आपले स्वागत आहे!

                                       ॐ
                     श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर
                              प्रवचने नोव्हेंबर २३
भगवंत कल्पनेच्या पलीकडे आहे.
मनुष्याचा स्वभावच असा असतो की, आपल्या कल्पनेत जेवढे
येते तेवढेच आपण सत्य मानतो. पण आपली कल्पनाच किती
संकुचित असते, याचा कोणी विचार करीत नाही. जो कल्पनेच्या
पलीकडे आहे, जिथे कल्पना थांबते, ज्याला कल्पना बांधू शकत नाही,
त्याला कल्पनेने कसे ओळखता येईल ? जो ज्ञानाच्या पलीकडे राहिला आहे
त्याला माझ्या तोकड्या ज्ञानाने कसे अजमावता येणार ?
माझ्या बुद्धीच्या पलीकडे तो आहे. तेव्हा त्याच्या इच्चेनेच त्याचे खरे
ज्ञान होणार आहे. अविद्दा ती हीच की, आपल्या कल्पनेने ज्ञान खरे मानणे.
या करीता श्रध्दा आणि कल्पना यांतला फरक ओळखावा.खरी श्रध्दा तीच
की जी कल्पनेच्या पलीकडे राहते.

DSCF3225 DSCF3226

यावर आपले मत नोंदवा