐ
भूई मुगाच्या मुगाच्या जमिनीत भूई मुगाच्या शेंगा येतात. भूई मुगाच्या शेंगदाणे
वाळवून शेंगदाणे तयार होतात.जुलै ऑगस्ट मध्ये अशा प्रकारचे भूईमुगाच्या शेंगा मिळतात.
मध्यंतरी ३० रुपये पावशेर असायचे. आज मला १५ रुपये पावशेर मिळाले.आणले.कांही भूई मुगाच्या
शेंगा भाजल्या.कांही कुकर मध्ये पाणी व मीठ व भूईमुगाच्या शेंगा गॅस पेटवून कुकर ठेवला तीन चार
शिट्या कुकरला दिल्या.कुकर मधील भुईमुगाच्या शेंगा मीठ पाणी घातल्या मुळे छान मऊ व खारट आतील
शेंगदाणे तयार झाले.कुकर गार करून चाळणीत घातले.पाणी निथळू दिले.गरम च खाण्यास चांगले लागतात.
भाजलेले भुईमुगाच्या शेंगा पण मीठ लावून तसे पण खाल्ले.खातात

               DSCF2739  DSCF2740

कांद्याचीपात

                                                ॐ
कांदा याची पात : कांद्याचीपात : कांदाचीपात भाजी पाच (५)एक जुडी पेंडी मिळाली.
मी एक पेंडी घेतली.कांदाचीपात धुतली.बारीक विळीने चिरली.कांदा व कांदाचीपात दोन्ही
एकत्र केली.गॅस पेटवून पातेले ठेवले तेल मोहरीची फोडणी केली.त्या फोडणीत चिरलेली
कांदा व कांदाचीपात घातली.टाकली.कळत न कळत पाणी घातले.झाकण ठेवले.चांगली
कांदा व कांदाचीपात शिजली.मीठ, लाल तिखट, हळद,हिंग घातला नाही.कांदा याचा वास चांगला येतो.
परत परतून घेतले.हरबरा डाळीचे पीठ लावतात.मी लावले.नाही नुसती परतून चांगली लागते.एक चमचा
शेंगदाणे कूट घातला परत झाकण ठेवून कांदा कांदाचीपात मीठ,लाल तिखट शेंगदाणे चा कूट एकत्र करून वाफ
आणली.चांगली कांदा व कांदाचीपात याची भाजी तयार झाली.केली.डिश मध्ये काढून छायाचित्र काढले मी चं!
कोणताही पदार्थ मध्ये मीठ तिखट तेल मोहरी पाणी याची चव असते.मूळ चं भाजी उसळ यांना चव असते.तीच
चव ठेवावी म्हणजे पदार्थ याला चव येते असते.
माझ्या सौ.सासूबाई नेहमी म्हणत कोल्हापूर ला पदार्थ याला चं चव आहे.पूर्वी सकाळ चे सकाळी व रात्रीचे
रात्री पदार्थ पोळी पण संपत.संध्याकाळी भाकरी इतर भाजी असे.फ्रीज घरी नसायचे चं.

                         

                         DSCF2735    DSCF2736

श्रावण अमावास्या

                                         ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर दक्षिणायन वर्षाऋतु
आश्लेषा नक्षत्र कर्क राशिप्रवेश शुक्रवार श्रावण कृष्णपक्ष ३० दर्श पिठोरी अमावास्या
तसेच दिनांक तारीख १७ ऑगस्ट २०१२ साल आहे.
पोळा मातृदिन आहे.
हा दिवस पोळा अमावास्या भारतीय पंचाग प्रमाणे मातृदिन साजरा करतात.
बैल याची पूजा करतात.शेवया ची खीर करतात.साधी कणिक याची पुरी करतात.
मुलगा व मुलगी यांना आई दोरे याला हळद कुंकू लावून वाण देते.शेवया ची खीर पुरी देते
अशा प्रकारे पोळा श्रावण अमावास्या मातृदिन साजरा करतात.

                    DSCF2733 शेवया

                  DSCF2723    DSCF0356

सौ. सूनबाई


सौ.सूनबाई (सौ .अनु )
मी व हे सौ.सूनबाई व मुला कडे अमेरिका येथे गेलो होतो.
त्यांनी असाच रेडीओ लावला.त्यात गाणं ओळखायचं व कोण
कोणी लिहिले कोणत्या सिनेमात आहे हे झटपट रेडोओ वर सांगायचे.
लवकर सांगितले की पहिला नंबर देत.व निकाल पण सर्व गाणी झाल्या नंतर लगेच चं
देत. आमच्या सौ सूनबाई ला पहिला क्रमांका चे बक्षीस मिळाले.त्यात ड्रेस वा किंवा साडी मिळाली.
आमच्या सौ.सुनबाई हिने मला मॉल मध्ये नेले. व साडी पसंत करायला सांगितली.व ती बक्षीस याची साडी
सौ.सूनबाई सौ अनु ने मला दिली.तिच्या बक्षीस ची साडी मला घेतांना पण मला अभिमान झाला वाटला.
मी ती बक्षीस ची साडी नसले.सौ सुनबाई हिने माझा बक्षीस च्या साडीचा माझा फोटो काढला.
आपल्याला मिळालेले बक्षीस आपल्या सौ.सासू ला (त्यावेळा ) द्दावे द्यावे ही चं मोठी आदराची ठेवण आहे.
तूं तूं मे मे

DSCF3385.jpg

मुळा

                                         ॐ
मुळा : सकाळी ८ वाजतां मुगाची डाळ भिजत टाकली. घातली.
संध्याकाळी ६ वाजतां पर्यंत मुगाची डाळ चांगली मऊ झाली.भिजली.
राहिलेला मुळा विळीवर बसून विळी च्या पाताने भाजी सारखा चिरून घेतला.
गॅस ची शेगडी पेटवून भांडे ठेवले तेल मोहरी ची फोडणी केली.तेल मोहरी च्या
फोडणीत भिजलेली मुगाची डाळ घातली.टाकली.हरबरा डाळ पण चालते.हरबरा डाळीचे
पीठ मुळाच्या पाला याला लावले.आता मुग डाळ वेगळी चव असावी.मुगाच्या डाळीत पाणी
घालून मुगाची डाळ शिजविली.मुळा चिरलेला भाजी मुगाच्या डाळीत घातला.परत थोड पाणी
घालून मुळा व मुगाची डाळ शिजविली.पचण्यास व चावण्यास सोपे जाते.पांचट होत नाही.
नंतर हळद मीठ लाल तिखट घातले. झाकण ठेवून वाफ आणली.थोडे पाणी रस मुळाच्या व
मुगाच्या डाळीत तिखट मीठ हळद तेल मोहरी फोडणी सर्व वाफ झाकण ठेवून आणली.
छान मुळा मुगाची डाळ तिखट मीठ हळद तेल मोहरी ची फोडणी सर्व एकत्र भाजी बाऊल मध्ये
काढली.फोटो काढला. मीच !

                                        DSCF2726

मुळा व मुळा चा पाला

                                         ॐ
मुळा व मुळा चा पाला : मुळाचा पाला सगट पांच रुपये (५) एक मिळाला.
मी १० दहा रुपये चे दोन पाला सगट मुळा आणला. घेतला.मुळा चा पाला एकत्र केला.
धुतला.विळी वर बसून ताटात मुळा चा पाला विळी च्या पातीने बारीक चिरून घेतला.
गॅस पेटवून पातेले ठेवले.तेल व मोहरी ची फोडणी केली.फोडणीत चिरलेला मुळा चा पाला
घातला.पाणी अर्धा भांड मुळाच्या पाल्याच्या भाजीत घातले.चांगले.शिजवू दिले.मुळाचा पाला
शिजल्या नंतर लाल तिखट मीठ हळद घातली.हिंग घातला नाही.मुळा चा वास चांगला येतो.
सर्व हलवून घेतले.त्यात डाव भर चना हरबरा डाळीचे पीठ घातले.परत मुळा चा पाला हरबरा डाळीचे
पीठ लाल तिखट मीठ हळद एला मोहरी ची फोडणी सेवा एकत्र हलवून वाफं आणली.परत हलवून वाफं आणली.
मुळा चा पाला याची भाजी चांगली केली.तयार झाली.बाऊल मध्ये मध्ये काढली.मुळा चा पाला ची भाजी शिजे पर्यंत
पांढरा मुळा किसणीने थोडा किसाला.त्यातील पाणी पिळले नाही.मुळाच्या किसा मध्ये मीठ शेंगदाणे याचा दोन चमचे कुट
घातला तिखट घातले नाही.मुळा तिखट असतो तेवढा व ती चव चांगली लागते .मुळाची कोशिंबीर तयार केली.
मुळाचा पालाची भाजी व मुळा ची कोशिंबीर तयार केली.त्याचे छायाचित्र फोटो काढला मीचं !

                   DSCF2720 DSCF2721  DSCF2722

ऋतू प्रमाणे पानांची पूजा

अधिक माहिती ऋतु प्रमाणे झाडांची पाने ह्या ब्लॉग मध्ये ५ सप्टेंबर २०११ ला लिहिली आहे. तो ब्लॉग अवश्य वाचावा.

श्री स्वस्ति शालिवाहनशक ऋतू प्रमाणे पानांची पूजा करतात. त्या पानांची पूजा घरात केलेली आहे. त्याची रोपं दाखवीत आहे.

सर्व छायाचित्र एकत्र पाहण्यास चांगली वाटतील हे नक्कीच !

aca1f8502b4e  DSCF0810  DSCF0827  DSCF1210dscf1827  DSCF1949DSCF1991  DSCF2682  DSCF2711  DSCF1130  कडुनिंब

श्रावण पौर्णिमा

                               ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
श्रावण शुक्लपक्ष बुधवार १४ नारळी पौर्णिमा आहे.
तसेच १ ऑगस्ट २०१२ साल आहे.
त्या निमीत्त मी नारळ साखर तांदूळ तूप व इतर एकत्र करून नारळ याचा
नारळीभात केला आहे.
पाऊण बाऊल आंबेमोहर बारीक तांदूळ घेतले एक नारळ फोडून विळी वर बसून खोवून
खोऊन घेतले.पाऊण बाऊल साखर घेतली.लवंग ४/५ घेतल्या.सादुक तूप अर्धी वाटी घेतले.
बदाम थोडे घेतले.चारोळी,केशर रंग,जायफळ असे थोडे घेतले.
तांदूळ भांड्यात काढून धुतले.कुकर च्या ठेवण्याच्या भांड्यात तूप व लवंग गरम केले.
धुतलेले तांदूळ तूप व लवंग ह्यात घातले.थोडे परतले कुकर मध्ये पाणी घातले.
गॅस पेटवून कुकर ठेवला.कुकर च्या पाण्यात तांदूळ तूप लवंग हे पातेले ठेवले त्यात
दोन बाऊल पाणी गरम घातले.भात तांदूळ नेहमी सारखे चार शिट्या देऊन शिजवून घेतले
घेतला.कुकर गार झाल्या नंतर दुसरे पातेले गॅस पेटवून ठेवले.त्यात पण सादुक तूप ,लवंग ,
खोवलेले खोबर नारळ घातले.सर्व एकत्र केले.त्यात शिजलेले भात घातला.रंग ,जायफळ ,केशर ,
बदाम,चारोळी व साखर घातली.सर्व एकत्र हलवून वाफ आणली.साखर खोबर नारळ ओल असल्यामुळे
व भात पण ओला असल्यामुळे पाणी घालण्याची गरज नाही.छान वाफ आणली.परत चांगली वाफ आणली.
मस्त साखर भातात विरघळून नारळ,साखर,तांदूळ,तूप,लवंग,जायफळ,रंग व केशर यांचा एकत्र नारळा चा
नारळीभात गोड हवा तेवढा केला. झाला.मी नारळीभात केला आहे.जास्त गोड हव असल्यास साखर थोडी वाढवावी.
पण जास्त फार गोड झाल्यास जास्त भात जात नाही.म्हणून जेवढे तांदूळ तेवढीच साखर पुरते.

                        DSCF2705

                                      DSCF2709

मटकी ची उसळ

                                                  ॐ
मटकी ची उसळ : १०० ग्रॅम मटकी आणली आठ (८ ) रुपये पावशेर मिळाली.
दिवस व रात्र चोवीस तास (घंटा) भिजत पाण्यात पातेल्यात भिजत ठेवली.
दुसरे दिवस मटकी चांगली भिजली.चाळणीत भिजलेली मटकी घातली.टाकली.
मटकी तले पाणी सर्व काढून टाकले.एका स्वछ कपड्यात भिजलेली मटकी घातली.
बांधून ठेवली.दुसरे दिवस ला मटकी ला छान चांगलेच मोड आलेत.मोड आलेली
मटकी मध्ये कच्चे शेंगदाने मुठ भर घातले.गॅस पेटवून पातेले ठेवले.पातेल्यात तेल
मोहरीची फोडणी केली दिली.फोडणीत भिजलेली मोड आलेली मटकी व कच्चे मुठभर
शेंगदाने घातले.भांडभर पाणी मटकी शेंगदाने ह्यात घातले.झाकण ठेवून मोडआलेली
मटकी व कच्चे शेंगदाने शिजवू दिले.चांगलेच शिजले.त्यात मीठ,लाल तिखट ,हळद,हिंग
घातले. घातला.परत मोड आलेली मटकी,कच्चे शेंगदाने,मीठ,तिखट.हळद,हिंग शिजवीले.
चांगली चं वाफ आणून थोडे उसळीत पाणी ठेवले.अशा प्रकारे मटकी ची उसळ घरी मोड आणून
तयार केली. मी !

               DSCF2697    DSCF2699

नागपंचमी

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर दक्षिणायन वर्षाऋतु श्रावण शुक्लपक्ष सोमवार ४/५ नक्षत्र पूर्वा रास कन्या नागपंचमी आहे. नवनागपुजन नागाची पूजा करतात. श्रावण सोमवार असल्यामुळे शिवमुष्टि (तांदुळ) महादेवाला वाहतात. घालतात. तसेच तारीख दिनांक २३ जुलै (७ ) २०१२ साल आहे. सोमवार आहे.

नागपंचमी असल्यामुळे भासक धान्य खातात. तवा, विळी, सुरी याचा वापर नागपंचमी चा दिवस म्हणून वापर करत नाहीत. शेतात नांगरणी व पेरणी झाल्यामुळे नाग बाहेर येतात. नागाची पूजा करतात. ज्वारीच्या लाह्या व दुध देतात. मी १० रुपये अर्धाशेर मापट लाह्या आणल्या. भट्टीची दुकान असतात.

तेथे खुप जणांनीज्वारीच्या लाह्या घेतल्या. प्लॅस्टिक पिशवीत बांधलेल्या मिळतात. मी कांही ज्वारीच्या लाह्याच मिक्सर मधून पीठ केले. ज्वारीच्या लाह्याच्या पिठात, हिरवी मिरची, मीठ, ताक, तेल मोहरीची फोडणी करून लाह्याच्या पिठात घातली. कांही लाह्या शेंगदाणे फोडणीत घातले मीठ,लाल तिखट, हळद घातली. फोडणी कोंबट झाल्या नंतर लाह्या घातल्या. गरम फोडणीत टाकले तर लाह्या आकसून बारीक होतात. पावसाला ऋतू मध्ये ज्वारीच्या लाह्या खातात.

