आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 3, 2012

श्री ब्रह्मचैतन्य प्रवचने ३ नोव्हेंबर

                                                 ॐ
                              श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर
                                   प्रवचने ३ नोव्हेंबर
विषय मनात आले की भगवंताची आठवण करावी.
‘ भगवंता, माझा भोग बरा कर, ‘ असे आपण जर त्याला
म्हटले नाही, तर त्याच्या स्मरणाची जाणीव आपल्याला होईल.
भगवंताच्या स्मरणात आनंद आहे. आनंदाची जाणीव झाली की
दु:खाची जाणीव कमी होईल. अनुसंघाने जे काय साधायचे ते हेच.
भगवंताच्या आड येते त्याची पर्वा करु नये. भिक्षा मागण्याचा जरी
प्रसंग आला तरी भगवंताचे अनुसंधान सोडू नये. घरादाराला रात्रीच्या
वेळी आपण पाहारा ठेवतो. चोर येतील त्या वेळेस सावध राहातो.तसेच
संधिच्या वेळेस भगवंतापासून दूर होऊ नये म्हणजे झाले. वेळेला सावध रहाणे
ज्याला साधत नसेल त्याने अखंड सावध राहावे. विषय मनात आले की तिथे
भगवंताची आठवण ठेवून द्दावी. ‘ अंते मति: सा गति: ‘ अशी आपल्यात म्हण आहे.
जन्मात जे केले नाही ते मृत्यु च्या वेळेला कसे आठवता येईल ? एवढ्याकरिता
भगवंताचे अक्षंड स्मरणात राहावे.
भगवंताचे नाम हे औषध समजावे. भगवंताची प्राप्ती हे त्याचे फल.
औषध मात्र थेंब थेंब आणि सतत पोटात गेले पाहिजे. नामस्मरण
जर शेवटपर्यंत चालू राहिले तर तो ‘ योगच ‘ आहे; आणि
‘ एकाशी ‘ योग साधणारा तो योगी समजावा

DSCF3225.DSCF3226

श्री यंत्र मंदिर

माझ्या चुलत बहिणी सौ राजेश्वरी (ज्योस्तना) व शैलजा धाट
श्री यंत्र मंदिर डाकोर येथे त्या गेलेल्या आहेत. त्यांनी श्री यंत्र
मंदिर याचे छायाचित्र फोटो मला पाहण्या करता पाठविले आहेत.
त्यांना श्री यंत्र मंदिर पाहतांना माझी त्यांना आठवण आली झाली.
ताई श्री यंत्र काढते ह्या साठी.मला पण हे समजल्या नंतर व
श्री यंत्र याचे फोटो छायाचित्र पाहिल्या नंतर खूप मस्त व
श्री यंत्र व मी ह्याची आठवण ह्या बद्दल बध्दल अभिमान वाटला !

    

%d bloggers like this: