आपले स्वागत आहे!

श्रीदत्त दर्शन ११

                                     ॐ
श्रीदत्त दर्शन
दत्तात्रेयांचे अवतार –
एकूण सोळा अवतार दत्तत्रेयांनी घेतले असे भाविक मानतात.
दत्तसांप्रदा यिक श्रिपादश्रीवल्लभ यांना व नरसिंह सरस्वतीं ना
इतिहास काळातील अनुक्रमे पहिले आणि दुसरे अवतार मनतात.
दासोपंतांना सतरावा अवतार मानण्यात येते.इतकेच नव्हे तर अल्ललकोट
स्वामी महाराजां ची आणि माणिकप्रभूं चिही दत्ता अवतारातच गणना होते.
दत्तात्रेयांचे सोळा अवतार असे –
१ योगिराज २ अत्रिवरद ३ दत्तात्रेय ४ कालाग्निशमन ५ योगिजनवल्लभ
६ लीलाविश्र्वंभर ७ सिद्धराज ८ ज्ञानसागर ९ विश्र्वंभर १० माया मुक्त
११ मायामुक्त १२ आदिगुरु १३ शिवरूप १४ देवदेव १५ दिगंबर
१६ कृष्णश्याम कमलनयन ह्या सोळा अवतारां च्या
जन्मकथां चा संस्कृत ग्रंथ श्रीवासुदेवानंद सरस्वतीं नी सिद्ध केला आहे.
दत्तत्रेयाचे चोवीस गुरु –
‘ भागवता च्या एकादश स्कंधात विशद करुन सांगितलेले
दत्तात्रेयांचे चोवीस गुरु दत्तसामप्रदायिकां नीही मान्य केले आहेत.
‘ जो जो जयाचा घेतला गुण | तो तो म्यां गुरु केला जाण ‘
असे एकनाथांनी म्हटले असून भागवत करांनी या चोवीस
गुरुं चा उल्लेख ज्या श्र्लोकात केला आहे तो असा –
‘पृथिवीवायुराकाशमाषो s ग्निश्र्चचन्दमा : |
कपोतो s जगर : | सिन्धु : पत ड्.गो मधुकृत् गज : ||
मधुहा हरिणो मीन : पीड्.गला कुररो s र्भक : |
कुमारी शरत्कृत्सर्प उर्णनामी सुवेशकृत : || ‘
सहिष्णुता, धैर्य, परोपकार,पृथ्वी, पर्वत,वृक्षापासून.
अनासक्ती, वैराग्य, अलिप्तता,वायु,आकाश देहापासून .
स्निग्धता व माधुर्य पाण्यापासून.
तेजस्विता,मलनाश अग्निपासून.
दुर्गुणांचा परिहार व सद् गुणां चा उदंड व व्यवहार सूर्यापासून.
स्त्रीसंगाचा त्याग, कपोत,पतंग हत्ती हरणापासून.
यदृच्छालाभसंतोष, अजगरापासून.
अक्षुब्धता, प्रसाद,गांभीर्य, लाभालाभ, समानदृष्टी, समुद्रापासून.
असंग्रह,अपरिग्रह माशी, मधमाशी, कुरर सर्पापासून.
स्वावलंबनाने स्वोध्दार पिंगळेपासून.
एकांतरुची कुमारिकेपासून.
खाद्दपेयासंबंधाने संयम माशापासून.
एकांतिक एकाग्र ध्यान इषुकार भिगुरषेपासून.
कर्त्या संहर्त्या इष्र्वराचे ज्ञान कोळी, कांतीणीपासून .
मानापनाची समानदृष्टी बालकापासून .
असे चराचर गुरुं कडून दत्तात्रेय यांनी गुण मिळविले .

DSCF3507 DSCF2808

Comments on: "श्रीदत्त दर्शन ११" (1)

यावर आपले मत नोंदवा