DSCF2693  DSCF2694DSCF2695

श्रावण पौर्णिमा ला जसे भावाला बहिण राखी बांधणे याला महत्व आहे. तसेच नागपंचमीला बहिण भावाच्या पाठीवर हाताने काकडी फोडणे फोडण्याचा महत्व आहे. ती काकडी भाऊ बहिण खातात. का ते माहीत नाही.

मनाचे श्लोक


|| श्रीहरि ||
मनाचे श्लोक ( मराठी )
श्रीसमर्थरामदासस्वामीविरचित

जनीं सांगतां ऐकतां जन्म गेला |
परी वाद वेवाद तैसा चि ठेला |
उठे संशयो वाद हा दंभधारी |
तुटे वाद संवाद तो हीतकारी || ११२ ||
जनीं हीत पंडीत सांडीत गेले |
अहंतागुणें ब्रह्मराक्षेस जाले |
तयाहूंनि वित्पन्न तो कोण आहे |
मना सर्व जाणीव सांडूनि राहे || ११३ ||
फुकाचें मुखीं बोलतां काय वेचे |
दिसेंदीस अभ्यांतरी गर्व सांचे |
क्रियेवीण वाचाळता वेर्थ आहे |
विचारें तुझा तूं चि शोधून पाहें || ११४ ||
तुटे वाद संवाद तेथें करावा |
विवेकें अहंभाव हा पालटावा |
जनीं बोलण्यासारखें आचरावें |
क्रियापालटें भक्तिपंथे चि जावें || ११५ ||
बहू श्रापितां कष्टला अंबऋषी |
तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी |
दिल्हा क्षीरसिंधू तया ऊपमानी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी || ११६ ||
धुरू लेकरुं बापुडें दैन्यवाणें |
कृपा भाकितां दिधली भेटि जेणें |
चिरंजीव तारांगणीं प्रेमखाणी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी || ११७ ||
गजेंद्रू महां संकटीं वास पाहे |
तयाकारणें श्रीहरी धांवताहे |
उडी घालती जाहला जीवदानी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी || ११८ ||
अजामेळ पापी तया अंत आला |
कृपाळूपणें तो जनीं मुक्त केला |
अनाथासि आधार हा चक्रपाणी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी || ११९ ||

 

 

 

मनाचे श्लोक


|| श्रीहरि: ||
मनाचे श्लोक ( मराठी )
|| श्रीसमर्थ रामदासस्वामीविरचित

क्रियेवीण नानापरी बोलिजेतें |
परी चीत दुश्र्चीत तें लाजवीतें |
मना कल्पना धीट सैराट धावे |
तया मानवा देव कैसेनि पावे || १०४ ||
विवेकें क्रिया आपुली पालटावी |
अती आदरें शुध क्रिया धरावी |
जनीं बोलण्यासारिखें चाल बापा |
मना कल्पना सोडि संसारतापा || १०५ ||
बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा |
विवेकें मना आवरी स्नानभ्रष्टा |
दया सर्व भूतीं जया मानवाला |
सदा प्रेमळु भक्तिभावें निवाला || १०६ ||
मना कोपआरोपणा ते नसावी |
मना बुधि हे साधुसंगीं वसावी |
मना नष्ट चांडाळ तो संग त्यागीं |
मना होइ रे मोक्षभागीं विभागी || १०७ ||
सदा सर्वदा सज्जनाचेनि योगें |
क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे |
क्रियेवीण वाचाळता ते निवासी |
तुटे वाद संवाद तो हीतकारी || १०८ ||
जनीं वाद वेवाद सोडूनि द्दावा |
जनीं सुखसंवाद सूखें करावा |
जगीं तो चि तो शोकसंतापहारी |
तुटे वाद संवाद तो हीतकारी || १०९ ||
तुटे वाद संवाद त्यातें म्हणावें |
विवेकें अहंभाव यातें जिणावें |
अहंतागुणें वाद नाना विकारी |
तुटे वाद संवाद तो हीतकारी || ११० ||
हिताकारणें बोलणें सत्य आहे |
हिताकारणें सर्व शोधूनि पाहें |
हिताकारणें बंड पाषांड वारी |
तुटे वाद संवाद तो हीतकारी || १११ ||

रवा खोबर याचे लाडू

रवा नारळ ( खोबर ) याचे लाडू :

एक बाऊल रवा घेतला. अर्धा बाऊल साखर घेतली. एक नारळ घेतले.मूठभर बदाम घेतले. साजूक तूप डेचक (भांड) घेतले. थोडे पाणी घेतले.जायफळ थोडे घेतले. प्रथम नारळ विळी बसून दोन्हीं हाताने ताटात खोवून खोऊन घेतले.

प्रथम रवा नुसता भाजला. तुपा बरोबर भाजला जात नाही.फुलतो. फसफसतो. रवा छान तांबूस भाजून घेतला. त्यात खोवलेले खोबर घातले.परत रवा खोबर भाजून घेतले.खोबर ओल असल्यामुळे वाफ आली.छान परत रवा भोबर.

नंतर सादूल तूप रवा व खोबर भाजलेल्या मध्ये घातले. परत एकसारखे रवा खोबर सादूक तूप एकत्र केले.पातेले गॅस बंद करून खाली ठेवले.

पातेल्यावर झाकण ठेवले रवा सर्व भाजलेले छान वास उडू नये म्हणून झाकण ठेवले.तो पर्यंत बदाम जायफळ मिस्कर मधून बारीक केले.दुसऱ्या पातेल्यात साखर घेतली.घातली.साखर भिजेपर्यंत पाणी घातले. गॅस पेटवून साखर व पाणी पातेले ठेवले.साखर पाणी उकळू दिले.पाक एक तारी केला.पाक रवा वर टाकून गोळा झाला का? पाहिला.

सर्व साखरेचा पाक रवा खोबर तूप बदाम जायफळ हे सर्व भाजलेले एकत्र केलेले ह्यावर साखरेचा पाक घातला. थोडा दबू दिला. सर्व एकत्र झालेले रवा लाडूचे मिश्रण याचे लहान मोठे लाडू वळले. लाडू तयार केले.मस्त रवा ओल खोबर तूप बदाम पावडर
जायफळ याचे भाजून लाडू तयार झाले.केले.

पूर्वी आह्मी पुण्यात दिवाळीत जात असू.सर्वांचे लाडू एकत्र  केले (आत्या सासूबाई आक्का यांनी) फराळाचे आलेले लाडवांचा व नंबर लावला. त्यांनी पुण्याचा लाडवाला १ पहिला नंबर तिला.माझ्या लाडवाला दुसरा नंबर दिला.मी त्यावेळा पांढरे लाडू दिसावे
म्हणून कमी भाजले होते.आतां सवय झाली.

अन्नपूरणा स्तोत्र पूर्ण लिहून झाले.वाटले गोड कांही करावे व रवा ओंल खोबर साखर तूप भाजून बदाम पावडर जायफळ याचे लाडू

चांगले मस्त झालेत!

DSCF2678 DSCF2679

अन्नपूर्णास्तोत्रम्

अन्नपूर्णास्तोत्रम् |
श्रीमच्छंकराचार्यविरचितम्
दृश्यादृश्यप्रभूतवाहनकरी ब्रह्माण्डभाण्डोदरी
लीलानाटकसूत्रभेदनकरी विज्ञानदीपाड.कु री |
श्रीविश्वेशमन: प्रसादनकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपुर्णेश्वरी || ५ ||
भाषांतर – हे आई अन्नपूर्णे तू दृश्य आणि अदृश्य अशा
सगळ्यांचा चरितार्थ चालविणारी आहेस.तुझ्या पोटात हे त्रैलोक्य
सामावलेलं आहे,तू संसाररूपी नाटकाचा सहजतेने नाश करणारी आहेस,
तू विज्ञानाच्या दिव्याला प्रज्वलीत करणारी आहेस, तू श्रीविश्वनाथाचे मन
प्रसन्न करणारी आहेस, काशी नगरीची अधीष्ठात्री देवता,कृपेचा आधार
असलेली,अन्न पुरविणारी, मला भिक्षा दे. || ५ ||

आषाढ पौर्णिमा


स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्षिणायन ग्रीष्मऋतु नक्षत्र मूळ राशिप्रवेश धनु मंगळवार
आषाढ शुक्लपक्ष १५ व्यासपूजा, गुरुपौर्णिमा, आषाढ पौर्णिमा आहे .
तसेच दिनांक तारीख ३ जुलै (७)२०१२ साल ला गुरुपौर्णिमा आषाढ पौर्णिमा
व्यासपूजा आहे.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुदेर्वो महेश्र्वर: |
गुरु: साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम: ||

DSCF2670 DSCF2671DSCF2671

कडवे वाल

                                                   ॐ
कडवे वाल : पूर्वी वाल मिळत असतं ते पाण्यात भिजवुन दुसरे दिवसला मोड आणत.
गरम पाण्यात टाकून सोलून उसळ करत असतं आता मी कडवे वाल डाळ चं आणली.
२५ रुपये पावकिलो तुरीची डाळ कशी शिजवितात तसेच कडवे वाल शिजविले.पातेल्यात
थोडे कडवे वाल घेतले.कुकर मध्ये पाणी घातले पातेल्यातील कडवे वाल धुतले.पाताल्यात
पाणी हळद टाकले.कुकर मध्ये कडवे वाल पाणी ह्याचे पातेले ठेवले. कुकर ला झाकण लावून
प्रेशर ठेवून गॅस पेटवून कुकर ठेवला. चार ४ पाच ५ शिट्या दिल्या.कुकर गार झाल्या नंतर
गॅस शेगडी वर दुसरे पातेले ठेवले तेल मोहरीची फोडणी केली शिजलेले कडवे डाळ फोडणीत
घातले.लाल तिखट मीठ हिंग घातले .गोड कांही साखर गूळ घातले नाही.तसेच शिजवलेले
कडवे वाल लाल तिखट मीठ हिंग तेल मोहरी ची फोडणी सर्व उकळू दिले .व कडवे वाल याची
उसळ किंवा आमटी तयार केली. झाली.नंतर बाउल मध्ये वाढली.काढली.व छायाचित्र काढले.
कडवे वाल याची आमटी उसळ चवीला पण चांगली झाली.पोळी भाकरी भात कशा पण बरोबर 
खाण्यास चांगली लागते.

                             DSCF2662

                              DSCF2666

आषाढ एकादशी

आषाढ एकादशी : स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्षिणायन ग्रीष्मऋतु आषाढ शुक्लपक्ष विशाखा नक्षत्र वृश्चि राशिप्रवेश
शनिवार ११ शयनी एकादशी शुक्ल आषाढ एकादशी आहे.पंढरपूर यात्रा आहे.
तसेच तारीख दिनांक ३० जून (६)२०१२ साल ला शयनी एकादशी आहे.


   

जवस व कारले चटणी

जवस व कारले याची चटणी : जवस लाल असतात.कारले काळे असतात. मी जवस व कारले पाव पाव किलो आणले २५ पंचवीस रुपये पाव किलो मिळाले.दोन्ही २५ / २५ रुपये. पातेल्यात थोडे जवस घेतले. गॅस पेटवून जवस याचे पातेले ठेवले जवस उडे पर्यंत जवस भाजले.ते पातेले तसेच ठेवले दुसऱ्या पातेल्यात कारले थोडे घेतले. ते पण गॅस पेटवून कारले चे पातेले ठेवले उडे पर्यंत कारले भाजले. मिक्सर मध्ये प्रथम जवस घातले लाल तिखट मीठ घातले चांगले भाजलेले जवस लाल तिखट मीठ एकत्र करून मिक्सर चालू केला पूड झाल्या नतंर मिक्सर बंद केला बाउल मध्ये जवस याची चटणी काढली.भाजलेले कारले मिक्सर मध्ये घातले त्यात पण लाल तिखट मीठ घातले मिक्सर चालू केला भाजलेले कारले लाल तिखा मीठ सर्व एकत्र पूड झाली कारले याची चटणी तयार झाली.कारले याची चटणी बाउल मध्ये काढली. फोटो छायाचित्र काढले जवस कारले चटणीचे !नतंर काचेच्या बरणीत भरून ठेवले भरपूर दिवस अशा चटण्या राहतात.तेल घालून चवी साठी खातात.

 

वहिनी !

वहिनी !

वहिनी, आम्ही सर्व भावंडे आईस वहिनी म्हणत असू. ओळखीचे पण  व गावातील नातेवाईक पण वहिनीच म्हणत असत. म्हणतो ! माझी आई.

वहिनी नेहमी म्हणत असे पुष्पा पहिल्या झटक्यात S . S .C . पास झाली.
त्यावेळेला H .S . C . असे ! मला S  . S  . C  . (H  . S . C  .) पन्न्नास (५०) वर्ष झाली आहेत.

कणिक कधी तेल मीठ शिवाय भिजवू नये सांगत.

विडा चं पान ह्यावर सूर्य चक्र काढत ते मी शिकले . साटोरी छान करत असे मी पण साटोरी करण्यास शिकले. कपडे स्वच्छ ठेवत मी पण कपडे नीट ठेवते. फुलाचे गजरे घालण्यास तिला आवडत आम्हाला ही आणून देत असतं.

केळी दुधाची पिशवी त्यावेळी बाटल्या असत ते ती धूत असे. भाजी पण चांगली धुवून करीत असे.

एकदा ती व मी पुरण पोळी व मी बटाटे वडे केले होते.एकाच गॅस शेगडीवर असल्यामुळे तिने पुरणाचा तवा माझ्या बाजूला ठेवला व वडा चं कढई तिच्या बाजूला ठेवली. म्हणजे तू गोड कर. असे असा खूप आठवणी जवळ आहेत !

चला पुढे चला !

खिचडी !

तांदूळ व पिवळे मुग याची खिचडी : तांदूळ व पिवळे मुग सम प्रमाणात पातेल्यात घेतले. मुगाची चव चांगली लागते. म्हणून सारखेच तांदूळ व मुग घेतले. धुतले. गॅस पेटवून कुकर ठेवला. कुकर मध्ये तेल मोहरी याची फोडणी केली. धुतलेले तांदूळ मुगडाळ फोडणीत टाकले. लाल मिरची फोडणीत टाकली. गरम पाणी तांदूळ व मुगडाळ मध्ये टाकले. काला मसाला हिंग मीठ चावी साठी लाल तिखट टाकले. हळद टाकली. प्रथम नुसते छान तांदूळ मुगडाळ याची खिचडी शिजवून घेतले. नंतर वाफ येण्या करता कुकरचे झाकण लावले.व खिचडी पण छान दबली. तो पर्यंत लिज्जत पापड भाजला भाजलेला ची चव चांगली लागते. तळण्यापेक्षा ! नंतर बाऊल मध्ये तांदूळ मुगडाळ याची तयार झालेली खिचडी वाढली काढली. तेल मोहरीची फोडणी खिचडीवर वाढली टाकली खिचडीला तुपा पेक्षा तेल मोहरी ची फोडणी चांगली लागते. मसाला मिरची तळली ती ठेवली वाढली. अशा प्रकारे तांदूळ पिवळे मुगडाळ काला मसाला मीठ लाल तिखट लाल मिरची पाणी हळद सर्व घालून
खिचडी छान चवदार केली. लागते. बरोबर भाजलेला पापड ! तेल मोहरीची फोडणी ! मस्त बेत मेनू ! खाण्याचा !

