आपले स्वागत आहे!

उकडी चे मोदक

                                        ॐ
उकडी चे मोदक : एक नारळ याचे खोबर खोवून घेतले.
एक बाउल खोबर कीस एक बाउल केले झाले.त्यात एक बाउल
गूळ घातला. खोबर गूळ व खोबरातील पाणी एका पातेल्यात घेतले.
नारळ याचे पाणी प्यायले तर नैवेद्द उष्टा होतो. व नारळ याचे पाणी
सर्वांना मिळते.नारळ खोबर गूळ नारळ याचे पाणी पेटत्या गॅस वर पातेले
ठेवले.चांगले शिजविले फार घट्ट केले नाही.कडक होते.
दुसऱ्या पातेल्यात एक बाउल पाणी घातले.थोड मीठ घातले.तेल एक चमचा
घातले. पाणी उकळू दिले.एक बाउल तांदूळ याचे पीठ घातले.चांगली वाफ आणली.
झाकण ठेवले.
तांदूळ पीठ याची उकड चांगली केली.झाली.
एका ताटात थोडी थोडी तांदूळ याची उकड घेतली.तांदूळ याचा गोळा करून त्यात
नारळ याचे खोबर गूळ नारळ याचे पाणी याचे केलेले सारण भरले.अकरा ११ मोदक
केले झाले. दोन २ कारंजी केल्या.हे सर्व कुकर मध्ये पाणी घालून भांड्यात तांदूळ याचे
उकडी चे मोदक याला कुकर चे झाकण ठेवून वाफ आणली शिट्टी दिली नाही.
अशा प्रकारे तांदूळ पीठ नारळ खोबर नारळ पाणी गूळ सर्व एकत्र मोदक तयार केले.
झाले. मी केले ! आकार हाताने च मोदक यांना दिला.नीट नाही आला.
पण आमचा प्रणव म्हणाला मोदक चं छान झालेत ! आणि काय हवे ! हवं !

             DSCF2918 DSCF2913

 DSCF2914 DSCF2915DSCF2910

Comments on: "उकडी चे मोदक" (1)

  1. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
    निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।

    गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

    !! गणपति बाप्पा” मोरया “!! मंगल मूर्ति” मोरया “!!

यावर आपले मत नोंदवा