आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 4, 2011

नवरात्र


नवरात्र मी काढलेल्या रांगोळ्या

अश्विन नवरात्र  DSCF1103बुध बृहस्पति  कमळरांगोळी  DSCF1109

DSCF1884  DSCF1131

DSCF1983

सार्थ महालक्ष्मी स्तोत्रम्

सार्थ

|| महालक्ष्मी स्तोत्रम् ||

श्रीगणेशाय नम: |

जय पद्मपलाशाक्षी जय त्वं श्रीपतिप्रिये |
जय मातर्महालक्ष्मी संसारार्णवतारिणी ||१||

महालक्ष्मी नमस्तुभ्यं सुरेश्र्वरी |
हरिप्रिये नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं दयानिधे ||२||

पद्मालये नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं च सर्वदे |
सर्वभुतहितार्थाय वसुवृष्टिं सदा कुरु ||३||

जगन्मातर्नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं दयानिधे |
दयावती नमस्तुभ्यं विश्र्वेश्र्वरी नमो S स्तु ते ||४||

नम: क्षिरार्णवसुते नमस्त्रैलोक्यधारिणी |
वसुवृष्टे नमस्तुभ्यं रक्ष मां शरणागतम् ||५||

अर्थ – कमल पाकळीप्रमाणे डोळे असणारीचा जयजयकार !श्रीपती (विष्णू) च्या प्रियतमेचा जयजयकार ! माता महालक्ष्मी – जी संसाररूपी सागरातून तारुन नेते – तिचा जयजयकार असो.||१||

हे महालक्ष्मी, तुला नमस्कार, हे देवांच्या स्वामिनी, तुला नमस्कार, हे हरीच्या प्रियतमे,
तुला नमस्कार आणि दयेचा निधीआशा तुला नमस्कार असो ||२||

हे कमळात निवास करणारी, तुला नमस्कार, हे सर्व काही देणाऱ्या देवी, तुला नमस्कार.
सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी तू सदैव धनाचा वर्षाव कर. ||३||

हे जगताच्या माउली, तुला नमस्कार. हे दयेचा निधी (अशा)तुला नमस्कार.
दया हाच स्वभाव असलेल्या तुला नमस्कार तसेच विश्र्वाच्या स्वामिनी, तुला नमस्कार. ||४||

हे क्षीरसागराच्या कन्यके, तुला नमस्कार. हे तिन्ही लोक धारण करणारी, तुला नमस्कार.
हे धनाची वर्षा करणारी, तुला नमस्कार. शरण आलेल्या माझे तू रक्षण कर. ||५||

%d bloggers like this: