आपले स्वागत आहे!

Archive for मे 13, 2011

चिवडा !

चिवडा : पातळ पोहे निट चाळून घ्यावेतं थोडे गरम करुन घ्यावेतं. चांगली तेलाची मोहरीची फोडणी करावी. पोहे  त्यात लाल हिरवी मिरची देठा सगट टाकावी. खोबर लांब काप् केलेले डाळ भाजलेले सालासगट किंवा साल काढलेले शेंगदाने घालावेतं .गरम केलेले पोहे फोडणीतं घालावेतं.

हिंग तिखट मीठ हळद थोडा भाजलेले तिळाचा कुट घालावां. म्हणजे सर्व पदार्थ फोडणीतं जळतं नाहीतं. कडीपत्ता कोथिंबीर फोडणीतं घातल्यास वास खमंग राहतो. गार पातळ पोहे चा चिवडा झाल्यावर डब्यातं वा काचेच्या बरणीतं भरावां. केंव्हाही पटकन खावयाला देता येतो.

DSCF1592  DSCF1593