आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 31, 2011

अभयारण्य

क्रुगर अभयारण्य (Kruger ) – दक्षिण आफ्रिकेतील ट्रान्स वालच्या परिसरात १९,४८५ चौरस किमी क्षेत्रात पसरलेलं हे अभयारण्य आफ्रिकेतील वन्य जीवनाचं प्रतीक च आहे. जिराफा चित्ता पांढरा गेंडा मगर हे प्राणी येथे मोठ्या प्रमाणात दिसतात.नैसर्गिक गुहा व साकव आढळतात.

सेरेंगेटी अभयारण्य (Serengeti ) – आफ्रिकेतील टांझानिया येथील हे अभयारण्य प्रसिध्द आहे.प्राण्यांच्या स्थलांतराकरिता आणि भक्ष्य शोधकार्याकरिता ! झेब्रा, हत्ती ,काळा गेंडा, जिराफ, विविध जातीची हरणं व पक्षी पाहावयास मिळतात. टांझानियातिल कराटू या गावातून या अभयारण्यात जाण्याचा रस्ता आहें

लोएंगो अभयारण्य (Loango ) – आफ्रिकेतील एक छोटासा आणि अपरिचित असा देश म्हणजे ग्येबोन. या देशाचा ७० टक्के भाग जंगालात व्यापलेला आहे. छोट्याशा गेबोन मध्ये हे लोएंगो हे अभयारण्य आहे. अज्ञात असलेले हे अभयारण्य तिथे आढळणाऱ्या वन्यसृष्टी मुळे प्रकाश झोतात येत आहे. या अभयरण्यात गोरिला , चिपांझी, हत्ती असे अनेक पशुपक्षी पाहण्यास मिळतात. अभयरण्यात संपन्न सांस्कृतीक आर्थीक वारसा लाभला आहे .

%d bloggers like this: