आपले स्वागत आहे!

कहाणी

व्यास : लोक पुरुषोत्तमाची भक्ती करायला लागले.त्यांची पापं नष्ट झाली. त्यांचं जीवन फुललं.त्यांच्या इच्छा फळाला आल्या.असतो अधिकमास पुण्यमास ठरला. आता त्याची कहाणी ऐकुया.

गुणसुंदरीचं भाग्य

दृढधन्वा नावाचा राजा होता.हैहय हे त्याचं राज्य. त्याला एक राणी होती.तिचं नाव गुणसुंदरी. दोघही गुणवान, रूपवान होते.राज्यात सुख-शांती-समृद्धी होती.अशी समृद्धी पण विनाशास कारणीभूत ठरते. राजाला नेहमीच शंका यायची.एवढं सुख आपल्याला कसं बरं मिळालं ? जगात दु:खी लोक आहेत.त्यांना  वेगवेगळ्या व्यथा आहेत.आज आपण सुखी आहोत.कदाचित उद्दा दु:खी असू;असं तर होणार नाही ना ?

वरील विचार मनात यायचे.राजा दु:खी व्हायचा.त्याचं मन त्याला खायचं. राणी त्याची समजूत घालायची, म्हणायची.” आतातरी आपण सुखी आहोत ना ? उद्दाचा विचार कशाला ? मात्र राजाचं विचारचक्र चालूच असायचं. तो आपल्याच मनाशी स्वप्न बघायचा ! आपल्याच वाट्याला एवढं सुख का यावं ? लोक तर भयंकर दु:खी आहेत. त्यांना खायला नाही.प्यायला नाही,मग आपणच सुखी कसे ?

राजाला वाटलं, आपण आज शिकारीला जावं. बंदूक घेतली.राजा घोड्यावर बसला.पुढे जंगलात जाऊ लागला. तो बराच दमला.त्याला पुढे तलाव दिसला.तलावात स्वच्छ पाणी होतं.आजूबाजूला झाडं होती. झाडांवर वेगवेगळे पक्षी होते.त्यांचं गुंजन सुरु होतं.राजा घोड्यावरून उतरला.तलावाच्या काठी बसला. राजाचं विचारचक्र चालूच होतं.तेवढ्यात झाडांवरील पोपट बोलू लागला.
“राजा,कसलं तुमचं वैभव ! हे वैभव इंद्रियाचं आहे.त्याचं हे सुख आहे.ते सुख आत्म्याचं नाही. आत्म्याचं सुख वेगळं असतं.ते सुख मनाला शांती देतं.मनाची शांती मोठी असते.दान करा,धर्म करा. त्यानं मनाला शांती मिळेल.तुम्हाला सुख लाभेल,परमार्थ घडेल,पुण्य घडेल.पुढील जन्मी ते तुम्हाला उपयोगी येईल.”

राजा खुष झाला.पोपटाचा उपदेश त्याला पटला.त्याचं मन सुखावलं.पोपट उडून गेला.राजा घोड्यावर बसला. राजधानीत आला.त्यानं अंत:पूर गाठले.राणीची भेट घेतली.एकांतात तिला हकीगत सांगितली. राणीलाही पोपटाचा उपदेश पटला. ” राणी, हे आपलं भाग्याच ! पोपटानं खरं सांगितलं. आपण चैन करतो,चैन म्हणजे मनाची शांती नाही. ते खरं सुख नाही.पोपट शहाणा आहे.त्यानं आपल्याला उपदेश केला.तो का बरं केला असेल ? ”

राणीचे विचार सुरु झाले.राजासारखीच ती विचार करू लागली. दिवसामागून दिवस गेले.बराच काळ लोटला.एक दिवस चमत्कार घडला. राजाचे विचार सुरुच होते.तो सिंहासनावर बसला होता.अचानक वाल्मीकी ऋषी आले. पहारेकऱ्यानं वर्दी दिली.राजानं त्यांना राजवाड्यात आणलं, त्यांचं स्वागत केलं. राणीलाही आनंद झाला,तीही सोबत येऊन बसली.तिचे विचारचक्र चालू झाले.
अचानक ती वाल्मीकींना म्हणाली, राणी : ” एवढा वैभव कसं बरं मिळालं असेल ? ते आम्हाला खुपतं.त्याचं दु:ख आम्हाला
सलतं, पोपटानं ते राजाला सांगितलं.राजानं ते मला सांगितलं.

वाल्मीकी ऋषी : राणी,जरा शांत व्हा. विचार करायला वेळ द्दा. राजा-राणी ऋषीं पुढं बसली. मुनींनी ध्यानधारणा केली.तिचा त्याला उबग आला.वाल्मीकी ऋषी पुढे बोलू लागले. ” राजन, तुमच्या पुण्याईचं हे फळ आहे.पूर्वपुण्याचं हे प्रतीक आहे.पूर्वण्याईचं फळ फार मोठं असतं.”

मुनींनी त्याबात एक कहाणी सांगितली –
प्राचीन काळी द्रविड देशात ताम्रपर्णी नावाची नदी वाहत होती.त्या नदीकाठी एक आश्रम होता. तिथले तुम्ही मूळचे रहिवासी. तेव्हा तुमचं नाव होतं,सुदेव व पत्नीचं गौतमी.दोघेही आनंदात रहात होता. बरेच दिवस झाले.पोटी संतान नव्हतं. म्हणून तुम्ही दु:खी झालात. मग तुम्ही विष्णूची आराधना केली. तेव्हा विष्णुदेव प्रसन्न झाले.” पुत्र संतान सोडून इतर काहीही मागा.” असं ते म्हणाले.तेव्हा गरुडानं मध्यस्थी केली.गरुड म्हणाला,” देवा ! भक्ताची इच्छा पुरी करा. त्यातच तुमचा मोठेपणा आहे.तुमचं महत्व आहे.त्याना तुम्ही पुत्रसंतान द्दायला हवं .”

भगवान ‘ तथास्तु ‘ म्हणाले, ” पुत्रसुख अन् पुत्रशोकदेखील ! ” काही दिवसांनी ‘ गौतमीला ‘ पुत्ररत्न झाले.त्याचं नाव शुकदेव ठेवलं.शुकदेव हुशार अन् सुंदर सद्गुणी होता.दिवसामागून दिवस गेले.शुकदेव मोथा झाला. खूप शिकला. एके दिवशी फिरत-फिरत तो नदीवर आला.नदीला भरपूर पाणी होतं.त्याला पोहायची इच्छा झाली.तो पाण्यात शिरला.पोहू लागला;पण कर्म आड आलं.एके ठिकाणी खूप खोल पाणी होतं.पोहत पोहत तो तिथं आला.पाण्यात बुडाला अन् मरण पावला. गावात वार्ता पसरली.गौतमी-शुकदेव नदीतीरावर आले.पुत्र मेलेला दिसला.बाळाला त्यांनी मांडीवर घेतलं. ते शोक करीत बसले.पावसास सुरुवात झाली.त्यांच्या उपवास होता.

अधिकमासाचं व्रत त्यांनी केलं होतं.पुरुषोत्तमाची भक्ती घडली.ते पुण्यकर्म होतं. पुरुषोत्तम प्रसन्न झाले.त्यांनी शुकदेव यास जीवदान दिलं.शुकदेव-गौतमीस वर दिला. पुढील जन्मी तुम्ही राजा-राणी व्हाल !

अशी तुमची पुण्याई ! पूर्वजन्मी तूनही पुण्य केलं. त्याचं तुम्हाला फळ मिळालं.मी तुमचा पूर्वजन्मीचा पुत्र ! माझं नाव शुकदेव | ” पोपट म्हाणाला, अधिक महिना आहे. तुम्ही आता स्नान-दान करा. पुण्य करा.तुम्हालाही सुख-शांती व समाधान लाभेल ! ”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: