आपले स्वागत आहे!

श्रीविष्णुच्या आरत्या

१ आवडी गंगाजळें देवा न्हाणीलें | भक्तीचें भूषण प्रेमें सुगंध अर्पिलें ||१||
अहं हा धूप जाळुं श्रीहरीपुढें | जंव जंव धूप जळे तंव तंव देवा आवडे ||२||
रमावल्लभदासें अहंधूप जाळिला | एकारतिचा मग प्रारंभ केला ||३||

२ सोहं हा दीप ओवाळुं गोविंदा | समाधी लागली पाहतां मुखारविंदा ||१||
हरिख हरिख होता मुख पाहतां | चाकाटल्या हया नारी सर्वहि अवस्था ||२||
सभ्दावालागीं बहु हा देव भुकेला | रमावल्लभदासें अहं नैवद्द अपिंली ||३||

३ फळ तांबूल दक्षिणा अर्पिला | तयाउपरी निरांजनें मांडीलीं ||१||
आरति करूं गोपाळा | मी तुपण सांडोनि वेळोवेळां ||धृ o ||
पचप्राण पंचज्योति आरती उजळली | द्द्श्य हें लोपलें तया प्रकाशातळीं ||२||
आरती प्रकाशें चंद्र सूर्य लोपले | सुरनर सकळीक तटस्थ ठेले ||३||
देव भक्तपण न दिसे कांही | ऐशापरी दास रमावल्लभ पायीं ||४||

४ करुणाकर गुणसागर गिरिवरधर देव लीला नाटकवेष धरिला स्वभावें ||
अगणित गुनलाघव हें कवणाला ठावें | व्रजनायक सुखदायक काय कीं वर्णावें ||१||
जय देव जय देव जय लक्ष्मीरमणा आरती ओवाळुं तुजनारायणा || धृ o ||
वृंदावन हरिभवन नूतन तनु लाभे | वक्रांग श्रिरंगे यमुनातट शोभे |
मुनिजनमानसहारी जगजीवन उभे | रविकुळ टिळक दास पदरज त्या लाभे ||
जय देव जय देव जय लक्ष्मीरमणा ||२||

यावर आपले मत नोंदवा