आपले स्वागत आहे!

Archive for सप्टेंबर 9, 2018

गहु,खोबर,गुळ, दुध.खीर

गहु चि खीर

IMG_0687[1]

पिठोरी अमावास्या / गहू चि खीर.


आज सकाळी च थोडे गघू पाणी त ठेवले.
दोन तास नंतर खलबत्ता त खुटले.
छान गहू फुटला.
कुकर मध्ये गहू कुटलेले घातले.
भिजलेल पाणी पण घातलं.
आणि थोड पाणी वाढवून गहू शिजवू दिले.
नुसते शिट्टी न देता हलवित राहिले.

सुक खोबर किशून मिक्सर मध्ये बारीक केले.
पाणी घालून आणि बारिक केले.
गहू शिजलेले त्यात घातले.शिजवू दिले.

गूळ किसलेला घातला. सर्व अम्दाजन असल तरी
भरपूर समजत हात बसलेला असतो.सर्व परत शिजवू दिले

सर्व नंतर दुध घातले.
थोड शिजवू दिले. ग्यास बंद केला कुकर झाकण लावलं
शिट्टी ठेवली. थोड्या वेळा नंतर छान
गहू खीर झालेली पाहिली.
नैवेद्द दाखविला.छान वाटलं !

शेजारी गहू खीर दिली.
मुंजा मुलगा व सौ आई वडील आहेत.
मला खूप बर वाटत अस द्यावयाला.

IMG_0685[1]

गंगा / इंदिरा काकू

Vasudha Chivate Jyotsna Deshpande Kherde शुभेच्छा ! काकू चिं पण आठवण येते.

Vasudha Chivate

Vasudha Chivate पूर्वी णा एकत्र राहत नुसती आई च नसत.
तर काकू पण तेवढ करायची जीव लावण खायला देण गंगा पण.

IMG_0086[1]

श्रावण अमावास्या / आई चा दिवस


तारिख ९ सप्टेंबर २०१८
श्रावन / श्रावण महिना

अमावास्या / पोळा / मराठवाडा येथे बैल पूजा करतात.

आई चा दिवस ! आई ला वहिनी राधाबाई देशपाण्डे ला नमस्कार.

माझी आई म्हणायची!

पुष्पा H.S.C. / S.S.C. ला पहिल्या झटक्यात पास झाली.
संसार छान केला. हे तिचे जावाइ यांनी मला चांगल सांभाळल.
मुल मुलगे झाली / आहेत.

वहिनी ला गजरा फुल याची हौस होती.
आम्हाला गजरे देत व ती पण गजरा घालत.

वहिनी साटोरी छान करत असतं मी पण साटोरी शिकले.
पुरण पोळी केली कि शेवया खीर करतात तिने शिकविले.
कणिक मध्ये तेल मिठ घालून तिंबावी नुसती
बिन तेल मिठ ची कणिक भिजवी नये.

स्वच्छता खूप होती. पूर्वी दुध बाटल्या असत.
बाटल्या धुवून नंतर दुध बातेलेत काढत.
केळी भाजी धुवून घेत असत.

माझी आई उंच होती सडपातळ होती. नऊ वारी
काष्टा लुगड नेसत असे.

आई ला वहिनी म्हणत व
दोन्ही आजी न्ना आई म्हणत.

वहिनी नमस्कार.

vahini_thumb3.jpg
वहिनी . आई. राधाबाई देशपाण्डे

39983986_1103759853134117_8044424422003572736_n
साटोरी