 

आंबे जांभळ मोगरा

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
तसेच २०१२ साल ह्यावर्षातील आंबे जांभळ कैऱ्या
कोकमं हि फळ मोगरा व बकुळी दवणा हि फुल आता
मिळणे कमी झाली.ह्या मधील संपुन नवीन फळ व फुल
मिळतील. आंबे आता १४० एकशे रुपये डझन व २०० दोनशे
रुपये पेटी कांही आंबे अजून ही महाग आहेत जांभळ ४०चाळीस
रुपये पाव किलो होते आज मला १५ पंधरा रुपये पाव किलो मिळाले .
मोगरा १० रुपये आहे कैरी लोणचं छोट्या १० रुपये ४ आणल्या.
तेवढ चंच लोणचं घरी केले.किती ही महाग असले तरी थोड थोड
खाण्यात येते..

 

सण !

मी ब्लॉग मध्ये स्वस्ति श्रीशालिवाहन शक महिनातील सर्व सण व घरातील प्रत्येक सण याचे छायाचित्र लावून माहिती दिली आहे. आमच्या घरात सर्व सण केले जातात.चैत्र महिनात चैत्र महिनात कैरी डाळ व पन्ह केले जाते. रामनवमी चा उपवास केले. रामाचा जन्म च्या वेळी देवळात जात रामरक्षा म्हणत देवळात. वैशाखात बुध्द पौर्णिमा नसली तरी पौर्णिमा म्हणून व अक्षय्य त्रीतीया केली जाते. जेष्ठ पौर्णिमा ला वड च्या झाडाची वट पौर्णिमा केली जाते. आषाढ महिना त गुरु पौर्णिमा केली जाते.आषाढ एकादशी केली
जाते. श्रावण पौर्णिमा नारळी पौर्णिमा राखी पौर्णिमा नारळ साखर गूळ याच गोड व वान बरोबर बोलणे राखी पाठविणे केले. नदी समुद्र याची पूजा करतात. श्रावण सोमवार मी करत भाद्रपद महिनात गणपती गौरी खड्याच्या गौरी आणल्या. आश्र्विन महिनात नऊ दिवस ते दसरा पर्यंत कोल्हापूर महालक्ष्मी दर्शन केले आहे.कार्तिक कार्तिक स्वामीच देवळात जाऊन दर्शन घेतले.दिवाळी त धन पूजा लक्ष्मीपूजन पाडवा भाऊबीज केले.स्वत: कुबेर यंत्र व महालाक्षी यंत्र काढून पूजा घरात केली.मार्गशीष महिना हे गुरुवार करत
पौंश महिनात सुगडीचे वाण साखर डाळी तांदूळ केळी केले.त्याच उद्दपण केले.माघ महिनात गणपतीला तिळगुळ याचा लाडू देत. गणपती जन्म च्यावेळी देवळात जात.फाल्गुन महिनात पुरण पोळी करून सार्वजनिक होळीत टाकते. बारामहिने गुरुवार ह्यांचे घरात असत. हे सर्व सण मी माहिती देऊन छायाचित्र फोटो घरातील दाखविले आहेत. नदीचे समुद्र चे फोटो गणपतीचे पूजेचे फोटो वडाचे फांदी चे फोटो दाखविले आहेत अशा प्रकारे आमच्या घरात पूजा केली जाते.घरोघरी असते.पण मी आपले
लिहून फोटो दाखवून केले आहे ब्लॉग मध्ये.

वड !

वड याच झाड रांगोळी ने काढायचं किंवा कागद घेऊन वडाच रंगीत चित्र काढावे.  फांध्या पारंब्या पण काढाव्यात.व पूजा घरात केल्यामुळे घर भररेल व प्रसन्न वाटत.  म्हणून घरी कोणतीही पूजा केली मी मनाला समाधान असतं अद्दात्मिक ता निर्माण असते.

५ जून

५ . जून (६ ) ला आमचा लग्नाचा वाढदिवस !

 

वट ज्येष्ठ पौर्णिमा

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
उत्तरायण ग्रीष्मऋतु ज्येष्ठ शुक्लपक्ष १५ नक्षत्र अनुराधा
राशिप्रवेश वृश्चिक सोमवार वट पौर्णिमा आहे.तसेच
तारीख दिनांक ४ जून (६) २०१२ ला वटपौर्णिमा आहे.
वडाच्या झाडाची किंवा वडाच्या फांदीची पूजा करतात.
पूर्वी भिंतीवर वडाच झाड काढून पूजा केलेली चित्र असे.
कोल्हापूर येथे बैल याची पूजा वटपौर्णिमा लाच करतात.
मातीचे बैल छान मिळतात.त्याची पण घरोघरी बैल याची पूजा करतात.

   

साबुदाणा चं थालीपीठ

                                          ॐ
                           साबुदाणा चं थालीपीठ
साबुदाणा चं थालीपीठ : साबुदाणा एक भांडभर पातेल्यात घेतला.
साबुदाणा धुतला ४ /५ तास चार / पाच तास भिजवू दिला. चार पाच छोटे
गॅस पेटवून बटाटे कुकर मध्ये पाणी घालून चार / पाच शिट्या दिल्या.
गॅस बंद केला कुकर गार झ्या नंतर उकडलेले बटाटे पातेल्यात काढले.
बटाटाची साल काढली. बटाटा मध्ये भिजलेला साबुदाणा थोडा घातला .
शेंगदाणे याचा कूट अर्धी वाटी घातला.हिरवी मिरची दोन वाटलेली घातली
मीठ चवी पुरत घातलं.साबुदाणा बटाटा शेंगदाणे कूट हिरवी मिरची मीठ सर्व
छान एकत्र हाताने केले.खर तर करण्याची सवय इतकी झाली की माप घ्यावयाची
गरज च नसते.अंदाजाने सवय खूप झाली आहे तरी अंदाजाने मापं लिहित आहे.
सर्व साबुदाणा थालीपीठ याचं एकत्र केलेले केलेलं लोखंडी तवावर तूप लावून साबुदाणा
थालीपीठ च सारण थापले.गॅस पेटवून दोन्ही बाजूने भाजले.गॅस बंद केला बरोबर
शेंगदाणे कूट वाटलेली हिरवी मिरची मीठ दही एकत्र केलेले ठेवले.अशा प्रकारे
साबुदाणा थालीपीठ व दही मिरची मीठ खाण्यास दिले.मी लोखंडी तवा वरील वरच
साबुदाणा थालीपीठ दाखवीत आहे.

                               DSCF2634

बुध्दिबळ !

बुध्दिबळ

बुध्दिबळ : बुध्दिबळ बुध्दिबळ खेळणारे यांना बुध्दिबळपटू म्हणतात.
काळे व पांधरे घर असतात ३२ बत्तीस पांढरे घर व ३२ बत्तीस काळे घर असे असतात.
काळे पांढरे घर दोन्ही मिळून ६४ चौंसष्ठ घर असतात.
पांढरा राजा काळा काळ्या घरात असतो. काळा राजा पांढरा पांढऱ्या घरात असतो.
राजाच्या उजवा हात ला घरात वजीर असतो वझीर असतो. उंट एक काळा घरात व पांढऱ्या घरात असतो.
एक राजाच्या शेजारी व वझीर च्या शेजारी घरात उंट असतो उंट च्या शेजारी काळा व पांढऱ्या घरात घोडा असतो.
पांढऱ्या घरात व काळ्या घरात हत्ती असतो. प्यादी ८ आठ असतात.पांढऱ्या व काळ्या घरात असतात.
बुद्धिबळ पट लावतांना उजवा हात याला पांढरे घर असते.
राजा तिरपा सरळ एक घर चालतो. वझीर सरळ कितीही घर चालतो. उंट तिरपा एक घर चालतो.घोडा अडीच घर चालतो.
हत्ती सरळ किती ही घर चालतो.पाद पादी एक घर सरळ चालते.
अशा प्रकारे बुद्धिबळ खेळ आहे.
तसेच वाघ शेळी चा एक खेळ आहे.चार ४ वाघ (चार उंट ) एकत्र मधल्या घरात असतात. व शेळी म्हणजे सर्व प्यादी
कडेच्या घरात असतात.वाघ एक घर चालतो. व प्यादी एक घर चालतात.शेळी वाघांना बांधून अडकवून ठेवतात .
वाघ अडकत नाही असा हा बुद्धिबळ चा दुसरा खेळ आहे.
मी लहान पाणी माझा भाऊ डॉ शरद यांच्या बरोबर खेळत असे..आता आमची मूलांनी कॉलेज मध्ये असतांना
घरात बुध्दिबळ पट सोंगट्या आणल्या तेवेळेला मी मुलां च्या बरोबर राजा वझीर हा खेळ खेळले आहे.
मला थोडीफार बुध्दिबळ याची माहिती आहे.जुना पट व सोंगट्या आज ही घरात आहे. याच मला खूप चांगल वाटत आहे.


 

बटाटा चा किस

                                  ॐ
बटा टा चा किस : दोन मोठे बटाटे घेतले.धुतले.
किसनिने ताटात किसले परत थोड पाणी घालून धुतले .
खर तर परत किस धुत नसतात.मोकळा होण्याकरता धुतला.
गॅस पेटवुन पातेले गॅस वर ठेवले .तूप जिरे याची फोडणी केली.
हिरवी मिरची दगडी खलबत्ता त ठेचून घेतली.चिरलेली मिरची व ठेचलेली मिरची
ह्यात चव वेगळी लागते.हिरवी मिरची ठेचलेली तूप जिरे फोडणीत घातली.टाकली.
किसलेला बटाटा टाकला झाकण ठेवून किसलेला बटाटा ठेचलेली हिरवी मिरची तूप जिरे ची फोडणी
सर्व वाफ आणल्या नंतर मीठ घातले.शेंगदाने याचा कूट घातला लिंबू पिळले.परत एक वाफ आणली .
बरोबर शेंगदाने कूट लाल तिखट मीठ घालून चटणी केली.
किसलेला बटाटा शेंगदाने कूट ठेचलेली हिरवी मिरची मीठ तूप जिरे याचा बटाटा कीस तयार केला.झाला.

                                   DSCF2626

रवा याचा सांजा

                                                 ॐ
रवा याचा सांजा : रवा एक भांड भर घेतला .दोन कांदे विळीने चिरून घेतले.
दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या थोडी कोथीबींर चिरून घेतली.रवा पातेल्यात
पातेल्यात घेतला. गॅस पेटवून रवाचे पापेले ठेवले. रवा उलथ नाने हलवून रवा तांबूस
भाजून घेतला. दुसरे पातेले गॅस पेटलेल्या शेगडीवर ठेवले. तेल तापवून मोहरीची फोडणी
केली. फोडणी मध्ये चिरलेला कांदा हिरव्या मिरच्या घातल्या टाकल्या.कांदा तांबूस झाल्या
नंतर भांड भर पाणी घातले .पाणी उकळू दिले हळद मीठ हिंग घातले टाकले.भाजलेला रवा
उकळलेल्या पाणी ह्यात घातला टाकला.रवा कांदा मीठ हळद हिंग हिरवी मिरची लिंबू पिळले .सर्व उकळू दिले.
वाफ आणली.रवा पाणी व सर्व मसाल्यात चांगला शिजला.हळद टाकली की सांजा म्हणतात व बिन
हळदीचा याला उपमा म्हणतात. सुक खोबर किसून घेतले. सांजात कडेला घातले.सादुक साजूक तूप
सांजा त घालून वाफ आणली.डिश मध्ये सांजा घेतला .सुक खोबर घातले.अशा प्रकारे सांजा तयार केला मी !

                                              DSCF2622

पेरुच रायत

                                            ॐ
                                         पेरु

पेरुच रायत :पेरु दहा रुपयाला चार ४ पेरु आणले.पेरु धुतले .

पेरु दाताने पण खातात.दोन हातात दाबुन फोडतात. चिरून पण पेरू

खातात.पेरूचं रायत कोशीबींर पण करतात.मी पेरू प्रथम दगडी खलबत्ता त

बारीक ठेचून घेतले.बी साल सगट पेरू ठेचले बारीक केले.दोन हिरव्या मिरच्या ठेचल्या

दगडी खलबत्ता तच हिरव्या मिरच्या ठेचून बारीक करून घेतल्या.एका काचेच्या बाऊल मध्ये

पेरूच्या सालासगट व बिया सगट ठेचलेले पेरू हिरवी मिरची ठेचलेली काचेच्या बाऊल मध्ये घातले .

ठेचलेल्या पेरू मिरचीत चवी प्रमाणे मीठ हिंग घातले. दुधाची साय व दही घातले. ठेचलेला पेरू ठेचलेली हिरवी मिरची

मीठ हिंग दही दुधाची साय सर्व एकत्र केले पेरू चे रायत किंवा कोशींबीर केली.दगडी खलबत्ता घरी असल्यामुळे दगडी खलबत्ता

त करण्यास चांगल वाटतं ! मिस्कर मधून पण असे करता येते.

                                       DSCF2615

                  DSCF2618

कार्ले याची भाजी

कारले कार्ले याची भाजी : दहा रुपये याची दोन २ कारली कार्ली आणली. कारलेकार्ली धुवून घेतली.विळीने गोल गोल बिया सगट कापली.चिरली.फोडी काप कार्ले भाजीचे केले.कारले कार्ले काप ला मीठ लावून अर्धा तास ठेवले. गॅस पेटवून पातेले ठेवले.तेल व मोहरी ची फोडणी केली.मीठ लावलेले कारले  कारले कार्ले व मीठ ह्यातील पाणी न पिळता फोडणीत टाकले.कारलेकार्ले शिजण्याकरता  पाणी भांड भर टाकले.कारले कार्ले लावलेले मीठ पाणी शिजवू दिले.त्या शिजलेल्या कार्ल्यात
लाल तिखट हळद टाकली परत मीठ टाकले नाही.कारले कार्ले याला लावलेले मीठ बरोबर  आहे.होते.ते पुरले. पुरते.अशा प्रकारे मिठाचे कार्ले चे पाणी न पिळता पाण्यात शिजवून हळद  लाल तिखट घालून कार्ले कारले चिंच गूळ न घालता कार्ले कारले याची भाजी चांगली लागते.  कार्ले कारले जरूर महिना तून एकदा खावेतं.परतून पण कार्ले याची भाजी करता येते चावण्यास  त्रास होतो म्हणून थोडी शिजवून खावी.

 

कोकमं

                                             ॐ
कोकमं : कोकमं हे फळ आहे. ते वाळविले की अमसूल बनतात.
ओले कोकम मी १५ रुपये पावकिलो आणले. कोकम याचे हातानेच
कापून तुकडे करतांना त्यातील बी बिया काढून टाकल्या.कोकम याचे
केलेले हाताने कालेले तुकडे बरणीत घातले.त्यात पाव किलो साखर घातली.
आठ दिवस साखर व हाताने केलेले कोकम चे तुकडे भिजवू दिले.साखर व
कोकम छान भिजले. कोकम व साखर याला पाणी सुटले.आले.ते कोकम व
साखर याचे पाणी ग्लास मध्ये चमचा भर घेतले.त्यात चव येण्या करता कोकम
व साखर याच्या रसात मीठ घातले.पाऊण ग्लास गार पाणी कोकम साखर रसात
मीठ ह्यात ग्लास मध्ये घातले.मस्त कोकम सरबत तयार झाले केले मी.अजून
काहेच्या बरणीत कोकम साखर याचा रस आहे.केव्हां ही कोकम सरबत करता
येते.कोकम साखर याचा रस पाणी भरपूर दिवस राहते टिकते.

                   DSCF2569

               DSCF2571

                        DSCF2575

हरबराडाळीचेसांडगे याची आमटी

                                             ॐ
                    हरबरा डाळीचे सांडगे याची आमटी
हरबरा डाळीचे सांडगे अंदाजाने घेतले.छोटे दोन कांदे बारीक
विळीवर चिरून घेतले.थोडा शेंगदाने कुट घेतला. हरबरा डाळीच्या
सांडगे तिखट मीठ असल्यामुळे थोडे घेतले देठा सगट लाल मिरच्या
घेतल्या.हळद हिंग घेतले.गॅस पेटवून पातेले ठेवले.तेल मोहरीची फोडणी केली.
प्रथम फोडणीत लाल मिरच्या टाकल्या. चिरलेला कांदा परतून घेतला हरबरा डाळीचे सांडगे परतून घेतले.
भांड भर पाणी कांदा व हरबरा डाळीच्या सांडगे ह्यात घातले झाकण ठेवून छान
बरपूर हरबरा डाळीचे सांडगे व चिरलेला कांदा शिजवू दिला. शिजल्यात शेंगदाने कुट
घातला थोड मीठ लाल तिखट हिंग हळद टाकली.सर्व भरपूर शिजविले.
हरबरा डाळीचे सांडगे चांगले शिजले.मस्त लाल देठा सगट मिरची चिरलेला कांदा हरबरा डाळीचे सांडगे
शेंगदाने कुट मीठ लाल तिखट सर्व याची हरबरा डाळीची आमटी तयार झाली.केली. मी.

                               DSCF2597

                                   DSCF2599

वरणातील फळ

वरणातील फळ

वरणातील फळ : प्रथम तुरीची डाळ एक वाटी भांड्यात घेतली धुतली. कुकर मध्ये पाणी घातले. भांड्यात तुरीच्या डाळीत पाणी व हळद घालून गॅस पेटवून कुकर गॅस वर ठेवला चार ४ पाच ५ शिट्या दिल्या. कुकर गार होई पर्यंत कणिक घेतली त्यात तेल मीठ घालून पाण्यात कणिक तींबवली. भिजविली तो पर्यंत कुकर गार झाला. कुकर मधील तुरुची डाळ शिजली.

दुसरे पातेले पेटत्या गॅस वर ठेवले. तेल मोहरी ची फोडणी केली फोडणीत शिजलेली तुरुची डाळ घातली. तिखट मीठ हिंग चिंच घातली. आमटी वरण उकळू दिले.तो पर्यंत कणिक याचे थोडे थोडे गोळे घेतले व त्यांना द्रोणाचा आकार दिला कडा पातळ केल्या व मध्ये जाड सर ठेवून कणिक याचे फळ केली.कणिक याचे फळ उकळलेल्या तुरीच्या डाळी वरणात आमटीत घातले परत वरण कणिक फळ उकळू दिले.

मस्त वरणात कणिक याचे फळ शिजली. खाण्या करता बाऊल मध्ये काढली.

थोड सादुक तूप वाढले घातले. मस्त वरणातील फळ तयार झाली केली मी.

आता मॅगी सर्रास करतात.पण वरणातील फळ जुनी पध्दत आहे.

कैरी चा साखर आंबा

                       ॐ
कैरी चा साखर आंबा : प्रथम एक कैरी घेतली.
धुवून धेतली.कैरीचे साल खाढले.किसनीने कैरी
किसली.एक पातेले घेतले.त्या पातेल्यात किसलेली
कैरी घातली.पाऊण वाटी साखर पातेल्यात कैरी मध्ये
घातली.अर्धा भांड पाणी घेण्यासाठी मी एक गडू ठेवला आहे.
तो वापरून पाणी स्वंयापाक करतांना वापरतं असते.अर्धा गडू
पाणी किसलेल्या कैरी च्या व साखर घातलेल्या पातेल्यात घातले.
गॅस पेटवून किसलेली कैरी साखर पाणी एकत्र केलेले.ठेवले.
सर्व शिजविले.पाणी खिसालेल्या कैरी व साखर ह्यातील पाणी
अटवून गेले.पातळ साखर व कसलेली कैरी राहिली.कैरी चा साखर व
जायफळ साखर आंबा तयार झाला केला,मी.

                   DSCF2565DSCF2566DSCF2567

पडवळ याची भाजी

पडवळ याची भाजी : १० रुपये पाव किलो पडवळ आणले धुवून घेतले साला सगट पडवळ विलीने लांब २ दोन भाग केले. परत एका भागाचे लहान लहान काप तुकडे विळीने केले. गॅस पेटवून पातेले ठेवले.पातेल्यात तेल मोहरी ची फोडणी केली. तेल मोहरी च्या फोडणीत पडवळ चिरलेले घातले.पाणी भांड भर घारले. झाकण ठेवून शिजविले.थोडे पाणी शिजण्य्या करता ठेवले.पडवळ पाणी तेल मोहरी च्या फोडणी लाल तिखट मीठ हळद हिंग शेंगदाने याचा कूट घातला. परत थोड्यावेळ पडवळ सर्व मसाला घातलेले.शिजविले.पडवळ याची भाजी तयार झाली केली.थोडा पडवळ शिल्लक ठेवला ती भाजी मुगाची डाळ रात्री भिजत टाकून दुसरे दिवसाला पडवळ व मुगाची भाजी केली तेल मोहरी ची फोडणी केली.त्यात चीरालीला पडवळ मुगाची भिजलेली डाळ घातली.पाणी भांड भर घातले लाल तिखट मीठ हळद हिंग मुगाची भिजलेली डाळ पडवळ सर्व शिजवून दुसरे दिवस याला पडवळ ची भाजी केली. हरबरा डाळ भिजत घालून पण पडवळ याची भाजी करतात. माझ्या स्वंयपाक मध्ये तिखट पदार्थ तिखट चं असतो.त्यात साखर गूळ नसतो.व गोड पदार्थ गोड चं असतो त्यात मीठ नसते.

   

कायरस

                            ॐ
कायरस : कैरी एक घेतली.धुतली.साल काधले.
मोठ्या जाड फोडी केल्या. कांही पातळ मोठ्या कैरीच्या
फोडी केल्या.गॅस पेटवून त्यावर पातेले ठेवले तेलं मोहरीची
फोडणी केली.तेलाच्या मोहरीच्या फोडणीत जाड फोडी कैरी च्या
फोडणीत घातल्या.एक ग्लास भर पाणी कैरी च्या फोडीत घातले.
मीठ लाल तिखट हिंग हळद शेंगदाने याचा कुट घातला. सर्व छान
भरपूर पाणी आटे पर्यंत शिजविले.कैरी पाण्यात व शेंगदाने याचा
कुट असल्यामुळे आंबट पणा कमी होतो.तेवढा आंबट पणा कैरी शिजलेली
खाण्यास चांगला लागतो.कैरी शेंगदाने कुट मीठ लाल तिखट हिंग हळद पाणी
तेल व मोहरीची फोडणी सर्व शिजवून कायरस केला आहे.मी.

