आपले स्वागत आहे!

विळी आडकित्ता

                                          ॐ
विळी
विळी ने भाजी चिरतात.फळ पण विळी ने चिरतात.
कोणी कोणी विळी ओटयावर लावून उभ्याने चं चिरतात.
पण विळी वर चिरतांना बसून व विळी वर मांडी ठेवून एक
पाय उभा करून विळी वर भाजी कैरी आंबा फळ असे बसून चं
विळी वर बसून उभा पाय पायाची बोट टेकून बसून चिरतात.
पूर्वी कच्च खोबर पातळ काप तुकडे वीळि वर चं करत.असत.
भाजून त्याची खोबर याची चटणी किंवा मसालात वापरतांना
खोबर असेच काप करून भाजून वापरत हल्ली किसुन करतात.
कोयता कैरी चे लोण चे करतांना कोयता लोखंडी कोयत्याने
फोडून घेतात.अजून ही कैरी चे लोणचे करतांना कैरी फोडून
कोयत्याने देतात.कोयता लोखंडी असतो.मी कैरी चे लोणचे
कोयत्याने फोडून आणून करते. ह्या ष्टिल च्या विळी ने
पण चांगले लोणचे होते पण कोय मिळत नाहि ह्यासाठि
कोयत्याने कैरी फोडून लोणचे करते.
माझी विळी १९६७ साल ची ईतकी जूनी आहे.
एकदा ही परत विळी ला धार केली नाही.
ही विळी माझ्या बहिण बहिन कमलताइ ह्यांनी दिलेली आहे.
माझ्या सौ सासूबाई नीं मला लोखंडी विळी दिली होती.
पण त्या काळात नवीन च ष्टील ची विळी ची पद्दत पध्दत होती
हौस म्हणून माझ्या बहिण यांनी मला ष्टील ची विळी दिली आहे.
ती विळी आज ही मी चांगली वापरत आहे.खर तर लोखंडी विळी
पण वापरतात. काही जुन्या सामानात ती लोखंडी विळी उगीच चं
दिली गेली असे हळहळ वाटते.पण बाजारात आता ही लोखंडी विळी मिळते.
पण कमल ताई नी हौस यांनी दिलेली आहे हे जास्त महत्व .! आहे.
आजच मी कमल ताई ला बोलतांना विळी खूप चांगली आहे धार पण
चांगली आहे सांगितले अजून ती विळी आहे ! तिला खूप चांगले वाटले.
तसेच घरात एक लोखंडी आडकित्ता आहे. ह्यांना कोणीतरी
सुपारी कापायला इतके पातळ सुपारी काप होतात.आज ही
तो लोखंडी आडकित्ता घरात आहे मला स्वत: ला आडकित्ता
जपून ठेवला आहे याच तृप्त ता वाटतं आहे.जपणूक फार छान
करावी !

DSCF3738 DSCF3739

DSCF3740 DSCF3741

DSCF3742 DSCF3589

यावर आपले मत नोंदवा