आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 6, 2011

दसरा

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर दक्षिणायन शरद ऋतु १० गुरुवार
तसेच आक्टोबर ६ .१० .२०११ तारीख ला दसरा आहे.
दसरा च्या सर्वांना शुभेच्छा !

DSCF0651  DSCF1130

DSCF1991  DSCF1993

सार्थ महालक्ष्मी स्तोत्रम्

सार्थ
|| महालक्ष्मी स्तोत्रम् ||
श्रीगणेशाय नम: |

पांडित्यं शोभते नैव न शोभिन्ति गुणा नरे |
शिलत्वं नैव शोभेत महालक्ष्मी त्वया विना ||१२||

तावव्दिराजते रूपं तावछ्चीलं विराजते |
तावग्दुणा नराणां च यावल्लक्ष्मी: प्रसीदति ||१३||

लक्ष्मी त्वयालंकृतमानवा ये पापैर्वित्का नृपलोकमान्या:
गुणैर्विहिनागुणिनो भवन्ति दु:शीलीन: शीलवतां वरिष्ठा: ||१४||

लक्ष्मीर्भूषयते रूपं लक्ष्मीर्भूषयते कुलम् |
लक्ष्मीर्भूषयते विद्दां सर्वाल्लक्ष्मीर्विशिष्यते ||१५||

लक्ष्मी त्वग्दुनाकीर्तनेन कमला भुयात्पलं जिह्मतां |
रुद्राद्दा रविचंद्रदेवपतयो वत्कुं च नै क्षमा: |

अस्माभिस्तव रुपलक्षनगुणान्वत्कुं कथं शक्यते |
मातर्मा परिपाहि विश्र्वजननि कृत्वा ममेष्ठं द्रुवम् ||१६||

अर्थ – हे महालक्ष्मी ! तुझ्याशिवाय विव्दत्तेला शोभा येत नाही,
मनुष्याच्या गुणांना पण शोभा येत नाही आणि त्याच्या
शिलाला पण शोभा नाही . ||१२||

जो पर्यंत लक्ष्मीचा कृपाप्रसाद आहे तो पर्यंतच
मनुष्याचे शील, गुण आणि रुप या गोष्टींचा गौरव होतो. ||१३||

हे लक्ष्मी ! तुझी कृपा ज्यांच्यावर होते ते लोक पापांपासून
मुक्त होतात आणि राजा व प्रजा यांना प्रिय होतात. गुण अंगात
नसलेला सुध्दा गुणवान होतात, तर शीलहीन लोकही श्रेष्ठ असे
शीलवान होतात. ||१४||

रूप कुळ आणि विद्दा या गोष्ठी लक्ष्मी मुळेच भूषविल्या जातात ,
म्हणूनच लक्ष्मी चे स्थान हे सर्वोपरि आहे. ||१५||

लक्ष्मी, तुझ्या गुणांचे वर्णन करता करता कमला लाजून क्षणमात्र
स्तब्ध झाली. रुद्रू आदिकरून, सूर्य चंद्र देवराजइंद्र हे सुध्दा वर्णन करू
शकत नाहीत. मग तुझे रुप गुण यांचे वर्णन करणे आम्हाला कसे बरे
शक्य होईल ? तरी आई विश्र्वमाउली, तू माझे चिरंतन स्वरूपाचे कल्याण
कर आणि मला तारून ने. ||१६||