आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 25, 2012

कोइमतूर

                      ॐ

ख्रिसमस च्या पूर्वसंध्येच्या रोषणाई आणि झगमगटाने देश भरात

आनंदाची लहर उसळली

कोइमतूर येथील इरोड मधील

सीएसआय चर्च वर अशी सजावट करण्यात आली आहे.

 

      DSCF3522

श्रीदत्त दर्शन ५

                                 ॐ
श्रीदत्त दर्शन
आपल्या भारतात जे अनेकानेक धार्मिक संप्रदाय आहेत त्यात
‘ दत्तसंप्रदाय ‘ हा एक प्रमुख संप्रदाय मानला जातो.यालाच
‘ अवधूत संप्रदाय ‘ असेही संबोधिले जाते. ‘दत्तात्रेय ‘ हे या
संप्रदायाचे आराध्य दैवत होय !
सनातन भारतीय संस्कृती ही प्रतीकात्मक आहे आणि म्हणून च
प्रतिकात्मता हे तिचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य सांगता येईल.
ही प्रतिकात्मकता पारमार्थिक जीवनाच्या आचारात आणि
विचारात द्रुष्टोत्पत्तिस येते त्याच प्रमाणे सर्वसमावेशकता हे
सुध्दा तिचे एक ठळक वैशिष्ट्य आहे.
अस्तित्व अबाधित –
भारतीय संस्कृती चा उगम थेट वेदकाळात झाला नसून तिने
प्रसंगी विविध वलणे घेतलेली दिसून येतात.त्याला कारण या
संस्कृतीचा आधारभूत असलेला धर्म हिंदूधर्म संकुचित किंवा
मयादित पातळीवर कधीच स्थिर राहिला नाही.सर्वसमावेशकता
त्याच्या ठायी असल्यामुळे आजपर्यंत अनेक आक्रमणे गंडातारे आघात-
प्रत्याघात होऊन ही हिंदू धर्माचे अस्तित्व कधीच लोप पावले नाही .
हिंदू धर्म नव्हे वैदिक धर्म –
वास्तविक ‘ हिंदूधर्म असे नामकरण कालौघात झाले असून ‘ वैदिकधर्म ‘
असेच प्रथमपासून त्याला संबोधण्यात आले आहे.
यातून पुढे जे अनेक पंथ संप्रदाय अणि विचारधारा उदयास आल्या
त्या सर्वांना आपल्या मूलस्त्रोतात सामावून घेऊना तो संरुध्द होत गेला.
समन्वयाची धारा – या श्रेष्ठ परंपरेतूनच उदयला आलेली महाराष्ट्रातिल
भक्ती परंपरेची एक सनातन आणि बरिचशी समन्वयवादी धारा
म्हणजेच ‘ दत्तसंप्रदाय ‘होय.
सर्वात प्राचीन व लोकाभिमुख संप्रदाय –
उपनिशत्काला पासून भारतीय जीवनात उपासनामर्गाला
एक अनन्यसाधारण महत्व प्राप्त असून या उपासनेच्या
विविध प्रकारातून च वेगवेगळा संप्रदायांचा उगम झालेला
दिसून येतो.त्यापैकी ‘ दत्त्संप्रदाय ‘ हा सर्वमत प्राचीन व
लोकाभिमुख असा लोकप्रिय संप्रदाय असून उपनिषद् कारांनी
‘ विश्र्वगुरु ‘म्हणून यथार्थं पणे गौरविलेले प्रभु ‘ दत्तात्रेय ‘
हे या संप्रदायाचे एकमेव दैवत होय !

DSCF3507 DSCF2827

जन्मकथा नाताळ गोठ्याची !

                                                          ॐ
जन्मकथा नाताळ गोठ्याची !
गेली दोन हजार वर्षे श्रध्दावंत ख्रिसमस हा येशू चा जन्मदिन
मोठ्या उत्साहाने सागरा करत आले आहेत.नाताळ ख्रिसमस
25डिसेंबर २५ डिसेंबर ला सागरा केला जात असला तरी
२४ डिसेंबर चा मध्यरात्रीचा धर्मविधी महत्वाचा असतो.
ख्रिस्त मंदिरात धार्मिक विधिव्यक्तिरिक्त नाताळ सण साजरा
करताना ख्रिस्ती घरोघरी अनेक परंपरा पाळल्या जातात.
गच्ची वर शुभ्र तारा लावणे ख्रिसमस वृक्ष उभारणेगोड पदार्थ तयार करणे.
गोठा बनवून तिथे साकारलेला येशू च्या जन्म रूपाचा देखावा करणे.
यांच्या मूर्ती ठेवल्या जातात.-
अवती भवती गाय बैल गाढव शेळ्या -मेंढ्या ठेवल्या जातात.
बेथलेहेम मधील गाव ,डोंगर दऱ्या नदी घरे समावेश करतात.
गोठा बनविण्याची प्रथा पहिल्या शतका पासून सुरु झाली.
देवपुत्र येशू चे व परंपरे नुसार मारिया माता व पिता योसेफ
यांच्या सोबत बाळ येशू यांच्या मूर्ती ठेवल्या जातात.
आज जगभर प्रसिध्द असलेल्या नाताळ अनावलेल्या गोठ्याचा संत
फ्रान्सिस हाच जनक !ज्या हेतूने त्यांनी बेथलेहेम मधील
येशूने जन्म घेतलेल्या गाईचा गोठ्याची प्रतिकृती बनवून
ख्रिस्ती श्रध्दावंत यांना तारणमय घटनेचा अनुभव देण्याचा प्रयत्न केला.
तोच अनुभव आजही ख्रिस्ती जन घरोघरी
बनवलेल्या गोठ्याव्दारे घेतात.

           

DSCF3518DSCF3484

DSCF3482 DSCF3481

येशू

                       ॐ
खिसमस दिन येशू चा जन्म दिवस
25 .12. 2012 साल २५.१२.२०१२ साल ला
येशूचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो.होतो.
25 डिसेंबर २५ डिसेंबर

मेरी ख्रिसमस असे म्हणातात.

DSCF3484 DSCF3485

DSCF3481 DSCF3482

%d bloggers like this: