आपले स्वागत आहे!

Archive for मे 26, 2011

उकलसंच

उकलसंच

एक न् एक दोन
पण दोन न् दोन तीन
व्यवहारात असते बरे
गणित हीन दीन
तीन पंचे पंधरा
हे जरी ठीक
दोन दुणे होतात वीस
पुन्हा एकदा शीक
गणित सोपे गणित अवघड
असे कसे होते
याचे कारण एकच
शून्य हातचे राहते
शून्य पूर्ण सोडू नका
म्हणा
सुखा गुणिन
विसा वसा काम करीन
मग विसावीन !

८ || तुळसपाणी

श्रीकांत चिवटे

तुळसपाणी त्यांच्या च पुस्तक मधील ही त्यांचींच कविता आहे.