                                DSCF2556

              DSCF2562

पालक पाले भाजी ची भजी


पालक पाले भाजी ची भजी : प्रथम पालक पाले भाजी देठा सगट निवडून घेतला.
चाळणीत पालेभाजी ठेवून पाणी याने धुवून घातला. विळी भाजी चिरतो तसा पालक
चिरून घेतला.एका पातेल्यात चणा डाळीचे पीठ घेतले.त्यापिठात हळद हिंग मीठ
लाल तिखट तापलेले तेल घातले.त्यात चिरलेला पालक घातला.गॅस पेटवून त्यावर कढई
ठेवली तेल घातले. तेल तापल्या नंतर चिरलेला पालक चणा डाळीचे पीठ हळद हिंग मीठ
लाल तिखट तापलेले तेल सर्व एकत्र केलेले याचे भजी तळून काढली.कांही पालक भाजी ची पान
याला डाळी च्या पिठात घालून ते पण पालक याची पान तळून काढली.हात गाडीवाले यांच्या कडे
चिरलेल्या पालक भाजी ची भजी चांगली मिळतात.म्हणून अशा प्रकारे चिरून पण भजी केली.पूर्वी
पानाला डाळी चे पीठ लावून करत असतं त्या प्रकारे पण पालक भाजी ची भजी मी तयार केली आहे.
बरोबर हिरवी मिरची वाटलेली मीठ दही चटणी केली.दही असल्यामुळे तिखट फार लागत नाही.

 

काकडी ची कोशींबीर

काकडी ची कोशींबीर : काकडी धुवून घेतली. काकडी चे प्रथम साल काढून घेतले.
विळीवर चोचून घेतली.काकडी चिरून पण करतात.चोचणे चोचण्याची पध्दत
असते.दोन्ही हातात काकडी धरायची विळी च्या पात्यावर हळू हळू गोल फिरवत चोचून
चिरून घ्यावयाची परत चोचून घ्यावयाची परत चिरून घ्यावयाची.असा प्रकारे चोचून काकडी
घेतली.तेल मोहरी ची फोडणी गार करायला ठेवली.चोचल्या काकडी मध्ये हिरवी मिरची वाटलेली
घातली.मीठ घातले.शेंगदाने याचा कुट घातला.तेल व मोहरी ची फोडणी घातली.दही घातले.
काकडी चोचलेली दही मीठ वाटलेली हिरवी मिरची शेंगगाणा कुट तेल मोहरी ची फोडणी सर्व एकत्र
केले. काकडी ची कोशींबीर तयार मी केली आहे.

 

कैरी व शेवगा ची आमटी

कैरी व शेवगा च्या शेंगा ची तुरीच्या डाळीची आमटी : प्रथम दोन मोठ्या जाड सर शेवगा च्या शेंगा घेतल्या.धुतल्या.विळीने लहान लहान काप केले.कुकर मध्ये थोडे पाणी घातले.त्या कुकर च्या पाण्यात काप कलेले शेवगा च्या शेंगा घातल्या. दोन शिट्या दिल्या. कुकर गार झाल्या नंतर त्या शेवगाच्या शेंगा पातेल्यात पाण्या सगट ठेवल्या.परत तुरीची डाळ धुवून हळद व पाणी घातले.कुकर मध्ये पाणी घालून तुरीच्या डाळीचे हळद पाणी चे पातेले कुकर मध्ये ठेवले. चार ४ शिट्या दिल्या. कुकर गार नंतर पातेले दुसरे घेऊन गॅस पेटवून त्यावर पातले ठेवले.तेल तापवून मोहरी ची फोडणी केली.फोडणीत तुरीचे शिजलेले वरण घातले.कुकर मधील गरम पाणी घातले.रवीने एक सारखे केले.
त्यात कैरी च्या फोडी केलेया घातल्या.तुरीचे वरण कैरी च्या फोडी उकळू दिल्या.कैरी लगेच शिजते.फार मऊ करायला नको म्हणून तसे केले.परत शिजलेल्या शेवगा च्या शेंगा तुरीच्या डाळी वरणात घातल्या.नंतर लाल तिखट व मीठ अंदाजाने घातले.मस्त परत शेवगाच्या शेंगा कैरी च्या फोडी तुरीच्या डाळी चे वरण हळद लाल तिखट मीठ सर्व परत उकळू दिले. मस्त कैरी च्या फोडी शेवगाच्या शेंगा तुरीच्या डाळी ची आमटी तयार झाली.भाता बरोबर व पोळी बरोबर खाण्यास चांगली लागते.

बटाटे वडे

बटाटे वडे : प्रथम छोटे बटाटे घेतले.धुतले त्याचे दोन भाग विळीने केले. कुकर मध्ये बटाटे घातले.बटाटे भिजतील इतके पाणी कुकर मध्ये घातले. गॅस पेटवून कुकर ठेवला. ४/५ चार/पाच शिट्या दिल्या.कुकर गार झाल्यानंतर कुकर चे झाकण काढले.उकडलेले बटाटे एका पातेल्यात गार करण्यास ठेवले. बटाटे गार झाल्या नंतर उकडलेल्या बटाटे याचे साल काढली.अंदाजाने मीठ हिरवी मिरची वाटलेली लसून वाटलेला चिरलेली कोथिंबीर असं सर्व उकडलेल्या बटाटा मध्ये घातले.हाताने उकडलेला बटाटा व सर्व मिश्रण एकत्र उकडलेल्या बटाटा मध्ये एकत्र केले.त्याचे छोटे छोटे गोळे लाडू केले.दुसऱ्या पातेल्यात डाळीचे पीठ अंदाजाने घेतले. डाळीच्या पिठात लाल तिखट मीठ हळद हिंग कच्च तेल घातले.पातळ करण्या करता पाणी घातले.सर्व डाळीचे पीठ तयार केले. गॅस पेटवून तेल कढई सगट पेटत्या शेगडी वर ठेवले.एक एक बटाटा गोळा चपटा केला डाळीच्या पिठात बुडवून तापत्या तेलात तळून काढला.असे सर्व बटाटे वडे तयार केले.मस्त चव आली.उकडलेल्या बटाटा मध्ये मीठ हिरवी मिरची बारीक केलेली लसून बारीक केलेला कोथिंबीर चिरलेली गरम तेलात डाळीच्या पिठात मीठ लाल तिखट कच्च तेल हळद सर्व घातलेले ह्यात बुडवून तापत्या तेलात तळलेले बटाटे वडे मी तयार केले. तसेच बटाटे याच सारण थोड बाजूला ठेवले. कणिक घेतली कणिक मध्ये लाल तिखट मीठ कच्च तेल हळद घातली. पाण्यात सर्व कणिक भिजवून ठेवली.गॅस पेटवून तवा ठेवला.पोळपाट लाटणे घेतले.कणिक याचा गोळा घेतला कणिक मध्ये बटाटा सारण भरलं.पोळी सारखे लाटून तापत्या तव्यावर पोळी व बटाटा सारण एकत्र केलेले पराटा दोन्ही बाजूने भाजून तेल लावले.बटाटा पराटा तयार केला.कणिक मध्ये मीठ लाल तिखट कच्च तेल ह्यामुळे पापुद्रा याला पराटा याला चव चांगली आली.