आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 2, 2011

श्री संभाजी मंदिरातील विहीर

श्री संभाजी मंदिरातील विहीर : छ. संभाजीराजे दुसरे यांच्या देवालयाच्या मागे एक सुंदर बाव असून ती संपूर्ण दगडी छावण्या घालून बंद केलेली आहे. जवळ गेल्याषिवाय तिचे अस्तित्व जाणवत नाही. या विहिराचा आकार अष्टोकोणी असून त्यात खाली उतरण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. येथील पाणीही पिण्यासाठी खूपच सुंदर आहे. याचं विहिरीवर पाणी साठविण्यासाठी एक दगडी कुंड आहे.

सोमेश्वर तलाव (सोमाळे) हा तलाव पन्हाळगड चा पूर्व बाजूला प्राचीन आहे. याचा उल्लेख करवीर महात्म्य ग्रंथात आहे. हा तलाव पन्हाळा वरील सर्वात मोठा तलाव आहे.या तलावाची घाटाची बांधणी यादवकालीन आहे. यावर एक शिलालेख होता तो सध्या कोल्हापूर मुझीयम मध्ये आहे. या तलावाच्या पाण्यावर चाक्रवाका व राजहंस यासारखे पक्षी विहार करीत असल्याचे पर्णाल पर्वत ग्राहणाख्यान या शिवकालीन ग्रंथात आला आहे.