आपले स्वागत आहे!

गणपती

                                        ॐ
गणपती : १९९६ साल ! भाद्रपद महिना व सप्टेंबर महिना !
आम्ही त्याच्या आधी ३०/३५ वर्ष भाद्रपद शुक्लपक्ष मध्ये गणपती आणलेले
आहेत.पुष्कर आमचा मुलगा ! अमेरिका येथे जाण्यास निघाला.वाटलं गणपती व
याची तारीख दिनांक अमेरिका येथे जाण्याची तारीख एक आली तर आपण सर्वजण
विमानतळ तेथे कसे जाणार ! पण त्याची तारीख १५ सप्टेंबर ला आली.१४ सप्टेंबर ला रात्री
मी, हे,प्रणव, कमल माऊशी,व पुष्कर चा मित्र मकरंद व पुष्कर सर्वजण १४ सप्टेंबर ११ वाजता
मुंबई विमान तळ येथे पोहोचलो.१५ सप्टेंबर ला त्याचे विमान रात्री अडीच वाजता अमेरिका येथे
जाण्यास सुटले.आम्ही सकाळी ९ च्या कोयना मुंबई कोल्हापूर रेल्वे आलो रात्री १० वाजता.
१५ सप्टेंबर ला आलो १६ सप्टेंबर ला भाद्रपद शुक्लपक्ष चतुर्थी ला सकाळी गणपती आणले.i
नेहमी प्रमाणे पूजा नैवेद्द केला.झाला.सकाळी पुष्कर च्या मित्रा चा फोन पुष्कर अमेराका येथे आला
पुष्कर कडे तेव्हा फोन नव्हता.मी च घेतला मला एकदम काही सुचेना कस असेल मी मित्रा विचारत होते.
त्याने ठेवून दिला. १६ तारीख ला गणपती आले तो दिवस पुष्कर चा संध्याकाळी त्यान बाहेरून आम्हाला
फोन केला मी सुखरूप व मजेत आहे.लगेच ठेवला आता आम्ही खूप वेळ अमेराका तून बोलतो पण ते २ मिनिट
आठवतात.आताही !गणपती ने स्वत:चं आमच्या कडून करून घेतलं व पुष्कर ची अमेरिका विमानतळ हि करून
घेतलं !
आपल्याला वाटतं मातीचा गणपती ! पण तो आपणास सर्व देऊन आपल्या कडून करून घेतो ! हे नक्की चं !

Comments on: "गणपती" (1)

  1. aathwanini bare watate….aata mule tikde poorn rulali …aani aapansudhha…aata bharpur bolnech nahee tar skype war pahata sudhha yete…kiti aanand hoto na!…Ganpati Bappa Moraya!

यावर आपले मत नोंदवा